Nutan Pattil

Inspirational

3.2  

Nutan Pattil

Inspirational

जन्मदाती

जन्मदाती

2 mins
165


"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"असे आईबद्दल म्हटले आहे. आई बद्दल बोलू काही तरी, आई बद्दल बोलणे एवढे सोपे नाही, जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही.

     

   God cannot reach everywhere so he invented the mother......

      

  येलूर येथे जन्मास आलेल्या तात्यासाहेब जाधव यांची मुलगी

" आशालता"म्हणजे माझी आई.

    तिचे लग्न शिवाजीराव मोरे वकील रेठरेहरणाक्ष यांच्याशी झाले. तिच्या आईचे माहेर रेठरे बुद्रुक होते. तिला दोन मावश्या व दोन मामा होते......

   तिचे वडील आजारी असल्यामुळे तिचे लग्न लवकर केले.... छोटीशीच तेरा वर्षाची असताना तिचे लग्न झाले.... लग्न झाल्यानंतर पाच दिवसांमध्ये तिचे वडील वारले......

  त्यामुळे आईची आई आई म्हणजे माझी आजी यांना माझ्या पप्पांनी सांभाळले.. 

     आशा आत्ता पाच मुलांची आई झाली... गोरी गोरी गोबरी सुनिता, सुंदर रंजना, नाजुकशी मनीषा, स्मार्ट राहुल, नटखट छोटीशी नूतन.....  

     मुलांवरती तिने खूप प्रेम केले.. तिचा स्वयंपाक खूप छान असायचा. वांगी ,भेंडी ,कोबी, गवारी, या भाज्या अतिशय चविष्ट असायच्या.... नॉनव्हेज प्रकार तर ती खूप छान बनवत असे..... मला तर असे वाटते मी जीवनात परत नाही असे काही खाल्ले...... आईने केलेल्या स्वयंपाकाची चव परत नाही कुणा मध्ये मिळाली मला......

      शिरा अत्यंत आवडीने मला खाऊ घालायची.. खूप लाडाने बोलत असे ती मला....

  कराडला जाऊन ती आम्हाला फरसाणा व केक आणत असे... ती तर काही खात नसे पण तिचा जीव मुलांमध्ये होता....

   चांगले संस्कार तिने मला दिले.. खूप शांत आणि सुस्वभावी होती. हेवा दावा करणे हे तिला जमलेच नाही.. कधी कुणाचा द्वेष करत नसे.... ती कधीही कोणत्याही गोष्टीची डिमांड करत नसे....... साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे तिचे वैशिष्ट्य होते. माझी आई दिसायला सुंदर होती... मी तिला जाडीची पाहिले..‌ लग्नामध्ये ती खूप सडपातळ आणि नाजूक होती...‌.

     तिने सासू सासर्याची खूप सेवा केली.. दोन दीर ,दोन जावा अशा एकत्र कुटुंब पद्धती मध्ये राहिली......  

    खरंतर ती स्वतःच्या मुलांपेक्षा दुसऱ्यांना खूप जीव लावत असे..... ती सर्वांना खाऊ घालायची.. दानधर्म करणे. प्रेम जिव्हाळा , वासल्य हे सगळे गुण तिच्यात होते......

    सगळे तिला कराडचे काकी म्हणत..... गावातल्या बायका तिला वकिलीन म्हणत असत

   आज हे जग बघतोय आम्ही अक्का फक्त तुझ्यामुळे..... आईला आम्ही आक्का म्हणत असे...... पाची मुलांनीही तिच्यावर ती खूप प्रेम केले......

   नवऱ्या विषयी तिला खूप आदर होता..... वकील म्हणूनच की त्यांना बोलवत असे...... त्यांची खूप सेवा करत असे..... आणि तिलाही तसेच प्रेम मिळत होते..... पप्पांनी शेवटपर्यंत तिची खूप सेवा केली तिचे लाड पुरवले....

    अशी माझी अन्नपूर्णा देवी.. माझी आई ,माझी जन्मदात्री, माझी जननी....... मला ती हिरव्या साडी मध्ये खूप आवडायची...... हिरव्या बांगड्या तिला खूप आवडत असत.. रेशमी बांगड्या ती घालत असे..... डोक्यावरती पदर घेणे... तिला खूप आवडायचे..... सोन्याचे दागिने घालायला खूप आवडतं असे... ती लाल रंगाचा गंध वापरत असे...... अशी माझी गोड गोड आई होती.... आई असते जन्माची शिदोरी....

  माऊली जननी जन्मदाती तू माय

आई तुझ्या प्रेमाचा पार, न अंत..... आई वरती लिहीण्याइतपत माझे व्यक्तिमत्व एवढे मोठे नाही...... जितके बोलावे तेवढे कमीच आहे......  

  अशी माझी आई ५ ऑगस्ट २०१२ ला वारली......    पण तशीच मूर्ती अजून माझ्या डोळ्यांमध्ये साठून आहे...‌

   ""आई माझा गुरु आई कल्पतरु"""....


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational