Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win
Turn the Page, Turn the Life | A Writer’s Battle for Survival | Help Her Win

Komal Mankar

Drama

1  

Komal Mankar

Drama

द लार्वे ( हरवलेला देवमासा )

द लार्वे ( हरवलेला देवमासा )

12 mins
1.2K


   सायंकाळची वेळ माणसाची नसतेच रहस्यमय ओढयात बंधिस्त करून घ्यायला खोल खोल दरीत भू मातेच्या शोधात भटकणारा हा देह न थकता महासागरी प्रवासाच्या दिशेने झुकलेला असतो. भूगर्भ त्या दिवशी खवळलेल्या लाटांशी एकजूट होऊन मला ओढत खोल खोल दरीत ढकलू पाहत होता अंगातलं सर्व त्राण एकटवून मी बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होती. त्या खवळनाऱ्या लाटा मला ओढुन घेणाऱ्या असफल ठरावयात असचं काही झालं. बाहेरचा परिसर नजरेच्या दृष्टीक्षेपात पडला आकाश निरभ्र होतं. सूर्य क्षितिजाच्या पल्याड जाऊन मला हसतं असावा असा भास झाला त्याची आणि माझी गट्टी न हरणाऱ्या भावनिक ओढीची होती. पण आता लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी सडा पाडला होता. दोन हाताने लाटाना मागे सारत southern च्या किनाऱ्यावर येऊन हात लांब केला दोन किनारी गोवलेल्या खडकाच्या आधारे वर आली .. गिटो नेहमी सारखंच आजही त्याचे दोन्ही हात मला कवेत घ्याला मोकळे करून उभा होता. त्याला आलिंगन देत मी विचारणा केली ..

“ गिटो , ह्या महासागराच्या प्रवासात तुला कधी काही गवसलं का ? “ 

गिटो माझ्याकडे नजर रोखून बोलू लागला  .... “ यस माय चाईल्ड , जगण्याचे धडे मला ह्या महासागराकडून मिळाले . “

मला त्याच्या कडून अपेक्षित असलेल्या उत्तराच्या हव्यासात मी होते . हा मला काय सांगतो जगण्याचे धडे ह्या जलांतरीत महासागरकडून मिळावे मी जरा अवाक होऊन विचारले ..” गिटो ते कसं काय ? “  

 “ तुला सांगू एकदा काय झालं ? “

“ हं ...”

“ नावाडयाने मला नाव चालवायला दिली मी चौदा वर्षाचा असेलं तेव्हा .. “

“ मग ..”

“ मग काय ? मला नाव चालवण्याची शैली अवगत नव्हतीच तरीही वाट नेईल तिकडे मी सैरवैर हा आस्मंत धुंडाळू लागलो. वादळाने अचानक तीव्र रूप धारण केले नाव घेऊन मी कोणत्या बांधावर येऊन पोहचलो हे माझ्याच ध्यानात नव्हते नाव मला ढासळू लागली.  लाटा खवळू लागल्या लाटाचा शिरकाव माझ्या तोंडापर्यंत पाणी उसळून फेकत होत्या. नाव डामलडोल होऊ लागली. स्ट्रेनजर माझ्याजवळ नव्हताच मी त्या नावेवर मोठ मोठ्याने विलाप करू लागलो कोणी तरी वाचवा मला वाचवा. माझ्या मदतीसाठी माझ्या बचावासाठी साक्षात जेसु सुद्धा येणारं नव्हता. नावेने मला पाण्यात ढकलले नाव लाटाच्या वेगात तरंगत होती मी नावेला पकडून उठण्याच्या प्रयत्नात होतो तोच लाटा मला घेरत होत्या एक मोठी लाट आली आणि त्या लाटेने मला दूर फेकले नावेपासून खूप दूर. पाण्याच्या तुडुंब भरलेल्या त्या महासागरात माझ्या डोळ्यात पाण्याचा प्रचंड डोह साचला होता. काय करू मी तेव्हा विचार करण्यापेक्षा कृती करून बाहेर पडणे हितकर होते . “

 एवढ्यात मी ओरडून गिटोला म्हटले , “ बापरे  गिटो , पण तूच तर माझा स्विमिंग मास्टर आहे आणि तुझ्यावर ही वेळ आली होती मग तू बाहेर कसा पडला ?? “

ह्यावर गिटो आपल्या दोन्ही हातानी मला खुणावत सांगत होता. “ त्या वेळेनेच मला स्विमिंग मास्टर बनवलं,  कधी पोहणे न जाणारा मी दोन हात दोन पाय शाबूत आहे म्हणून जोर जोराने त्या लाटाच्या तावडीतून हेलकावे देत पोहू लागलो तेव्हापासून माझ्यात एक वेगळीच उर्मी संचारली. कोणत्याच शिकवणीचा आधार न घेता मी स्वतः एक स्विमिंग मास्टर झालो. आणि तुला माहिती आहे मी त्या मध्यरात्री जग धुंडाळत महासागराच्या दुनियेतून बाहेर  कुठे येऊन पोहचलो होतो ?? “

प्रश्नार्थक नजरेने मी गिटो कडे बघत , “ कुठे ... कुठे येऊन पोहचला होतास गिटो तू ? “

समोर असलेल्या वोडकावर नजर खिळवत गिटो  उद्गारला , “ लुसिआ  तो तुझ्यासमोर असलेला वोडका बघतेय southern  ऑसेन च्या ह्याच दक्षिणी किनारपटीवर येऊन मी  मोकळा सुटकारा घेतला . “   

 ओह्ह्ह तर म्हणून तुला जगण्याचे धडे ह्या महासागराने  दिले . असं म्हणतच मी गिटो चा निरोप घेतला . गिटो चा सहवास त्याच्या प्रेरणा देणारा संवाद माझ्या मनाला मोहून घेत असला तरी माझी जन्मदात्री घरी माझी वाट बघत दाराजवळ उभी असते वाटेकडे टकलाऊन ...

  तसं गिटो माझा स्विम मास्टर पण तो मला स्वतः च्या लेकी सारखा जपतो, अलबतचं  माय स्वीट चाईल्ड म्हणून कुरवाळतो . कधी त्याला मी त्याच्या परिवाराबद्ल विचारयला गेली तर तो विषय टाळण्याचा प्रयत्न करतो आजपर्यंत गिटो ने जगातल्या सर्व रहस्यमय ताकदीची न उलगडणाऱ्या कोड्यात डोकून पाहण्याची मला भरभरून हुरूप दिली. त्याचं वय तो मला बरोबर सत्तर वर्ष असल्याचं सांगतो पण कधी त्याचा जन्मदिन असतो हे सांगत नाही . माझ्या जन्म दिनी मात्र मला नवनवीन भेट वस्तू तो मोठ्या कर्तबगारीने देत राहाला ... सत्तरी ओलांडलेला गिटो मात्र आजही मला मनाने नवतरुण वाटतो कारण ती धम्मक मी त्याच्यात पाहिली आहे अजून आपल्याला खूप काही करायचं असल्याचं त्याच्या डोळ्यातल चैतन्य मला माझा नव्याने जन्म झाल्याचे डोहाळे लावतात . जसा साप कात टाकल्यावर नवं रूप नाही पण नवा जन्म धारण करतो तसचं गिटो च्या बोलण्याने मी भारवून जाते .

  आजपर्यंत मी आणि माझी लाडकी मैत्रीण मार्टिना म्हणजे माझी सर्वस्व ह्या विश्वातली सौख्य देन  माझी मॉम ... ह्या रक्ताच्या दोन नात्यापैकी तिसरे नाते कधी अनुभवलेच नाही . मॉम म्हणायची मला रक्ताचाभाऊ आहे माझ्यापेक्ष्या चार वर्ष मोठा असलेला पण तो अजून काही मला साक्ष्यात भेटलेला नाही . त्याच्या भेटीसाठी मी आतुर आहे त्याचं प्रेम नको मला त्याचे खांद्यावर धीर देणारे हात नकोय, पण मला कोणी भाऊ आहे ह्याच कल्पनेने माझ मन भरून येतं  .. तो कुठे असेलं आता ? कसा दिसत असेलं? दिसायला तो मार्टिनामॉम सारखा असेलं की ? मॉम मला त्याच्या बदल कधीच काही सांगत का नाही सांगत ?? ह्यावर मी तिला खुपदा विचारून तिच्या निरागस चेहऱ्यावर एक चिंतातूर स्पर्श करून गेलेली छटा बघून हा प्रश्न तिला कधी विचारायचाच नाही म्हणून ह्या नात्याच्या भावविश्वातून स्वतःला दूर सारते .... एकदा मला अडगडित एक फोटो फ्रेम दिसली ती फ्रेम घेऊन मी मॉम जवळ गेली तिला विचारणा करू लागली , “ मॉम  , हा फ्रेम मधला माझा भाऊच आहेना ! आणि ही त्याच्या कडेवर असलेली मी.. तो किती प्रेम करायचा न मझ्यावर, किती सुंदर वाटते ही फ्रेम ... नाही ?? “  हे शब्द ऐकताच मॉमने माझ्या हातून ती फ्रेम हिसकावली आणि मला म्हणाली , “ हो हा तुझा भाऊच आहे जॉन पण तू ही फ्रेम ....” ह्या समोर काहीच न बोलता ती ते फ्रेम घेऊन तिथून निघून गेली . जॉन हे नावं फक्त मी  ध्यानात ठेवत जॉन नावाच्या मिळेल त्या माझ्या पेक्ष्या वयाने चार वर्ष मोठ्या असलेल्या तरुणाशी मैत्री करून तो माझा भाऊ आहे का हे जाणण्याचा प्रयत्न करीत होती . पण अजून पर्यंत माझ्या संपर्कात दोन जॉन येऊन गेलेत ते माझे कोणी असणे शक्यचं नाही . त्यांना पूर्ण परिवार आहे. जॉनचा शोध अद्यापही घेणे सुरूच होते ..

