Nutan Pattil

Others

3.4  

Nutan Pattil

Others

मी पैसा बोलतोय

मी पैसा बोलतोय

2 mins
237


जगात आजकाल सर्वश्रेष्ठ काय आहे तर तो *पैसा*

कारण पैशाशिवाय कोणाचे पान घालत नाही

प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक खुशीसाठी आरोग्यासाठी शिक्षणासाठी मौज मस्ती साठी अन्न पाण्यासाठी जगण्यासाठी या पैशाची गरज असते.

त्यामुळे पैशाला खूप सर्व सर्वोच्च स्थान आहे.

आणि खरं तर *खरच मला पैसा खूप आवडतो*


   अशीच मी झोपले असताना माझ्या स्वप्नांमध्ये पैसा आला. अग उठ उठ पैसा बोलू लागला.

क्षणभर माझ्या काही लक्षातच येईना हे काय चालले आज काही नवलच घडते.. चक्क पैसा बोलतोय...

पाहते तर काय खरेच पाच रुपये दहा रुपये" पंधरा रुपये ,वीस रुपये 500, 2000 सर्वच नोटा अवतीभवती फिरू माझ्याशी बोलत आहेत.. अरे जो पैसा मला आवडतो तो आज माझ्या सभोवती फिरून माझ्याशी बोलत आहे.

अग नूतन कशी आहेस?

अरे पैश्या मस्तच

तू जवळ आहेस मग कशाची कमी?

हो ना

पण पैश्या तू कसा आहेस?

अग काय सांगू पैसा बोलू लागला

माझ्यामुळे तर सर्व काम होतात खरे आहेमी खूप उपयोगी आहे

सर्वांच्या इच्छा आकांशा पूर्ण करतो.

पंचक सर्व पैशासाठीच बनले आहे पैशासाठी नातीगोती विसरायला लागल्यात भांडण-तंटे वाढू लागल्या भ्रष्टाचार वाढू लागला.

मला नको आहे सर्व.

 मी तर सर्वानजवळ राहतो

माझा उद्देश फक्त आनंद देणे आहे पण हे काय चालले?

जास्त असावा म्हणून ही धडपड हे नैराश्य ही उदासीनता नको वाटते गं !!

माझ्यामुळे श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव होतो तो मला सहन होत नाही.

माझ्यासाठी सर्वजण सारखेच असतात माझ्यासाठी कोणी श्रीमंत नाही कोणी गरीब नाही मी सर्वां जवळच आहे.

माझी तुलना गरीब आणि श्रीमतांमध्ये का होते जिकडे मी जास्त तिकडे श्रीमंती तिकडे मी कमी तिकडे गरिबी..

सर्वत्र आहे पण मला मिळवण्यासाठी जे कधीकधी चुकीचे मार्ग निवडले जातात ते मला आवडत नाहीत.

कष्ट करून जे पैसे मिळतात तेच मला आवडतात आणि मी सदैव तेथेच राहतो.

माझे जे सन्मान करतात त्या व्यक्ती पासून मी कधीही दूर जात नाही.

दुरुपयोग करतात मी त्यांच्या जवळ थांबत नाही असा माझा स्वभाव आहे.

मिळवण्यासाठी व्यक्तीने शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे तरच मी त्याच्याजवळ थांबतो.

*नूतन तू एक पवित्र आत्मा आहेस *तू सदैव मला आवडतेस तू नेहमी चांगले कार्य चांगले कर्म करतेस सर्वांना समजून घेतेस दयावान आहेस परोपकारी आहेस आणि तू पैशाचा उपयोग चांगल्या ठिकाणी करतेस त्यामुळे मला तू आवडते आणि मी नेहमी सतत तुझ्याजवळ राहतो.

  तुझ्या या प्रेमा मुळेच आज मी तुझ्या स्वप्नात आलो आहे आणि मी तुला सांगतो की मी सदैव तुझ्या बरोबर राहीन कारण तू माझा सन्मान करतेस नेहमी नेहमीच आयुष्यभर मी तुझा साथ देईल 

*तुझाच पैसा*


Rate this content
Log in