किंकाळी
किंकाळी


आज राहुलचा पहिला दिवस होता बदली नंतरचा.......नवीन जागा.....नवीन ऑफिस......नवे शहर......आणि आताची नवी रात्र.......तो बिअरचा टिन हातात घेऊन बालकनीत बसला होता......आरामात एकेक घोट रिचवत.......जंगल समान...घनदाट झाडीत..... मध्ये मध्ये....कटाक्ष टाकत होता..........शीण घालवायचा म्हणुन त्याचं .... हे असं पक्क समीकरण ठरलेलं असायचं....!
रात्रीची भयाण शांतता........काही चुकुन पडलं तरी त्या आवाजाने दचकून माणुस भेदरून जाईल...अशी शांतता.........त्यात त्याला कुणीतरी तरी मुलगी गोड आवाजात गातेय......असं वाटलं......त्याने विचार केला......कोण एवढ्या भयानक शांततेत गात फिरेल....परत त्याने नीट कानोसा घेतला.......
नाही सोबती कोणी
रात्र एकलीच राणी
शोधते सहवास तुझा
देशील का साथ मला
.........हो गाणंच गात आहे कोणीतरी...........त्याने आवाजाच्या दिशेने नजर फिरवली........बघतो तर काय...? एक छान तयार झालेली महिला हे गाणं गात चालत होती...........घनदाट जंगलाच्या दिशेने............एकटीच.......राहुल बघतच राहिला तिच्या दिशेने.........एवढ्या रात्री ही बाई जंगलात एकटी काय करायला जाते आहे...? कारण माणसं घोळक्याने सुध्दा ह्या वेळी फिरताना आढळली नव्हती त्याला ......! पण थोड्याच अंतरावर एका माणसाची पाठमोरी आकृती दिसली त्याला...... त्या बाईच्या पाठीमागुन जाताना..........दोघे चालत चालत जंगलात दिसेनासे झाले...........आणि एक भयानक किंकाळीने त्याचे कान भरून गेला......त्याला काहीच कळत नव्हतं ....काय झालेे नक्की...? पण आपल्याला भास झाला असावा ? ......राहुलने स्वतःला मनात बोलून दुर्लक्ष केलं.....!
राहुलचा दुसरा दिवस उजाडला.......तो सगळं आटोपून ऑफिसला गेला......कामांत अख्खा दिवस निघून गेला.........तो परत रात्री बालकनीत बसला.......कालची किंकाळी विसरून गेला..........परत तेच गाणं त्याच्या कानावर आदळत होतं..........परत ती दिसली.......पाठोपाठ दुसरा माणुस.........परत ती किंकाळी.........हे कोणाला जाणवतं ..? ...की नाही ...? हे विचारायला.....त्याच्या आजूबाजूला कोणीही व्यक्ती राहत नव्हती........तिसरा दिवस.......चौथा.....पाचवा.....दहावा.........तेच सगळं चालू होतं.........आता त्याला राहवेना.......त्याने घाबरत घाबरत......आज त्या आवाजाचा पाठलाग करायचा ठरवलं.........आज तो आधीच दबा धरून बसलेला....लपून......गाणं चालू व्हायच्या आधीच.......परत ते गाणं कानावर येऊ लागले......
नाही सोबती कोणी
रात्र एकलीच राणी
शोधते सहवास तुझा
देशील का साथ मला
तो ....त्या दोन आकृत्यांमागून तिसरी आकृती बनून निघाला.........सगळे एका पाठोपाठ चालत जंगलात गेले........एवढ्यात ती बाई अचानक पाठमोरी वळली.........आणि परत एक किंकाळी आसमंतात दुमदुमली...... राहुल तिचं भयानक रूप पाहून मोठ्याने किंचाळलाच..........इकडे भुताटकी सीरियलचं शूटिंग चालू होतं.......आज कोणता भलता तिसराच माणूस किंचाळला म्हणुन तो सीन कट केला डायरेक्टरने ....आणि आजपण एका महान माणसामुळे त्यांची मेहनत पाण्यात गेली होती .......आणि राहूलने खोटं...नकली भूत होतं तर हे..... म्हणुन दीर्घ श्वास घेत उसासा टाकला................! आणि डायरेक्टरने नकोच ती सीरियल म्हणून कपाळावर हात मारून घेतला......!