Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

माता लक्ष्मी

माता लक्ष्मी

2 mins
196


   हे माता लक्ष्मी अग तू मला किती आवडतेस लहानपणापासून, तू पैशाची देवी आहेस हे मला माहीतच नव्हते पण तुझे ते रूप गोजिरवाणे, तुझी ती लाल रंगाची साडी आणि कमळात बसलेली ,कधी उभी राहिलेली तू तर कधी बसलेली तू. माझ्या आईने मूर्ती आणली होती आणि देव्हाऱ्यात ठेवली होती ती लाल लाल रंगाची साडी.

कमळात बसलेली तू तुझ्या हातामध्ये कमळ आणि खूप मनमोहक रूप खूपच भावायचे मला!

   तुझा फोटो ही होता पण उभी राहिलेली होती तुझ्याकडे बघून मला वाटायचे ,काय माहिती सतत तुलाच पाहावेसे वाटयचे!

   हळूहळू मोठे झाले आणि समजले तुच ती देवी की जी सर्वांवरती प्रसन्न होऊन सर्वांचे भाग्य उजळवते. माझी आई नेहमी मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायची आणि नेहमी मला तुझी कथा वाचायला लावायची आणि मला त्या वेळेसच वाचनाची खूप आवड झाली ती कथा मला खुप आवडायची.

   नेहमीच तु मला भावलीस, परत समजले तू म्हणजे भाग्य देवी. तूच की संपूर्ण जग चालवते चालते सुख-समृद्धी ,संपत्ती, आनंद, आरोग्य, सौंदर्य देणारी देवी.

   तू जर प्रसन्न असली तर त्या माणसाचे भाग्य उजळते तो मनुष्य गर्भश्रीमंत होतो त्याला कशाचीही कमतरता पडत नाही.

   पण खरंच तू राहतेस पण अशा ठिकाणी की जिथे शांतता आहे, स्वच्छता आहे जिथे लोक भांडत नाहीत दानधर्म करतात, चांगले वागतात अशा योग्य ठिकाणी तुझा निवास असतो.

   पापकर्म तुला अजिबात आवडत नाही अशा ठिकाणी तू फिरकतही नाही. आणि हे मला माहिती आहे देवी!

   पहिल्यापासूनच तू माझ्यावरती अतिशय प्रसन्न माझ्या आईसारखीच. खूप दिलेस गं मला तू! आणि मलाही तुझी सेवा करण्यात खूप आनंद येतो!

   प्रत्येक दिवाळीच्या अमावसेला तुझी पूजा केली जाते आणि तो दिवस म्हणजे माझा वर्षभरातला अत्यंत आनंदाचा दिवस असतो. तू माझ्या घरी सतत नांदावी म्हणून मी खूप धडपड करते.

   तुझ्या रूपाने, तुझ्या दर्शनाने जी प्रसन्नता मिळते ती देवी मला कदापि कुठेही मिळत नसेल.

     अग तू माझी लाडकी लक्ष्मी माता आत्ता पण मी तुझी वाट पाहत आहे कधी तो दिवाळीचा लक्ष्मीपूजनाचा दिवस येतो आणि मी तुझी पूजा करते!

 मला आवडते गं तुझी पूजा करायला!

    हो आणि देवी माझी इच्छा अशी आहे की जशी तू मला नेहमी प्रसन्न होते तरी सर्वांना हो आणि सर्वांची काळजी दूर कर! सर्वांचे आर्थिक संकटे दूर होतात आणि प्रत्येकाच्या घरी एक प्रकाशमय दीप तेऊदेत!

   दिवाळीला सर्वांच्या घरी येतेस आणि तू अशीच वर्षभर प्रत्येकाच्या घरी निवास कर आणि कधीच गरिबीही उचल, प्रत्येकाला सुख मिळते आणि अशी बुद्धी येऊदेत नेहमी तू तर त्यांच्यासोबत रहावी त्यांनी सत्कर्म करावे, अन्नदान करावे ,चांगले वागावे

सत्य बोलावे आणि कोणाचेही वाईट करू नये.

मग तू त्यांना सोडून जाणारही नाहीस.

  माझी प्रिय लक्ष्मी मी तुझी वाट पाहत आहे प्रत्येक वर्षी पाहते तसेच तुझ्यासाठी मी खूप तयारीही केली आहे आत्तापासूनच!

  सतत तुझा ध्यास

 ध्यानी, मनी, स्वप्नी तूच तू देवी!


Rate this content
Log in