मैत्र जीवांचे
मैत्र जीवांचे
ते दोघे मस्तपैकी पब मध्ये एकमेकांच्या सहवासात धमाल करत होते, छान नृत्य चाललं होतं,संगीतच असं अफलातून वाजत होत ना , की आपोआपच पावलं ठेका धरत होती........! उल्हसित वातावरणात, थोडासाच ऊजेड ,जास्तीचा अंधार.......सगळी गर्दी असूनही .....तो आणि ती.......कोणीही नाही आजुबाजूला.......फक्त तोच.........आणि.....फक्त तीच..........दोघंही त्या गजबजाटात एकमेकांच्या डोळ्यांत एकटक पाहत.........गर्दीत नाचत.......गात......हरवलेले !
सृष्टी अजून एक पेग ? जय ने तिला विचारलं......येस माय डियर ....बट व्होडका विथ ..........! हा...हा .....आय नो.......व्होडका विथ स्प्राईट.......राईट.....मॅम......?
राईट...सृष्टी म्हणाली आणि परत संगीताच्या तालावर ती थिरकत राहिली. बेधुंद,बेफिकीर,आपल्यालाच तल्लीनतेत मग्न,आपल्यालाच भावविश्वात रमलेली सृष्टी...! जयला तो तिचा पूर्वीचा दिलखुलास पणा पाहून फार समाधान मिळत असे....म्हणुनच तो तिला दर शनिवारी पब मध्ये घेऊन यायचा.....आपआपलं ऑफिसचं काम आटोपून दोघेही त्यांच्या ठरलेल्या पब बाहेर भेटायचे ......मग खाणं...पिणं...
.नृत्य.........मग मन भरलं की यथेच्छ, मनसोक्त भटकंती करून दोघेही घरी परतायचे !
मग सृष्टी घरी आल्यावर एक बायको,सुन आणि आई बनून आपल्या भूमिकेत शिरायची आणि जय एका नवरा,मुलगा आणि वडिलांच्या भूमिकेत ! एकाच घरात,एकत्र कुटुंबात राहून दोघेही एकमेकांच्या वाट्यात तसे कमीच यायचे....म्हणुनच हा जयचाच सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न !
दोघेही लग्नाच्या आधी भेटायचे तसेच भेटत.....एका प्रियकर-प्रेयसी सारखे.....एकमेकांना वेळ देत......तो आधीचा मोकळेपणा,स्वच्छंदीपणा ,प्रत्येक क्षण अन् क्षणाचा आस्वाद घ्यायची सवय.......सारं काही पुन्हा नव्याने अनुभवायची दोघं.....एकमेकांचे मैत्र जीवांचे बनून........! आणि परत त्यांना त्या शनिवारच्या पब भेटीतून ,परत आपआपल्या भूमिका चोख बजावायला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळायची.......एकमेकांच्या साथीने......विश्वासाने आणी एकमेकांना दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच........!
फार कमी जोडपी असतात, जे मैत्र जीवांचे बनून राहतात.....बाकी तर कट्टर नवरा...कट्टर बायको बनून जीवनाचे रडगाणे आणि ओझेच वाहत असतात......बघा जमेल का मैत्र जीवाचे बनून मोकळं जगायला........अहं ....पब तर एक बहाणा आहे हा मात्र....🤫🤭