अंगुलीमाल - एक अहिंसक
अंगुलीमाल - एक अहिंसक
नाव ऐकलंच असेल ना अंगुलीमाचं. लोकांची हत्या करणारा म्हणजे अंगुलीमाल पण अंगुलीमाल पण, तो अंगुलीमाल कसा बनतो का बनतो हे फार कमी लोकांना माहिती असावं. तो काळ असा होता गुरूकुल असायचे. एक अहिंसक होता फार ज्ञानी मुलगा दिसायला गोड स्वभावाने तेवढाच नम्र आणि सर्व विद्यात पारंगत असणारा.नेहमी पहिला येणारा .आजूबाजूच्या मित्रांना त्या नेहमी अव्वल येणं खटकायचं. तो हुशार असल्याने गुरूला त्याचा अभिमान होता. तो गुरुचा खूप लाडका झाला होता. मित्रांनी ठरवले अहिंसकाला गुरुच्या नजरेतून कसे उतरवायचे. मित्र आपापसात कट रचू लागले. मित्रांनी तीन जमाव तयार केले. सर्वप्रथम पहिला जमाव गुरूकडे गेला आणि सांगू लागले, गुरूदेव अहिंसक तुमच्या गैरहजरीत गुरूमातेसोबत एकांतात असतो. गुरूंनी दुर्लक्ष केले. अहिंसक गुरूमातेला मातेसमान मानायचा. आधी एक जमाव गेला मग परत दुसरा जमाव सांगू लागला, असे करता करता सर्व विद्यार्थी अहिंसकविषयी गुरूच्या मनात द्वेष निर्माण करू लागले.
एखादी व्यक्ती कितीही चारित्र्यवान असली आणि त्याच्या विरोधात सर्व खोटे बोलू लागले असतील तर जे डोळ्यांनी पाहिले नसले तेही इतरांचे ऐकून खरे वाटायला लागते. गुरूंनी त्या सर्वांवर विश्वास ठेवला. अहिंसकाचं शिक्षण पूर्ण झालं. गुरूदक्षिणा द्यायची वेळ आली. अहिंसक गुरूकडे जाऊन 'गुरूवर्य दक्षिणा सांगा', असे म्हणाला. गुरू अहिंसकला म्हणाले,'अहिंसक, जा आणि मला लोकांची हत्या करून कापलेली हजार बोटे आणून दे!' गुरूदक्षिणा देणे हे प्रत्येक शिष्याला गरजेचे असते. गुरुने गुरूदक्षिणेत जीव जरी मागितला तरी शिष्याला तो हसतहसत द्यावा लागतो आणि ही गुरूदक्षिणा जीव मागितल्यासारखीच होती.
हातात तलवार घेऊन विजयाने धुंद धावणारा अहिंसक आता गुरूकुलातून बाहेर पडल्यावर एक डाकू होणार होता. कारण गुरूला त्याचा असा बदला घ्यायचा होता. गुरू त्याला स्वत: मारू शकत नव्हते. असे केले तर गुरूला वाटे पापी गुरू समजून माझ्याकडे विद्या शिकायला कुणीच येणार नाही. लोकांची बोटे कापताना अहिंसक मारला जाईल. आता अहिंसक अंगुलीमाल झाला. वाटेत येईल त्या लोकांची तो बोटे कापू लागला. ही वार्ता राजा नरेश कोशल प्रसेनजित याच्यापर्यंत पोहोचली. हजारोंचे सैन्य पाठविले; पण अंगुलीमालने त्यांनाही मारून टाकले.
बुद्ध ध्यानस्थ बसले होते. डोळे मिटले होते आणि बुद्धाला दिसत होते अंगुलीमाल लोकांची हत्या करीत आहे. बुद्ध उठले आणि ज्या दिशेने अंगुलीमाल आहे त्या वाटेने जाऊ लागले. माणसे सांगू लागली बुद्ध त्या वाटेने जाऊ नका डाकू अंगुलीमाल आहे. वासरू हंबरू लागले बुद्धाला ते सांगू पहात होते त्या वाटेने जाऊ नका. आतापर्यंत अंगुलीमालने नऊशे नव्याण्णव लोकांची बोटे कापली. हजाराला एक व्यक्ती कमी होता. बुद्धाला बघताच अंगुलीमाल खूश झाला. आता त्याच्या गुरूची दक्षिणा देण्यात तो सफल होणार होता. पण उलट झालं. बुद्धाची मधूर वाणी ऐकताच डाकू अंगुलीमालच्या हातची तलवार खाली पडली. कापलेल्या बोटांची माला खड्यात पडली आणि अंगुलीमाल बुद्धाच्या चरणावर नतमस्तक झाला.
