Nutan Pattil

Inspirational

2  

Nutan Pattil

Inspirational

गुरुपोर्णिमा

गुरुपोर्णिमा

2 mins
135


गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री नमो नमः

पहिला गुरु आई

आत्मविश्वासाचा गुरु पिता

जगणे शिकवले समाजाने

समाज पण गुरुच

हास्य दिले मीत्र मैत्रीणींने ते पण गुरुच शिक्षक पण गुरुच

आषाढी पोर्णिमा गुरुंच्या स्मरणात पुजली जाते म्हणून तीला गुरुपोर्णिमा म्हणतात गुरु पोर्णिमेलाच व्यास पोर्णिमा म्हणतात. गुरुपोर्णिमेला व्यासपोर्णिमा देखील म्हणतात.

गुरुपोर्णिमेला गुरु शिष्याच्या नात्याला अनन्य साधारण महत्त्व आहे पुराणात अनेक गुरु शिष्य होऊन गेले आहेत

महिर्षी आणि गणेश. वशिष्ट आणि राम, कृष्ण संदिपनी

अर्जुन द्रोणाचार्य एकलव्य द्रोणाचार्य अशी अनेक उदाहरणे आहेत.

गुरु ने दिलेले ज्ञान शिष्याला नेहमी मार्गदर्शन करते.

गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करून ते आचरणात आणले पाहिजे. व त्या ज्ञानातून नवनिर्मिती केली पाहिजे. समाजाला बोध देता आला पाहिजे. हेच उत्कृष्ट शिष्याचे काम आहे. हेच गुरु आणि शिष्याचे पवित्र बंधन आहे.

 महाभारत व अनेक पद्यपुराणे लिहलेले व्यासमुनींची पुजा करण्याचा त्यांचा गौरव करण्याचा हाच दिवस आहे. या मंगलदिनी गुरुपोर्णिमा साजरी केली जाते तसेच भगवान बुद्धांच्या स्मृतीमध्ये गुरुपोर्निमा साजरी केली जाते.

  गुरुपोर्णिमेला सर्व वंदनीय गुरूंची पूजा केली जाते गुरुंचा सन्मान केला जातो.

   प्रथम जन्माला आल्यानंतर आईच मुलाला संस्कार देते. जसा मातीच्या गोळयाला आकार दिला जातो तस ती मुलांना घडविते. तसेच बाबाही मुलांना संस्कार देतात. पण आईचे महत्त्व अनन्य साधारण आहे 

म्हणुनच म्हणतात " आई माझा गुरु आई कल्पतरू"

तसेच आईला मातृदेव भवः

व वडिलांना पीतृदेव भवः म्हटले जाते.

गुरुंनी दिली नवचैतन्याची दिशा

शिस्तबद्ध जीवन, चाकारीबद्ध वागणी, प्रामाणिक पणा, कर्तव्यदश राहणीमान, तेजपुंज जीवन. सद्गुणांचा साक्षात्कार , नितीमत्ता, प्रेरणादायी जीवन.

या गुरूंमुळेच आज मी एका उच्च स्थानावर आहे.

 जीवनात येणारी प्रत्येक व्यवित्त माझी गुरु आहे. प्रत्येक व्यवित्तकडुन मी काहितरी ठिकतेच चांगले गुण आत्मसात करावेत.

प्रत्येकाल एक तरी गुरु लाभलेला असलेला पाहीजे. गुरुमुुळे आपल्यात सकारात्मक बदल घडतो. कार्यक्षमता वाढते स्वभाव शांत येतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढते. आत्मविश्वास येतो संभाषण कौशल्य चांगले होते. रागावर नियंत्रण मिळवता येतो. व जीवनात चैतन्य निर्माण होते!!


अशा गुरूना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational