STORYMIRROR

Vilas Yadavrao kaklij

Abstract Romance Tragedy

2  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Romance Tragedy

' सवत '

' सवत '

8 mins
83

मदन आज सातवीचची केंद्र परीक्षा उत्तीर्ण होऊन ट्रेनिंग साठी त्याची निवड झाली होती. ट्रेनींग झाल्या नंतर मदन शाळेचा मास्तर बनणार होता. त्यामुळे मदन च्या वडिलांना आनंद झाला होता . मदनच्या वडिलांनी यांनी आज नदीतून भरपूर मासे पकडून आणले व येथेच्छ पार्टी म्हणून सगळ्यांना मासे घरी खाऊ घालणार होते .मदन पास झाल्याची पार्टी चे कारण . त्याचे वडील कोळी समाजाचे असून मासे पकडणे हा त्यांच्या वडिलो पारजीत व्यवसाय . मदन चे वडिल ग्यानबा ची या गावामध्ये "गाव कोळी "म्हणून नेमणूक झाली होती. गाव कोळी चे काम म्हणजे मंदिरांची स्वच्छता ! ठेवणे .मंदिरात रोज सायंकाळी दिवाबत्ती करणे . मदनची आई चे काम झाडलोट करणे . स्वच्छता करणे त्याबद्दल त्यांना गावातील प्रत्येक शेतकरी पिका मधला काही वाटा मदन च्या वडिलांना देत असत .त्या काळामध्ये भरपूर धन धान्य पिकत असल्यामुळे शेतकऱ्याला धन धान्य देणे .आंनद वाटत . बारा बलुतेदार यांना या प्रकारची कामे शिवरायाच्यां राज्यात रित होती . शेतकरी स्वखुशीने बोलावून घेत आणि वाटा देत होते . कारण दान दिल्याने वाढते . असा प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वास होता .मदनची आई रोज सकाळी लवकर उठून सर्व मंदिरांची झाड झूड करणे मदन च्या वडिलांनी सायंकाळी पाटलाच्या करून दिव्यासाठी तेल घेणे .काडीची पेटी घेऊन गावातील मंदिरांमध्ये दिवा पेटवणे . हे मदन च्या वडिलांचे काम होत .

 एखादा सण असेल दिवाळी , दसरा , पाडवा ; किंवा गावची यात्रा असेल तेव्हा सर्व गावातील लोक आपल्या ग्रामदैवतेला नैवदय देत . आजही या प्रथा ग्रामिण भागात टिकून आहेत .ते नैवद्य जमा करणे हा कोळीं लोकांचा परंपरागत व्यवसाय होता .त्यामुळे मदन लहाण पणा पासून लोकांनी देवाजवळ ठेवलेला नैवद्य जमा करणे व घरी आणणे . साधारणता आठवडाभर त्यांच्या कुटुंबाला ते पुरत जणू आपण देवाचे भक्त आहोत . देवाचा नैवद्य लोक देतात भक्तांनाच देतात अशी मनाची समजूत झालेली होती .जेव्हा मदन हळूहळू समजू लागले . गावात सातवी पर्यंत शाळा असल्यामुळे परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत . सातवीची केंद्र परीक्षा असल्यामुळे मदन ने खूप अभ्यास केला व केंद्रामध्ये नंबर कमावला . त्यामुळे साऱ्या गावभर कोळीचा " मदन " त्यांची वाहवा झाली . तेव्हा त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला . मुलगा मास्तर होणार ! एका कोळ्याचा मुलगा मास्तर होणार ! वडिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला . ट्रेनिंग स्कूल साठी शहरांमध्ये पाठवण्यासाठी व्यवस्था केली . अनेक लोकांनी आर्थिक स्वरूपात मदत दिली . त्यामुळे जाण्यास उपयोग झाला . ट्रेनिंग स्कूल मध्ये मदन ची होस्टेलमध्ये राहण्याची सोय झाल्यामुळे तेथे खर्च वाचला !

एक वर्षानंतर ट्रेनिंग संपले .आणि मदन मास्तर म्हणून गावाजवळ शहरापासून लांब अंतरावर एका खेड्यात नेमणूक झाली . तेव्हा मात्र मदन च्या लग्नासाठी असंख्य स्थळ सांगून येऊ लागले. एक चांगली सुंदर गोरीगोमटी अशी मुलगी पहिली / दुसरी शिकलेली असेल ! वडिलांच्या शब्दापुढे मदन ला काही बोलता आले नाही . आणि मदनच्या आई-वडिलांनी धूमधडाक्यात गावां मध्ये मदनचा संसार सुरू झाला. मदन अतिशय साधा , भोळा , मुलींसारखा लाजाळू होता . पत्नीशी बोलण्यासही घाबरत असे . लोकांसमोर बोलण्यासाठी सुद्धा तो लाजत असे . लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देव दर्शन झाले .दुपारी पूजा आटोपली आणि मदन च्या खऱ्या संसाराला सूरुवात झाली .पहिली रात्र एका छोट्या खोलीत व्यवस्था केली .स्वर्गापेक्षा ही जास्त वाटणारे सुख म्हणजे मानवी जीव माची पाहिली रात्र ! रंगात ' स्वप्नात झाली . हळू हळू पत्नी नव नवीन संसाराची स्वप्न रंगू लागले गावापासून काही किलोमीटर अंतरावर नोकरी असल्यामुळे मदन सायंकाळी घरी येत होता व सकाळी लवकर उठून डबा घेऊन त्या गावी जात .आता लवकरच मदन ला एक गोंडस असा मुलगा झाला . सर्वांना आनंद झाला .मदन चा संसार आंनदाने चालू होता . पत्नी अतिशय सुरेख गोरी गोमटी कमनीय बांधा . देखणी असल्यामुळे मदनच्या साऱ्या मित्रांना देवा वाटत होता. एक /दोन वर्षांनी मदन ची बदली गावा पासून लांब अंतरावर कोकण पट्ट्यामध्ये झाली . त्यामुळे तेथे जाणे अपरिहार्य होते .दुसऱ्या दिवशी मदने स्वतःचा बिछाना काही वस्तू ,एक लोखंडी पेटीत घेतल्या आणि मदन नोकरीच्या गावी निघाला ! 

कोकण भाग असल्यामुळे मदन ने एकट जाण्याचे ठरले व पत्नीला गावी आईवडिलांकडे ठेवून मदन निघाला . शनिवारी शाळा संपली कि घरी येणार व सोमवारी परत जाणार .अशा पद्धतीने त्या गावी पोहोचला . कोकणात एक छोटीशी वाडी त्या वाडीवर एक छोटीशी दोन शिक्षकी शाळा होती . जेमतेम वीस-पंचवीस मुलं असतील !त्या गावांमध्ये गुरुजीला लगेच गावातील एका गृहस्ताने आमच्या घरी या ! तुमच्या साठी एक खोली रिकामी करून दिली . त्या काळामध्ये गुरुजींना अतिशय मान होता . गुरुजी म्हणजे जवळ जवळ गावांमध्ये ज्याप्रमाणे आज तहसीलदार , आमदार यांचे प्रमाणे गुरूजींना मान दिला जात . कोणताही कार्यक्रम त्यांना विचारल्या शिवाय त्या गावातील लोक करत नसत .कोणत्याही प्रकारचा व्यवहार असो ,लग्न असो , मुंज .असो की कार्यक्रम . गुरुजी प्रथम !

