Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

विवाह

विवाह

4 mins
248


  शरयू आणि रोहित एकाच शाळेत शिकत होते. दोघेही अत्यंत हुशार इंग्लिश मीडियम ला जात होते. शरयूच्या बाबांची आणि रोहितच्या बाबांची पक्की मैत्री,

     एका कॉलनी मध्ये शरयू आणि रोहित राहत असे.

शरयूचे बाबा आणि रोहितचे बाबा मित्र असल्यामुळे दोघांचेघरी येणे जाणे होत असे.

     आणि शरयू आणि रोहितची लहानपणीच मैत्री झाली. दोघेही एकमेकांसोबत खेळायचे आणि अभ्यास ही करायचे एकमेकांशिवाय त्यांना करमत हि नसे. असे करत करतच दोघांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले.

      आणि आणि रोहित च्या बाबांची बदली झाल्यामुळे रोहित आणि त्यांचे फॅमिली मुंबईला शिफ्ट झाले. जाताना रोहितला ही खूप वाईट वाटले आणि शरयूला ही.

    दोघांचे मोबाईल नंबर एकमेकांजवळ होतेच. शरयु आता पुण्यामध्ये होती . आणि ती कॉलेजला जाऊ लागली.

रोहितनेही चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले.

   दोघांचेही कॉलेज लाईफ सुरू झाले. अधून-मधून एकमेकांना फोन देखील करत. असे करत करत दिवस निघून गेले.

   शरयू अत्यंत हुशार असल्यामुळे ती इंजिनियर झाली.

आणि आणि रोहित पण एमबीए करून एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून जॉईन झाला.

     शरयू इंजिनियर असल्यामुळे शरयू ला इंजिनियर मुलाचे स्थळ पाहिले.

   ऋतुराज खूपच हुशार देखणा आणि आणि सुस्वभावी मुलगा होता. एकुलता एक मुलगा शिवाय शेत जमीन ही भरपूर आणि आणि सुसंस्कृत व सुशिक्षित फॅमिलीतला. शरयूच्या बाबांना हे स्थळ खूपच आवडले.

    शरयू ला सांगितले की आता तुला ऋतुराज पाहिला येणार आहे. ऋतुराज चा फोटो शरयूने पाहिला. आणि त्याला पाहताच तिला लव्ह अट फर्स्ट साईट झाले.

    शरयू पण अति सुंदर सुशील नाजुक अशी मुलगी पाहताक्षणीच कोणीही आकर्षित होईल अशी ती!

    आणि दिवस पक्का ठरला मुलगी पाहण्याचा,

     ऋतुराज शरयू ला पाहायला येणार होता आणि मग शरयूचे तर ठोके वाढले कारण ऋतुजाचा फोटो पाहूनच तिला ऋतुराज खूप आवडला होता.

त्याला पाहायची इच्छा तर तिला खूपच झाली होती.

     आणि तो दिवस उजाडला ऋतुराज शरयूला पाहयला आला व शरयूला पाहताक्षणीच ऋतुराज ने तिला पसंत केले.

    शरयूचा तर आनंद गगनात मावेना, ती ऋतुराज ची स्वप्ने पाहू लागली. अरेंज मॅरेज असल्यामुळे याद्या त्याच दिवशी झाल्या. सुपारी फोडली गेली आणि साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला.

      पंधरा दिवसांनी साखरपुडा चा दिवस आला. खूप थाटामाटात शरयू चा आणि ऋतुराज चा साखरपुडा झाला. शरयू आणि ऋतुराज ने एकमेकांना भेटायचे ठरवले.

     पुण्यामध्ये एका कॉफी शॉप मध्ये त्यांची भेट झाली.

आणि दोघांच्या गप्पाही रंगल्या.

दोघांनाही एकमेकांच्या सहवासात खूप आनंद येत होता.

 ऋतुराज ने ठरविले आपण कुठेतरी शॉपिंगला जाऊ . मग त्याने पुण्यामध्ये तिला फिरवून आणले तिच्यासाठी गिफ्ट दिले.

     आता दोघांचे एकमेकांना फोन होऊ लागले दोघेही एकमेकांना भेटू लागले . शरयू ने पण ऋतुराज ला खूप छान छान गिफ्ट दिल्या.

       सहा महिन्यांनी लग्न होणार होते. मग शरयु आणि ऋतुराज च्या भेटीगाठी जास्तीत वाढू लागल्या. फिरायला कुठे जायचे ते हनीमून पर्यंत ऋतुराज ने तर प्लॅनिंग ठरवले.

     शरयूला पण ऋतुराज ची खूपच ओढ लागली होती त्याच्या या छान स्वभावाचा तिला मोह पडला होता. पूर्णपणे ती ऋतुराज ची झाली होती.

      आणि लग्नाची तारीख जवळ आली. लग्नाची शॉपिंग जोरात चालू झाली. दोघांनी ठरवलं की मुंबईला जाऊन शॉपिंग करायची.कपड्यांची शॉपिंग चप्पल ची शॉपिंग बांगड्याची शॉपिंग लग्नातल्या सर्व गोष्टींचे शॉपिंग शिवाय दागिनेही.

      मग ऋतुराज व शरयू दोघेही शॉपिंग साठी मुंबईला आले. शरयूने ऋतुराज ला सांगितले की येथे माझा मित्र रोहित राहतो. आणि आम्ही बालपणापासून मित्र मैत्रिणी आहोत. मग तिघांची भेट झाली आणि त्यांनी शॉपिंग केली व खूप छान आनंदाने हॉटेलमध्ये जेवण केले शरयू व ऋतुराज रोहितला निरोप देऊन परतले.

    ""लग्नाला नक्की यायचे ह"! असे शरयू व ऋतुराज ने रोहितला सांगितले.

रोहित ने शरयूच्या लग्नासाठी मी पुण्याला नक्की येणार असे सांगितले.

     लग्नाचा दिवस जवळ आला. मेहंदीचा कार्यक्रम झाला. संगीत झाले. लग्न पुण्याच्या वेस्टीन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते. लग्न तर खूप जोरदार होणार होते.

    आणि आज लग्नाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळीच ऋतुराज ने शरयूला फोन केला.

"अगं आज आपले लग्न आहे

आणि आज तू खूप सुंदर दिसली पाहिजे."! तीही बोलली ""ऋतुराज आज तर तू राजकुमार दिसायला हवास."

    आणि ऋतुराज बोलला चल फोन ठेव आता आपण भेटणार आहोत. आणि सकाळी दोन्ही पार्ट्यांच्या गाड्या लग्नासाठी निघाल्या.

     लग्न साडेसहाचे होते पण दहा वाजताच हॉलमध्ये यायचे ठरले होते. मुलीची गाडी वेस्टिन ला येऊन थांबली व ते ऋतुराज च्या गाडीची वाट पाहिला लागले.

      ऋतुराज योग्य टाइमिंग ला घरातून बाहेर पडला होता.

नवरदेवाची गाडी असल्यामुळे गाडी खुप सजवली होती. ऋतुराज आज खूप आनंदी होता.

त्यांनी ड्रायव्हरला म्युझिक लावायला सांगितले. शरयू ची आवडती गाणी तो ऐकत होता.

आनंदाने तो येत होता.

   आणि अचानक,,आणि अचानक,, गाडी समोरून मोठा ट्रक आला आणि ड्रायव्हरला गाडी कशी वळवायची कळेना तो खूप भांबावला. तो हॉर्न वाजवत होता त्याचा खूप आटापिटा चालला होता पण समोरून येणारे वाहन त्याला काही लक्षात येईना आणि एकदम अचानक काहीतरी येऊन कोसळले असे त्याला वाटले व गाडीवरती ट्रक येऊन धडकला होता. त्याच्यामध्येच ड्रायव्हरचा व ऋतुराज जीव गेला ,अपघात झाला.

   शरयू खूप बेचैन झाली व शरयू चे वडील देखील बेचैन झाले अजून ऋतूराज ची गाडी कशी येत नाही म्हणून त्यांनी तिकडच्या पार्टीला फोन करायला चालू केला.

     आणि अत्यंत वाईट बातमी शरयूच्या कानावरती पडली ऋतुराज चा एक्सीडेंट झाला होता आणी एक्सीडेंट मध्ये तिचा

ऋतुराज गेला होता.

    आणि आणि शरयू चक्कर येऊन खाली कोसळली.

    रोहित सकाळी सकाळी शरयूच्या लग्नासाठी निघाला होता. तो हॉलमध्ये आला तर सर्व सामसूम आणि आणि रोहित ला पण ही वाईट बातमी कळाली. शरयू तर चक्कर येऊन पडली होती. त्याच्या मैत्रिणीची ही अवस्था पाहून त्याला खूपच वाईट वाटले.

     शरयू शुद्धीवर आली पाहते तर काय नवरदेवाच्या कपड्यांमध्ये रोहित होता.

रोहित ने शरयू बरोबर लग्न करायचे ठरवले होते.

मी तुला कधीही अंतर देणार नाही मला झालेली परिस्थिती माहित आहे. मी तुझा स्वीकार करायला तयार आहे .तू माझ्याशी लग्न करशील का??

     शरयू ऋतुराजच्या स्वप्नातच होती आणि तो गेल्याचे दुःख तिला खूप होत होते पण तरीसुद्धा रोहितच्या प्रेमळ स्वभावामुळे तिने त्याच्याबरोबर लग्न करण्यास ठरवले. आणि ती दोघं बालपणाची मित्र-मैत्रिणी होते.

रोहित ने फोन करून त्याच्या आई-बाबांना बोलावून घेतले.

झालेली परिस्थिती सांगितली.

आणि रोहितचे वडील व शरयूचे वडील मित्रच होते.

    आणि ठरलेल्या टाइमिंग ला शरयू व रोहित चे लग्न झाले.

नंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी ऋतुराज ठेवले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational