Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Pandit Warade

Horror


2  

Pandit Warade

Horror


ती वाट बघत्येय-४

ती वाट बघत्येय-४

3 mins 110 3 mins 110

आठ दिवसाच्या माहेरवासानंतर शुभांगी शुभम सोबत आली होती. नेहमीप्रमाणे शुभम ऑफिसला जायला लागला. शुभांगी घरची कामे करून दुपारी वाचन करायची. परंतु आजकाल तिचे वाचनात मन लागत नव्हते. तिला सारखीच बालम टेकडीवरच्या मैत्रिणीची आठवण यायची आणि ती उदास व्हायची. दिवसेंदिवस ती निराश राहू लागली. शुभम घरी यायच्या वेळेस मात्र बळेबळेच प्रसन्नतेच्या प्रयत्नात असायची.


एक दिवस शुभम घरी आला. नेहमीप्रमाणे त्याला शुभांगी जरा निराश दिसली. तिच्या प्रसन्नतेसाठी सिनेमाला जाण्याचे त्याने निश्चित केले. जेवणदेखील बाहेरच करण्याचे ठरवले. दोघेही थिएटरला गेले. पारिवारिक कथा असलेला विनोदी सिनेमा असल्यामुळे बऱ्यापैकी मनोरंजन झाले. घरी परत येताना एका हॉटेलमध्ये दोघांनी जेवण केले. आठेक दिवस मजेत गेल्यावर पुन्हा एक दिवस रात्री तिला स्वप्न पडले. स्वप्नात तीच स्त्री होती, भेटीला येण्यासाठी तिला आग्रह करत होती. शुभमने बघितले, शुभांगी झोपेत कुणाशी तरी बोलत होती. त्याने तिला हलवून जागे केले, स्वप्नाबद्दल विचारले. तिला काहीही आठवत नव्हते. 'ती काही लपवत तर नाही ना?' त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. परंतु तिचा निरागस चेहरा पाहिल्यावर त्याला स्वतःच्या मनात आलेल्या विचाराबद्दल अपराधी भाव येऊन गेला. ती अगदीच शांत आणि निर्विकारशा चेहऱ्याने, जसे काही घडलेच नाही हा भाव डोळ्यात ठेऊन त्याच्याकडे बघत होती.


दुसऱ्या दिवशी शुभमच्या ऑफिसला काही कारणाने सुटी होती. तिला घेऊन तो एका डॉक्टर मित्राच्या हॉस्पिटलला गेला. दुपारची वेळ असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये पेशंट नव्हते. डॉक्टर रमेश एकटेच बसलेले पाहून शुभमला बरे वाटले. खूप दिवसांनी भेटले होते. दोघांनी निवांत गप्पा मारल्या. जोडीने आले असल्यामुळे डॉक्टरने घरी जाण्याचा विषय काढला तेव्हा, शुभमने तिला बाहेर थांबवलं. तिच्या आजाराबद्दल दोघांमध्ये चर्चा सुरू झाली.


"हं! बोल शुभम काय म्हणतंय तुमचं वैवाहिक जीवन? आमच्या वहिनी रुळल्या की नाही इथल्या वातावरणाला?" डॉक्टर रमेशने मूळ मुद्द्याला हात घातला.


"अरे यार, ती एकदम मस्त रुळली होती इथे पण..." शुभम बोलू की नको या द्विधा मनःस्थितीत अडकला होता.


"पण काय? काही अडचण आहे का? काही शारीरिक, लैंगिक त्रास?" डॉक्टरला शरीर आणि त्याच्या आजाराच्या पुढे कसे जाता येईल?


"नाही रे तसला कुठलाही त्रास नाही. परंतु गेले काही दिवस ती थोडी मानसिक तणावात वावरते आहे. बरं तिनं तणावात राहण्यासारखं काही कारणही मला दिसत नाही." शुभमने खुलासा केला.


"तुझ्याकडून तिच्या मनाविरुद्ध तर काही वर्तन घडत नाही ना? म्हणजे काय असतं स्त्रियांचं भावविश्व पुरुषांपेक्षा जरा वेगळंच असतं. अगदी छोटी छोटी गोष्टही त्यांच्या मनाला दुखवू शकते." डॉक्टर स्त्रियांचे मानसशास्त्र समजावत होते.


"माझ्या समजुतीप्रमाणे एकमेकांचा अपेक्षाभंग होईल असे आमचे दोघांचेही वर्तन होत नाही. तरी असे का होत असावे? पूर्वायुष्यातल्या समस्या तर नसतील ना काही?" शुभमची शंका.


"असू शकते. तसेही काही असू शकते. चल आपण घरीच जाऊ या. म्हणजे दोघी एकमेकींशी मोकळ्या गप्पा मारतील, मन मोकळे करतील." असे म्हणून डॉक्टरने घरी फोन करून शुभांगीला घेऊन शुभम आल्याचे सांगितले. मी त्यांना घेऊन घरी येतो आहे, जेवण करूनच जातील असे सांगितले. हॉस्पिटल बंद करून त्याने गाडी काढली. तिघेही डॉ. रमेशच्या गाडीत घरी जायला निघाले.


गाडी डॉक्टरच्या बंगल्यावर पोहोचली. सर्वजण खाली उतरले. सरीताने, डॉक्टर रमेशच्या पत्नीने सर्वांचे हसतमुखाने स्वागत केले. सर्वजण हॉलमध्ये स्थानापन्न झाल्यावर चहापान झाले आणि गप्पा सुरु झाल्या. थोड्या वेळाने डॉक्टरने सरीताला स्वयंपाक करण्याची सूचना केली. तत्पूर्वी डॉक्टर आणि सरीता आतल्या खोलीत गेले. शुभांगीच्या सद्यपरिस्थितीबद्दल आणि शुभमला वाटत असलेल्या संशयाबद्दल चर्चा केली. गप्पांचा सूर या दिशेने असावा असे सूचित केले. जेवणाचा मेनू शुभांगीला विचारूनच निश्चित करावा असे सांगून डॉक्टर हॉलमध्ये आले. शुभांगीला घेऊन सरीता किचनमध्ये गेली.


स्वयंपाक होईपर्यंत रमेश आणि शुभमच्या गप्पा झाल्या. त्यात लग्नाच्या वाढदिवसाचीही चर्चा झाली. शुभमने वाढदिवसाच्या सहलीचा सारा वृत्तांत रमेशच्या कानावर घातला. तेथून आल्यापासूनच हे सारं घडायला लागलं हे ही सांगितलं. पूर्वायुष्यातल्या काही गोष्टींच्या स्मृतींचा तिथे उजळणी झाली असावी अशी शंकाही बोलून दाखवली. 

 

"हं! असं आहे तर! बघू यांच्या गप्पातून काय मिळतं ते. नंतर ठरवता येईल काय करायचं ते." रमेशने सांगितले. 


स्वयंपाक तयार झाल्याची सूचना सरीताने केली, तसे फ्रेश होऊन सर्वजण डायनींग हॉलमध्ये डायनिंग टेबलवर जेवायला बसले. जेवतांना सर्वजण अगदी मन मोकळ्या गप्पा करत होते. गप्पांमध्ये बालम टेकडीबद्दल विषय निघाला. त्या ठिकाणी भेटलेल्या मैत्रिणीबद्दल शुभांगीने सांगितल्यावर तिच्याबद्दल सर्वांच्याच मनात कुतूहल निर्माण झाले. पुन्हा एकदा सर्वांनी बालम टेकडीची सहल काढावी, त्या मैत्रिणीला भेटावे, तिच्याशी बोलावे, असे ठरले. जेवण उरकल्यानंतर शुभम शुभांगी त्यांच्या घरी निघून गेले.


Rate this content
Log in

More marathi story from Pandit Warade

Similar marathi story from Horror