 कारण त्याकाळी कोणत्याही प्रकारच गुरुजी कोणावर अन्याय होऊ देत व न्यायाने आणि नीतीने वागल्यामुळे एक शब्द म्हणजे 'गुरुजी ' गावांमधील प्रथम नागरिक असल्याचा मान त्याकाळी गुरुजींना मिळत होता .पगार हा जेमतेम होता 40 रुपये ! तो घेण्यासाठी सुद्धा तालुक्याच्या गावी जावे लागत असे . मदने एका खोलीमध्ये सामान ठेवले .ओळकटि पसरवली . शेजारील गृहस्थाने एक हंडा पाणी आणून दिले . एक लोटा ग्लास आणून दिला . हे गृहस्थ त्या गावातील बागायतदार व्यक्ती ! शेती भरपूर असल्यामुळे भाताचे उत्पादन. गावाची ती कौलारू घरं! सागवानी बांधलेली कौलारू घरं . आणि पाऊस भरपूर असल्यामुळे त्या घरांमध्ये पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतक्या पद्धतीने लाकडाची साठवण व जनावरांच्या शेणापासून तयार केलेल्या गोर्‍यांची साठवण केली जात . व झोपण्यासाठी लाकडांचा चबुतराप्रमाणे केलेला . त्या पद्धतीने गुरुजींची राहण्याची व्यवस्था . गुरुजी शाळेत आले गुरुजींच्या बरोबर असलेले सहकारी शेजारच्या गावात असत .त्यामुळे ते मुक्कामी त्या गावात जात . ते थांबत नसल्यामुळे मदन 24 तास त्याच गावांमध्ये . लवकरच मदन ची सर्व गावांमध्ये ओळख झाली . मुलांना मदन चा लळा लागला . सर्व गावाला मदन अतिशय आवडू लागला .ज्या घरामध्ये मदन ची राहण्याची व्यवस्था केली होती . त्यात शेतकऱ्याला तीन मुली होत्या . दोघींचे लग्न झालेली होती व एक लहान मुलांच्या शाळेत होती . मात्र त्या शेतकऱ्याची दुसरी मुलगी लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसात तिचा पती साप चावून वारल्यामुळे ती परत आली होती . दुसरे लग्न करणे त्या समाजामध्ये वाईट मानले होते . त्यामुळे ऐण तारुण्यात असलेली 'ती 'मुलगी घरामध्ये होती .जेव्हा मदनला त्या घरांमध्ये जेवणासाठी आग्रह केला जात तेव्हा मदन नाही म्हटला तेव्हा त्या गृहस्थाने खानावळ म्हणून आमच्याकडे खा ! आणि जे काही जेवणा चे तुम्हाला पैसे वाटतील ते द्या !रोज सायंकाळी एकत्रितपणे जेवण करणे आणि त्यांच्या घरामध्ये शाळेत व्यतिरिक्त टाईम देऊ लागला . हळूहळू त्या गृहस्थाची दुसरी विधवा मुलगी ! ऐण तारुण्यात .मदन पेक्षा पाच वर्षांनी लहान असेल . लग्न झाल्या नंतर तीन च महिन्यात त्या मुलीचा पती वारला होता .त्यामुळे ऐन तारुण्यामध्ये तिच्यावरही वैधव्य लादले गेले होते . मात्र निसर्ग नियमा प्रमाणे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि तारुण्यामध्ये आकर्षन ! मदन ही नुकतेच लग्न झाल्यामुळे पत्नी पासून आठवडाभर लांब राहिल्यामुळे ओढ .आपल्या घरात कोणी नसले की गुरुजीला रत्नांच जेवण देऊ लागली . काही मदत असेल तर आपणा कडून मिळत असे .हळूहळू रत्नाची ओळख वाढली आणि गुरुजी हा पूर्ण गावातला विश्वासू असल्यामुळे गुरुजींवर घरातील व्यक्ती म्हणून साऱ्यांचा विश्वास ! होता .गुरुजी शाळेत गेले शाळा सुटल्यानंतर सायंकाळी जेव्हा घरी आले घरामध्ये सारी साम सूम दिसत होती . गुरुजी ने आवाज दिला रत्ना ! रत्ना ! तेव्हा रत्ना घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली तिला विचारले ? तिने सांगितलं की आमचे दूरचे नातेवाईक बाजूच्या वाडी मध्ये निधन झाल्यामुळे आई वडील तिकडे गेले आहेत . कारण रत्नाची मावशीचं निधन झालं होत . व त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते . मात्र घर राखण्यासाठी त्याकाळी कोणत्या प्रकारची बस सुविधा नसल्यामुळे पायी येणे . प्रवास त्यामुळे सायंकाळी परत येणे शक्य नव्हते . सायंकाळी रत्ना एकटी होती गुरुजीला जेवण वगैरे दिले . गुरुजींच रत्ना कडे आकर्षित होत होते . आणि रत्नाचा हवाहवासा सहवास दोघांनाही ! वाटू लागला .आणि नीतीने जणू काही त्यांना संधी दिली होती . अचानक रात्री घरामध्ये कसलातरी आवाज झाला आणि रत्ना घाबरत घाबरत गुरुजी कडे रूम कडे पळत आली . मदने रत्नाला धीर दिला . खूप घाबरली . रत्नाला कसलातरी भास झाला मात्र एवढी घाबरली होती .कि शेवटी रत्ना मदन च्या रूम मध्ये थांबली !रत्नाची शारीरिक भूक तारुण्याच आकर्षण ! आणि जेव्हा दोन तरुण आणि विशेषतः ओळखीचे ! कित्येक वर्षापासून दोघांना मनामध्ये असलेल्या साऱ्या भावना व शारिराची भूक भागली ! दोघांनी स्वर्गसुख घेतले . त्यानां एकमेकां विषयी आकर्षण दोघांना इतकी सवय झाली . की दररोज रात्री बाहेर कोणत्या ना कोणत्या कारणाने जाऊन घरामध्ये सगळे असल्या नंतर सुद्धा ते निवांतक्षणी एकमेकाला भेटू लागली . रात्र घालवू लागली ! साधारणता दोन / तीन महित्यानंतर मात्र !एक दिवस रत्नाला उलट्या होऊ लागल्या .तेव्हा मात्र रत्नाच्या आईला संशय आला .तिने रत्नाला विचारले तुमच्या तोंडाने सांगणार कि नाही ? मदन चा आईला संशय आला . रत्नाचे वडील अतिशय तापट करारी होते . त्यांना कळले असते तर त्यांनी गुरुजीचा खूण केल्याशिवाय राहणार नाही . किंवा रत्नाला मारल्या शिवाय रहाणार नाहीत . रत्नाचे आईने गुरुजींना "मदन "ला झालेल्या कृत्या बद्दल सांगितले . यावर एकच पर्याय तिचे शी लग्न करा . ही विधवा मुली आम्ही घरामध्ये ठेवू शकत नाही . त्यामुळे सहाजिकच स्वतःची बदनामी होईल . यामुळे मदन ला लग्न करावे लागले . मात्र घरी सांगू शकत नव्हता . शेवटी मदने त्या गावी रत्ना बरोबर व गाठी पत्नीबरोबर राहू लागला .सुट्टी असली की गावाकडे येऊन संगीताशी सहवास करू लागला .तिकडे संगीताला दोन मुले झाली होती .हा धक्का सहन होणार नाही म्हणून मदन नि ती गोष्ट लपवून ठेवली . हळूहळू मूले मोठी होऊ लागली . शनिवार-रविवार मदन सुद्धा त्या गावाहून विशिष्ट काही कामाचे निमित्त सांगून तो टाळू लागला तिकडे रत्नाला दिवस गेले होते सारे गावा मधे चर्चा झाली मात्र लग्नामुळे ती चर्चा थांबली व मदन गावचा जावई झाल्यामुळे मदनला म्हणजे गुरुजीला जास्त प्रकारचा मान मिळू लागला काही दिवसांनी मात्र त्यांच्या मित्रांकडून गावापर्यंत बातमी पोचली तेव्हा मात्र त्याला काही सुचत नव्हते . व रत्नाचा आई वडील त्या गावाकडे रत्नाला घेवून चला ! शेवटि इकडे मदने कोणत्याही प्रकारे लग्न केलं नाही हे पत्नीला सांगितलेले नव्हतं .मात्र इकडे आईवडिलांना सांगितलं की आमच्या गावची मला नेहमीच सहकार्य करणाऱ्या हे काय असं म्हणून रत्नाला आणलं आणि तिच्या घरी कोणी नसल्यामुळे ती आपल्याकडे राहते असं म्हणून एकाच घरात राहू लागले रात्री जेव्हा रत्नाला मदन सहवास लागत असे तेव्हा ती मदन ला बोलत . इकडे संगीता आहे त्यामुळे हा तिच्याशी लगट का करतो ?त्यामुळे तिचा संशय बळावला शेवटी एक दिवस अचानक रात्री ते प्रणयक्रिडा मध्ये व्यस्त होते .त्यामुळे संगीताने त्या क्षणांमध्ये शेवटी मदन गयावया करून सांगितले की ही तुझी "सवत ..त "आहे कोणालाही सांगितले नाही तीचा स्वीकार कर ! अन्यथा माझ्या घरातून चालती हो ! संगीताला आपली दोन मुले आणि सुखी संसार मोडा वासा वाटला नाही . तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता . शेवटी ती हे सार सहन करू लागली . दोघी सोबत एकत्र राहू लागल्या . सवती ... सवती ...

----------------------

क्रमशः - भाग 2


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract