Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Yogita Takatrao

Others


3  

Yogita Takatrao

Others


जेवण

जेवण

2 mins 1.4K 2 mins 1.4K

    यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही भलामोठा लवाजमा सोबत घेऊन पूर्व युरोप फिरायला गेलो होतो. इकडे भारतात गरमीने उकडून उकडून...उकडलेला बटाटा झाल्या सारखंच वाटत होत..! विमानाची तिकीटं..पंचतारांकित हाॅटेलची बुकिंग्स सगळं ६ महिन्यांपूर्वीच करून ठेवले होते. तिकडे दिवसाही ११°-१८° c तापमान असते म्हणुनच थंडीचे कपडे.....जाडे....गरम...उबदार कपडे.....ह्या सगळ्यांची खरेदी एक महिना आधीच चालू होती... हातमोजे....थंडीचे मलम.. औषधं ते सुका नाश्ता पासून....पुरणपोळी....चकली..चिवडा....सुके मेवे....ते गुजराती थेपले......सगळं काही एकूण एक वस्तू पदार्थ ते खाद्य पदार्थ सगळंच सगळयांनीच आपल्या बॅगेत कोंबलं होतं.....आम्ही एकुण ७ जोडपी आणि प्रत्येकांची आपआपली मुलं मिळून २५ जण निघालो युरोप वारीला...रोज वाट बघत ...बघत तो दिवस म्हणजे ती मध्यरात्र आली......आम्ही सगळं १० दिवसांच बिर्‍हाड बॅगेत घेऊन निघालो घरातून १२ वाजता.....ही लांबची विमान भल्या पहाटेचीच असतात...झोप येऊ नये म्हणून की काय...? सगळी सोपस्कार पार करत शेवटी चेक इन ते विमान जेथे होतं त्या गेटपाशी आलो सगळे.....आणि घुसलो एकदाचं विमानात.....ह्यात ३ तास गेले..!  


         हा चेक इन......बिक इन चा टाईमपास सोडला तर बाकी एकदम मस्त......मग आमचा विमान प्रवास झाला सुरू.......अडीच तास मुंबई ते दुबई.......आणि 2 तासांनी लगेच दुसरं विमान...ते ६-७ तासांच होत दुबई वरून युरोपला जायला.......रात्रभर.... अर्धा दिवसभर विमानाने अंतर कापून आम्ही दुपारी प्राग विमानतळावर पोहोचलो........बाहेर सामान सुमान घेऊन पोहोचलो..........एकदम कडाक्याच्या थंडीने आमचं स्वागत केलं ...की या ...या...या......या...आलात....गरमीतुन...??.......त्यात वाहता थंड वारा आणि चिरीमिरी पडणारा पाऊस.........थंडीमुळे तोंडातून येणारा वाफाळता धुर.........काय मजा घेतली त्या थंडीने आमची आणि आम्ही त्या थंडीची...... ! कुडकुडत....थरथरत्या अंगाने बसमध्ये चढलो....हाच तो पहिला अविस्मरणीय थंडीचा अनुभव.......!


         पण भारतात जेवढे लाड होतात ना...? तेवढे बाहेर युरोपियन देशात नाही होत हा...!आपल्या देशात जेवढे देशातील आणि बाहेरील अतिथींची जेवढी सुश्रुषा आणि लाड होतात ना...? ते बाहेर बिलकुल नाही होत........आपल्या भाजी...चपाती...डाळ...भातात.....जी चवीने भुक भागवण्यासाठीची ताकद आहे ना......ती अजून कुठल्याच देशाच्या जेवणात नाही....! बाहेरच जेवण ...एक...दोन दिवसच ठीक.....बाकी तिसरा दिवस.....आपल्या जेवणाची आत्मियतेने आठवण येतेच......आणि भारतीय जेवणाच्य सगळयांच पाककृती डोळ्यांसमोरून फेर धरून नाचू लागतात.....एवढे सगळे हजारो...लाखो.....जेवणाचे प्रकार अजून कुठेच नसतील........सगळ्यात जास्त आठवण जेवणाचीच आली मला.........मेरा भारत महान....आणि भारतीय जेवणही तेवढंच महान....!


Rate this content
Log in