Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Yogita Takatrao

Classics

3  

Yogita Takatrao

Classics

ती फुलराणी

ती फुलराणी

2 mins
1.3K




       मऊसर गवताळ हिरवळ, त्यावर उबदार कोवळी सूर्य किरणांची झुंबरे , ओलेत्या हिरव्या पातीच्या टोकावर हिऱ्यासम चमचमणारे दवबिंदू जणू त्या गवताच्या अंकुरांवर गालिच्या सारखे पसरलेले, सर्वत्र निसर्गाने मुक्त हस्ते रंगबिरंगी उधळण केलेली, सर्वत्र सुगंधित झाड-फुलांचा सुवास दरवळत राहिलेला. एक ताजातवाना अनुभव आसमंतात भरून राहिलेला !.......जणू एक स्वप्नवत अद्भुत,अनोखी दुनिया जणू फक्त तिच्या साठीच निर्मिलेली......ती फुलराणी दिमाखात सगळ्या सृष्टीची देखरेख करत ,एकेक फुलपाकळी,झाडी झुडपी निरखून,पारखून घेत होती. मध्येच एखादं फुलपाखरू येऊन तिच्या खांद्यावर,मनगटावर खट्याळ पणे बसून जाई. 


       ती संथपणे एका विशिष्ट लयीवर चालत आपलं निरिक्षणाचं काम चोख बजावत होती. त्या गवताच्या गालिच्याने तिच्या नाजूक पायांत काहीही टोचु न देण्याचा आटोकाट प्रयत्न चालू ठेवला होता. आणि त्यात यशस्वीरित्या पारही पडत होता....मध्ये मध्ये उंच उंच झाडं तिच्यावर फुलापानांची उधळण करत होते.....ती मान उंचावून त्यांना दाद देत होती....तिचं फुलांनी सुशोभित झालेलं अंग वस्त्र,आणि तिचं ते निसर्गदत्त सौंदर्य , काय वर्णावे ? सर्व ब्रम्हांडाला लाजवेेल अशी लावण्यवती होती ती . सर्व काही एकदम सुरळीतपणे चालू होते.........मध्येच एकदम कर्कश्शऽऽऽऽऽ आवाज येत होता....फुलराणीला कळेच ना ? हे काय अघटित घडतं आहे...? ती साऱ्या सृष्टी सह सैरभैर होऊन ईकडे तिकडे,चहुकडे पाहू लागली ,तिला काहीच सुचत नव्हतं ? हे काय प्रकरण आहे ? 


       सगळी फुलपाखरं,पक्षी,प्राणी घाबरुन तिच्या भोवती गोळा होऊन कलकलाट करू लागले,झाड,फळं,फुले,लतीका तिच्या कडे मदतीची याचना करत होते. ती गोंंधळलेली फुलराणी ह्या अफराताफरीने पार गर्भगळीत झाली. काय करू ? काय करू ? पुरेरेरेरेेरेरेरेरेेरे ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ !


       तिने त्या कर्कश्श वाजणाऱ्या अलार्मच्या घड्याळाच्या डोक्यावर टपली मारत तो नकोसा आवाज आधी बंद करून टाकला......काय रोजची कटकट आहे रे तुझी ? एक दिवस निट स्वप्नात रमू देत नाहीस....? माझ्या मनासारखं...? तिने आपल्या भेगा पडलेल्या नाजुक पायांकडे एक ओझरता कटाक्ष टाकला आणि ती परत तिच्या स्वप्नांत हरवली...!


       आज तिच्या मुलांची बस चुकणार होती...! मुलीला शाळेत सोडायला जायला उशीर होणार होता.........आज घाईघाई आणि पळता भुई थोडी होणार होती पण वास्तविक वास्तवापेक्षा तिला स्वप्नांत रमणे आवडू लागले आणि ........ती परत फुलराणी बनून वावरू लागली............यथेच्छ बागडू,फिरू लागली, तिचं आत्मिक जीवन जगून घेऊ लागली.......मग काय फरक पडतो ? एक दिवस उशीर झाला तर ?.........किंमतच नाही ठरवू शकत कोणीही...? त्या स्वप्नांची ? आणि त्या मध्ये वसणाऱ्या त्या फुलराणीची......? माझी ,तुझी आणि समस्त स्त्री जातीची आवडती !............तिच्या हक्काची स्वप्नं अधिकाराने बघून त्यात आनंदाने रममाण होणारी......तुझ्यातली .....माझ्यातली ....सर्व महिला वर्गाची .....ती फुलराणी ......!


Rate this content
Log in

More marathi story from Yogita Takatrao

Similar marathi story from Classics