Nutan Pattil

Comedy

3  

Nutan Pattil

Comedy

ती आणि वजनकाटा

ती आणि वजनकाटा

3 mins
388


वजन वाढले की स्त्रियांना खूपच वाईट वाटते हे प्रत्येक स्त्री ला माहिती आणि असेच वजन वाढले रुपाचे.‌ रूपा खरं तर एकदम नाजूक पण लग्नानंतर तिचे वजन वाढले आणि तिने वजन कमी करण्यासाठी केलेला अट्टहास आणि प्रयत्न. पहिले तर रूपाने ठरवले की आता डाएट करायचे आणि तिने डाएट करायला सुरुवात केली.

  दोन दिवसाचे डाएट चालू झाले भाकरी खाणे टोमॅटो ,काकडी खाणे आणि कमी तेलाचे अन्न घेणे.

    पण अचानक काय झाले की तिला बारशाचे निमंत्रण आले आणि बारशाच्या जेवणामध्ये होते. "गुलाबजामून" आणि इथेच रूपाचे डाएट फसले तिला मोह आवरला नाही आणि तिने इकडेतिकडे बघून हळूच प्लेटमध्ये भरपूर गुलाबजामून खाल्ले. झाली दोन दिवसाच्या डायवर पाणी फिरले. परत रूपा ओशाळली अन परत तिने निर्णय घेतला की आपण आता डाएट बरोबर व्यायाम करायचा. मग रूपाने ठरवले की आपण दोरीवरच्या उड्या मारायच्या. बाजारात जाऊन तिने दोरी उडी शॉपिंग केली आणि दुसऱ्या सकाळपासून दोरीवरच्या उड्या मारण्यास सुरुवात झाली.


    आता किती दोरीवरच्या उड्या मारल्या नंतर वजन कमी होईल हे तिला काही लक्षात येईना प्रथमच चा दिवशी तिने चारशे ते पाचशे दोरीवरच्या उड्या मारल्या.  झाले दुसऱ्या सकाळी रूपाला झोपेतून उठताच येईना आणि तिचे पाय दुखू लागले आणि तिने ठरवले बस आता हा व्यायाम पुरे! दोन दिवस तिने मग विश्रांती घेतली आणि एक वजन काटा वजन आणला काटा वरती उभा राहिल्यानंतर रूपाचे वजन वाढलेले होते 80 किलो वजन घेऊन आता मी कशी जगू ,, रूपाचा निर्णय झाला आणि तिने परत डाएट घ्यायला सुरुवात केली.


    आता तिने ठरवले की आपण फक्त भात खायचे रोज फिरायला जायचे. रूपाने सलग आठ दिवस सकाळी आणि संध्याकाळी फक्त भातच खाल्ला. आणि त्याच्याबरोबर ती चालूही लागली. पण आठ दिवसात मसाले भात ,बिर्याणी ,दम बिर्याणी चिकन बिर्याणी, असे मस्त मस्त भाताचे प्रकार खाल्ले आणि रूपाचे वजन आणखीच वाढले. रूपा वजन काट्यावर उभा राहिली तर वजन आहे तसेच आहे. रूपा भयंकर नाराज झाली आणि तिला वाटले आपल्याला डाएट करता येत नाही मग तिने वजन कमी होण्यासाठी कॅप्सूल घेण्यास सुरुवात केली.


     खरे तर रोज एकच कॅप्सूल घ्यायची असते असे माहीत असून सुद्धा पटकन वजन कमी होण्यासाठी रूपाने 4 कॅप्सूल घ्यायला सुरुवात केली आणि कॅप्सूलच्या अतिरेक वापरमुळे रूपा चक्कर येऊन पडली. हॉस्पिटलमधून आल्यानंतर रूपाला खरेच आपल्या वागण्यातली चूक कळली आणि रूपा शांतपणे घरी बसली. पण रूपाचे वजन कमी होण्याचे फॅड काही गेले नव्हते आता तिने हर्बल प्रॉडक्ट घ्यायचे चालू केले, तसेच तिला कोणीतरी सांगितले की प्रोटीन युक्त आहार घेतला पाहिजे आणि त्याच्याबरोबर व्यायाम ही जरुरी आहे.


   रूपाली झुम्बा डान्स आणि व्यायाम चालू केला. पण रुपाने जोरदार प्रोटीन युक्त आहार चालू केला रोज 2ते4 अंडी आणि बदाम, काजू ड्रायफ्रुट्स ,अक्रोड तसेच एक ग्लास दूध दुपारच्या जेवणामध्ये चिकन, रोटी दाल संध्याकाळी परत स्नॅक्स आणि नंतर रात्री उशिरा भात. असे डाएट रूपाने पंधरा दिवस केले आणि व्यायाम ही भरपूर केला आणि रूपाला वाटले की आता आपले वजन कमी झाले असेल. व्हायचे तेच झाले रूपाचा प्लॅन फसला रूपाचे वजन 90 किलो झाले.


     आता रूपाला खरंच रडू कोसळले आणि तिने ठरवले हा काही प्लान बरोबर नाही मग तिने जाऊन सोना स्लिम बेल्ट आणला. सोना स्लिम बेल्ट लावून ती दोन ग्लास गरम पाणी पिऊ लागली. आणि काय झाले की एवढी उष्णता वाढली रूपाचा सोना स्लिम बेल्ट जळून गेला. क्षणातच सोना स्लिम बेल्टला जाळ लागला आणि रूपा प्रचंड घाबरली.


    हा पण प्रयोग तिचा फसल्या नंतर तिने ठरवले की आता आपण योगा करायचे आणि रूपा योगा करू लागली तिने योगा क्लास जॉईन केला आणि रोज नवीन योगासने शिकू लागली. तिला योगासने जमू लागले. पण आता ही गंमत झाली रूपाने वेडेवाकडे योगासने चालू केसे आणि रूपाचा पायाच मोडला. दुसऱ्या दिवशी रूपा प्लास्टर करून आली. 15 दिवस विश्रांती घेऊन रूपा काही गप्प बसली नाही रूपाला वजन हे कमी करायचे होते.

    

आता रूपा एरोबिक्स करू लागली, तिने सायकलिंग पण चालू केले, आणि ती जिना वर खाली चढू लागली. आठ दिवस छान गेले व्यायाम चांगला जोरात चालू होता. तिला कॉन्फिडन्स वाटू लागला की आता आपले वजन कमी होईल आणि अचानक एक गंमत झाली. रूपा सायकल चालवत चालवत असताना सायकलवरून जोरात पडली आणि रूपाचे वजन कमी करण्याचे स्वप्न राहूनच गेले. रूपाचा वजन काटा काही बदलला नाही आणि वजनकाटा एकच राहिला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy