तुझ्यात जीव गुंतला
तुझ्यात जीव गुंतला
रोहन आणि ऋतुजा लहानपणीचे मित्र मैत्रीण.
दोघेही एकत्रच शिकत होते. आणि मैत्रीचे रुपांतर परत प्रेमात झाले.
पण त्यांचे प्रेम येथेच संपले दोघांनीही मार्ग वेगळा निवडला.
रोहन चे लग्न झाले.
पण तो ऋतुजा ला विसरला नव्हता. रोहनला ऋतुजाची ओढ लागली होती.
पण आता त्याच्या जीवनामध्ये शरयू आली होती. शरयू दिसायला सुंदर मोहक आणि स्वभावाने गोड.
पण रोहनचे मन ऋतुजा मध्ये गुंतलेले होते तो शरयूला पत्नी मानायलाच तयार नव्हता.
शरयू शांत स्वभावाची असल्याने ती रोहनला काहीच बोलत नसे. आणि शरयुचा जीव रोहन मध्ये गुंतला होता.
हळूहळू तिला रोहन ची प्रेम कहाणी समजली. तिने ऋतुजा ची भेट घ्यायची ठरवली. ऋतुजा कडून रोहनच्या आवडी-निवडी शरयुला समजल्या.
शरयू रोहनची पूर्णपणे काळजी घेत असे त्याच्या आवडीनिवडी जपत असे.
पण तरीसुद्धा रोहनला काही समजतच नव्हतं हळूहळू रोहनला पण शरयू बद्दल प्रेम वाटत होते पण त्याला कळलेच नाही की आपले शरयू वरती कधी प्रेम
बसले.
असेच दिवसा मागून दिवस जात होते. आणि शरयू नेहमीप्रमाणेच रोहनची साथ देत होती. पण रोहन काही त्याचे प्रेम व्यक्त करत नव्हता.
आणि एक दिवस अचानक असे झाले की,
रोहनची आई खूप आजारी पडली. शरयू ने रोहन च्या आईची खूप काळजी घेतली.
घरातील सर्व मेंबर ची त्याच्या बहिणीची येणाऱ्या-जाणाऱ्या पाहुण्यांची सर्वांची ती सेवा करत असे व तसेच ती रोहनची करे!
रोहन ला पण तिच्याबद्दल प्रेम वाटू लागले.
रोहन शरयुचा आदर करू लागला. दिवाळीचा सण आला आणि शरयु माहेरी गेली.
रोहनला तिचे माहेर जाणे खूपच जाणवू लागले.
त्याला काही करमेना त्याला उदास वाटू लागले काहीतरी हरवते असे त्याला वाटू लागले.
त्याच्या पोर्चमध्ये ति त्याला दिसेना, किचन मध्ये ती दिसेना आणि सुंदर नटलेली शरयू त्याला काही दिसेना!
"किती गोड हसते शरयू"
"सर्वांचे किती करते."
"किती सुंदर दिसते"
"तिच्या असण्याने घराला शोभा वाटते."
हे रोहनला जाणवू लागले.
थोड्याच दिवसांनी शरयू घरी परत आली.
हळूहळू रोहनला समजू लागले की आपल्याला शरयू शिवाय करमत नाही.
तो तिला प्रेम करू लागला.
तिला एखादं फूल देऊ लागला.
तिला गिफ्ट देऊ लागला
फिरायला घेऊन जाऊ लागला .पिक्चर बघू लागला तिच्याशी त्याने शेअरिंग चालू केले व त्याचे सॉंग्स पण तो तिला ऐकवू लागला.
घरचे किरकोळ साहित्य आणण्यासाठी शरयू बाहेर गेली आणि अचानक ढग काळवंडले, जोराचा पाऊस यायला लागला , विजा कडकडायला लागल्या.
शरयु शॉपिंग ला गेली होती.
रोहन घरी आला तर रोहनला समजले कि शरयू घरी आलीच नाही. त्याने तिला फोन केला.
तर फोन काही लागेना.
मग त्याचा जीव खूप कासावीस झाला.
लगेच त्यांनी फोर व्हीलर बाहेर काढली.
आणि तो शरयूच्या शोधात निघाला. त्याला काही शरयू
दिसेना !
आता तो खूपच घाबरला.
त्याच्या लक्षात आली पल्लवी म्हणजे शरयूची मैत्रीण हिच्याकडे शरयु असेल का ?
आणि शरयूचा शोध लागला शरयू पल्लवी कडेच होती .खूप पाऊस पडत असल्याने ती तिच्या घरी थांबली होती.
ताबडतोब रोहनने शरयू ला पिकप केले. वाटेत त्यांनी तिची आवडती गाणी ऐकली.
घरी येताच त्याने तिला मिठीतच घेतले.
"अगं मी किती घाबरलो होतो ,तू कुठे होतीस इतका वेळ माझा जीव किती कासावीस झालेला ,माझा कंठ दाटून येत होता."
रोहनचा जीव आता शरयू मधे गुंतला होता.
शरयूला हि रोहन खूप आवडत होता. त्याच्या मिठीत शरयू सुखावली होती.
आणि रोहन खरे प्रेम शरयू वरती करू लागला.
रोहनचा जीव शरयू मध्ये गुंतला.
" मला पण तु खुप आवडतोस रे रोहन"
शरयू ने पण तिचे प्रेम व्यक्त केले.
जीव गुंतला तुझ्यामध्ये
. सख्या रे प्राण प्रिया !!

