Nutan Pattil

Others

2  

Nutan Pattil

Others

जनरेशन गॅप

जनरेशन गॅप

2 mins
35


   एक काळ असा नी एक काळ तसा,,,

     पूर्वीच्या स्त्रीचे जीवन खूप खडतर होते... अनेक प्रसंगांना त्यांना सामोरे जावयास लागत होते.... रोजच्या क्षुल्लक गोष्टी त्यांना मिळत नसत...

शिक्षण ही गोष्ट तर दूरचीच...

या काळातल्या स्त्रियांवर पुरुषांची मक्तेदारी खूप चालत असे...

   स्वतःचे दुःख ही कोणाला सांगू शकत नसत... सती जाणे..

अशा प्रताही पूर्वीच्या काळी होत्या... त्या परत बंद झाल्या...

   पण काळ बदलला...

आजचे स्त्रीचे जीवन खूप सुखकर झाले आहे.

बटन दाबलं की फॅन,, एसी (थंड वारे) हातातल्या पंख्याने रजा घेतली..

   उखळ ऐवजी मिक्सर ब्लेंडर आला.. थंड पाणी प्यायला फ्रिज

सोबत आईस्क्रीमची लज्जत भारी

नाहीतर पूर्वी मातीचा माठ.

मुलीची जागा घेतली गॅसने,, इलेक्ट्रिक शेगडीने..

  मातीची भांडी जाऊन स्टील ची आणि काचेची भांडी आली.

   घरे सुंदर झाली , बंगले बांधू लागले. खिडक्या आल्या, पडदे आले... बाग बगीचा,,, गार्डन घरीच नांदू लागले...

झाडूपोछा जाऊन व्यक्युम क्लिनर आले...

    बदलती स्त्री,, इतकी बदलली किती गाडी शिकू लागली....

स्कुटी चालवू लागली....

    आणखी एक पाऊल पुढे...

    चार चाकी चे ड्रायव्हिंग पण करून लागली...

   जमाना इतका बदलला...

स्त्रीच्या शिक्षणाला महत्व आले..

एक स्त्री शिकली तर सर्व घर शिकते ,हुशार होते ,संस्कारी होते हे मान्य झाले..

   पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून... ती पुढे जाऊ लागली...

 स्त्रीचे आयुष्य बदलले..

चूल आणि मूल न राहता स्वावलंबी झाले...

लँड लाईन ..कॉर्डलेस फोन जाऊन,,

मोबाईल फोन आले..

लॅपटॉप आले ,स्मार्ट फोन आले अँड्रॉइड आले..

नानाविध एप्स डाउनलोड होऊ लागले..

यु ट्यूब वरती रेसिपीस पण शिकवू लागल्या गेल्या..

स्त्रिया व्हाट्सअप फेसबुक वर आल्या..

स्वतःचे स्वातंत्र्य सेलिब्रेट होऊ लागले...

    ऑनलाइन शॉपिंग पण चालू झाली..

    आजची स्त्री स्वताकडे लक्ष देऊ लागली. योगा प्राणायाम झुंबा असे छंद जोपासू लागली

   छान छान स्वयंपाक करते,,

मेहंदी लावते, सुंदर दिसते, निसर्ग जोपासते.. लिहिते, वाचते, मुक्त होते... बोलते..

   आजची ती गायन ,वादन चित्रकला , नृत्य, एक्टिंग..

सगळ्यात निपून आहे...

    मोठे होण्याचे स्वप्न पाहते...

मुलांची काळजी घेते , घरच्यांची

,काळजी घेते....

   आजची आधुनिक जगातली स्त्री खूप खुश आहे...

पूर्वीची तिने कात टाकली...

   अन्याला लढून शिकून आणि जनरेशन गॅपने तिचे सर्व आयुष्य बदलले....

    दुःखीकष्टी ती पूर्वीची

    आनंदी झाली आज ती!!!

    अन्यायाला लढून झाली

    मर्दानी झाशीची राणी ती!!!


Rate this content
Log in