   आज घरी पोहचायला मला नऊ वाजलेत मार्टिनामॉम माझी वाट बघत बसली होती. माझ्या पायाचा आवाज येताच ती बाहेर आली .

“ बेटा किती वेळ ? चल लवकर आत ये मी आज तुझ्या आवडीची डिश बनवली . “

आत शिरताच चिकन फ्राय चा  खमंग घरभर दरवळत होता . हातपाय धुवून मी चिकनफ्राय वर ताव मारला . मॉमच्या हातच चिकन फ्राय खाण्यात काही वेगळाच स्वाद असतो . मी जेवण होताच अंथरुणावर लवडली .

 त्रानलेल्या देहाला रात्री झोप कशी लागली मला कळलच नाही . मॉम सकाळीच स्कूल मध्ये निघून गेली . म्याक्स्न माझी वर्ग मैत्रीण तिचा फोन वाजत होता . कधीची फोन करत असावी ती मी फोन उचलताच तिने मला सुखद धकका दिला .

“ हे माय च्याम्प तू तुझी पदवी पूर्ण केलीस तू पदवी पास झाली ...”

“ ओह्ह म्याक्सन मी तुझी खूप आभारी आहे , खूप खूप धन्यवाद तू झाली ना पास ? “

“ हो हो मी पण पदवी पास झाली , येत्या रविवारला ज्याकसन जूरेन सोबत माझं लग्न ठरल्य तू येशील नक्की . “

“ अरे एवढ्या लवकर लग्न करते ? “

“ तुला माहितीये न लुसिआ,  मॉम त्यांना माझं शिक्षण अमान्य आहे . “

पदवीचा निकाल पास होण्याचा आनंद काही औरच असतो पण तो कुणाजवळ व्यक्त करणार मॉम ती तर पहाटे आवराआवर करून लवकर घरून निघून जाते . बर्गर खाऊन  मी चर्च मध्ये निघून गेली तिथे जाऊन माझं सर्व सुखं दुख मी गिटार वाजवण्यात संगीताच्या मंत्रमुग्ध दुनियेत जाते . आज आनंद व्यक्त करायला माझ्या हातात गिटार आणि सुरांची ताल छेडायला स्वर होते .

Acoustic guitar माझ्या हातात होता बोट ताल छेडत होते . मी माझ्या दुनियेत हरवून गात होते . चर्च मध्ये रम्य शांतात वास करत होती. एवढ्यात एक नवतरुण माझ्या बाजूला जेसू च्या समोर उभा राहून माझं गायन एकाग्रतेने ऐकत होता. त्याच्याकडे लक्ष जाताच मी थबकली . त्याच्या नजरेवर नजर पडताच माझी बोटं गिटारवरून सुटली .

“ थांबली का ? खूप छान गाते तुझा सूर म्हणजे येशूने तुला दिलेलं गोड गिफ्ट आहे .... गा ना !“ मला खरतर कोणी ऐकत आहे ह्याचं भानच नव्हत माझ्या संगीताची वहा वा ! करणारा तो पहिलाच व्यक्ती जीवनात भेटला . अनोळखी व्यक्ती सोबत मी काय बोलावं म्हणून मी त्याला टाळण्याचा प्रयत्न केला . “ सॉरी मिस्टर मला एकांतात गायला आवडतं  .. “ त्याच्या चेहऱ्यावर माझ्या बोलण्याने तीळ मात्र नाराजी नव्हती पसरली . तो मला ओके म्हणून तिथून निघून गेला  .. मला जरा ओशाल्यासारखं वाटलं मी त्या अनोळखी व्यक्तीला दुखवल तर नाही ना ! त्याला क्षमा मागायला मी चर्चच्या  बाहेर पाय ठेवला पण तो दूरवर मला कुठेच दिसत नव्हता .

 मी घरी गेले सांयकाळ होत आली म्हणून मी स्विमिंगसाठी जायला निघाले . दार उघडतच तर मॉम माझ्यासमोर उभी तिला घट्ट आलिंगन देत मी पदवी पास झाल्याचे सांगितले . तिच्या चेहऱ्यावर तो आनंद ओसडून वहात होता तिने मला आज सरावाला न जाण्याची विनंती केली . पण माझ्यासाठी सराव खूप महत्वाची बाब होती  . तिला आज मी लवकर येईल हे सांगून  घराच्या बाहेर पडली ..

  किनारपट्टीवर जाताच मी गिटोला सर्व दूर शोधू लागली . गिटो मला कुठेच दिसत नव्हता तिथे असलेल्या एका कोळ्याला मी विचारलं , “ गिटो ला कुठे पाहिलंत का ? तो माझ्याकडे बघत मला म्हणाला , “ हो गिटोचा मुलगा आला आहे तो आज येणारं नाही तो कालच मला बोलला . “

“ ओह्ह्ह पण गिटोने मला असं काही सांगितलं नाही , गिटो च्या परिवारात आणखी कोण कोण सदस्य आहेत तुम्हाला माहिती आहे ?? “

“ गिटोला त्याच्या मुलाशिवाय कोणीच नाही ह्या जगात त्याचा मुलगाही परदेशात शिकायला होता तो तीन, चार वर्षांनी त्याला भेटायला येत असतो . “

“ ओके , मी सरावाला निघते मला वेळ होत आहे . “ त्याचा निरोप घेत मी महासागराच्या खडकावर येऊन उभी होतं सागराला निरखून बघू लागली . आज मला जीवन म्हणजे ह्या महासागराच्या भरती ओहटी सारखं वाटायला लागलं . स्वीमवेअर परिधान करीत खडकावरून मी महासागरात उडी मारली . सूर्य तांबूस होतं क्षितिजाच्या पल्याड मावळत होता पक्षी निरभ्र काळसर अवकाशातून उडताना दिसत होते मी तेवढ्याच जोमात पोहायला सुरवात केली आज मला खूप खोल वर खूप खूप दूर जायचं होतं एकतासात मी आठकिलोमीटर दुरिच्या वेगाने खूप लांब निघून गेली दक्षिणी महासागराला मागे टाकत . खोल भूगर्भात मी पोहत जात होती खोल खोल दरीत निरनिराळ्या पानखुटी वनस्पतीची नव्याने ओळख होतं होती . एवढ्यात मला मागून पायाला थंड स्पर्श झालेला जाणवला मी माझ्या पोहण्याची दिशा बदलवत मागे वळली ते भयाण रूप बघून मी चित्कारलीच. श्वास घेण्याचा वेग वाढला, जोराने हार्टबीट होतं होत्या माझ्या समोर देवमाशाचं पिल्लू होतं . ते मला काही करेल म्हणून मी भीत होती . पण तो शांत कसलीही हालचाल ओढाताण न करता तसाच एखाद्या स्टयाचू प्रमाणे माझ्याकडे सारखा बघत होता त्याने त्याच्या शेपटीनी मला समोर जाण्यापासून  रोखले मी समोर जाण्याचा प्रयत्न करू लागली तो हालचाल करते का म्हणून बघू लागली मला समोर जाताना बघून तो माझा मागोवा घेत येऊ लागला. तो आता माझ्या अगदी बाजूला येऊन मी ज्या दिशेला वळन घेईल तसा वळू लागला ...  त्याच्या हालचालीकडे त्याच्या शरीरयष्टीकडे बघून मला पुरती खात्री पटली हे देवमाश्याच नुकतच एक महिन्याचं पिल्लू आहे. मी त्याला जाणून घेण्याच्या प्रयत्नात होती तो तोंडानी फुत्कार्त मला काही सांगू पाहत होता पण मला त्याची भाषा कळेना मी ही त्याला हेच विचारण्याच्या प्रयत्नात होती . “ देवमाश्या तू तुझ्या आई पासून हरवला आहे का ? तू कोणत्या दिशेने इकडे आला तुझी आई कुठे असेलं आता आपण तिला शोधूयात का ?  “ इत्यादी प्रश्न ... त्याला आणि मला संवाद साधता आला असता तर कदाचित त्याच्या आईला शोधनही सोपं गेलं असतं . आमच्याकडे देवमाश्याच्या प्रजातीला लार्वे म्हणतात. लार्वे हे खूप चपळ असतात म्हणून त्या पिलाची आईही त्याला शोध घेत असेलच ह्यात तीळ मात्र शंका नव्हती . लार्वे माझ्या सोबत पोहत होता त्याच्या सोबतीला तेवढ्या मोठ्या जलाशयात जलचर प्राणी सोडले तर माझ्याविना कोणीच नव्हत . मी काय करावं म्हणून काही मिनिटासाठी थांबली देवमासा माझ्या पायथ्याशी कसाबसा चाचपडत होता.  मी मागे परतण्याच्या प्रयत्नात दिशा बदलली देवमासा मला सोडायला तयार नव्हताच. मी  किनाऱ्याच्या दिशेने वोडका शोधत पोहू लागली किनाऱ्याजवळ जाऊन कोणत्या नावाड्याला मला विचारायचं होतं तुम्ही देवमाशाची टोळी बघितली का ? वादळ विरुद्ध दिशेने येत होतं लाटा खवळत होत्या. देवमासा भीत होता त्याला माझ्यासोबत आता पोहता येणे शक्य नव्हत . तो प्रयत्न करीत स्वतःला माझ्या सोबत जायचं म्हणून रेटत होता. त्याला माझ्या सोबत भीती नव्हती म्हणून तो माझ्या मागेमागे येत होता त्याला आशा होती मी त्याच्या आईला नक्कीच शोधून काढणार ही . मी त्या खवळनाऱ्या लाटांचा प्रतिकार करत होती. लाटा अजून तीव्र वेग धारण करीत होत्या. एक उंच लाट आली आणि तिने लार्वेला माझ्यापासून खूप दूर नेऊन फेकले मी लार्वेच्या दिशेने जायला सुरवात केली तर त्या लाटा मला मागे ओढत होत्या एक लाट उसळत खूप तीव्र तांडव धारण करून चक्री वादळा सारखी घुटमळत होती त्या लाटेनेच मला ओढुन घेतले त्या लाटेत मी सतत दहा मिनिटे गोल गोल चक्रावत राहिली. त्या लाटेने मला लार्वे पासून एक किलोमीटर दूर अंतरावर नेऊन फेकले. लाटा उसळतच होत्या. ह्या लाटेनेच लार्वे आणि माझी ताटातूट केली . लार्वे मला शोधत होता का कुणास ठाऊक ? मी दूरवरून लार्वेला माझ्याजवळ येताना बघत होती . तो एवढा वेळ पोहत मला शोधत मझ्या जवळ येत होता. मी बाळमाश्याला सांगत होती आपण नक्की शोधून काढू तुझ्या आईला कितीही वेळ झाला तरी तू फक्त माझी सोबत सोडू नको . उसळत्या लाटाचा सामना करत आम्ही आता वोडकाच्या अगदी जवळ होतो दोन किलोमीटर दुरिच्या अंतरावरून वोडका माझ्या नजरेला खुणावत होता बाळमासा थकलेला दिसत होता त्याच्यात पोहण्याचा त्राण उरलेला नसावा . आता मी वेग धारण केला बाळमासा हळूहळू पोहत येत होता माझी नजर समोर खडकाच्या दिशेने होती मी समोर पोहण्याचा वेग धारण करत लार्वे माझ्या मागे आहे का हे बघत होती . किनाऱ्याच्या जवळ येताच मी नावाड्याला ओरडून ओरडून जवळ बोलवण्याचा प्रयत्न करीत होती . माझ्या आवाजाचा वेध घेत माझ्या जवळ आले मी त्यांना विचारले , “ तुम्ही देवमाश्याचा कळप सागरी प्रवाहाने जाताना कुठे बघितलं काय ? “ तेव्हा नावडी म्हणाले , “ नाही नाही मी तर नाही बघितलं पण आताच मी कुणाच्या तरी तोंडून ऐकलं southern च्या उत्तरेस एक दहा , पंधरा देवमाश्याचा कळप आला आहे . “ मी त्यांचे बोलणे ऐकून मोठ्या आशेने मागे वळली .. ह्याचा अर्थ देवमाश्याची आईही त्याचा शोध घेत होती . मी देवमाश्याच्या जवळ जाताच तो थबकला तो खूप दमलेला मला भासत होता त्याला भूक लागली असावी का ? तो काय खाऊन जगत असेलं बर ! तो त्याच्या आईवर अवलंबून राहत असेलं तर आता त्याचं कस्स होणार तो समोर पोहू शकणार की नाही ह्याचं काळजीने माझं मन बधीर झालं . देवमाश्या चल आपल्याला तुझी आई भेटणार आहे आपण लवकर तिच्या पर्यंत पोहचू असा धीर देत मी त्याचं सागरी प्रवाहाने उतरेकडे निघाली . दहा वाजले होते उत्तरेची सीमा गाठत आम्ही पोहत येऊन एवढ्या दूरवर मला देव माश्याचा कळप कुठेच दिसतं नव्हता .  देव माश्याने मात्र आता वेग धारण केला होता तो माझ्या विरुद्ध दिशेने पोहत जाऊ लागला त्याच्या मागोमाग मी जणू त्याला त्याची आई आवाज देऊन जवळ बोलवत होती . पाण्याच्या ल्हीरीतून त्यांचा संवाद होतं असेलं का ?  होत असावा म्हणूनच देवमासा माझ्या विरुद्ध दिशेने पोहू लागला होता मी पोहत त्याच्यापर्यंत गेली पण तो आता थांबलेला होता . काय झालं लार्वे चल ना समोर असा थांबू नको तुझ्या आईला शोधायचं ना आपल्याला ? त्याच्या पाठीवर हात फिरवत मी मनातच बोलू लागली . तो चित्कारत होता जागेवर पंख हलवत होता पण समोर जात नव्हता मला काही कळेना ह्याला काय झालं असावं . माझ्या डोळ्यासमोर आता दूरवरून माश्यांचा कळप दृष्टिस पडत होता पाण्याचा खळखळाट करत देवमाश्याचा कळप आमच्या समोर दहा फुटावर येऊन थांबलेला होता. त्यातून एक मासा देवमाश्या जवळ येत होता मी दूर होतं होती पण लार्वे सारखा माझ्याकडे डोकावत होता . लार्वेची आईजवळ येताच तो त्याच्या आईकडे बघून काहीतरी त्याच्या भाषेत सांगत होता. आता मला पक्की खात्री पटली होती लार्वेला त्याची आई मिळाली होती आणि हिच त्याची आई होती . एका हरवलेल्या देवमाश्याला त्याची आई मिळाली होती .  मी माझा दक्षिण महासागर सोडून लार्वेसाठी दिशा बदलवली होती आता मला आधी उत्तरेचा किनारा गाठायचा होता. मी मागे परतीच्या मार्गावर जायला आरूढ झाली तेव्हा माझ्या मागे संपूर्ण देवमाश्याचा कळप होता आणि माझ्या बाजूला लार्वे ... लार्वे आधीच खूप थकलेला होता पण त्याची आई त्याला मिळाली म्हणून तो त्याचं जोशात माझ्यासोबत येत आसवा ते माझ्या सोबत कुठवर येणारं हे मलाही ठाऊक नव्हते . मी उत्तरेच्या किनाऱ्यावर येऊन पोहचली खडकाला हातधरून किनाऱ्यावर पाय ठेवला तेव्हा तो देव माश्यांचा कळप मला सार करताना दिसत होता मी किनाऱ्याच्या मधोमध येऊन मागे वळून बघितल्यावर मला देवमाश्याचा कळप ज्या दिशेने आम्ही त्याच्या शोधार्थात गेलो त्याचं दिशेने परतताना दिसला . ते दृश्य मी माझ्या नजरेत कैद करून ठेवलं खरचं आज मला ह्या महासागराने कधी नव्हे ते अनोख गिफ्ट दिलं ... एका हरवलेला पाडसाला त्याचं मातृत्व भेटावं ह्या सारखी जगात आनंदायी सुखद गोष्ट दुसरी कोणती असू शकते ...


Rate this content
Log in

More marathi story from Komal Mankar

Similar marathi story from Drama