Yogita Takatrao

Romance

3  

Yogita Takatrao

Romance

मोकळं आकाश

मोकळं आकाश

2 mins
1.6K


     मस्तपैकी विस्तारलेलं रात्रीचं मोकळं अफाट आकाश.....जिथे नजर जाईल ,तिथ पर्यंत न संपणारा तो आकाशाचा नजारा......लुकलुकणाऱ्या असंख्य....अगणित तारका......पौर्णिमेचा पूर्ण चंद्र......त्याच्या अवती भोवती रूपेरी-सोनेरी कडा असलेले ....मऊ लुसलुशित ढग ....एखाद्या कलाकाराने.....जीव ओतून रंगवलेले चित्रच जणू भासत होते....हे आकाशाचे काळे......देखणे....आखिव....रेखीव रूप आणि त्याच्या जोडीला ताला सुरात आवाज करत.....रात्रिच्या शांततामय वातावरणात.....मंद वाहत ऊसळलेला तो समुद्र.......त्याच्या लाटा जिथे स्पर्श करायच्या........त्या जागेला लागूनच एका पंचतारांकित हॉटेलच्या गालिच्या सारख्या बागेत......नाजूक गवतावर पहुडलेली ती.........तेवढ्याच विस्फारलेल्या मोठ्या....टपोऱ्या ......हिरव्या घाऱ्या डोळ्यांनी.....आकाश आपल्याच डोळ्यांनी मनात साठवून घेणारी ती.......आणि कानांत हेडफोनवर तिचं आवडीचे.........डार्कसाइड...हे अलान वाॅकरच चालू असलेलं गाणं म्हणजे काय वर्णावी ही परिस्थिती........अहाहा.....मस्तच.....स्वर्गच जणू.......आणि दुसरं काही नको ह्या निरामय आनंदा पेक्षा.......असंच वाटायचं तिला.......शांत....एक चित्त.....तिचं आकाश निरिक्षण चालूच होतं.......मध्ये एखादा तुुुुटता तारा दिसायचा आणि तिला वाटायचं .........आकाशच तिच्यावर तो वर्षाव करतोय..........!


      २-३ वर्षांनी ती अशी बाहेर आली होती....तिच्या कुुुटुंबियांनीच सगळी व्यवस्था करून दिली.......कारण तिच्या नवऱ्याच्या आकस्मित अपघाती मृत्यू मुळे ती पार उध्वस्त आणि उदास झाली होती.....पण सासरं...माहेर दोन्ही बाजूंच्या भक्कम आधार आणि पाठिंब्याच्या जोरावर ती,आज परत तेच आयुष्य जगत होती....जे पुर्वी ती आकाश ....तिच्या नवऱ्या बरोबर जगायची,तिच्या सासऱ्यांनी तिला एक सामान्य आयुष्य जगण्याची ताकदच दिली तिला,तुला जे हवं !...जसं हव !...तसंच तू जगायचं प्रिशा,जसं तू आकाश असताना रहायची ना ?...तसंच रहा तू बेटा !...तु माझी मुलगीच आहेस,आणि माझ्या मुलीने एक सामान्य आयुष्य जगलंच पाहिजे,.....एका विधवेच आयुष्य नाही,.....प्रिशा तर रडायलाच लागली आणि आपल्या बाबांना बिलगली...ते दोघे बाबा आणि लेक खूप रडले .....आणि सगळंच दुःख त्यात वाहून गेलं,कारण प्रिशाला बाहेर एका विधवा स्त्रीवर परंपरेच्या नावा खाली काय अत्याचार होतात ते ज्ञात होतेचं,......तिची सासु आई,तिचे आई-वडिल फारच समजुतदार होते,....म्हणुनच ती आज सामान्य झाली होती.


      ...तिचा आकाश आणि ती .......ह्या विस्तिर्ण आकाशा खाली......असेच पहुडायचे.....नुसते पहुडायचेच नाही.... लोळतं पडायचे ......गवतावर.......तासन् तास.......आज आकाश नव्हता पण त्याच्या त्या.....तेेवढ्याच अफाट...... विस्तारलेल्या सुमधूर आठवणी होत्या.....आणि तो आणि हे आकाश होतेेचं तिच्या सोबतीला......आणि.....एक आकाश गेेलंं होत....तिच्या हातावरच्या रेषांवरून पुसूून.......पण हे आकाश अजूनही होतंच तिच्या बरोबर.......आकाशमय असंख्य आठवणी........त्या आकाशात तारकां सारख्या अजूनही लुुकलुक करत होत्या आणि कायम तिच्या मनाच्या आकाशात लुकलुकत राहतील.......तिच्या मनातलं आणि तिच्या डोळ्यांतल आकाश....आकाशने भरून राहिलं होतं .........!


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance