Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Komal Mankar

Thriller Others


3  

Komal Mankar

Thriller Others


सवंगडी

सवंगडी

15 mins 406 15 mins 406

               नुकतीच बारावीची परिक्षा उतीर्ण होऊन नागपूरला मी इंजीनियरिंगला अॅडमिशन मिळवली, कॉलेज तसं हिंगण्याला आत्याच्या घरून कमाल चौकातून दूरच पडायचं. म्हणून बर्डीचा समोर डिसी वसतीगृहात दाखल झाली. ते वसतीगृह म्हणजे जुनीपुरानी बिल्डिंग आतमधूनही तसंच. वार्डनने मला माझ्या रूमपर्यंत नेऊन सोडलं. थ्री शिटरची रूम वार्डनने नॉक करतच आतमधून कोणीतरी दरवाजा उघडला, तशी ती राहणीमानावरून एखादया रिच फॅमिलीमधली वाटली पूजा तिचं नाव होतं. वार्डन मॅडमने तिच्यासोबत माझी ओळख करून दिली."पूजा ही नवीन आहे पहिल्यादाच होस्टेलवर रहातं आहे, रात्री जेवनाची वेळ झाल्यावर हिला मेस बद्दल माहिती देऊन सोबत घेऊन यायचं.”पुजा मानेनेच होकार देत आपल्या बेडवर जाऊन बसली. आणि मला एकदमच म्हणाली, “कशाला आली ह्या होस्टेलवर? “ती माझ्यापेक्षा सिनियर होती म्हणून मी तिला ताईच म्हणायला सुरूवात केली,"ताई.”मधातचं मला ती थांबवतम्हणाली,”ताई नको पुजाच बोल.”मला तिचं बोलणं ही पहिल्यादा अजीबच वाटतं होतं,”ओके पुजा.. मला आत्याच्या घरून कॉलेज फार लांब पडतं म्हणून मी होस्टेल जॉईन केलं."मिश्किलपणे जरा हसतचं ती म्हणाली,”हेच मिळालं?. बाय द वे जाऊदे ते, तुझं नाव काय म्हणाली? "मनातचं म्हटलं ह्या मुली सिटीमध्ये दोन तीन वर्षा आधी स्थायी झालेल्या काही साध्यासुध्या नसतात हिला मला ह्या रूम मधून घालवायचं तर नाही आहे ना! (माझ्या मनाला सहजच पडलेला तो प्रश्न.) 


माझ्या बॅगमधलं सामान लावतं मी तिच्या प्रश्नाची उत्तरे देऊ लागली, “घरी मला तसं सर्वे काव्याच म्हणतात पण अटेन्डन्ट मध्ये माझं नाव.”मधातच माझं वाक्य पुर्ण न होऊ देता ती म्हणाली,”काव्या वॉव यार नाईस नेम.आमची नाव बघं ना पुजा आरती. रचना बाहेर गेली म्हणत ती हसायला लागली."थ्री शिटरचीच ही रूम आणि आरती रचना ह्या कोण आता? तेवढ्यात पुजाच खांद्यावर हात ठेवत म्हणाली,”जास्त विचार नको करू हं! आरती म्हणजे आपली रूममेट एक बेड इथे खाली होता म्हणून रचना इथे होती ती आपल्या वार्डन नाही का? ज्या तुला इथं पर्यत पोहचवायला आल्या त्यांची मुलगी. तू आली ना आता तर ती जाईल इथून निघून तू बिनधास्त रहा! "पाच वाजायला आलेत. एवढ्यात आरती आणि रचना आल्या कॉलेज मधून दोघीही बेधडक आणि मौजमजैत वावरणाऱ्या मॉर्डन गर्ल. रूम मध्ये येताच रचना मला म्हणायला लागली,”ये हँलो. तू नवीन आली? पहिल्यादाचं होस्टेलचं पाणी लागतं आहे की ह्या आधी ही राहिली आहे कधी हॉस्टेलवर? "मी तिच्याकडे बघतं,”हो नवीनच आहे ह्या होस्टेल लाईफच्या दुनियेत.." बाटलीतलं पाणी पित पुजा जवळ बसलेली आरती मला म्हणाली,”ओहहहह यु डॉन्ट माईंड. ह्या हॉस्टेल लाईफच्या विश्वात आम्ही आहोतच तुला ओळख करून द्यायला! "त्याच्या सोबत गप्पा करता करता सहा कसे वाजलेत ना कळलचं नाही मला.पुजा आणि आरती जवळ जवळ मला वाटयचं ह्याची जोडी म्हणजे बेस्टीची झक्कास! बॉन्डींग होती ह्याच्या मैत्रीत ते जियेंगे भी साथ साथ मरेंगे भी साथ साथ.! “दोघींचा कुठेतरी पार्टीला जाण्याचा आज बेत होता.. पुजा मला आणि रचनाला म्हणाली,”चला ना तुम्ही दोघी पण बरं वाटेल होस्टेल घुशा नका बनू नाहीतर बाहेरचं जग कळणार नाही! "रचना जरा तिच्यावर कावरीबावरी होतचं म्हणाली,”ये हँलो निघ ना आता! पार्टीत जा एन्जॉय करंतुझा तो काय नाव त्याचं? हा आठवलं. दिक्षीत, त्याला पण जा सोबत घेऊन!"(रचनाच्या बोलण्यावरून मला जाणवलं दिक्षित कोणी तिचा Bf असावा.)


तिच्या बोलण्यावर काहीच न बोलता पुजा आरती बाहेर पडल्या त्या खाली उतरल्याचं खिडकीतून त्यांना आवाज देतं रचना म्हणाली,”ये आरती येतांना माझ्यासाठी नुडल्स घेऊन ये! "ती बारीक हड्डी रचना.मला वाटयचं होस्टेलचं जेवन न खाता बाहेरच्याच खाण्यावर जगते की काय? पण, जेव्हा रात्रीच जेवन घ्यायला मी रचना सोबत मेस मध्ये गेली तेव्हा तिथल्या जेवणाचा पहिल्यानंदाच अनुभव आला कशा होत्या ना त्या पोळ्या जळल्या, अर्ध्या कच्च्या, राखडलागलेल्या.. भाजीची चव तर विचारू नका!त्या पेक्षा गटागट्ट पाणी घशाच्या खाली उतरेल पण त्या भाजीचा घास गिळता यायचा नाही. तुरीची डाळ महाग असते म्हणून त्यात अर्धशिजलेली चण्याची डाळ आणि त्याचं पाणी पातळ वरण. भाताचा तर पारं घाटा झालेला.लेट्रीन वाशरूमची तर विचारता कामा सोय नाही! कॉलेजला आंघोळ करून जायचं असतं.. म्हणून भल्यापहाटे उठून पाच वाजताच आंघोळ करून बाहेर निघायचं तेही एवढ्या सकाळी नळाचं पाणी. कुठून? आदल्या रात्रीच बालट्या भरून रूम मध्ये पाणी नेऊन ठेवायचं आणि खालच्या फ्लोअरवर घेऊन यायचं.भल्या रात्री वाशरूमला जायचं असलं तर कोणी एकटं जायचं नाही हे त्यातल्या त्यात अचंबीत करणारं. मला आरतीने तर ताकिदच देऊन ठेवली होती, "हे बघ! रात्री एकटं खालच्या फ्लोअर वर जायचं नाही खाली चोर लपून बसलेले असतात.! "तिचं बोलणं ऐकून जाम हसायला यायचं मी हसायचीही मी अजून उडवत तिला म्हणायची,”कुठे वाशरूम मध्ये बसले असतात की बंद नळाच्या खाली.”हश्शशाडोळ्यावर कितीही झोप असली आणि एकातदोघीनी आवाज दिला तर डोळे चोळत ह्यांना कंपनी म्हणून सोबत जायचं आणि येतांना पायऱ्यावरून ये खालच्या पायरीवर कोणीतरी उभं आहे बघ! म्हणताचं त्यांच पळत जाणं रूम मध्ये शिरताच मात्र त्या तिघीचा एकचं सूर.”काय हे काव्या तिथं खरचं कोणी असतं म्हणजे."मग मी हसतच म्हणायची,”तुम्ही तिघी पण एकनंबरच्या फट्ट्टू.. आणि भेकाडं चोरांना भीता काय पळवुन नेणारं ते आपल्याला? "तेव्हा त्या म्हणायच्या तू नवीन आहे इथे.. इथे कधी काय घडेल ह्याचा बेत नसतो.कसे तरी माझे तिथे पंधरा दिवस गेले घरच्यांनी ह्या महिण्याचे आधीचे पैसे भरलेले.


कॉलेज बर्डीवरून तरी दुरच पडायचं हिंगण्याला जायची बस पकडायची ते मोरभवन मध्ये जाऊनच.त्या रात्री रचना मला म्हणाली,”काव्या तू असं का करत नाही? “मी तिच्या शेजारीच बसत म्हटलं,”कसं?? "“अगं तू जयताळ्याला रूम करून राहू शकते ना! छान रूम आहेत त्या माझ्या काकूच घर आहे ते तुझं कॉलेज जवळ पडते तिथून म्हणून म्हटलं मी म्हणजे आधी तिथे मुली रहायच्या आताही असतील की नाही ठाऊक नाही पण जाऊन बघं तू एकदा."मला जयताळा कॉलेज पासून दुर नव्हतं पडत आधी तिथे जाऊन बघते म्हणतं मी तिला म्हटलं,”मग मला पत्ता दे ना मी जाऊन येते."पत्ता एका कागदावर लिहून देत ती म्हणाली,”बघं तू जाऊन मी आई सोबत काही दिवसासाठी मामाकडे जात आहे येईलच आठ दहा दिवसात."मी वेळ न दवडता जयताळ्याला तीने सांगितलं त्या बंगलो समोरच बस थांबली मी तिथेच उतरली फाटकं उघडलं आणि आत शिरली. दाराला आत मधून कडी लावली असावी म्हणून मी दार बाहेरून नॉक केलं. तसचं दरवाजा किर्रर्रर्र आवाज करतं उघडला. मी इकडे तिकडे वळून बघितलं परिसर तसा स्वच्छ गुलाबाच्या फुलांनी बहरलेला हिरव्याशार वेली. ती माझ्यासमोर उभी होती कधीची माझी तिच्यावर नजर पडताच ती म्हणाली, “कोण तू कोण पाहिजे? "गुलाबी रंगाचा सलवार तिने परिधान केला होता माझ्यासमोर एखाद्या हिंदी फिल्मच्या अभिनेत्री सारखी ती भासू लागली मी तिच्याकडे बघतच म्हणाली,”मला रूम पाहिजे होती इथे."त्यावर ती माझ्यावर नजर रोखतच म्हणाली,”तुला ह्या रूमचा पत्ता कोणी दिला?"मी तिला म्हटलं,”माझी रूममेट रचना!”त्यावर ती म्हणाली,”रचना नाही आली सोबत तुझ्या?”“नाही ती दहा दिवसासाठी बाहेर गेली आहे."ती मला आत घेऊन गेली रूमा दाखवायला.. आत तीन रूम होत्या बाहेरचा हॉल, किचन आणि एक बेडरूम त्या बेडवर मला ती बसलेली दिसली. मी नराहून तिला विचारलं ही कोण? त्यावर ती मला बेडरूम मध्ये घेऊन जातं म्हणाली,”ये. ही इथेच रहाते दिप्ती."मी त्यांना हाय हँलो बोलत म्हणाली,”तुमची काही अडचण नसेल तर मी उद्या येऊ इथे रहायला.”त्या दोघी माझ्याकडे हसत बघतं म्हणाल्या,”आमची काहीच अडचण नाही तू ये! “आनंदाच्या भरात मला रात्रभर झोपच आली नाही पुजा आणि आरतीही त्या रात्री पार्टी करून उशीरा रूमवर आल्या आणि झोपी गेल्या.


दुसऱ्या दिवशी मी त्यांना सांगितलं मी होस्टेल सोडून आज जात आहे त्यांना ऐकूनच जरा वाईट वाटलं पण नाईलाज होता होस्टेलच्या जेवनाला आणि ऐकूनच वातावरणाला मी त्रासली होती.मी माझ्या बँग भरल्या आणि निघाली. मला त्या बस मध्ये त्या रूम मधली तिच मुलगी दिसली ती बोटानेच मला खुणावतं जवळ बसायला बोलवतं होती. मी तिच्या शेजारच्या शिटवर जाऊन बसली. आणि तिला म्हटलं,”कुठे निघाली होती तू? "“मी अगं रूमवरच.. सोबतच जाऊयात ना आपण."मी तिच्या सोबत बोलत होती तेव्हा आजुबाजूला उभे असलेले कॉलेजचे मुलं सारखे आमच्याकडे बघतं होते. गुलाबाच्या फुलांकडे सारेच बघतात ती जणू अप्सराच होती ना दिसायला! मग, मुलांची नजर तिच्यावर खिळणं साहाजिकचं. बोलता बोलता बंगल्याच्या समोर असलेल्या स्टँण्डवर गाडी येऊन थांबली आणि भाणावर येतं ती म्हणाली,”अगं चल उठ आली आपली रूम."उतरताना तिनेही माझ्या बँग घेतल्या रूम समोर उभं रहातचं मी दार नॉक केलं दिप्ती दरवाजा उघडतच वार्याची थंडगार झुळूक अंगाला गारवा देऊन गेली. एवढ्यात माझ्या बँग आत घेत दिप्ती म्हणाली,”ये ना आत..”मी आत गेली आणि माझ्या सोबत बस मध्ये आली तिचं नाव अजून मला ठाव नव्हतं काल पण तिने दरवाजा उघडला पण तिचं नाव विचारायचं मी विसरून गेली, आता मी तिला विचारती झाली.”सॉरी काल मी तुझं नाव विचारायचं विसरून गेली, तुझं नाव काय? “त्यावर ती माझ्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली,”मी अनुराधा. दिप्ती प्रेमाने मला अनु बोलते तूही अनुच बोलं मला आवडेलं! "“अनुराधा किती गोड नाव आहे ना तुझं अनु.! "आता मसका नको मारू हं म्हणतं ती खिदळतचं म्हणाली,”तुझं नाव सांगशील आता? “का नाही.”काव्या."“ओहहहहह.. काव्या काय करते तू म्हणजे शिक्षण? “ “मी इंजीनियरिंगच्या पहिल्या वर्षाला आहे. “दिप्ती चहाचा ट्रे घेऊन येत दोघीनाही चहाचा कप दिला आणि म्हणाली,”छान म्हणजे. तू इंजीनियरिंग स्टुडन्ट आणि आम्ही मेडिकल! "


त्यावर मी म्हणाली,”कोणतं वर्ष? "“आम्ही दोघीही एमबीबीएस च्या तृतीय वर्षाला आहोत.”अनू बोलली.दोघीनीही माझं सामान लावायला मदत केली जागा तशी ऐसपेस होती.अनुने माझा फोन घेत मेस वाल्यांना कॉल केला. रात्री मेसवाला जेव्हा टिफीन घेऊन दारापर्यत आला तेव्हा तो आतमध्ये डोकाऊन बघत होता मी म्हटले त्याला काय झालं? त्यावर नकारार्थी मान हलवत तिथून तो निघून गेला. अनु आणि दिप्ती मला म्हणाली,”अगं त्याला सांग उद्यापासून बाहेर चेअरवर टिफीन आणून ठेवायला."कदाचित मेसवाल्याचं डोकाऊन बघणं त्यांना आवडतं नसावं. आणि मला ही त्यांची नजर काही तरी शोध घेत असल्यासारखी वाटली. असते कुणाकूणाला सवय जाऊदेत!मी आपली अभ्यासाला बसली. इथे मला शांत वाटायचं अनु दिप्तीही छान होत्या त्यांचे आणि माझे विचारही मिळते जुळते!त्या आपली पुस्तके घेऊन बसायच्या कधी रविवार आला की आम्ही टॉकिज मध्ये जायचो मूवी बघायला सर्वांच्या शेवटी जायचं तेही टिकीट न काढता मी त्यांना चल ना लवकर मुवी चालू झाला असेल असं म्हणायचीच तर टिकीट घेणारा हसायचा तो अनूला हसत असावा कदाचित! अनु खुप खोडकर होती कधी तर मला वाटायचं हिच्यातलं बालपण अजून गेलच नाही. आणि दिप्ती ती तर हिटलर दिदीचं जणू. जातांना तिघेणेही एकाच कलरचे ड्रेस घालून जायचे. अनू आणि मी तिला म्हणायचोही अगं आपण बेन्डपार्टीत नाही चाललो बँन्ड वाजवायला. मग तिच्या चेहर्यावर लटका राग! तो घालवायला मला काही क्षणाचा आढावा पुरे होता.आम्ही आत जातचं त्या रागेत दिप्ती मला म्हणाली चल ना माझं मुड नाही आता मुवी बघायचं आपण हॉटेल मध्ये जाऊ. बाहेर जाऊन मी तिच्यावर रागवलीच “दिप्ती आधी सांगायचं ना! “मग हॉटेलची वारी गुपचूपच्या ठेल्याकडे वळायची.. गुपचूप खातांना गुपचूपवाला सारखा आमच्याकडे बघतं राहायचा! एकंदरीत बघणाऱ्याच्या नजरा कळायच्या नाही. तिथून आम्ही अंबाझरीच्या गार्डनवर गेलो खूप फिरलो पाय दुखायला आले होते आमचे. न राहून मीचं दिप्तीला आणि अनुला म्हटलं, “ये खूप झालं ना फिरणं आता तुमचे पाय नाही दुखत आहे का? चला आता.! "सायंकाळचे सात वाजले होते.. आम्ही रूम वर आलो माझं राइटिंग वर्क पूर्ण करायचं होतं म्हणून मी हॉल मध्ये लिहतं बसली, एवढ्यात दीप्ती आणि अनुही स्टँडीला बसल्या अनु माझ्या नोट्स बघतं म्हणाली, “ये वॉव. किती छान हॅण्डरायटिंग आहे! तू लिहिलंय का? “ते नोट्स क्लास मधल्या एका फ्रेन्डचे होते. म्हणून मी तिला म्हणाली, “अगं अनु प्रोजेक्टच राहिलेलं थेसिस कंप्लेंट करते आहे हे नोट्स माझ्या ग्रुप मध्ये अभिनव आहे त्याचे आहेत. “तिला काय झालं माहिती नाही ती एकदमच थोडी चिडत मला म्हणाली, “तू मुलांसोबत फ्रेंडशिप ठेवते? “तिचं बोलणं मला जरा विचित्रच वाटतं होतं, “नाही अगं अनु माझ्या ग्रुप मध्ये आहे तो. पण, तुला काय झालं ह्यात वाईट काय आहे? “दीप्ती आतापर्यन्त शांत बसलेली आमच्या मधातच बोलतं म्हणाली, “काव्या मुलांपासून जरा दूरचं राह्यचं. “मी म्हणाली, “मुलं एवढी पण वाईट नसतात. “त्यावर अनु म्हणाली, “तुला मुलांचा अनुभवच काय आला.! “दीप्ती आणि अनुच्या चेहऱ्यावर विराण शांतता पसरली होती कुठे तरी नाराजीचा सावट पसरलेला होता.


मी अनुचा हात हातात घेतं तिला म्हटलं ”अनु. दीप्ती, माझा कोणी बॉयफ्रेंड वैगरे नाही आणि मी मुलांच्या संम्पर्कात नसतेच सो तुम्ही नका तसलं काही समजू! “त्यावर निरागस सूर ओशाळल्या आवाजातच मला दीप्ती म्हणाली, “पाच महिने झाले तुझ्या सानिध्यात अहो आम्ही तू कशी आहे ते चांगलं ठाऊक आहे ग पण आज तुझ्याजवळ मुलाचे नोटस बघून वाटलं.! “मी म्हटल, “काय वाटलं तुला? “त्यावर ती म्हणाली, “तुझा कोणी तो मित्र असेलं म्हणून. “मला तिचं बोलण जरा खटकत होतं ह्या एवढ्या संशयी वृतीने का बघत आहे माझ्याकडे. तो कोणी मित्र तर नव्हता आणि असता तरी त्यात एवढ लाऊन घेण्यासारखं काय कॉलेज life मध्ये मित्र, मैत्रिणी हे कॉमनच.. मी न राहून दिप्ती आणि अनुला म्हटल, “का ग तुमचा कोणी बॉयफ्रेंड होता का? की मुलांसोबत काही बिनसलं कोणत्या? “माझ्यावर चिडतच अनु म्हणाली, “हे बघं बॉयफ्रेंड कोणीच नव्हता आमचा, आणि प्लीज तू ह्या मध्ये पडून काही विचारू नको.. “पहिल्यांदाच त्यांना माझ्यावर एवढ मी चिडताना बघितलं खूप मनाला वाईट वाटतं होतं. पण मी मनात म्हटल काहीतरी मुलांसोबत झालं आहे ह्याचं पण मला काय करायचं ह्या नंतर मी तिच्यासमोर मुलांचा विषय कधीच काढणार नाही. त्याचं मूड फ्रेश करण्यासाठी मी त्यांना म्हणाली, “आपण अंताक्षरी खेळू यात? “त्यावर दिप्ती हसतच म्हणाली, “इथे फक्त अनुला गाणी येतात. तुला येतात का काव्या? “मी तिला म्हटल, “पहिल्या दोन ओळी नंतर बारागाडे बोम ह. आज पर्यंत एक ही गान मला पूर्ण म्हणता आलेलं नाही. “त्यावर,”अगं काही नाही, मी म्हणते आधी नाहीतर मीच ऐकवू का तुम्हा दोघींना. “अनु म्हणाली. ”अगं काव्या. तुला माहिती आहे ही आमच्या कॉलेज मधली सिंगर आहे, प्रत्येक गाण्याच्या कॉम्पिटीशन मध्ये पहिलं पारितोषिक हे अनुलाच जायचं! ““पुरे झालं हं दिप्ती तारीफ करून माझी. आता ऐका मी एकच छान कडवं तुम्हाला म्हणून दाखवते एका सीरिअलच टायटल साँग आहे हे! “आता आमची मैत्री रुळावर आली राग रुसवा शिगेला पोहचला अनुने गान म्हणायला सुरवात केली. “मन माझे मोर पिसे स्वप्न जणू. मन माझे शिशिरातील इंद्रधनू.. कुंद्कांची कुजबुज वेद्नाचे अलगूज, नवा चंद्र नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून नवा घेतला मीच आकार उजळूनी जाई पुन्हा अवघाची हा संसार.. अवघाची हा संसार! “अनुच्या आवाजात गोडवा होता गळ्यात नादमाधुर्य होतं ती गुणगुणत असताच थांबली तर मी आणि दिप्ती तिला म्हणायचो ये गा ना.! 


तिने ह्या चार ओळीच म्हणल्या पण खूप सुरेल. गाणं संपताच ती म्हणाली, “काव्या हे सीरिअल मी घरी गेल्यावर आवर्जून बघायची फक्त हे गाणं ऐकण्यासाठी.. "“फक्त गाणं ऐकण्यासाठी अनु? ““अगं हो ग. मला आजही हे tital song खूप आवडतं. “ह्ह्ह.. आता मी तुमच्या दोघीसाठी एका महान कवीच्या छान ओळी म्हणते. दिप्ती म्हणाली, आम्ही हसतच मानेने होकार दिला आणि ती म्हणायलाही सुरु झाली.. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येतेमी संध्याकाळी गातो, तू मला शिकवली गीतेते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवीझाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवायातो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेलासीतेच्या वनवासातील जणु अंगी राघव शेलास्त्रोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचेहे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे. बापरे अख्खी कविताच दिप्तीने ऐकवली. तिची कविता पूर्ण होताच मी तिला म्हणाली, “दिप्ती, ही कविता कवी ग्रेस ह्यांची आहे बरोबर ना! ““अगदी बरोबर.. मी त्यांच्या कवितेची चाहतीच आहे! ““मेडीकल च्या स्टुडटला लिटरेचर चा नाद. भारीच आहा तुम्ही! "अनु हसतच माझ्या बोलण्यावर म्हणाली, “मग काय माणसांनी ऑंल राउंडर असायला पाहिजे तू नाही का इंजिनियरिंगची student असून कवितेच्या दुनियेत रममाण होते. तू पण एक दिवस जग प्रसिद्ध कवयत्री बनशील तेव्हा आम्ही गर्वाने सांगू ती काय आमची रुमेट होती एका ताटात आम्ही तिघी जेवायचो. खुळ्याच सवंगडी आहोत आपण नाही! “गप्पा करता करता त्या दिवशी आम्हाला झोपायला दोन वाजलेत. काय असतेना मैत्रीची दुनिया आगळी वेगळी प्रेमाच्या नात्या पेक्षा निराळीच एक वर्षांनी अनु दिप्ती डॉक्टर झाल्या. तरी त्या माझ्याच सोबत त्याचं रूम वर राहायच्या मी त्यांना म्हणायची तुम्ही इथे माझ्यासोबत किती दिवस राहणार मी दुसरीकडे रूम शोधते तर त्या म्हणायच्या. “तू इथे आहे तेव्हापर्यंत आम्ही तुला सोडून कुठेच जणार नाही! “चार वर्ष कशी लोटलीना? त्या दिवशी शेवटच्या वर्षाचा मी शेवटचा पेपर देऊन आली. अजून माझी इथे काही काम अडलेली होती म्हणून निदान दोन महिने तरी घरी जायचा प्रश्नच नव्हता.. माझे पूर्ण पेपर झालेत आता मी फ्री होती एवढे दिवस स्टडी आणि फक्त स्टडी. आज कुठे तरी निवांत फिरायला जायचा बेत होता अनु आणि दिप्तीपण सोबत होती माझ्या. रस्त्याच्या थोड्या दूर जात नाही तर वादळ सुटलं सोसाटयाच. एका दुकानाच्या आडोशाखाली आम्ही विसावा घेतला तिथून शॉपिंग करायला गेलो एवढ्या वर्षात अनु आणि दिप्तीने स्वतासाठी काहीच कसं नाही घेतलं? मी त्यांना म्हणायची ही अरे निदान स्वतःसाठी कपडे तर खरेदी करा पण त्या त्यांच्या आवडीची ड्रेस मला घ्यायला सांगायच्या. ह्यांच्या वागण्याचीपण कमाल होती ना! रात्री आम्ही बाहेरूनच जेवण करून रूम वर परतलो.. हॉटेल मध्येही जेवताना आम्ही एकाच ताटात जेवण केलं अलग वेगळ जेवण आम्हाला कधी जमलच नाही. अनु दिप्ती बाहेरच कधीच खायचं घेऊन यायच्या नाही पण, मी काही पण आणायची तेव्हा त्यांना घासातून घास दयायची. रात्री थकून आल्यामुळे आम्ही झोपी गेलो लवकरच. सकाळी आम्ही उठलो नेहमीप्रमाणे आमची काम आटोपत होतो एवढ्यात दारावर थाप पडली, कोणी तरी दार थोटवत होते. मी अनुला म्हटल, “अनु जरा बघ ना कोण आलय. ““मी कामात आहे काव्या, तूच बघं ना. "अनु रूमला झाडू मारत होती आणि दिप्ती पेपरची रदी लाऊन ठेवत होती. मी दार उघडताच रचना आज पहिल्यांदा माझ्या रूम वर आली होती. ती दार उघडतच मला म्हणाली, ”काय ओळखलं की नाही मला. अग तू तुला कशी विसरेल मी सॉरी ह मी सीम बदलवले होते त्या मुळे तुझा नंबर ही फोन मधून डिलीट झाला. "“ओह्ह्ह्ह तुझं असचं चालयचं ठाऊक होतं मला, आज अचानक इकडे येण झालं. तू इथेच राहते का म्हणून आले बघायला म्हटलं निदान आपली भेट होऊन जाईल. ““हो आत तर ये. दिप्ती अनु पण आहेत! “ह्या माझ्या बोलण्यावर ती आक्षेप घेतल्या नजरेने माझ्याकडे बघतं म्हणाली.. “कोण दिप्ती अनु इथे. कशा? ““अग डॉक्टर दिप्ती. डॉक्टर अनुराधा नाही का? मी आली तेव्हाची त्या माझ्या सोबतच आहेत! “


रचना आतमध्ये डोकावत म्हणाली, “दिप्ती. अनु ह्या जगातून कधीच्या निघून गेल्या ह्याच रूममध्ये त्या दोघींवर त्याच्या क्लासमधल्या सहा मुलांनी एकतर्फी प्रेमातून बलात्कार केला. त्या प्रेमाला अनुचा विरोध होता पण बिचारी दिप्ती तिचा काहीच दोष नव्हता तिच्यासोबत राह्यची म्हणून त्या मुलांनीतिला पण त्या बदल्यात उतरवलं. सर्व घडलेलं त्यांनी घरी फोन करून त्यांच्या घरच्यांना सांगितलं माझ्या काकूला पण, माहिती नाही त्या दोघीचे आई बाबा इथे येत पर्यंत त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या मुलांची नावं पण कोड्यातच होती त्या मुलांच्या नावाचा उलेख त्यांनी फोनवर बोलतानी केलाच नाही. पण त्यांच्या बॉडी त्यांच्यावर बलात्कार झाला हे खर होतं खूप छान होत्या ग त्या दोघी आज असत्या तर डॉक्टर असत्या कुठेतरी. “माझ्या पाया खालची जमीनच सरकली मी रचनावर चिडतच तिला म्हटलं, “तू मूर्ख आहेस दिप्ती अनु आजही इथेच आहे काहीपण काय सांगते? "आणि तिचा हाथ ओढत तिला म्हटलं हे बघं दिप्ती अनु. पण त्या तिथे नव्हत्याच मी तिन्ही रूम मध्ये त्यांना आवाज देत होती अनु दिप्ती.. अनुनुनु. दिप्तीतीईइ. एकदा नाही खुपदा आवाज दिले मी त्यांना खुपदा पण त्या माझ्यासमोर आल्याचं नाही. रचना मला सावरत म्हणाली त्या हे जग सोडून गेल्यात सहा वर्षं झाली तुझ्या कितीही हाकेच्या सादेने त्या परत येणारं नाही. तेव्हा तू ही रूम सोडून चलमी रचनाने माझ सामान भरलं तिथे मला अनुच्या नोटस मध्ये एक पूर्ण भरलेली डायरी मिळाली ते सोबत घेतली आणि रूमच्या बाहेर पडताना एकदा मागेवळून बघितलं तेव्हा तिथे अनु दिप्ती नव्हत्याच पण क्षणाक्षणाला वाऱ्याची मंद झुळूक गारवा देऊन जात होती. आज मला कळत होतं इथे येताना रूम मध्ये मेसवाला डोकावून का बघत होता त्या बस मध्ये अनु माझ्या सोबत बसली असताना ती मलाच दिसायचीइतरांना नाही म्हणून तिच्यासोबत मी एकटीच बोलत आहे हे बघून ते मुलं हसतं होते. रोज अनु दिप्ती माझ्या सोबत एका ताटात का जेवायच्या? मला त्यांच्या पसंतीचे ड्रेस घेऊन देताना त्या काहीच का नाही घ्यायच्या. गेल्या चार वर्षात त्यांनी माझ्यासाठी बाहेरून कधीच खायचं काही आणलेलंका नव्हत?साऱ्या प्रश्नाची उत्तर आज मला मिळत गेली. कितीतरी दिवस त्यांच्या भासआभासाच्या आठवणीत कुठेही गेल्यावर झोप लागली नाही सांगायचं तरीकुणाला त्यांच्या बदल त्या तर हे जग सोडून कधीच्या आसमंतात विलीन झाल्या म्हणूनच रूम मध्ये शिरताना वाऱ्याची मंद झुळूक अंगाला भेदून जायची. तिची डायरी वाचताना मी कधी कधी झोपून जायची. भूतकाळ खूप निराश असला तरी येणारा काळ आशावादी म्हणून उदयास येतो पण आम्ही कोणत्या काळात जगू ग आमचा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीही संपलेत खूप काही करायचं बाकी राहून गेलं.


आमच्यासोबत जे घडलं ते फार भयंकर होतं. त्यांनी आम्हाला कॉलेज मध्ये पण सुखाने जगू नसतं दिलं डॉक्टर होण्याचं स्वप्न त्याचं रात्री भंगल. म्हणून दोघींनीहीठरवलं आत्महत्या करायची आणि संपवायच स्वतला. ती मुलं बड्या घरची आमदार खासदाराची त्यांच्यावर काय पोलिसांनी केस दाखलं केली असतीम्हणून आईसोबत बोलताना मी त्यांच्या नावाचा पण उलेख नाही केला. काव्या तू ही हा भूतकाळ विसरून जाशील! आपण सवंगडी ना! आठवणीच्या भिरभिरत्या दुनियेत आता जगायचं सारं काही विसरून निघते मी काळजी घे! मी झोपेतुनच दचकून उठली. दिप्ती अनु माझा निरोप घेत अदृश्य झाल्याएवढ्यात आईच्या हाताचा स्पर्श झाला काय झालं बाळा? काही वाईट स्वप्न पडलं का? मी नाही म्हणत कड पलटवला. एका कडावर झोपत डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. दिप्ती अनुच्या चिरकाळ न मिटणाऱ्या आठवणीत! 


Rate this content
Log in

More marathi story from Komal Mankar

Similar marathi story from Thriller