Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sangieta Devkar

Drama Tragedy Action


3  

Sangieta Devkar

Drama Tragedy Action


तेरे जाने का गम - भाग 2

तेरे जाने का गम - भाग 2

4 mins 162 4 mins 162

प्रथमेश च्या बाईक वरून नचिकेत आला होता. त्याला घरा च्या कोपऱ्यावर प्रथमेश ने सोडले. नचि जाशील ना नीट घरी त्याने विचारले. अरे हो इथून दहा मिनिटाचा तर रस्ता आहे नको काळजी करू मी घरी जाऊन तुला कॉल करतो. बाय म्हणत प्रथमेश निघाला. नचिकेत चालत निघाला होता. त्याचे घर जवळच होते. रस्ता सुनसान होता रात्रीचे अकरा वाजता आले होते. कोपऱ्यावर शेकोटी पेटवून चार मुलं उभी होती. ते सिगरेट ओढत उभे होते. त्यांनी नचिकेत ला पाहिले. मग एकमेकांना इशारा करत नचि जवळ आले. काय पाहिजे तुम्हाला कोण तुम्ही नचिकेत ने विचारले. त्यातल्या एका ने नचि च्या चेहऱ्यावर हात फिरवला तू कुठे फिरतो रे इतक्या रात्री ? भाई हा तर लोण्या सारखा मऊ आहे तो दुसऱ्या मुला कडे बघत म्हणाला. बघू तर म्हणत तो मुलगा ही नचि कडे आला आणि त्याचा हात धरला खरच रे हा चुकून मुलगा जन्माला आला इतका कोवळा आहे. तो भाई असलेला मुलगा बोलला. तुम्हाला काय पाहिजे माझ्या कडे थोडे पैसे आहेत हे माझं वॉच पण घ्या पण मला सोडा नचिकेत म्हणाला. तुला असा कसा सोडता येईल घ्या रे याला त्या दुकानाच्या बाजूला तो त्या मुलांचा भाई म्हणाला. मग बाकी तिघांनी नचिकेत ला ओढत तिथे असणाऱ्या दुकानाच्या बाजूला नेले तीथे पूर्ण अंधार होता. नचिकेत त्यांच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्या चौघा समोर त्याचा निभाव नाही लागला. त्यांनी नचिकेत चे सगळे कपडे काढले आणि त्याच्या वर अनैसर्गिक अत्याचार केला. नचि ओरडू नये म्हणून एका ने त्याचे तोंड दाबून धरले होते. चौघांनी त्याच्या वर अत्याचार करत आपली वासना शमवली. मग ते लांडगे निघून गेले.


नचिकेत तिथेच बसून जोरात रडू लागला. पण त्या अंधारात त्याचा हुंदका विरून गेला. कसेबसे कपडे घालून तो घरी यायला निघाला. त्याचा मोबाइल आणि वॉच त्या लोकांनी पळवून नेले होते. नचि घरी आला. खूप दमलो आहे मी झोपतो म्हणत आई ला सांगून रुम मध्ये गेला. बाथरूम मध्ये जाऊन त्याने शॉवर घेतला त्याचे अश्रू ही पाण्या सोबत वाहत चालले होते. त्याने त्याची डायरी घेतली आणि त्याच्या सोबत जे घडले ते सगळं लिहून काढले. झोपायचा प्रयत्न करत होता पण झोप उडाली होती त्याची. पुरुषावरही बलात्कार होतो हे तो फक्त ऐकून होता आज मात्र स्वतः त्याने अनुभवला. नंतर चे चार दिवस तो कॉलेज ला गेला नाही. प्रथमेश घरी आला नचि अरे तुझा फोन का बंद आहे आणि कॉलेज ला का येत नाहीस तू. प्रथमेश फोन हरवला माझा आणि माझी तब्येत ठीक नाही म्हणून नाही आलो कॉलेज ला. बर डॉ. कडे जाऊन आलास का? नाहीतर मी नेतो चल. नको नको मी घेतले मेडिसिन डोन्ट वरी प्रथमेश. नक्की ना नचि. हो रे मग प्रथमेश घरी गेला. त्याच रात्री नचिकेत च्या आई चा फोन प्रतिमेश ला आला. ताबडतोब घरी ये म्हणालया. तसा प्रथमेश लगेच निघाला. नचिकेत कडे आला तर नचिकेत ने आत्महत्या केली होती. फॅन ला त्याने गळफास घेतला होता. पोलीस आले होते. नचि ने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की मी स्व खुशीने आत्महत्या करत आहे. याला कोणी जबाबदार नाही .


प्रथमेश ने नचि ला पाहून जोरात हंबरडा फोडला. नचि अरे अस का केलंस काय झालं होतं भावा मला सांगायचे तरी एकदा.अस म्हणत प्रथमेश जोर जोरात रडत होता. नचि ने असे का केले हे अजून कोणाला समजले नवहते. दोन दिवस झाले प्रथमेश नचिकेत च्या घरीच होता. त्याला आठवले नचि डायरी लिहित असायचा मग तो नचिकेत च्या रूम मधये गेला त्याने त्याची डायरी कपाटातून काढली आणि वाचू लागला. जस जसे तो डायरी वाचू लागला त्याच्या डोळयातून अश्रू वाहतच राहिले. नचि मला सांगायचे होते रे इतकं सार घडले आणि तू एकट्याने सहन केलेस . का नचि मी होतो ना रे कायम तुझा स्पोर्ट सिस्टिम. मग का गप्प राहिलास. त्याचा आवाज ऐकून नचि चे आई बाबा रूम मध्ये आले. प्रथमेश काय झाले ? नचि च्या आई ने विचारले. मग प्रथमेश ने ती डायरी बाबा कडे दिली. त्या दोघांनी ती वाचली. दोघे ही सुन्न झाले. काकू अहो मीच त्याला त्या दिवशी घरा जवळ सोडले जर मी त्याला घरात सोडून गेलो असतो तर आज नचि आपल्या सोबत असता. माझंच चुकलं मला माफ करा प्रथमेश हात जोडून नचि च्या आई बाबा समोर उभा राहिला. नाही प्रथमेश तुझं नाही चुकले काही. हे त्याच्या नशिबात होते आणि त्यात नचि इतका संवेदनशील होता की हा आघात तो सहन नाही करू शकला. बाबा म्हणाले. प्रथमेश नचि च्या फोटो कडे पाहत रडत होता. नचि मी का नाही तुला सोबत केली त्या दिवशी ?का एकट्याला सोडलं ? मी सोबत असतो तर अस काही घडलं नसत रे. मनात असा विचार करत प्रथमेश स्वतःला दोष देत राहिला. हे गिल्ट त्याच्या मनात साचून राहिले होते आणि आता कायम राहणार होते . आपला जिवाभावाचा यार प्रथमेशने गमावला होता.


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama