Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy

4.5  

Vilas Yadavrao kaklij

Abstract Tragedy

"सवत" भाग -3

"सवत" भाग -3

5 mins
450


भाग-3 क्रमश:


सुगंधा आज फार आनंदात होती. कारण तिने मदनला सर्व कल्पना दिल्यामुळे मदन अतिशय गोडी गुलाबीने वागू लागला .त्यामुळे तिला खात्री झाली की आपण त्याला कायद्याचा धाक दाखवल्यामुळे तो आपल्याशी नीट वागू लागला तो आपल्याशी लग्न केल्याशिवाय राहणार नाही . तीला खात्री वाटू लागली कारण मदन चे वागणे वर्तनामध्ये फरक पडला होता . दररोज तो एखाद्या संसारी माणसाप्रमाणे घरामध्ये सर्व लक्ष देऊ लागला. शाळेकडे लक्ष देऊ लागला .सुगंधाला तिच्या संसारामध्ये असलेल्या अतृप्त इच्छा कशा पूर्ण होतील ? पूर्ण करण्याचे तीला स्वप्न दाखवू लागला . मात्र त्याच्या मनामध्ये एकच विचार ! घोळत होता .कि सुगंधा च्या पोटात वाढत असलेला स्वतःचा अंकुर हा वेळेपूर्वीच नाहीसा करणे त्यासाठी तो वेगवेगळे प्रयत्न करत होता . वेगवेगळ्या खाद्य पदार्थातून वेगळ्या प्रकारच्या गोळ्या . औषधे , नकळतपणे देऊ लागला. ज्या गोष्टी सुगंधा खाण्यासाठी टाळत होती त्या गोष्टींचा तो आग्रह करू लागला . पण प्रेमापोटी असले विचार सुगंधाच्या लक्षात येत नव्हते . मात्र सुदैव की दुर्दैवाने सुगंधा वर कोणतीही मात्रा उपयोग होत नव्हता व त्याचा दुसरा प्रयत्न या खेड्यातून लांब दूर अंतरावर बदली ! करून सुगंधा पासून सुटका करून घेणे हा त्याचा प्रयत्न चालू होता त्यामुळे तालुक्याच्या गावी जाऊन साहेबांची वेगळ्या प्रकारचे कारणे सांगून बदलीचे बहाने करू लागला.

इकडे मात्र सुगंधाला गावामध्ये स्वतःला दिवस गेले असल्याचे कळल्यानंतर आपल्याला लोक नालायक किंवा वेगळ्या चालीची म्हणतील व आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल याची चिंता ' असल्यामुळे ती ला लवकरात लवकर आपण मदन शी लग्न केले की गावातील सर्व मंडळींची व समाजातील नजर बदलेल व मला मानाने राहता येईल व संसार करता येईल अशा प्रकारची ती स्वप्न रंगवू लागली .मात्र इकडे तिचे स्वप्न भंग करण्याचे प्रयत्न मदन कडून जोराने सुरू होते. साधारण तीन महिन्यानंतर दिवस गेल्याने पोट दिसते व इतरांना कळत . त्यामुळे सुगंधा तशा पद्धतीची काळजी घेऊ लागली. तिकडे मदन च्या प्रयत्नाला यश आले. मदन ची बदली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दूर एका अनोळखी खेड्यामध्ये त्याने करून घेतली. तीला न सांगता ! आठवड्यामध्ये त्याला विरोध होण्यासाठी आपले सगळे सामान आवराआवरी करून निघाला व सुगंधाला सांगितले की लवकरच तुला पण घेऊन जाईल. मात्र तुला हि नोकरी सोडावी लागेल? तीला आधाराची गरज असल्यामुळे ती सर्व गोष्टींना तयार होती .मदन गावी गेल्यानंतर त्याने कोणत्याही प्रकारच संपर्क ठेवला नाही व ती येऊन पोहोचेल अशा प्रकारची कोणत्या प्रकारची ओळख त्याने दिली नाही.

दोन महिने झाले तरी मदन चा निरोप , संदेश , कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे सुगंधाला शंका येऊ लागली. तिने शाळेतील दप्तरामध्ये असलेल्या मदन चा घरचा पत्ता शोधला. ती त्या गावी जाऊन पोचली. सर्व तपास करून मदनच्या घरी पोहोचली व मदनाची सहकारी शिक्षिका आहे. व या गावात कामानिमित्त आली होती असं म्हणून तिने घरी सर्वांशी ओळख करून घेतली बोलता बोलता तिला मदन चा पूर्व इतिहास कळला . याविषयी मदने कोणत्याही गोष्टी सांगितलेल्या नव्हत्या व आपण एक विवाहित पुरुष आहे याची कल्पना सुगंधाला दिली नव्हती .मात्र इथे आल्यानंतर सुगंधाला रत्नाचा आणि संगीताचा पूर्ण इतिहास बघायला मिळाला होता .बाहेर व्हरांड्यात यांचे आई - वडील दोघेही म्हातारे ! बसले होते . तेव्हा संगीता ची तीन मुलं व त्यांची दोन मुलं अशा पाच मुलांचा जन्म देता बाप ! मदन व या च्या दोन दोन सवती ! त्यांच्या मनामध्ये असलेली चलबिचल तीणे ओळखली व पूर्व इतिहास जाणून घेऊन येते म्हणून निघाली .मात्र तिने स्वतःचा पूर्ण नाव ,पता वगैरे न सांगता ती त्यांच्या घरून निघाली .

नोकरीला तो दूरच्या गावी होता दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ! प्रवासासाठी दोन दिवस व प्रवास खर्च तीला झेपणारा नव्हता . त्यामुळे ती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये शोध येऊ शकत नव्हती याचा फायदा मदने घेतला होता . आता मात्र सुगंधा पुढे एकच पर्याय होता एक तर आपल्या पोटी असलेला अंकुर मिटवणे किंवा मदनला शोधून त्याच्याशी कायदेशीररित्या लग्न करणे . मात्र मदन ठावठिकाणा लागत नव्हता. इकडे मात्र सुगंधाने तालुक्याच्या गावी जाऊन पोलिसांमध्ये तक्रार दिली .मदन वर फसवणुकिचा गुन्हा दाखल केला व गावांमध्ये या गोष्टी कळू नये म्हणून तिने काही दिवसासाठी बाहेरगावी जाणेचे ठरवले .तब्येतीचे कारण सांगून तिने सहा महिन्याची रजा टाकली. व दुसऱ्या एका खेड्यामध्ये मोलमजुरी करून धूणी भांडी करून पोट भरू लागली . जेव्हा तिचे दिवस भरात आले. तेंव्हा ती एका सरकारी दवाखाने मध्ये भरती झाली . व एका गोंडस बाळाला जन्म दिला. आता त्या बाळाला सांभाळल्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता व नोकरी जर सोडली तर पोट भरण्यासाठी त्याशिवाय चांगला पर्याय मिळणार नाही . त्यामुळे तिने त्या बाळाला आश्रमामध्ये सोडण्याचा विचार केला. एका बाजूला समाजामध्ये असणारी प्रतिष्ठा ती टिकावी दुसऱ्या बाजूला जन्मदात्री आई आपल्या बाळाला दूर सोडावे की नाही याविषयी तिच्यातील अथवा बाळाला सोडून देत नव्हता. मात्र या गोष्टी केल्या नाही तर पुढील जीवन जगण्यासाठी व तिचे तीन मुलं सांभाळण्यासाठी एका मुलाला सोडणे हाच पर्याय ! दिसू लागला . तिने जवळच्याच शहरालगत अनाथालयाचा शोध घेतला होता . एका रात्री तिने बाळाला झोपेच्या गोळया दिल्या आणि मोठ्या जड अंतकरणाने त्या बाळाला अनाथालय रात्रीच्या अंधारात या कुंतीने आज जड अंतकरणाने तीच्या कर्णा ला दरवाजाजवळ सोडून पसार झाली. दुसऱ्या दिवशी तीने परत नोकरी त्या गावी जाणेचे ठरवले होते रजा आता संपत आली होती. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी पोचली नाही तर तिला नोकरी परत मिळू शकणार नव्हती . त्यामुळे तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिने आपल्या मुलांना आणि जुजबी सामान घेतलं ती मोलमजुरी करून त्या गावातील दुकानाची उधारी घरभाडे चुकती केली आणि परत नोकरीच्या गावी येऊन पोहोचली. आल्यानंतर गावांमध्ये बऱ्याच चौकशी ना तिला सामोरे जावं लागलं . मात्र वेगवेगळी कारणं सांगत तिने नी भावल . एक खोटं लपवण्यासाठी सतरा खोटी कारणे द्यावी लागतात तिला पहिल्यांदा समजल होत .. आता तिला समाजापासून व समाजातील प्रतिष्ठित पासून कोणताही धोका नव्हता मात्र तो त्या निष्पाप ,निरागस , बाळाला. ! त्याला सर्व काही असून सुद्धा अनाथालया मध्ये जीवन जगावं लागलं होतं .त्याचं कारण समाजाची प्रतिष्ठा ! व स्वार्थापोटी मनुष्य कशा पद्धतीने वागतो याच ते .ज्वलंत उदाहरण ! म्हणजे बाळ होतं .

एक दीड तासानंतर ते बाळ जेव्हा थंडीमुळे कुडकुडत रडण्याचा आवाज आल्यानंतर अनाथालय कर्मचाऱ्यांनी आवाज ऐकल्यानंतर बाळाला भरती करून घेतले. त्यांना या विषयी सार्‍या कल्पना होत्या कारण अनाथला यामध्ये अशा प्रकारची बालके दाखल होतात . त्यामुळे त्यांना ही गोष्ट नवी नव्हती . त्या बाळाला दाखल करून घेतले . मात्र सुगंधाला वात्सल्य , ममता , आईला झोपू देत नव्हते . यामुळे ती नेहमी अनाथालया कडे वेगवेगळ्या कारणाने भेट देऊन बाळाचा खुलासा करावा असे विचार तिच्या मनात येत होते .व त्याप्रमाणे ती कृती करीत होती व दुसऱ्या बाजूला मदन ! विषयी मनामध्ये आलेला संताप व स्वतःची केलेली फसवणूक याची शिक्षा ? त्या बाळाला .न्याय मिळवून देण्यासाठी तिने मनात खूणगाठ बांधली होती .तिने पोलिसात तक्रार दाखल करून त्यांनी स्वतःची चक्र फिरवायला सुरुवात केली . तिकडे मदन ला वाटते की मी सर्व गोष्टीतून सहीसलामत बाहेर पडलो .त्यामुळे तो आनंदात होता त्याचे घरी येण्याच्या चकरा जास्त वाढू लागल्या कारण आता त्याला दोन्ही सवती जवळच्या वाटू लागल्या होत्या. घरी आल्यानंतर तुझ्या शाळेतील सहकारी शिक्षिका येऊन गेल्याचे कळल्यानंतर मात्र त्याच्या पायाखालची जमीन सरकली ! त्याला वाटले की सुगंधा ईत पर्यंत येऊन पोहोचली . ती पोलीसांचा आधार घेतल्याशिवाय राहणार नाही याची त्याला शंका निर्माण झाली व तो नेहमी शंकेच्या व काळजीपोटी शांत राहू शकत नव्हता????


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract