Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Sangieta Devkar

Drama Action


3  

Sangieta Devkar

Drama Action


तेरे जाने का गम (भाग 1)

तेरे जाने का गम (भाग 1)

4 mins 226 4 mins 226

नचि चल कैंटिन ला जावू भूक लागली . तू जा मला नाही भूक नचि खालीच बघत बोलला. अरे इतके काय लिहित असतोस त्या डायरीत प्रथमेश त्याची डायरी हिसकावून घेत म्हणाला. प्रथमेेेश डायरी दे अस कोणाची पर्सनल डायरी वाचू नये बैड मैनर्स. ओह्ह नच्या तुझ्या माझ्यात पर्सनल असे काही आहे का? अरे चड्डीबड्डी फ्रेंड आहोत आपण विसरलास? आणि तुला मनातल सगळ सांगायला मीच लागतो. कधी कधी रडायला ही माझा खांदा लागतो. असु दे माहित आहे तू मोठा स्ट्रॉन्ग आहेस बाबा मी आहे हळवा बास. चल चल म्हणत नचि ला ओढत प्रथमेश कैंटिन कड़े निघाला. नचिकेत आणि प्रथमेश लहान पणा पासून चे जिगरे मित्र. शाळा एकत्र झाली आणि आता कॉलेज ही एकच होते. दोघ मित्र कमी आणि भाऊ भाऊ जास्त वाटायचे. दोघांच्या घरी ते आपलच घर समजून हक्का ने यायचे राहायचे. कॉलेज मध्ये फेमस त्यामुळे सगळे जन त्यांना" जयविरू " या नावानेच चीड़वायचे.


प्रथमेश ख़ुप स्ट्रॉन्ग,बिनधास्त जगनारा तर नचिकेत त्याच्या उलट ख़ुप संवेदनशील ,विचार करणारा असा. एखादी गोष्ट इतकी मनाला लावून घ्यायचा की मग प्रथमेश लाच त्याला सांभाळुन घ्यावे लागायचे. दोघांचा एकमेकांवर जीव पण तितका च होता. कैंटिन मध्ये आल्यावर प्रथमेश ने नचि ला विचारले सांग आता काय लिहित होतास. काही नाही असच. नचि मी तुला आज ओळखत नाही समजल बोल लवकर नाहीतर डायरी घेइन परत. अरे ते कस सांगू प्रथमेश? जसे सांगायचे तसे सांग . आपल्या वर्गातली अश्विनी ती मला आवडते ख़ुप तिच्या साठी कविता लिहित होतो. ओह्ह नच्या तू आणि प्रेमात ? पण भावा या मुलींचे काही खरे नसते आज एका सोबत उद्या दुसऱ्या सोबत दिसतात.प्रथमेश अश्विनी तशी नाही. ती ही माझ्या कड़े बघत असते. अरे नुसते बघितले म्हणजे तू तिला आवडतोस अस नाही. पण माझे आहे प्रेम तिच्यावर प्रथमेश. ओके सांग मग तिला. हम्मम नचिकेत इतकच बोलला. पण प्रथमेश ला ही काळजी होती की तिने याला नकार दिला तर हा खूप मनाला लावून घेणार.


तसा नचिकेत गोरा नाजूक उंच दिसायला स्मार्ट होता. घारे डोळे आणि हसणं ही छानच होते कोणी ही मुलगी त्याच्या कडे वळून पहात असे. नचिकेत अश्विनी ला आपल्या मनातले कसे सांगावे याचा विचार करत होता. तिला सांगायचे धाडस त्याच्या कडे नवहते तो जरा लाजरा बुजरा टाइप होता.प्रथमेश तू सांग ना माझ्या तर्फे अश्विनी ला. वेडा आहेस का रे प्रेम तू करणार आणि मी प्रपोज करू तिला. जा तूच सांग नचि. मला असलं काही आवडत नाही अन जमत पण नाही. असेच काही दिवस गेले. कॉलेज ची ट्रीप गेली होती. सगळे जण ट्रिप ला आलेले. अश्विनी आज छान तयार होऊन आली होती. आज संधी मिळाली तर आपण बोलूया असे नचिकेत ने ठरवले. पिकनिक मस्त सगळे जण एन्जॉय करत होते. नचि चे सारे लक्ष मात्र अश्विनी कडेच होते. कोणाचे लक्ष नाही पाहून अश्विनी एका बाजूला एकटीच जाताना नचि ला दिसली. हीच संधी आहे आता अश्विनी कडे जाऊन आपण बोलावे अस ठरवून नचि ही अश्विनी गेली त्या बाजूला निघाला. प्रथमेश मित्रांसोबत होता.


अश्विनी एका गर्द अश्या झाडाच्या मागे गेली. तिथे त्यांच्याच वर्गातला रवी उभा होता. नचि ही तिच्या मागे गेला. जरा दूर उभे राहून तो अश्विनी कडे लक्ष देत होता. रवी ने पटकन अश्विनी ला आपल्याला मिठीत घेतले आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिला किस केले. आणि सर्व नचिने पाहिले. तसाच तो माघारी फिरला. अश्विनी उगाच त्याच्या कडे पाहून हसत असायची त्याला नचि ने प्रेम समजले होते. पण अश्विनी तर रवी सोबत होती. खूप वाईट वाटले नचिकेत ला कारण रवी एक उडाणटप्पू आणि वाया गेलेला मुलगा होता. त्याच्या सोबत अश्विनी सारखी सालस मुलगी कशी काय हाच विचार नचि करत होता. हे नचि कुठे गेला होतास प्रथमेश ने त्याला बघून विचारले. काही नाही असाच फिरत होतो. पण नचि ला पुर्ण पणे ओळखनारया प्रथमेश ने काही तरी झाले आहे हे ओळखले. घरी गेल्या वर बोलू असे त्याने ठरवले. दुसऱ्या दिवशी नचि कॉलेज ला आला नाही. तेव्हा कॉलेज सुटल्यावर प्रथमेश नचिकेत कडे आला. काय रे तब्येत वैगरे ठीक आहे ना? आज का आला नाहीस कॉलेज ला? काही असच इच्छा नवहती माझी. नचि काय झाले सांग. प्रथमेश ने त्याच्या खांद्यावर हात ठेवत विचारले. ती अश्विनी काल त्या रवी सोबत होती. दोघाना मी एकत्र पाहिले. हम्मम मी तुला बोललो होतो नचि या मुलीच्या मागे नको लागु. अरे पण मी खरे मना पासून प्रेम करतो तिच्या वर आणि ती त्या बेकार फालतू रवी च्या प्रेमात आहे. दे सोडून हा विचार नचि . जास्त विचार नको करू. तुलाच त्रास होईल. प्रेम बिम काही ही नसते उगाच इमोशनल नको होऊस जरा प्रॅक्टिकल वाग. मला वेळ लागेल तिला विसरायला प्रथमेश. नचि अस वागून काही ही मिळत नसते. जरा स्वतः चा विचार कर. दुनिया अशीच असते. फाइट करायची तयारी ठेव. काळजी घे आणि उद्या कॉलेज ला ये. अस बोलून प्रथमेश निघाला.


मग आठवडा भर तरी नचिकेत ला अश्विनी चा विसर नाही पडला. त्याला खूप वाईट वाटत होते. प्रथमेश ने त्याला समजावून सांगितले पण नचि इतका सेन्सेटिव्ह होता की त्याने ही गोष्ट मनाला लावून घेतली. आज त्यांच्या मित्राचा राघव चा वाढदिवस होता. सगळ्याना त्याने पार्टी साठी बोलवले होते. संध्याकाळी प्रथमेश आणि नचिकेत एकत्र निघाले. तसा नचि पार्टी ला यायला तयार नवहता पण प्रथमेश नेच त्याला आग्रह करून तयार केले त्यामुळे जरा अश्विनी चा विचार त्याच्या डोक्यातून जाईल म्हणून. रात्री खूप लेट झाला त्यांना पार्टी संपायला. प्रथमेश च्या बाईक वरून नचिकेत आला होता. 

(क्रमशः)


Rate this content
Log in

More marathi story from Sangieta Devkar

Similar marathi story from Drama