बकुळीची फुले ( पूर्ण कथा )
बकुळीची फुले ( पूर्ण कथा )


खडबडीत रस्त्यावर सामसूम होती …. रात्री पाऊस पडून गेल्याने पाण्याने रस्ते नाहून निघाले होते . गटारे , नाल्या तुडूंब भरल्या होत्या …. रस्त्याच्या कडेला असलेली बकुळाची झाडे लक्ष वेधून घेत होती . त्या बकुळाचं आणि आपलं खूप अगत्याचं नातं असावं असा अनुज झाडांकडे बघत होता मधेच समोर पाऊलं टाकत पुढे चालत होता … समोर गेला की परत मागे वळून त्या झाडाकडे बघत होता क्षणभरासाठी त्याला वाटलं की त्या झाडासमोर स्तब्ध उभं राहून काहीतरी बोलावं …
एवढ्यात त्याला मागून कोणी तरी आवाज दिला .
“अनुज …. अनुज … थांब ! ” ओळखीचाच पण खूप वर्षांनी ऐकलेला तो आवाज ऐकूून तो मागे वळला .
” आदि , तू … तू इकडे ! ” अनुजचे भावूक हृदय अगदी पिळून निघाले . त्याच्या डोळ्यात लगेच आदीला बघून पाणी डबडबून आले … त्याच्या मुखातून एकही शब्द बाहेर फुटले नाही … तो तसाच तिच्याकडे कितीतरी वेळ बघत राहिला .
आदीही काहीच न बोलता त्याच्याकडे बघत उभी होती …
तोच रस्ता तेच आकाशाशी भिडणारं त्यांच्या दोघांच्या मध्ये उभं असलेलं बकुळाचं झाड , आणि … आणि तोच पावसाच्या सरीने मातीला आलेला मृदगंधाचा दरवळणारा सुगंध .
रस्त्यावरून जाणाऱ्या गाडीच्या हॉर्नने अनुज भानावर आला . हळूच आदीवर खिळलेली नजर दूर केली त्याने .
” कधी आलीस , कशी आहेस … विसरली की काय वाटलं … “,
” मी मजेत आहे … अरे ऑफिसच्या कामाने आली … आठवडा झाला ..
घरी येणारच होते भेटायला पण नको म्हटलं … उगाच “,
” हो तू आता आमच्याकडे येणार पण कशी म्हणा , तू आता परदेशात रहाते … तुला इकडे बिन एसीच्या घरात गुदमरल्या सारखं होत असेल ना ! “,
” असं नाही मुळीच … “,
” मग कस आहे … सांग जरा … “,
” जुन्या आठवणीं उफाळून येतात रे मनात … “,
” त्या कधी जातील म्हणा …. ”
” बकुळीच्या झाडाकडे बघत होता ना ! अजूनही येतो इथे ? “,
” हो गं ….. येतो कधी कधी …. आज एक महिन्याने आलो इकडे रनिंग करत पण इथेच घुटमळत राहिलो … “
” हो दिसलं मला तुझं वेड्यासारखं वागणं … मागे काय जात होता परत वळून काय बघत होता .. मला वाटलं तूच असावा … तशी मीही इथेच येत होती … ” तो स्वतःशीच पुटपुटला मला माहिती होत तू इथे येणार .
” तू काही बोलला का ? “
” नाही …. नाहीतर …. काही नाही , मी आज अचानक इकडे आलो वाटलं नव्हतं तू अशी आज इथे भेटशील म्हणून …. ” अनुज आणि आदी उघड्या डोळ्यांनी त्या बकुळीकडे बघत होते .
किती मोठं झालं हे झाड … विपीनने लावलं तेव्हा अगदी रोपटं होतं इवलीस … आता किती बहरलं …
” आदी तुला आठवतं …. विपीनने लावलेलं हे झाड आहे … ” ती जुन्या स्मृतींनाच उजाळा देत होती .
” हो आठवतं ना … कसे विसरेल मी ते दिवस . “,
” मला वाटलं तू कॅलिफोर्नियाला जाऊन सहा वर्षे झालीत … तुला इथे कुठे काय ? कोणी लावलं ? ते कसं आठवेल आता …. पण स्ट्रॉंग मेमोरी आहे तुझी … “
” जागा बद्दलली तरी आपली माती ती आपलीच असते रे ! तिची नाळ नाही तुटत देश सोडून गेलं तरी … चल ना झाडाखाली थोडं उभं राहू … “
दोघेही त्या गार्डन मध्ये आत शिरले . अनुज तिच्या मागोमाग चालू लागला .
अजूनही तशीच वाटते आदिती … आपल्याला पहिल्यादा भेटली तेव्हा कशी होती ना ही अल्लड … तापट जरा रागीट … नाक तर फुगलेलंच असायचं हिच …. आमची भेट पण तशीच झाली होती …. अजूनही हसायला येत त्यावरून …. अनुज ते दिवस आठवू लागला ….
==========================================================
” ये …. अरे आंधळा आहेस का तू ? दिसतं की नाही डोळ्याने … कोणी मुलगी जात आहे ते समोरून … ” अनुज घाईत ऑफिसकडे जायला निघाला होता .
” राहू दे ना ! मी उचलते माझे बुक … तू आधी हॉस्पिटलमध्ये जाऊन डोळे चेक करून घे स्वतःचे … ” त्याने ऐकून न घेता बुक उचलून देत तिच्या हातात ठेवले .
” हे घे तुझी बुक्स … आणि i am really sorry … ” अनुज तिथून निघून गेला …
” काय बावळट मुलगा आहे ना … कॉलेजचा पहिलाच दिवस स्पोईल केला ह्याने … “
” काय झालं आदी , कुणावर रागावली आहेस ? ” क्लासरूमकडे जाणाऱ्या मालतीने प्रश्न केला .
” काही नाही ग एक बावळट मला टकरावला … “
” ओहह …. अच्छा तरी म्हटलं काय झालं असं आल्या आल्या चिडायला …. लागला असेल चुकून धक्का …. एवढं काय हायपर होतेस ….. “,
” अगं तुला माहिती नाही ही मुलं जाणून असं करतात … आधी धक्का द्यायचा मग सॉरी म्हणत मैत्रीचा हात पुढे करायचा … पण नाही यार तो तसा नव्हता … सॉरी म्हणून निघून गेला … “,
” हो तेच सांगत आहे …. घाईत असेल तो जाऊदे … चल आता क्लासमध्ये … ” दोघीही क्लासकडे निघाल्या .
” Hey guy's …… निख्या …. प्रितम …. अरे तुम्ही सर्व आलेत पण आज लवकर … what a pleasant surprise यारो … मी तर म्हटलं , नेहमीसारख कॉलेज दहाला असते न तुम्ही येणार बाराला आपल्या ब्रम्ह मुहूर्तावर …” सर्वाना लवकर आलेलं बघून आदिला आश्चर्याचा धक्का बसला .
” अगं हो हो , श्वास तर घे जरा बोलताना …. आम्ही आता लवकर यायचं ठरवलं ! फस्ट इअरला चाललं ग … आता सिरिअसली स्टडीला लागायचं … “
” क्या बात है प्रितम …. हो यार खूप झाला टाइमपास करून … अरे रेवडी कुठे दिसत नाही आहे … आली नाही का अजून …. “,
” रेवा आली नाही येणार आहे ती ट्राफिकमध्ये फसलेली असेल …. आणि निख्या तू तिला रेवडी रेवडी का करतो रे , एवढं छान नाव आहे तिचं रेवा . “
” रेवडी कापराच्या वडी सारखी आहे …. कापूर कसा हवेते ठेवला की उडून जातो , तशीच ती न सांगता उडून जाते … म्हणून मी तिला रेवडी बोलतो … आणि मी म्हणेल रेवाला ” रेवडी ” माझा हक्क आहे तो . ” हसत हसत निखिल रेवाची खिल्ली उडवत होता .
” थांब येऊ दे तिला सांगते …. ” आदितीने ताकदीचा स्वर काढला .
” काय गं आदे जा सांग घे आली ती … अरे रेवडी कोणाला घेऊन आली सोबत … ” रेवाचा मागे निखिलला क्लासमध्ये नवीनच मुलगा येताना दिसला .
” Hey फ्रेन्डस ….. ” रेवा त्यांच्या घोळक्यात शिरली .
” ये तुझीच वाट होती … नाही म्हणजे आम्ही तुझीच चर्चा करत होतो ..”,
” आम्ही नाही ग रेवा हा निख्या हा तुला …… “, मालती रेवाला तक्रारीच्या स्वरात सांगायला लागली .
” यार चुप रहा ना तू मालती …. हा कोण नवीनच आला क्लासमध्ये ?? तू घेऊन आली का रेवडे ह्याला …. “,
” निख्या …. तू ना आधीतर मला असं चिडवू नकोस … आणि त्याला मी ओळखत पण नाही …. “
” हा …. हा तोच आहे ज्याच्यासोबत माझी ऑफिससमोर टक्कर झाली … हा आपल्या क्लासमध्ये कसा काय ?? ” त्याला बघून लगेच आदितीला आठवलं . हा तोच होता ज्याने आपल्याला धक्का दिला .
” अच्छा म्हणजे हा तोच बावळट आहे का ज्याच्यावर तू चिडली होती… ” मालती तिला विचारती झाली .
” हो हा तोच आहे …. ” अनुजकडे बघतच आदितीने तिला हा तोच असल्याचं सांगितलं .
अनुज समोरची दोन तीन बेंच सोडून मागे आला ... त्याने निखिलच्या बाजूला येऊन बॅग ठेवली .... आणि बसायला गेला एवढ्यात मागच्या बाकांवर गप्पा करत असलेल्या निखिलच त्याच्याकडे लक्ष होतच .
” ये हिरो …. हा तूच तिथून बॅग घेऊन मागच्या नाहीतर समोरच्या बेंचवर बस ती माझ्या मित्राची जागा आहे …. ” निखिलने बसल्या जागून अनुजला उठवलं .
अनुजला हा प्रकार रॅगिंग सारखाच वाटला … त्याने आपली बॅग घेतली आणि मागच्या बाकावर जाऊन बसला .
” काय रे निख्या , अजून आला नाही विपीन ….कशाला उठवलं त्याला बसू द्यायचं होतं ना ! नवीन आहे तो कॉलेजमध्ये …. “,
” तुला बरी सहानुभूती वाटायला लागली गं मालती त्याची …. बरं जाऊन त्याला सॉरी म्हणून का मी , की पाया पडू त्याचा मला माफ कर म्हणून …. ” निखिल जरा चिडला होता .
” अरे काय हे …. सॉरी बोलण्याने काय चाललं तुझं … समोरच्याला आपल्या चुकीने वाईट वाटलं असेल तर सॉरी म्हणून चूक दुरुस्त करता येते माणसाला … ” मध्ये पडून रेवा त्याला समजवत होती .
” OK ….. OK …. जाऊन त्याला सॉरी म्हणतो …. खुश ना आता ! ” निखिल तडक आपल्या बेंचवरून उठून अनुज जवळ गेला .
” हॅलो …. सॉरी …. तुला वाईट वाटलं असेल माझं बोलणं …. “,
” नो .. नो …. इट्स ओके …. “,
” बाय द वे …. आय एम निखिल …. निखिल परांजपे … ऍण्ड यू ?? “,
” आय एम … अनुज ......“,
” आता मध्येच ऍडमिशन कशी काय केली तू इथे ? “,
” काही कारणास्तव मला दिल्ली सोडून इथे यावं लागलं … सो इथे ऍडमिशन घेतली … “,
” गुड …. चल …. एन्जॉय युअर फस्ट डे इन नीव कॉलेज …. “अनुजने फक्त स्माईल दिली … निखिल परत आपल्या ग्रुपला जॉईन झाला .
” हा विपीन आज येतो का नाही कॉलेजला …. यार सर पण नाही आलेत चला बाहेर कॅन्टीनवर जाऊ … ” , विपीन ह्या ग्रुपची जान होता आज त्याचा काही पत्ता नव्हता कॉलेजला . तो आला की साऱ्यांना हसवत राहायचा .
” नको रे प्रितम …. सर येतीलच एवढ्यात एक लेक्चर झालं की जाऊ बाहेर मग .” ,
” तू पण ना आदी …. ठीक आहे . “,
पहिले तीन लेक्चर झाले आणि सर्व निघून गेलेत .
” चला आता आपण मस्त धम्ममाल करूयात ही मंडळी गेली आता घरी …. “
” प्रतिम पार्टी वैगरे नको यार ….. कॅन्टीन मध्ये जाऊन काही खाऊन घेऊ आणि निघू मला डान्स क्लासला जायचय … “
” मालती तुझे डान्स क्लास न तू …. धन्य हो …. चला कँटीनला …” सर्वांनी आपल्या आपल्या बॅग घेऊन क्लासचा बाहेर निघाले . निखिलच अनुजकडे लक्ष गेलं तो एकटाच आपल्या बाकावर बसून कसल्या तरी विचारात डूबला होता .
” अनुज …. अनुजच ना …. ” दचक्कतच त्याने भानावर येत मान हलवली …
” चल कॅन्टीनला आमच्यासोबत …. सर्व क्लास निघून गेला , आता लेक्चर नाही होणार आहे … “
” कॅन्टीन ला ….. मी … “,
” आय नो तू नवीन आहेस पण ओळख करावं लागेल ना … आणि इथे सर्व ग्रुप पडलेत तुला एखादा ग्रुप जॉईन करावं लागणार आहे …. “,
” अरे ये निख्या चल ना यार …. लवकर ये … आम्ही सगळे बाहेर वाट बघतोय तुझी ” दाराजवळ येत रेवाने आवाज दिला त्याला …
” हो आलोय जस्ट वेट …. “
” चालतो का आता तू ? ” निखिलने जबरदस्तीने अनुजला आपल्या सोबत नेले .
सर्व कॅन्टीन मध्ये एकत्र येऊन बसले . त्या जुन्या मित्रांमध्ये अनुजची एक नव्याने भर पडली … अनुजने आपली ओळख सर्वाना करून दिली . एक वर्ष अनुजने दिल्लीच्या IIT कॉलेजमध्ये केलं होतं अचानक काही आजाराने त्याचा वडिलांची डेथ झाली आणि दिल्ली सोडून त्याला मुंबईला आपल्या आईजवळ यावं लागलं . अनुजसाठी खूप मोठा धक्का होता तो .
” अनुज ही रेवा आहे सर्वात बडबडी …. अगदी तुला हिच्या बोलण्याने कंटाळा आला तरी हिला ऐकून घेण्याशिवाय ऑप्शन नाही … हिटलरशाही चालते हिची सर्वांवर …. ” प्रितम आपल्या ग्रुपमधील सर्व मित्रांची अनुजला ओळख करून देत होता .
” ये अनुज असं नाहीच रे हा प्रितम तुला जास्त सांगतो आहे माझ्याबद्दल … ” रेवा जरा आव आणतच बोलली .
” झालं का माझं बोलून, सांगू तर दे अजून तुझे स्किल काय आहे ते …. आणि हो रेवाला भटकंती करायला जंगली जनावरांचे फोटो काढायला खूप आवडते … हिने क्षेत्र चुकीचं निवडलं असं मला कधी कधी वाटतं . “
” बस्स पुरे झालं आता प्रितम …. नेक्स्ट सांग … ” ,
” नेक्स्ट हा … निख्या … निख्या आपल्या कॉलेजमध्ये चॉकलेट बॉय … एका वर्षात ह्याला क्लास मधल्या आणि कॉलेजमधल्या वीसक मुलीने प्रपोज केलं पण ह्याने कुणालाच होकार दर्शविला नाही …”
” का ? ” अनुजने प्रश्न केला .
” अरे सांगतो आहे …. कारण ऐकून तू हसू नको मात्र …. ह्याला ना ती मधुबाला आवडते ‘आईये महेरबा बैठिये जाने – जा; शौक से लीजिये जी , प्यार का इम्तेहा ‘ न थांबता प्रितमने गण्याचं पहिलं कडवं पूर्ण करत बोलू लागला ......" हे गाणं गुणगुणत असतो हा मधुबालाच सारखं …. आता तूच सांग ह्याला ती ओल्ड 1920 मधुबाला कुठून मिळणार आणि ह्या अश्या मॉर्डन युगात , हा डिजे वाले बाबू सोडून असले song ऐकतो आईये महेरबा ..”, प्रितम मोठ मोठ्याने हसू लागला .
” ये भसाड्या तुला काय माहिती आहे रे मधुबाला बद्दल ? शी माईट बी द मोस्ट ब्युटीफुल वूमन एव्हर walked इन द प्लेस आफ्टर माय मॉम , शी इस pure ब्युटी वन ऑफ द मास्टर पीस एव्हर क्रिएटेड बाय God , आणि माझ्या गाण्याची वाट लावली यार तू … आता एक शब्द पण गाशील ना तर मुसकाट धरून आवरेल हं तुझं “ निखिलला असं चिडलेलं बघून सर्व परत हसायला लागले होते .
” खिदळायला का लागली सारीच .. ओके मी जातो इथून हसत बस्सा …. ” निखिल उठून तावातावाने जायला निघालाच होता . प्रितमने त्याला ओढूनताणून आणतं बसवलं .
” यार निख्या कुल रे … मला पण रात्री झोपण्यापूर्वी जुणी गाणी ऐकायला आवडतात त्याशिवाय झोपच येत नाही . ” त्याला समजवण्यासाठी मालती बोलू लागली . आता हे कितपत खरयं तिचं तिला माहिती ..
” त्यात ओल्ड काय नीव काय चॉईस इस चॉईस ….. आणि कुणाकुणाला आवड असते जुन्या collection ची …. “अनुज खऱ्या अर्थाने निखीलची बाजू घेत होता .
” व्वा …. अगदी मनातलं बोलला रे अन्या …. मलाही भेटेल अशीच कोणीतरी जी फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनली असेल सिंगल पीस… म्हणून ना मी कुणाच्या मागे जात नाही , मर्मिड कशी हवेत हळुवार उडत असते ती पण तशीच न सांगता येईल माझ्या आयुष्यात … ” प्रितमच्या खांद्यावर हात ठेवून निखिल बोलला .
” बघू कधी भेटते तर तुझी मधुबाला ….. ” रेवा त्याला चिडवत होती .
” ये अनुज तुझी पण आहे का कोणी …… ती ….. असेल तर आताच आम्हाला सांगून दे ! “,
” नाही रे प्रितम अजून मी कुणाच्या प्रेमात पडलेलो नाहीये …. पण कवितेच्या प्रेमात असतो नेहमी गुंतलेलो …. “,
” अरे व्वा ! ….. म्हणजे तू कविता देखील करतोस …. भारी हा …. तुला माहिती आहे आपल्या ग्रुप मध्ये आदी i mean आदिती सुद्धा खूप छान कविता लिहिते …. चला तर आपल्या ग्रुप मध्ये आता अजून एका कवी महोदयांची भर पडली … ” मालती खूप खुश होत म्हणाली . तिला कविता लिहिता येत नसल्या तरी कविता वाचायला खूप आवडायच्या .
अरे देवा ! ही तीच तर मुलगी आहे . नाकावर फुगा …. अनुज आदितीकडे सारखा बघत होता … विचारशून्य नजरेने पण , त्याच्या डोक्याततर विचाराचं चक्रीवादळ आलं होतं ….
” काय झालं अनुज आदितीला बघून तुझ्या चेहऱ्यावरची स्माईलच उडाली ?? “, अनुजला असं विचारात पडलेलं बघून प्रितमला आश्चर्य वाटलं .
” कुठे काय काही नाही …. छान आहे ना ती पण कविता करते तर …. “
अनुज आदितीकडे बघत बोलला .
” अनुज सॉरी अरे , मी जास्तच बोलले तुला …. काय तू पण ना बघून चालायचं ना ! ” ,
” अगं सॉरी तू कशाला बोलते माझीच चुकी आहे …. मी खूप घाईत जात होतो , मला काय माहिती समोरून तू येत आहे ते …. पण तेव्हाची आदीती ती तूच आहेस ना ! तेव्हा मला वाटलं झालं आता आपलं काही खरं नाही …. “
” म्हणजे तुला काय म्हणायचं ….. “,
” तेव्हा तुझं नाक किती फुगून होतं असं माठा सारखं ….. ” अनुज हसत होता .
” ये माठा सारखं नाही हा …. “,
” बरं …. आता आपण फ्रेंडस ना ! “,
” हो फ्रेंड्स …. मला आवडेल तुझ्याशी फ्रेंडशिप करायला …. ” आदितीने अनुज सोबत हात मिळवला . तिचा तो हात त्याने असाच कितीतरी वेळ हातात धरून ठेवला होता . आदिलाही त्याच्या हातातून आपला हात सोडून घ्यावं वाटलं नाही . निखिल हळूच अनुजला धक्का देत त्याच्या कानात कुजबुजला .” अरे सोड की आता तिचा हात … ” भानावर येत तसच अनुजच्या हातून तिचा हात निसटला .
” अनुज आता सर्वांशी तुझी ओळख पटली ना ! शिवाय तुला प्रत्येकाची नावही माहिती झाली . “
” काहीतरी खायचं मागवू …. आज पार्टी माझ्याकडून …. ” आदिती ओरडली .
” हो हो ….. काय खाणार ते ठरवा आधी … “,
” निख्या तू पण ना इथे कॅन्टीनवर समोश्या , वड्या शिवाय दुसरं काय असतं खायचं …. पिज्जा बर्गर खायचं असेल तर मोठ्या हॉटेलमध्ये चला इथून …“,
मालती तिथून उठायच्या तयारीतच होती , एवढ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली . पावसाचं असं अचानक येणं तिथे बसलेल्या सर्वाना नको होतं ,पण अश्या अचानक येणाऱ्या पावसाची अनुज आतुरतेने वाट बघायचा … आणि पावसाचं स्वागतही मोठ्या उत्साहाने करायचा … रिमझिम सरी ना बरसायला नुकतीच कुठे सुरूवात झाली होती . पाऊस तसा वेग धारण करत होता . विजेचा कडकडाट नव्हता की ढगाचा गडगडाट नव्हता . थंडावा काय तो सर्वत्र पसरला होता
” wow ….. पाऊस ….. How romantic atmosphere ….. चला ना आपण सर्व पावसात भिजूयात मग मस्त कॉफी घेऊ …. “, अनुजच्या मनातलं बोलत होती आदिती .
” ये आदे तुला काय वेडबिड लागलं का पावसात भिजायला …. ” रेवा चिडलीच तिच्यावर ….
” किती गजगज असते ग आदी मी नाही येत …. “, प्रितमने पावसात भिजायला नकार दिला .
” हे बघ प्रितम तुला यायचं नसेल तर नको येऊ रहा इथेच बसून …. मी भिजते एकटीच ….. “,” ये थांब थांब ….. आम्ही आहोत ना तू एकटी कुठे चालली …. “
निखिल , मालती …. तिच्यासोबत पावसात भिजायला उठले …. खरंतर अनुजलाही भिजायचं होतं त्या पावसात पण तो जागेवरून उठला नाही … त्याला आदितीला पावसात भिजताना बघायचं होतं …. फुलपाखरू कसं मनसोक्तपणे आनंद लुटतो ह्या झाडावरून त्या झाडावर उडण्याचा आदिती तशीच पावसात भिजण्याचा आनंद लुटत होती … बसल्या जागून अनुज तिचं भिजणं पावसात खळखळून हसणं…. हाताने सरीना झेलण … त्या सरी निखिल आणि मालतीवर शिंपडनं डोळ्याने टिपत होता …. आपल्या नजरेत भरत होता ते दृश्य …. त्याला तिचं असं मनसोक्त वागणं बघून आपणच पावसात भिजतो आहोत की काय असं वाटायला लागलं …
एक मोठी सर धावून आली आणि मग सारखा संथ पाऊस पडत होता . अर्धा तास तिघे पावसात चिंब भिजत राहिले ...
” वेटर …… वेटर ……. छे प्लेट समोसा लाना , और छे ग्लास कॉफी …. ” प्रितमने ऑर्डर दिली . आणि त्या तिघांना आवाज दिला ….
” निख्या , मालती ….. आदिती , या आता खूप झालं पावसात भिजून ..”
सगळ्यांनी मिळून नास्ता फस्त केला . तसा पाऊसही गेला होता . सर्व आपल्या आपल्या घरी जायला निघाली …
अनुज कॉलेज मध्ये कारने यायचा . त्याने कार कॉलेजच्या मेन गेटसमोर पार्किंगला लावून ठेवली होती . सर्वाना गुड बाय बोलून अनुज मेनगेट वर आला कार पार्क केली आणि घराची वाट धरली . वाटेत एक ब्रीज आला, पुढच्या चौकातील सिग्नल रेड असल्याने मागे पुलावर गाड्या जाम होत्या कशीतरी त्याने वाट काढली … ट्राफिक एवढं गच्च भरलेलं . अर्धा तास तरी लागणार होता . म्हणून अनुजने रेडिओ लावला …. आणि बसला गाणे ऐकत एवढ्यात त्याच लक्ष काचेच्या बाहेर गेलं …. काच त्याने खाली घेतली ….
मुसळधार पावसाच्या दिवसातही घामाघूम झालेला एकजण त्या चढावरून हातगाडी ढकलत होता, अनुज उजव्या लेनमधून ब्रिजच्या वरच्या टोकावर आलेल्या त्याला पाहत होता . खूप जोर लावून तो गाडा ढकलत होता…
रापलेल्या मानेवरून ओघळणारा घाम सळसळत जात होता , गुडघ्यापर्यंत दुमडलेला पायजमा,टरारून फुगलेल्या पोटऱ्या....
कधी एकदा हा चढ संपतोय असं त्याच्याकडे पाहून वाटत होतं… शेवटी एकदाचा तो चढ संपला…. आता उतार …. आजूबाजूला ट्रॅफिक जॅममुळे वैतागलेलं पब्लिक, अस्वस्थता घालवायची म्हणून असेल ….उगाच वाजणारे हॉर्न…. त्या गाडीवाल्याकडे सहानुभूतीने पाहणाऱ्या कित्येक नजरा…. सिग्नल सुटला.. अनुजची लेन तरीही जाम… डाव्या बाजूची लेन निघाली..तो गाडावाला निघाला.. अनुजची लेन साधारण अर्ध्या मिनिटाने सुटली…
ब्रीजच्या उतारावर तो त्या गाडीवाल्याला पाहत होता .. क्षणभरासाठी अनुजला वाटतं होत त्याला मदतीला जावं … पण ती गर्दी जवळ जवळ लागून असलेल्या गाड्या त्यात अनुजही फसला होता . ही गर्दीच आपल्याला त्याच्या मदतीपर्यंत पोहचायला आड येत आहे …
मगाशी ब्रीज चढताना करावी लागली होती त्यापेक्षा अधिक कसरत त्याला आता उतारावर करावी लागत आहे ….
आयुष्य असंच असतं नाही का..?
कष्ट,दुःख असतं तेव्हा काही ध्येय असतं समोर ,तेव्हा आपण त्या ध्येयाकडे नजर ठेऊन त्रास सहन करत तो चढ चढत असतो …
ध्येय साध्य झालं, हवं ते यश मिळालं..की मग खरी कसरत सुरू होते… अपयश यश एकानाण्याच्या दोन बाजू असल्या तरी भिन्न आहेत .
यश मिळवणं कठीण असतं ना ! पण त्या कष्टाने मिळालेल फळ आपल्या कर्तबगारीचं असतं …. आपल्या वडिलांनीही शून्यातून असचं जग उभं केलं तेव्हाकुठे “ड्रीमर” आजही खंबीर उभं आहे . पण डॅड आपल्यातून निघून गेले हे सर्व मागे टाकून ह्याची त्याला आठवण झाली . आणि तो भावुक झाला डॅडसाठी …त्यांच्या नसण्यासाठी …. गाड्याचे हॉर्न वाजू लागले … किरकोळ आवाजाने अनुज विचारातून जागा झाला . त्या गर्दीतून अनुजची गाडीही निघाली आपल्या वाटेने ….
कॉलेजचा दुसरा दिवस उजाडला . पहिल्याच दिवशी अनुजला चांगला ग्रुप मिळाला होता . आणि अनुजने त्याच दिवशी ठरवलं आपण ह्याच ग्रुपला धरून राहायचं ... छान आहेत ना सर्व .... हसरी मालती , बोलकी रेवा , निख्या तो तर जाम भडकतोच कधी कधी..... लहरी आहे तो ... प्रितम आहे बऱ्यापैकी मनमिळावू वृत्तीचा ... आदिती , तिचं नाव ओठावर येताच तो गालातल्या गालात हसला ... आधी वाटायचं मला , खूप रागीट असावी पण मनाने कशी भडभडी आहे ती .... तसच असायला पाहिजे तेव्हाचा राग , रुसवा तेव्हाच समोरच्या व्यक्तीवर काढून मोकळं झालेलं बरं ! नाही तर कुणाला सवय असते कुणाचा राग कुणावर .... आवडायला लागली का आदिती आपल्याला .... छे छे काही पण ना ! पहिल्याच दिवशी ? असं वाटतंय .... असो निघू आता आपण कॉलेजला ....
” निघतो ग मॉम मी ….. ” अनुज आईला सांगून हॉलच्या बाहेर पडला .
“अरे टिफिन घेऊन जा …. ” हा काय टेबलवरच ठेवला होता .
” असुदे ग मॉम , जेवण केलंय मी …. आता दुपारी जेवायची सवय नाहीये मला … ” ,
” बरं …. नीट जा ….”,
” yes मॉम …. bye … “,
अनुजला वाटेत मालती ऑटोला हात देत उभी दिसली . त्याने कार
तिच्या समोर नेली … आपल्या समोर उभ्या असलेल्या कारकडे
बघून आधी तर दुर्लक्ष केलं तिने .
” मालती …… मालती …. ” अनुजने तिला काच खाली करून आवाज दिला .
” अण्या , तू ….. ” ,
” हो … “,
” कॉलेजमध्ये चालला का ? “,
” नाही चौपाटीला चालतोय मरीन ड्राईव्हला …. चलतेस तू …. “,
” नाही यार कसा आहेस तू …. आज कॉलेज आहे ना मग कधी ! “,
” मी उनाडक्या मारतोय तिकडे जाऊन चल ये बस्स …. कॉलेजलाच चलोय … “,
” अरे ये …. मागे काय गेली … मी समोरचा दार उघडला ना … तुझा ड्राईव्हर नाही मी समोरचा शीटवर येऊन बस्स … “,
” मला वाटलं तुला काही अडचण असेल तर ….. “,
” मला कसली ग अडचण …. “,
” ही कार तुझी स्वतःची आहे ? ” ,
” नाही चोरीची आहे ,कालच डाका टाकला एका ग्यारेजवर …. “,
” सॉरी यार मला तसं नव्हतं म्हणायचं …. आपल्या ग्रुपमध्ये कोणी असं कारने येत नाही ना कॉलेजला …. “,
” इट्स ok ग …. आय एम जस्ट किडींग सरळ शब्दात उत्तर द्यायची सवय नाही ना मला …. ही कार माझ्या डॅडची आहे …. मी ड्राईव्ह करतो …. बाय द वे , तू रोज कशाने येते कॉलेजला ?? “
” बस …. “
” स्कुटी नाही का तुझ्याकडे …. “
” असून काय फायदा , चालवता यायला पाहिजे ना ! ”
” तुला स्कुटी चालवता येत नाही …. ok नो प्रॉब्लेम उद्या पासून आज होती त्या बसटोपवर उभी रहा … “
“Done …..! ठरलं मग …. ” ,
” तुला बॉम्बे IITला एवढ्या टॉप मोस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन कशी मिळाली रे मधेच …. “,
” अगं 1st इयरला मी क्लासमध्ये टॉपर होतो … “,
” ओहहह मग तुला ऍडमिशन तर मिळेलच … “
बोलता बोलता दोघेही कॉलेजमध्ये आले . अनुजने गाडी पार्कींगला लावली . मालती त्याची वेट करत गेट जवळ उभी होती … तिला दुरूनच विपिन येताना दिसला ..
” हे विपिन …… यार काल कुठे गेला होता तू कुणाचा कॉल पण घेत नव्हता होतास कुठे ?? खूप खूप मिस केलं आम्ही सर्वांनी तुला …. “,
” अगं कुठे नाही …. हॉस्पिटलमध्ये जरा काम होतं …. तू इथे गेटवर कुणाची वाट बघत उभी आहेस ….” विपिन जवळ येत म्हणाला .
” आला … ” विपिनने मागे वळून बघतं , " कोण आलाय ?"
” हा अनुज आहे आपल्या क्लास मध्ये नीव आला … कालच त्याच्या सोबत आमची फ्रेंडशिप झाली … अनुज दिल्ली IIT ला होता … ” ,
” Hello …. नाईस टू मिट यू …. ” दोघांनी हॅन्डशेक घेतला . आणि
क्लासकडे वळले …
” कालचा खूप मोठा डे मिस केला म्हणजे मी …. अनुजचा पहिला दिवस सेलिब्रेट नाही करता आला . मी तुमच्यात असायला हवा होतो यार … “,
” विपिन सोड अरे आता मी तुमच्या ग्रुपचा हिस्सा झालो … अजून सेलिब्रेशन करायला दिवस आहेत आपल्याला … “,
” बरोबर बोलला मित्रा …. ” ,
विपिन सर्वाना आपलंसं करून घेणारा होता . त्याच्या गमतीदार बोलण्याने तो ग्रुपमध्ये सर्वांचा चाहता होऊन गेला . त्यामुळे अनुजलाही त्याने खूप लवकर आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतलं ….
पाच लेक्चर होऊन सुट्टी झाली आणि सर्वांनी आज फिरायला कुठेतरी जायचं ठरवलं … अनुजला विपिनच बोलणं आठवलं … तो येण्याच्या खुशीत सेलिब्रेशन …
” Guy’s ….. आज हम फाइव्ह स्टार चलते है ! “,
नक्कीचही पार्टी अनुज देणार होता म्हणून सर्व हो म्हणून ओरडली पण , विपिनच्या डोक्यात काही वेगळाच प्लान चालू होता .
” नाही यार …. “, पार्टीला विपिनने नकार दिला .
” काय नाही “,
” अनुज , मला नाही यायचं हॉटेलमध्ये …. “,
” अरे …. असं कसं मगाशीच तर बोलला की तुला मी यायचा खुशीच सेलिब्रेशन हवंय …. आता अचानक काय झालं ?? “
” हो म्हटलं होतं , पण आज नाही … “
” मग …. मग कधी ??”
” आज माझं खूप महत्त्वाचं काम आहे … “
” तुम्ही सर्वे चालणार का माझ्यासोबत …. “
“अरे हो … पण कुठे ??” सर्व विचारात पडली . निखिलला तर पार्टी हवी होती आज .. पण ह्याला मधेच काम सुचतात असं वाटून तो गप्प बसला .
” काय यार …. पार्टी सोडून कुठे जायचा बेत आहे तुझा … आम्हाला देखील कळू दे ! “
” सिटी गार्डन …. ” ,
” सिटी गार्डन ….. तिकडे काय काम ? “,
” तिथे गेल्यावर कळेलच …. चालायचं …. “, सर्व त्याच्या सोबत चलायला तयार झाली .
अनुजने कार सिटी गार्डन समोर आणून थांबवली . सिटी गार्डन अनुजच्या घराजवळचं होतं . त्याच्या घरापासून अर्ध्या तासाच्या दुरीवर . त्याने कार पार्किंगला लावली . सर्व कार मधून उतरून विपिनच्या तोंडाकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते …
” आता काय करायचं इथे …. ” आदिती त्याला विचारू लागली .
” काय करायचं म्हणजे काय ? चला आत गार्डनमध्ये …. “
गार्डनमध्ये पाय ठेवताच विपिनने आपली बॅग काढली … त्यातून दोन तीन रोपटे आणि एक छोटंसं झाड त्याने बाहेर काढलं …
” अरे यार , हा काय प्रकार आहे तू बॅगमध्ये ही छोटी छोटी रोपटे भरून आणली …. खरचं विप्या तू ना , असं काय आहे ह्या झाडात ……..” ,
” मला खूप आवडतात बकुळीची फुलं….. भविष्यात इथे येणाऱ्या प्रत्येकाला हे झाड आपल्याकडे आकर्षित करून घेईल …. ” फुलांबद्दल एवढा जिव्हाळा , अनुजला पहिल्यांदाच एखाद्या बकुळप्रेमीला भेटल्यासारखं वाटतं होतं … तो होताही बकुळीच्या प्रेमात ….
अनुज , रेवा आणि मालती ह्यांना तर अजून बकुळीच फ़ुलं काय असते माहिती नव्हतं .
” कसं असते रे बकुळीच फुलं ?? ” विपिनला आश्चर्याचा धक्काच बसला .
” तुम्हाला बकुळीच फुलं नाही माहिती ??”,
” नाही तू सांग ना … जेव्हा हे झाडं मोठं होईल तेव्हा इथे एन्जॉय करायला आपण सर्व एकत्र येत जाऊ …. मग बकुळीची फुले आपल्यावर वर्षाव करतील …. ” रेवा भविष्याचे स्वप्न रंगवत बोलत होती .
" ये आता पासून स्वप्न नको रंगवू ?" निखिल मध्येच तिचं बोलणं तोडत म्हणाला.
" सगळीच स्वप्न तुटत नसतात रे ...." रेवा त्याला प्रतिउत्तर देत बोलली .
” तू पण येशील ना विपिन इथे …. “,
“मग काय …. मी इथेच पहुडलेला असेल … असं का विचारतेस ….”,
” नाही अरे , काय आहे ना तू अजून कोणत्या दुनियेचा शोध लावशील … तुझं आपलं कशात ना कशात भान हरवून बसणं चालूच असतं …. गेल्यावर्षी तुझं प्राजक्तावर प्रेम होतं …. आता बकुळी …. दोन वर्षाने तुला वड वैगरे आवडायला लागला तर … “,
” ये यार मस्करी नको करुस ग आदे अशी , मला प्राजक्तही खूप जवळचा वाटतो आणि तेवढीच बकुळीही …..
सुंदर, नाजूक आणि तनामनाला भुरळ घालणाऱ्या सुवासिक फुलांनी बहरलेले बकुळी …… जणू सुगंधकोषाचे भांडारच! निसर्गाची अद्भूत अत्तर असावे असे …. नुसती रूपानेच नाही तर सुगंधानेही गर्भश्रीमंत अशी बकुळी आपल्या सुगंध सुवासाने दिपवून टाकणारी . संध्यासमयी अथवा पहाटे पहाटे या झाडाखाली बकुळीचा वर्षाव अनुभवणे म्हणजे स्वर्ग सुख …. बकुळीचा दरवळणारा तो सुगंध अंगाला भेदनारा गारवा … ! किती किती आल्हादायक असतो अनुभवा कधी ....
बकुळीचं आणि माझं एक वेगळचं नातं आहे , माझ्या घरापासून अर्धातास अंतरावर असलेल्या बागेत मी नित्यनियमाने सकाळी चालायला जातो.... आणि अचानक एक दिवस चालत असताना एका ओळखीच्या सुगंधाने मनाला भुरळ घातली. सुगंध ओळखीचाच होता, पण मला नाव आठवत नव्हतं... सुगंधाच्या दिशेने आपोआप पावले वळली. माझ्या आनंदाला तर उदामच आलं. कित्येक वर्षानंतर मी बकुळीच्या झाडाखाली उभा होतो . नक्षत्रांसारख्या सुवासिक फुलांचा सडा पडला होता. मन भूतकाळात गेलं. मनात बालपणीच्या अनेक आठवणी उचंबळून आल्या मी सहावीत असेल तेव्हा आमच्या घरी बाबांच्या गावाला अंगणात डोलदार बकुळीचं झाड होतं …. बकुळीचा सुगंध मला तेव्हा पासून परिचित आहे … नंतर बाबांच्या बदल्या होत गेल्या आणि बकुळीचा सुगंध काय तो आपलासा होऊन गेला … फक्त ओळखीपुरता ….
आता ते गाव ओस पडलं ..... आजी , आजोबा कोणीच आपलं नाही तिथे , गावाकडच्या आठवणी ताज्या झाल्या की मन तिकडे घेऊन जातं मला भूतकाळात ... पाऊले मात्र आहे त्या जागीच स्थिर रहातात .... "
अनुजला मधेच प्रश्न पडला ,
” झाडं असेल ना रे अंगणात बकुळीच …. “,
” माहिती नाही आता असेल की नाही ते , मोठेपणीही लहान होऊन मी तोच अनुभव भान हरपून घेतला … आता दोन दिवसाआधी मी फिरायला जात असताना कुठूनतरी हा सुगंध दरवळताना माझ्या पर्यंत आला आणि त्या सुगंधाचा मागोवा घेत मी झाडपर्यंत पोहोचलो , पटापटा बकुळीची ओंजळभर फुले गोळा केली आणि भरभरून त्यांचा सुवास घेतला. मन प्रसन्न झाले अगदी , त्या सुगंधासमोर मला कितीही महागडा परफ्युम आणून दिला तरी थिट्टा पडले त्या सुहासासमोर ..... ती फुले मी ओंजळीत घेऊन घरी आलो ….
ओंजळीतून फुले पातेल्यात सोडावी असं वाटलंच नाही …. फुलांनी ओंजळ भरूनच रहावी असं सारखं वाटतं मनाला , ह्या फुलांची विशेषतः म्हणजे ही फुले कालांतरानेे वाळू लागतात. पण सुगंध मात्र कमी होत नाही. फुलं आकारानं लहानशी, नाजूक, आपल्या शर्टाच्या बटनाएवढी, रंग-सफेद, हलकिशी पिवळसर झाक असलेली विलोभनीय असतात... पाकळ्यांची नजाकत चांदणीसारखी. इतकी देखणी असतात की टक लावून पाहात बसावं आणि सुगंध तर केवळ दैवी असतो ….. तो अनुभवल्याशिवाय कळणारच नाही .
या फुलांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मिटलेली फुले. पाण्यात टाकल्यावर पुन्हा उमलतात इतर फुलांसारखी ही फुले कुजत नाहीत. वाळतात. वाळल्यावरसुद्धा आपला मादक, मंद सुवास कायम राखतात …. तिसरी चौथीत मी गावाकडे असताना बकुळीची फुले पुस्तकात ठेवायचो मला खूप आवडायचे , पुस्तकांचे पान अलगद उघडत असतानी जो पानांपनातून सुगंध यायचा तो बकुळीच्या उमलत्या पाकळीतून येतोय असा मी भान हरपून जायचो . “
बकुळीच्या फुलांची महती ऐकता ऐकता सारी त्याच्या सांगण्यात हरवून गेली होती …..
” चला आता आपण ही बकुळी इथे लावून घेऊ …. ” ,
” हो …… यार खूप खूप आनंद मिळाला इथे येऊन … तुझे आभार विपिन तू आम्हाला घेऊन आला …. झाड मोठं झाल्यावर इथे येणारा प्रत्येक झण झाडाजवळ दहा मिनिटे तर थांबेल … सुखावेल … आणि आपली सारी दुःख क्षणभरासाठी विसरून इथून पुढे समाधानी होऊन जाईल …. ” ,
” हे तू बोलतोय निख्या ….. Unbelievable …… ” ,
” का ? मला नाक नाही का ? ” ,
” मला वाटलं तुला फक्त तोंडच आहे गिळायला आणि बोलायला …. ” प्रितम निखिलची मज्जाक घेत हसायला लागला …. त्याला असं हसताना बघून निखिलने झाडांसाठी गड्डा खोदायला सांगितला …
**********
विपिनने बकुळीची तीन झाडे लावली , पण त्यातलं जगलं एकच ….. खूप मोठं झालं ते झाड … गार्डनमध्ये जाणाऱ्या येणाऱ्याच्या हृदयात घर करून बसलं …. किती पक्षी त्याच्या फांद्यांवर आसरा घ्यायला येतात आता.... थकलेला जीव त्यांच्या आडोशाला येऊन बसतो . पण विपिनलाच त्या झाडांची शितलता अनुभवता नाही आली.....
==============================================
" विपिन आता कुठे असेल रे ? " आदितीचं हे वाक्य ऐकताच अनुज भूतकाळाच्या गर्देतुन बाहेर पडला .
" तुला आजही आठवण येते का ग त्याची ? " ,
" हो , मित्र म्हणून .... तू समजतो तसं काही नाहीये , माझं मन त्याच्यात कधी गुंतलच नाही . तो माझ्यासाठी खूप जवळचा मित्र होता त्यापलीकडे काहीच नाही . त्याचा तो हसरा विनोदी स्वभाव आठवला की वाटतं आजही तो आहे आपल्यात . तुला ठाऊक आहे ना अन्या , विपिन कधीच कुणाला sad मूड मध्ये दिसला नाही . कोणी दुःखी असलं की त्याला पोटधरून हसवायचा तो . प्रेम म्हणून नाही पण मित्र म्हणून आजही येते त्याची आठवण .... ",
" हो , पण तू त्याला नकार तरी का दिलास ... ",
" माझं आधीच कुणावर तरी प्रेम होतं , पण त्याला मी कधीच सांगू शकली नाही .... ",
" really , कोण होता तो ..... आम्हाला कधी सांगितलं नाही तू ..... ",
" आता काही अर्थ उरला नाही रे त्या सर्व भावना भूतकाळातच जमा राहिल्या ... life खुप पुढे निघून गेलं . आता माझं लग्न झालं .... आणि ...... ",
" आणि ..... काय ?",
" आणि.... त्याचही लग्न झालं असावं .... " आदितीला वाटलं " विचारावं का ह्याला , नाही नको " म्हणून तिने तिथेच विषय टाळला . तिचं लक्ष वर आकाशाकडे गेलं , राखंडी ढग दाटून आले होते . सर्वत्र बकुळीचा सुगंध पसरलेला होता .... इवलीस रोपटं होतं हे विपिनने लावलं होतं तेव्हा , आता किती बहरलं ना ! एवढं विशाल झालं ...
आदितीच्या मनात जे विचार घोळत होते तेच विचार अनुजच्या डोक्यात चालले होते .
" आदि , आज आपण विपिनने लावलेल्या बकुळीच्या छायेखाली उभे आहोत ... त्याला तर तिचा सुगंधही घेता आला नाही . ",
" हो ना यार .... म्हणत होता ' मी इथेच पहुडलेला असेल ' आज ह्या बहरलेल्या पुष्पाकडे बघून वाटतं हा बहर म्हणजे विप्याचं खळखळणार हास्य ..... तो इथेच कुठे असावा .... ",
प्रत्येकात एक सुप्त इच्छा दडलेली असते , जगावेगळी आवड असते काहीतरी आगळंवेगळं करण्याची .... ती आवडच त्या व्यक्तीला मग खूप मोठं बनवते . नाव , प्रतिष्ठा सारं काही मिळवून देते . तो निघून गेल्यानंतरही जगाच्या पाठीवर त्याच अस्तित्व कुठेतरी शाबूत असते .
विपिनच अस्तित्व त्याने लावलेल्या बकुळीत का नसावं ?
" खूप जपायचा ग तो बकुळीला , एकदा म्हणाला होता ' अरे बकुळी म्हणजे ना माझं हृदय ..... नाही , हृदयात उमलणार सुहासी पुष्प , नाही माझा श्वास ... यार मी कोणी कवी नाही ना म्हणून मला असं शब्दाशब्दात बकुळीला नाही मांडता येत .... "
अनुजला विपिनचे ते शब्द आठवत होतेे . अचानक किती तरी कालावधी नंतर त्याच्या स्मृतिफलकावर तो हृदयद्राव्य प्रसंग तरळत उभा राहिला .
=========================================================
" शब्दशब्द जपून ठेव हे बकुळीच्या फुलापरी असे म्हणतात , आणि .... तू तुझे ते शब्द जपून ठेवले आहेस .... बकुळीला तू तुझ्या हृदयात उमलणार सुहासी पुष्प म्हण , की तुझा श्वास म्हण , भावना व्यक्त होणं गरजेचं आहे .... ",
" खरयं अनुज , भावना व्यक्त होणं गरजेचं असतं .... आयुष्यात काहीतरी चांगलं केलं असावं मी , तेव्हा कुठे तुझ्यासारखा अर्थबोध समजवून सांगणारा मित्र मिळाला मला . "
प्रेम हे एकतर्फी किंवा मनुष्यालाच मनुष्यावर होत असतं असं नाही . निःस्वार्थ प्रेम पुष्पावर , वृक्षवल्लीवर ही केल्या जातं ... भावनांचं काय त्या शब्दात खिळतातच .
" अनुज तुला काही सांगायचं होतं . ",
" सांग ना मग ..... ",
" तू कुणाला सांगणार नाही ना ? ",
" अरे बिनधास्त बोल .... नाही सांगणार . ",
" माझं ...... आदितीवर प्रेम आहे ..... " हृदयावर कोणी नकळत येऊन घाव घालावा तसं अनुजला झालं . आपण विपिनच्या तोंडून हे काय ऐकतोय मला तर वाटतं आदिती माझ्यावर प्रेम करते . ती मला रिस्पॉन्स ही देते पण कधी व्यक्त होत नाही . आदितीच खरचं विपिनवर प्रेम असेल का ? तसं झालं तर ही कल्पना देखील त्याला असह्य होत होती .
" काय .......??? ",
" हो ...... अनुज . ",
" माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे .... मला आवडते ती , मला तिला हे सांगायच आहे ... पण एक अडचण आहे . " ,
" कोणती ? ",
" ती माझ्यावर प्रेम नाही करत .... तिचा नकार पत्करावा लागला तरी मी तिला येत्या 1 जानेवारीला माझ्या मनातलं बोलून दाखवणार आहे . " ,
अनुजला काय बोलावं कळत नव्हतं .
" अनुज , मी तिच्यावर पहिल्यादा एक कविता लिहिली तुला ऐकवतो .",
" हो , ऐकवं ना ! "
विपिन खिशातून चिट्टी काढून कविता वाचू लागला , "
तू मंद वारा की झुळक त्या वाऱ्याची ,
नकळत माझ्या मनाला स्पर्शून जावी .......
तू सर पावसाची , का मज हवीहवी वाटावी ,
तू गंध परिजातकाचा मला मोहून घ्यायची ........
हसरे टरोपे डोळे तुझे किती लाजवी ,
क्षणक्षणाला भुरळ घालती मला , नयनताराच्या भिजवून राती ....
मी विरंगुळा होतो , कधी तुझा प्रियकर म्हणूनी तर कधी सखा ....
तू सांग कोणते नाव देऊ आपल्या ह्या नात्याला ?? "
अनुज निःशब्द होता ,
" अरे सांग ना , कशी वाटली माझी कविता ..... जमली ना ! " ,
चेहऱ्यावर उसने हास्य आणत "अप्रतिम" बस्स एवढंच बोलला अनुज . विपिनला त्याचा चेहऱ्यावर नैराश्याच वादळ उमटलेल दिसतं नव्हतं . तो आपल्याच धुंदीत बोलत होता .
अनुजला एवढ्यात कॉल आला . तो कॉल कंपनीच्या एका एम्प्लॉयचा होता . आईचा कॉल आहे तिने मला घरी अर्जेन्ट बोलवलं , असं सांगून अनुज तिथून निघून गेला .
उद्या 1 जानेवारी ... ठरल्या प्रमाणे आपण आदितीला सर्वांच्या समोर प्रपोज करायचं असं त्याच्या मनात होतं . त्या रात्री विपिन रात्रभर झोपलाच नाही . काय म्हणेल आदिती ? ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल का उद्या ? उद्या नाही केला तर ..... कधीतरी !
मी शेवटपर्यंत तिच्या होकाराच्या प्रतीक्षेत असेल ... ह्याच विचारात पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला आणि ट्रिंगट्रिंग कांठाळ्या बसवणाऱ्या अलार्मने त्याला लागलीच जाग आली . रात्रभर आदितीचा विचार आणि आताही तो कॉलेजमध्ये आदितीच्या विचारातच घराच्या बाहेर पडला . मालती , निख्या , अनुज .... ह्यांना विपिन ...आदितीला आज प्रपोज करणार असल्याचं माहिती होतं .
ते सारे विपिन कधी येतो त्याचीच वाट बघत बसले होते . विपिन आपल्यावर कधी प्रेम करेल असा विचार देखील आदितीच्या मनात आला नाही . तिला तर ह्याची पूर्वकल्पना देखील नव्हती . विपिन येण्याच्या आधीच निखिल आणि प्रितमच्या बोलण्यावरून तिला समजलं ... हे खरयं का हे जाणून घेण्यासाठी तिने रेवाला विचारलं , तिने ही खरं काय ते सांगून दिलं . झालं विपिनच्या प्लॅनवर पानी फिरलं ..... आदिती रेवाला बजावून गेली ,
" त्याला सांग आल्यावर , तो माझा फक्त मित्र आहे.... आणि मित्रासारखं रहा म्हणावं... "
तावातावाने आदिती तिथून निघून गेली .
विपिन कॉलेजमध्ये आल्यावर त्याला आदिती कुठेच दिसत नव्हती ह्यावरून त्याला कल्पना झालीच ..... ह्यातल्या कोणीतरी तिला सांगितलं असावं ,
" निख्या , तू सांगितलं का आदितीला काही ...... ती कॉलेजमध्ये आली म्हणून तूच वाटेत असताना टेक्स्ट केला होताना ?? गेली कुठे आता आदी .... "
" ये मी कशाला काही सांगू ..... "
" मग कोणी काय सांगितलं ...... मालती तू ?? ", मालती काही बोलायचा आतच .... रेवा मध्ये आली ,
" हे बघ माझ्यावर नको रागावू मी काही नाही केलं ..... तिने निख्याचं आणि प्रितमचं बोलणं ऐकलं ..... ह्यांना माहिती नव्हतं , ती ह्यांच्या मागे उभी आहे म्हणून .... मग ती मला येऊन विचारू लागली ...... ",
" आणि तू सांगून दिलं ....... हो ना ! "
" साल्यानो , तुम्ही माझे मित्र आहात की शत्रू रे ..... तिला थांबवलं का नाही कोणी ?"
" अरे यार , रिलॅक्स .... जाईल कुठे ती उद्या कॉलेजमध्येच येईल .... डोन्ट वरी .... चल टपरीवर चहा प्यायला ..... "
" चाआयला , तुला चहा सुचतो ..... मला व्हिस्की प्यावी वाटते ..... "
" चला ना मग .... बार वर ..... ",
" ये गप्प बसा रे ..... "
" का ग रेवडे ..... तुला काही प्रॉब्लेम होतो का ?"
" मला तर दारूची वास देखील सहन होतं नाही ..... "
" ये देशी ..... चल तिकडे जाऊन बस , म्हणे मला दारूची वास सहन होत नाही .... "
" चला रे चला .... चहाच्या टपरीवर .... " प्रितमने साऱ्यांना चहा प्यायला टपरीवर नेलं .
गेली आठ दिवस आदिती विपिनसोबत बोलायचं टाळत होती . 10 जानेवारीला विपिनचा वाढदिवस होता . म्हणून त्याने सर्वाना एका हॉटेलमध्ये पार्टीला इन्वाइट केलं होतं . आदितीला ही बोलवलं .
" आदिती , मला माहित्ये तू माझ्यावर खूप रागावली आहेस ना ! .... पण प्लिज आजचा दिवस हा राग बाजूला ठेऊन पार्टीला ये ..... तू आली नाहीस तर मला छान वाटणार नाही . "
आदितीने मानेनेच होकार दर्शविला . त्याचा शब्दाला मान देत ती आणि सर्व ग्रुप ठरल्यावेळेवर रात्री आठ वाजता हॉटेलमध्ये जाऊन पोहचले .
आठचे दहा ..... दहाचे बारा वाजलेत पण विपिनचा काही यायचा पत्ता नव्हता .
सर्व वाट बघून बघून कंटाळले ... आम्हाला हॉटेलमध्ये बोलवून कुठे गेला असावा हा
म्हणून प्रितमने शंभरवेळा कॉल लावून बघितला असेल त्याला .रिंग जाऊन कोणीच कॉल नव्हतं घेत .
रात्रीचे बारा वाजले होते ....
अनुज आपल्या कारने सर्वाना घरी ड्रॉप करून देत होता .... सुनसान रस्त्याने अनुजची एकट्याची कार धावत होती .... मुसळधार पाऊस पडत होता .... रस्त्यावरचे खड्डे अनुजला दिसेनासे झाले होते .... पावसामुळे रस्त्यावरचे दिवे बंद झाले होते ..... काहींची उघडझाप चालू होती .... कारच्या फ्रॉन्ट लाईटच्या मंदप्रकाशात अनुज कार चालवत होता .... आजूबाजूला किर्रर्र अंधार , आणि पावसाचा जोर तेवढा कायम होता .
" welcome back ..... everyone ,आप सुन रहे है 93.3 my FM निधी के साथ ... बाहर तेजी से बारिश हो रही है .... आजकल बादल अपना रुख बदल रहे ! इस साल समय से पहिले मुम्बई में बारिश शुरू हो रही है .... और इस बरसात का स्वागत करेंगे हम एक प्यारभरे गाने से .... तो चलिए सुनते है , सुनिधि चौहान की आवाज में Bhage re mann .....
बेहता है मन कहीं , कहाँ जानते नहीं
बेहता हे मन कहीं , कहाँ जानते नहीं
कोई रोकले यहीं ....
भागे रे मन कहीं , आगे रे मन चला जाने किधर जानु ना
भागे रे मन कहीं , आगे रे मन चला जाने किधर जानु ना !!..... "
" अण्या , loudly ..... loudly ..... woofer ऑन कर ना यार ...." मालती ओरडली . कारण तिचं हे फेव्हरेट song होतं ...
अनुज volume वाढवायला गेला एवढ्यात रेडिओ खरखरायला लागला . मागच्या शीट पर्यंत आवाज पोहचत नव्हता . कदाचित पावसामुळे असेल .....
" का रे अण्या तुझा रेडिओ पण ना ! .... ",
" त्याचा रेडिओला काही नाही झालं ...... तू तुझे कान साफ कर .... " निखिल रेवाला चिडवण्याची एक संधी सोडत नव्हता .
" शट्ट यार .... किती मुसळधार पाऊस पडतो आहे , इकडे जवळपास कुणाचं घर आहे का ? " मालती वैतागली होती अश्या अचानक आलेल्या पावसाने .
" हो , माझं घर आहे इथून पुढच्या चौकातच .... अनुज तू कार माझ्या घरी घे ... आज रात्रभर तुम्ही सर्व माझ्या घरी थांबा ... ",
" अरे यार प्रितम .... तुझ्याघरचे रागावतील नाही ना ! आपल्या सोबत ह्या तिघीपण आहेत .... ",
" नाही रागावतील रे , तिघीसाठीच म्हणतोय .... ह्या एका एरियात नाही राहत तिघीपण तीन टोकाला राहतात .... एवढ्या मुसळधार पावसात ह्यांना ड्रॉप करणं शक्य आहे का तुला ? ",
" नाही .... चल तुझ्याचकडे ....",
" हो , आलंय माझं घर .... कार लेफ्टला घे इथून समोरचा रस्ता लागला की राईटने टर्न .... बस्स बस्स थांबव आता , आलं घर ..... "
पावसात सर्व भिजनार होती . अनुजने कार गेटच्या आत घेतली . कारचा डोर उघडून सर्व पावसापासून बचाव करत घराच्या बाल्कनीत पळाली ....
" अरेच्चा ..... लाईट गेली वाटतं .... " एवढा वेळ गप्प बसलेला निखिल पुटपुटला .
" काय झालंय इकडे .... ",
" मूर्खां निख्या , काय व्ह्याचंय इकडे .... मुसळधार पाऊस कोसळतो आहे दिसत नाही का तुला ? ",
"यार .... कार मधून उतरताच तुम्ही दोघे इथे गोंधळ नका घालू शांत रहा जरा ...."
रेवा निखिल आणि अनुजवर चिडली ...
प्रितमने एकदा , दोनदा ..... दरवाजा वाजवला तेव्हा आतून त्याची आई बाहेर आली ...
" काय ग आई , किती उशीर करते ..... ", आव आणतं प्रितम आईशी बोलला .
" पाऊस बघ किती धो - धो पडतोय ते तुझा आवाज आत येईल तर ना ... अरे ही कोण ? या आत या .... ",
" आई , हे माझे सर्व फ्रेंड्स आहेत .... ही रेवा , ही मालती .... आदिती आणि हा निख्या , अनुज हा नवा आलाय क्लास मध्ये .... आणि हा प्रितम ह्याला तर तू ओळखतेच .... ", असं म्हणत प्रितम हसायला लागला .
" Hello .... अँटी ....... " साऱ्यांनी एक सूर काढला .
प्रितमच्या आईने साऱ्यांना बसायला सांगितलं . आणि त्या आत पाणी आणायला गेल्या ,
" आई आम्हा सर्वांना जाम भूक लागलीये ..... काही खायचं दे ! ", प्रितम किचनमध्ये आवाज जाईल अश्या आवाजात ओरडला .
पाण्याच्या बॉटल घेऊन येत प्रितमची आई त्याला विचारू लागली , " अरे हो काहीतरी बनवते मी , पण तुम्ही सर्व पार्टीला गेले होते ना ! कशी झाली पार्टी ? ",
" कसली पार्टी न कसलं काय ...... अगं विपिन आलाच नाही . ",
मधेच निखिल बोलला ,
" हो ना काकू ..... खूप वाट बघितली आम्ही त्याची ......",
" अरे मग कॉल करायचा होता ..... ",
" शंभरक वेळा कॉल केला असेल , पण नाही रिसिव्ह केला त्याने ... कुठे गेला ना हा विपिन ....",
" असुद्या, महत्वाच्या कामात फसला असेल ..... इकडे आलात ते बर झालं मला तर प्रितमची खूप काळजी वाटतं होती .... बाहेर मुसळधार पाऊस कोसळतो आहे .... ",
" अगं आई , नको ना एवढी काळजी करत जाऊ माझी .... मी काही पावसात वहात नाही जाणार आहे .... बाय द वे , बाबा आणि छोटी कुठे दिसत नाही .... ",
" झोपलेत ते ..... वेळ बघ किती झाला ... बर ऐक तुझ्या मित्रांना घेऊन वर गेस्ट रूम मध्ये जा मी काहीतरी खायचं करून आणते .... ",
" okay mom ..... "
प्रितम सर्वाना घेऊन गेस्ट रूम मध्ये गेला . सर्व फ्रेश होऊन बसलीत . अनुज एकटाच खिडकीतून पाऊस बघत उभा होता .
" एवढ्या काळोखात तुला पाऊस दिसतो तरी कसा ? ",
" अगं रेवा , दिसत नसला तरी फील करता येतो ना ! ",
" ओहहहह ग्रेट रेन फील लव्हर ... ",
" मला पाऊस खूप आवडतो ..... ",
" ...... आणि मला अजिबात आवडत नाही ....",
" दिवसाही रात्र वाटावी असा काळोख आणि ढगांच्या आड लाजून बसलेला तो सूर्य .... ",
" आग ओकणारा सूर्य तो ..... म्हणे लाजून बसतो ..... तुम्ही कवी लोक ना यार वेडे असता वेडे .... कशालाही कशाची उपमा देत बसता ..... " थोड्या दूर अंतरावर बसलेल्या साऱ्याकडे बघत रेवा बोलली ," guy's ..... ऐकलं का ? " निखिल ओरडला हो .... चालू द्या आम्ही ऐकतोय ....
" वेली झाडांना बिलगतात .... जणू वीज कडकडावी आणि ..... ",
" आणि अश्या पावसात गाड्या ट्राफिक मध्ये फसतात .... घनटोनशे ! ",
" पावसात कॅशिअर पण कधी कवी बनतो ..... , थेंब थेंब सरीने शब्द शब्द भिजवतो ... ",
" थेंब थेंब सरीना काय घेऊन बसलास , त्या सरी न तो पाऊस फक्त इंस्टा fb वॉलची क्रेज वाढवतो बाकी काही नाही .... ",
" गरमा गरम भजी सोबत ..... वाफाळलेल्या चहाची काही औरच मज्जा असते ग.... ",
" सोसाट्याचा वारा आला आणि हातातली छत्री उडून गेली .... की झाली सजा .... ",
" सजा काय म्हणतेस पाऊस असा एन्जॉय करायचा असतो .... तुझ्या बाजूला बघ ! "
आदिती खिडकीतून बाहेर हात ठेवत , हातावर सरी झेलत तो थंड पाण्याचा स्पर्श गालाला लावून घेत होती.....
" इट्स सो cold ..... ",
"तुम्ही दोघेही ना पाऊस वेडे आहात ..... ",
" हो की , पाऊस वेडे काय म्हणतेस चक्क मृगजळीत म्हण ..... असं पावसाच्या मागे मागे धावणाऱ्या ह्या दोघांना .... ",
" हो , प्रितम ..... अचूक बोललास ...
ह्यांना खिडकीतूनही पाऊस हवाहवासा वाटतो , कॅफेमध्ये तर पावसात नाचावं वाटतं ...."
" चला आपण गाण्याच्या भेंड्या खेळूयात .....",
" रेवा , अगं ही गाण्याच्या भेंड्या खेळायची वेळ नाहीये ..... मला विपिनचा विचार येतोय ... कुठे असेल तो ? कॉल पण घेत नाही आहे .... ",
" अनुज अरे आपण किती कॉल केलेत त्याला , उद्या चल त्याच्या घरी .... सल्याला सोडणार नाही मी भेटला तर ..... असं असतं का ? मित्रांचा काही विचार ? आपली काळजी करत असतील एक कॉल करून सांगितलं पाहिजे .... नाही ..... तो कशाला सांगणार .... उद्या कॉलेज मध्ये न चालता आधी त्याच्या घरी चल .... "
रात्री उशिरापर्यंत कुणालाच झोप येत नव्हती .... पहाट झाली .... अनुजने रेवा , आदिती , मालती ह्यांना घरी ड्रॉप करून दिलं ... आणि ते तिघे विपिनच्या घरी गेले .
दोन , तीनदा निखिलने डोर बेल वाजवली पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता .
प्रितमची नजर दाराच्याकडीकडे गेली ,
" अरे यार शिट्ट ...... लॉक लागलेले आहे ..... म्हणजे घरी कोणीच नाही ..... ", सर्व गेले कुठे असतील ..... आजूबाजूला विचारलं पण कुणालाच माहिती नाही ....
दोन दिवस झाले सर्वाना वाटलं विपिन आज येईल उद्या येईल .... आठ दिवसाने अनुज घरी गेला तरी देखील घराला लॉक लावलेलं होतं . महिना झाला पण विपिन आला नाही . परत अनुजने ठरवलं एकदा घरी जाऊन बघू ....
महिनाभराने प्रितम आणि अनुज विपिनच्या घरी गेले , आज घराची सारी दार सताड उघडी होती . पाहुण्यांची रेलचेल .....
" अन्या , घरी काही प्रोग्राम आहे वाटतो विप्याच्या ..... आणि ह्यांने आपल्याला काही सांगितलं देखील नाही .... त्याच्या बहिणीच लग्न तर .... ",
" गप्प रे ..... आपल्या सोबत गेली एक महिना झाला विपिन बोलला नाही .... आत जाऊन बघू .... " ,
दारातूनच प्रितमला विपिनचे डॅड दिसले .... त्याने बाहेरूनच त्यांना आवाज दिला ,
" अंकल , विपिन घरी आहे का ? " तिथे उपस्थित साऱ्याचा माना प्रितमकडे वळल्या ,
" आम्ही त्याचे मित्र ..... आम्हा दोघांना त्याला भेटायचं आहे .... खूप दिवस झाले तो बोलला देखील नाही आमच्या सोबत , त्याच्याशिवाय क्लासमध्ये लक्ष लागत नाही ... बोलावाना विपिनला ...."
भितीवर लटकवलेल्या फोटोकडे दारातूनच अनुजची नजर गेली .... अनुजच हृदय जोराने धडधडु लागलं .... तो एकदम स्तब्ध झाला .... सुन्न मनाने त्याने त्या फोटोकडे आवासून बघितलं ...
" काय झालं काका ?? तुम्ही काहीच का बोलत नाही आहात .... " पायातील शूज बाजूला काढून ठेवत प्रितम आत गेला .
" विपिन , विपिन ..... कुठे आहे तू ? काय यार आम्ही तुझ्या घरी आल्यावर देखील अशी मज्जाक नको करू .... लवकर बाहेर ये हा ...नाहीतर मी येईल तिकडे ... "
आत जात अनुजने प्रितमचा घट्ट हात आवरला , आणि भिंतीवर टांगलेल्या फोटोकडे नजर फिरवली .... फोटोतही हसतच होता तो त्याची ती करारी मिश्किल नजर उभ्या असलेल्यावर रोखून धरली असावी त्याने , असा बघणाऱ्याला भास व्हायचा .... बकुळीच्या फुलांचा सुकलेला हार त्याच्या फोटोवर झुलत होता .... बाहेरून येणाऱ्या मंद वाऱ्याने तो काहीसा हलत होता .
" बेटा , विपिन ...... विपिन आपल्यातुन निघून गेला ..... " त्याच्या डॅडच हे बोलणं ऐकून प्रितमच्या पायाखालची जमीनच सरकली ....
" त्याला ब्रेन ट्युमर झाला होता ..... वाढदिवसाच्या दिवशी तो हॉटेलमध्ये तुमच्याकडे यायला निघाला तेव्हा अचानक त्याची तब्येत बिघडली .... त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं .... ICU मध्ये एक महिना भरती होता तो ..... ", विपिनचे डॅड जे घडलं ते निर्विकारपणे सांगत होते ...
" एवढं सगळं होऊन तुम्ही आम्हाला , साधं कॉल करून देखील बोलवलं नाही ..... "
अनुज डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होता .... प्रितम तर तुटून गेला होता .... सारखा विपिनचा फोटोकडे बघत होता तो .....
" मी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच तुमचे कॉल येत होते तेव्हा तुम्हाला सांगणार होतो , पण विपिनने मला अडवलं म्हणत होता , " माझ्या मित्राना कुणालाच सांगू नका मला काय झालं ते ... आज माझा वाढदिवस आहे आणि ते सर्व खुश आहेत .... ",
किती निःस्वार्थी वृत्तीचा होता विपिन .... " एकटा एक मुलगा होता आमचा , कधीच कशाचं अट्टहास नाही केला त्याने आमच्याकडे .... जाताना एवढंच सांगून गेला तो तुम्हाला ..... मी नसलो तरी मला भेटत रहा बकुळीच्या झाडाखाली.... "
मागे वळून त्याच्या फोटोकडे एक नजर टाकत अनुज आणि प्रितम घराच्या बाहेर पडले ....
====================================================================
" काय झालं अन्या , तुला ते दिवस आठवायला लागलेत ?",
" हो अगं ..... ",
" बहुतेकदा माणूस वर्तमान सोडून भूतकाळात जगत असतो .... विपिन गेल्यानंतर परत तो इनसिडेंट कधी आठवलाच नाही .... आणि आज त्याच्या घरून निघालो , प्रितम सोबत शेवटचं आठवलं .... ",
" यादे भी बड़ी करारी होती है ना अनुज .... ",
" हा यार , दिलसे दफ़नाती ही नही ..... ",
" अब छोड़ वो बाते .... कॉलेजचा टपरीवर घेऊन चालणार मला ..... ",
" का नाही .... बस्स एक कप चाय की तो बात है .... ",
" हा चल ..... ",
" अगं पण , कार कुठे आणली मी running करत आलो म्हटलं ...." अनुज हसायला लागला .
" अरे तू नाही आणली तरी माझी आहे ना ... ही घे चावी तू ड्राईव्ह करणार .... ",
" Okay ..... good man .....",
दोघेही कॉलेजचा चाय टपरीवर गेले ..... तीच टपरी तोच टपरीवाला ..... टपरी उघडली होती ..... येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ होतीच .... अनुज आणि आदिती एका लाखडी बेंचवर जाऊन बसले .... थोड्याच वेळात गरमागरम इलायची चाय आली ....
" By the way .... काय लिहितो सध्या तू ? " तिच्या अचानक विचारलेल्या प्रश्नाने अनुज जरा बुचकाड्यात पडला .
" Hmmm ...... नॉट मच , जस्ट रेग्युलर stuff from here and there .... ",
" ohhh ग्रेट , यू स्पीक इन सच अ poetic manner .... ",
" really ...... such think ..... there is something about poetry that fascinates me .... i love writing .... Bing able to say so much ....कमी शब्दात खूप काही सांगून जाणं ..... ",
" अरे मी एकटाच माझ्या writing बद्दल सांगत बसलो .... तू पण लिहायची ना ग clg मध्ये असताना .... ",
" Honestly .... i love writing too ..... you know असं जड जड शब्दात व्यक्त नाही होता येत .... पण डायरीच्या प्रत्येक पानात मनात साचलेले खोलवर रुतून बसलेलं
आपोआप पेन हातात घेतला की उतरत .... हा मालती म्हणायची , आठवतं तुला ' डायरी म्हणजे द्विधा मनात साचलेला गाळ व्यक्त करायचा ह्रदयातला दुसरा कप्पा ."
" हो आठवतं , किती आठवणी आहेत अश्या मनात कोरलेल्या... मला देशील तुझी डायरी वाचायला ..... ",
" अहहह ...... तुला का देऊ वाचायला it's personal . ",
" चल नको देऊ .... तसही मला डायरी लिहायचा आणि वाचायचा शोक नाहीये .... ",
" अन्या मी एक बुक लिहिलय ..... ",
" wow yar , Congratulation बरं आधी सांग कशावर लिहिलय ..... ",
" A collection of short stories ..... ",
" ohh grate ..... त्यामधील काही वास्तविकदर्शता तुझ्या आयुष्यात घडलेली असू शकते का ? ",
" may be or may be not ..... it's depend on how interesting it is ..... तसं बघितलं तर अनुज लिहणारा जे सभोवती घडतो तेच मांडतो .... खूपशा कल्पनाही निवळ फुटकळ असतात रे ....",
" हो .... मलाही वास्तविक लिहायला आवडतं ...... मग तसं घडावं म्हणून आपण कल्पकतेच्या जोरावर लिहू शकतो .... "
" wait wait ...... wait ..... कसा यार गरम आहे अजून चहा , थंड होऊ दे .... जळलं ना ओठ ? ",
" what can I do yr ? ..... ओल्ड habits डाय हार्ड सो ..... "
" as always ..... खूप घाईचा आहेस तू ..... ",
" नाही ग .... ओठाला थोडा लागला चहा , पण ती चहाची चव अजूनही बदललेली नाही ....
सेम टी स्टॉल , सेम Ginger tea ...... this was our thing ! ",
" wait a sec ....... कप नेऊन देतो काकांना ",
" वेटर आणि कस्टमरचे दोन्ही काम तूच करतो .... " ,
" अगं कोणतही काम करण्यात लाज कसली बाळगायची .... " कप ठेवायला गेला अनुज ... कॉलेज मध्ये असताना पण हा साऱ्यांचे कप गोळा करून नेऊन ठेवायचा .... नेहमीच ह्याचं .... त्याला हे असं करून काही मिळायचं नाही , पण काकांच्या चेहऱ्यावर गोड स्माईल दिसायची .... त्याचं समाधानाने तो सुखावून जायचा ....
" तुला माहिती आहे आदिती , तुझा हाच प्रॉब्लेम कॉलेजमध्ये असताना पण होता .... ",
" ये नाही हा .....",
" काय नाही म्हणतेस , माठा सारखं फुगणं ; कोणी काही म्हटलं तर आणि एखाद्या गोष्टीवर
अडून रहाणं ...." ,
" ओहहह , तुला आठवतं रात्र रात्र मी तुझ्या assignment's complete करू लागायची आणि तू स्वतःच्या एक दोन impressing line टाकून सबमिट करायचा ... जाम खुश व्हायचे रे सर तुझ्यावर ...... credit तो तुने मुझे उस बात का कभी दिया ही नही ... ",
" मै क्यू तुझे क्रेडिट देता .... ",
" जाने दे अब .... ",
" नही ..... जाने क्यू दू ..... असं सांगत आहे की सर्व sacrifices तूच केलं , आपल्या मैत्रीत प्रत्येकाला एक दुसऱ्या सोबत adjust होणं किती कठीण होतं माहिती आहे तुला ....",
" हो ते चांगलंच ठाऊक आहे मला , माझ्या सारख्या कॉफी पर्सनला तू इथे रोज चायचा टपरीवर आणूून चाय लव्हर बनवलं ..... ",
" आणि तू ग .... मनात नसताना सत्यमेव ज्यतेचे सर्व एपिसोड बघायला लावायची .... ",
" ये Hello ..... it's reality's .... you need to watch ..... ",
" okay ..... तुझा नवरा काय म्हणतो ? त्याला नाही आणलं इकडे ...... "
" तो तिथेच आहे .... आणि तू लग्नाला का नव्हता आला माझ्या ? खूप शोधलं तुला .",
" एवढ्या लोकात मी कसा दिसेल तुला ...... ", तो हसला .
" म्हणजे तू आला होता ..... पण मग स्टेजवर का नाही आला , प्रितम आणि निखिल तर आला होता .... मी विचारलंही तुझ्याबद्दल .... पण सभोवती गर्दी एवढी होती तो काय बोलत होता समजलच नाही .... ",
अनुजला ह्यावर काय बोलावं सुचत नव्हतं ....
तो परत भूतकाळात गेला ....
======================================================================
कॉलेज संपून तीन महिने झाले होते ... सर्व डिग्री घेण्याकरिता कॉलेजमध्ये आले ... निखिल , रेवा , अनुज , प्रितम ...... मालती सर्व कॉलेजच्या गेट समोरच भेटलीत . एकदाच कॉलेज संपल्यावर असं रोज रोज भेटणं आता कुणालाच शक्य नव्हतं . कॉलेजच्या आठवणी तश्याच ताज्या होत्या , रोजच्या पाणीपुरीची निखिलला आठवण झाली . कॉलेजच्या गेटसमोरून जातानाच त्याचं लक्ष बाजूच्या चारचाकीवर गेलं , आणि त्याने तिथेच साऱ्यांना थांबवून घेत पाणीपुरी खायचा हट्ट केला .... तारुण्यही कधीकधी बालिशपणाने जगायला भाग पाडतं ते असं ....
वाऱ्यावर हलणारा बोर्ड ’ --------- स्पेशल पाणीपुरी सेंटर’ . आणि कॉलेजच्या बाजूला उभी रहाणारी ती चारचाकी , बहुतेकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती . अनुजला तर तिथली पाणीपुरी खाल्याशिवाय कॉलेजमधून घरी जावं वाटतं नव्हतं . पाणीपुरी खायची तर त्याचं चारचाकीवरची नाहीतर , त्या चारचाकीशिवाय दुसऱ्या ठिकाणंच्या पाणीपुरीला कुठली आली तशी चव ....
सर्व ग्रुप तिथे गेल्यावर
गाडीवाला: या भाऊ काय खाणार? भेळ,पाणीपुरी, शेवपुरी, .... (अजुन काय काय नावे घेतली त्याने, पण साऱ्यांचे लक्ष्य एकच पाणीपुरी).
अनुजने ऑर्डर दिला , " काका , पाणीपुरी खिलाओ ....."
तोपर्यंत पाणीपुरीवाल्याने पाचझणाच्या हातात पाच स्टीलच्या प्लेट ठेवल्या आणि त्याने पहिला ’सा’ लावला. एक हाताने गल्ल्यातून सुट्टे पैसे देऊन आधीचे गिऱ्हाईक कटवले दुसऱ्या हाताने सराईतपणे दोन फूट उंचीच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून एक पुरी उचलली, चार बोटांवर धरुन अंगठ्याने कर्रकन तिच्या वरच्या पापुद्र्याला भोक पाडले आणि वाटाणा-बटाट्याचे थोडे मिश्रण त्यात भरले.
सर्वांना पाणीपुरी कशी हवी आहे एकदा पाणीपुरीवल्याने विचारून घेतले गोड, तिखट की कमी तिखट?
सर्व ओरडले तिखट पण रेवा म्हणाली , " कमी तिखट ..... " सारे रेवाकडे बघून हसू लागले .
त्याने ती मिश्रण भरलेली पुरी आधी एका चिनीमातीच्या बरणीत हलकेच बुडवली आणि मग एका मडक्यात बुचकळली. बाहेर काढून मडक्यावर दोनदा खालीवर केली. एक्स्ट्रा पाणी त्यात पडले आणि मग काढून पाण्याचे थेंब पाडत प्रितमच्या प्लेटमध्ये ठेवली .
त्याने ती स्वतः न खाता अनुजच्या प्लेटमध्ये ठेवली . अनुजने नाही नाही म्हणत सराईतपणे घाईघाई ती उचलून सरळ तोंडात टाकली आणि गपकन तोंड बंद केले.
दुसरी पाणीपुरी मालतीच्या प्लेटमध्ये पडली तिने ती खाऊन घेतली . पाणीपुरिवाला जणू एकशेदहाच्या स्पीडने पाणीपुरी बनवत प्लेटमध्ये टाकत होता . त्याचा लक्षातच आलं नाही की रेवाने कमी तिखट मागितली . त्याने रेवाच्या प्लेटमध्ये पाणीपुरी ठेवताच तिने घाईने पाणीपुरी उचलत तोंडात कोंबली आतमध्ये हवा आणि पुरीतल्या पाण्याचे असे काही स्फोटक मिश्रण तयार झाले की जणू सुरुंग फुटावा. नाकातोंडात पुरीचा खमंग झाला होता ... डोळ्यातून पाणी. कानातून धूर यायचा तेवढा बाकी होता. असा काही ठसका लागला म्हणता की रेवाला ब्रम्हांड आठवले. रुमाल, प्लेट आणि स्वतःला या सगळ्यांना सावरता सावरता तिची तारांबळ उडाली. काय पण ध्यान आहे अशा नजरेने पाहत त्या गड्याने दुसरी पुरी ठेवली. पण सगळे सावरून स्थिर होऊन तिला हात घालेपर्यंत ती जरा जास्तच भिजली. आणि उचलून खाताना तिचे पाणी प्लेटमध्येच राहिले. हे पुरीचे आवर्तनपण फसले. रेवाकडे प्रितमचं लक्ष जाताच त्याने आधी गालातल्या गालात हसून घेतले नंतर आपल्या बॅग मधून पाण्याची बॉटल काढत रेवा समोर ठेवली .
आता तर रेवा पाणीपुरी खायचं नाव घेणार नव्हती . निखिल , मालती , अनुज खाण्यात मस्त व्यस्त होते . त्याने तिसरी पुरी मांडली. आता जरा अंदाज आला. ही पुरी अगदी व्यवस्थित तिच्या गंतव्य स्थानी पोहचली होती. आता तर सगळे टेकनिकच आत्मसात झाले. त्याने पुरी मांडली रे मांडली की लगेच अनुजनेही झडप घालून उचलली आणि हळूच पुरी तोंडात टाकली .... तिखट लवंगी फटाका, आंबट फुलबाजे, गोड भुईनळे आणि नमकीन रॉकेट्स अशी सगळी आतषबाजी आतल्या आत सुरु होते. ही जी काही सरमिसळ टेस्ट असते ना पाणीपुरीची, ती प्रत्येक पाणीपुरीवाल्याची युनिक आयडेंटिटी असते. जगात कुठेही भटकलात तरी तशी सेम टेस्ट मिळायची नाही. ती टेस्ट एखाद्या ठरल्या प्लेसवरच विसावली असते पण त्याची सवय होते न होते तोच एका प्लेटचा कोटा संपतो पण मन भरत नाही. मग शेवटची पुरी तोंडात घोळवत खुणेनेच ’लगे रहो’ म्हणून रेवाने गाडीवाल्याकडे प्लेट पुढे केली .
खाणं संपल्यावर त्याने आवरायला सुरुवात केली .
किती झाले म्हणून निखिलने विचारलं . पाणीपुरीवाल्याने जेवढे सांगितले तेवढे खिशातून काढून निखिलने त्याच्या हातावर ठेवले . एवढेच का झाले हे विचारण्याचा भानगडीत तो पडला नाही . आपण खालीच तेवढी असावी ना ठोसून.... शेवटी कितीही पाणीपुरी खाल्ली तरी मन काय ते भरत नाही . हे निखिलला आत्मसात होतं .
निखिल पैसे देऊन मागे वळतोच तर त्याला दूरवरून आदिती येताना दिसते .
" अरे ती काय आदिती ..... इकडेच येत आहे ..... " निखिल आदितीच नाव घेताच अनुज क्षणांचा विलंब न करता मागे वळतो ....
" अरे वा ! तुम्ही सर्व इथे पाणीपुरीचा आस्वाद घेताय ..... "
" ओहहह ..... सॉरी आदि ..... अगं आम्ही तुझ्यासाठी थांबलो नाही .... "
" सॉरी काय त्यात मालती .... मला यायला वेळ झाला थोडा ..... "
" इट्स okay ना ..... चल आता खाऊन घे ..... "
" नाही , मी just .... जेवण करून निघाले घरून ...."
प्रितमला आदितीच्या हातात कसले तरी कार्ड दिसत होते , उत्सुकतेने तो तिला विचारायला गेला ,
" आदिती , तुझ्या हातात कसले कार्ड आहे का ? "
चेहऱ्यावर उसनं हास्य आणतं ती ,
" अरे हो ..... बघ विसरलेच सांगायच .... माझं लग्न ठरलंय ..... "
आदितीच्या तोंडून हे शब्द ऐकताच अनुजच्या पायाखालची जमीन सरकली ..... त्या गुलाबीसर पारदर्शी बॅगेतून तिनं पत्रिका काढत आधी रेवाच्या हातात ठेवली , मग मालती .... प्रितम , निखिल ... आणि शेवटी ती अनुजच्या समोर येऊन उभी राहिली अनुज कितीतरी वेळ तसाच उभा होता निःशब्द ... हातही त्याचे पत्रिका घ्यायला थरथरत होते ... डिग्री हातात यायचा आधीच आदितीच्या लग्नाची पत्रिका त्याच्या हातात स्थिरावली होती ... कार्ड न बघताच त्याने बॅग मध्ये घातलं ..... रेवा , मालती मात्र निरखून निरखून कार्ड बघत होत्या ...
" ये कसा आहेस तो ..... यार कमाल केलीस ग असं अचानक धक्काच दिलास आम्हा सर्वांना ..... हो ना रे अण्या .... " अनुजच मात्र लक्षच नव्हतं मालतीच्या बोलण्याकडे .
" हो हो ..... अचानक झालं ना ! आधी सांगायच होत ..... " अनुजच असं बोलणं ऐकून मनात आदिती स्वतःशीच पुटपुटली ... मग काय आधी सांगून तरी तू स्वतः बोलायला पुढाकार घेतला असता का ? म्हणे आधी सांगायच होत ...
अनुज ही स्वतःच्या मनात एकटाच गुंतला होता , तू जरा पण थांबू शकत नव्हती का ग , सांगणारच होतो माझ्या मनातलं पण इतकी घाई केलीस तू .... आता सर्व काही गेलं हातातून ....
आदिती त्याच्याकडे बघत मनातच बोलत होती , अजूनही वेळ नाही गेली रे , मी वाचते आहे तुझ्या चेहऱ्यावरचे भाव ..... आता तरी हो म्हण ना ! फक्त एकदा मनातलं बोल .... एकदा तुझ्या तोंडून ऐकू दे मला .... मला माहित्ये तू खूप प्रेम करतो माझ्यावर .... पण आजही बोलणार नशील तू तर मी खूप दूर निघून गेली असेल तुझ्या , कायमची ..... मला असं दुरावू नको तुझ्यापासून .... प्लिज , असं म्हणतच ... अनुज तिच्याकडे न बघता तिथून बाहेर पडला ...
आदितीच्या मनातले सारे भाव विरून गेले ... तो असा अचानक का निघून जातोय म्हणून निखिल धावतच त्याच्या मागे गेला .
" अण्या , अण्या ...... अरे थांब ना ... आपण अजून ऑफिसमध्ये गेलो कुठे , तुला डिग्री नकोय का ? "
" अरे मला खूप महत्त्वाचं काम आठवलंय .... मी नंतर भेटतो .... ", असं सांगून अनुजने निखिलला टाळलं ... निखिलला तर कल्पना झाली ह्याचं काहीतरी बिनसलं . पण नेमकं काय कळतं नव्हतं .
अनुजने अख्खा दिवस स्वतःला रूमची दार बंद करून कोंडून घेतलं होतं ... सायंकाळची वेळ होती अनुजचा फोन खणानला ..... नको म्हणत त्याने पहिल्यादा फोनकडे बघितलं देखील नाही ... परत फोन आला ... स्क्रीनवर प्रितमच नाव फ्लॅश होताना दिसत होतं ...
" Hello .... Hello ..... Hello अण्या ..... "
" थांब अरे थोडा बाहेर निघतो .... रेंज नाहीये .... ", अनुजच्या तोंडून शब्द फुटत नव्हते , प्रितम सोबत बोलायची मुळीच मानसिकता नव्हती त्याची . एकांत हवा होता त्याला .
" हा .... बोल आता .... येतोय का आवाज ? "
" का रे .... गळल्या सारखा का बोलतोय .... रेंज नाहीये .... कॉलेजमधून पण तसाच काही न सांगता निघून गेलास ..... तू आताच्या आता मला भेटणार आहे ? "
"काय वेड्या सारखा बोलतो .... आता ? "
" हो आताच ..... फक्त आपण दोघेच भेटू .... "
" कुठे पण ? "
" चौपाटीला ये .... "
" चौपाटीला ?? "
" हे बघ आता मी भेटू शकणार नाही , वैगरे .... वैगरे मला कारण सांगत नको बसू तू निघतो आहे .... "
" अरे पण ....... " प्रितमने त्याचं हो नाही ऐकून घेण्याच्या आधीच फोन कट्ट केला होता .
सायंकाळचे सात वाजले होते तेव्हा ... शर्टच्या बाह्या दुमडून अनुज ओंजळीने लाटासोबत खेळत होता . स्वतःला तो असा हरवून घेण्याचा प्रयत्न करत होता .... पण मन कुठेच रमत नव्हतं .... किती स्वर्गीय ठिकाण आहे हे , कातरवेळची निरभ्र शांतता , निस्तेज समुद्र .... खवळणाऱ्या लाटा .... खरचं प्रितमचे लाख लाख आभार .... तरी देखील अश्या उसळणाऱ्या लाटात मी स्वतःला शोधतोय की तिला ? हा प्रश्न माझ्याच मनाला भेडसावतो .... पायाखालून जाणाऱ्या लाटासोडून निरुत्तर नजरेने अनुज दूरवर बघत बसला होता . त्याला त्या पायाला विळखा घालून जाणाऱ्या लाटांचाही स्पर्श होत नव्हता .
" अण्या .... आलास पण तू ? सॉरी वाट बघावी लागली तुला ..... "
" ..... मी तुझी वाट नव्हतोच बघत , समुद्राला दूरवर न्याहाळत होतो ... किती अथांग असतो रे हा , खोल खोल अरूंद .... नदीच्या संगमाने बनलेला महाकाय समुद्र .... "
" हो .... माझ्या एका प्रश्नाचं उत्तल देशील ..... "
" कोणता प्रश्न ..... "
" अजूनही वेळ गेलेली नाही आहे ..... जाऊन सांग तिला . "
" कशाची वेळ ..... आणि कुणाला काय सांगू ? ",
" अण्या .... तू ना आता मार खाशील हा .... समजून न समजल्या सारखा नको करू ... ",
" सोड रे तो विषय .... ",
" ऐवढे दिवस कधी हा विषय तुझ्या समोर मांडलाच नाही मी , पण आज वाटतयं बोलावं ... मला माहिती आहे तुझं आदितीवर खुप प्रेम आहे .... ",
" हो .... पण आता खुप उशीर झालाय .... तिचं लग्न अश्या मुलासोबत होत आहे ज्याची मी एक टक्का बरोबरी नाही करू शकत .... आता पत्रिका देखील छापल्या ... ",
" आणि तू ती पत्रिका बँग मध्ये न बघताच टाकून दिली न तसाच तडक घरी जायला निघाला , ती तरी तुला जाताना बघत राहिली .... पण आजही थांबवू शकली नाही .... ",
" तुला माहिती आहे , सगळ्यात अवघड क्षण कोणता असतो ? आपल्याला आवडणारी व्यक्ती स्वतः आपल्या हातात तिच्या लग्नाची पत्रिका ठेऊन जाते ना .... तो क्षण .... असा क्षण माझ्या सारख्या एखाद्याच्याच वाट्याला यावा , त्या क्षणाला सावरून घेणं देखील किती गरजेच असतं.... नाहीतर प्रेमही मुठीतून निसटलेल्या वाळूच्या कणासारखं निसटत जातं .... आणि ते निसटून गेलयं ....."
" अण्या हेच सांगण्यासाठी मी तुला इथे बोलावून घेतलं ..... अजूनही वेळ गेलेली नाही ...तू बोल रे तिला .... तीही प्रेम करते तुझ्यावर .... डिप्लोम्याटिक आहेस यार तू ... ऐकायला पण तयार नाही .... "
" सर्व संपल रे ... तिने माझ्यावर प्रेम केलं असतं तर लग्न जुळायचा आधी एकदा कॉल करून सांगितलं असतं , आलीही तर पत्रिका घेऊन लग्नाच्या .... तुला आठवतंय ? "
" विपिनला नकार दिला होता तिने , मलाही तसाच नकार दिला तर .... तिचा नकार पचवण्याएवढं माझं साहसी हृदय नाही ..... "
" तुझ्यावर प्रेम करत होती ती , म्हणूनच विपिनला नकार दिला तिने .... "
" तुला कोणी सांगितलं हे ..... "
" तिनेच ....."
" माझ्यावर प्रेम करते असं म्हणाली का ? "
" नाही , पण म्हणण्याचा उद्देश तोच होता ..... "
" सोड यार ...... पण , खूप प्रेम करतो रे तिच्यावर ... तिला एकदा तरी खूप आठवण येईल माझी आणि येईल ती माझ्याकडे .... माझी आठवणच तिला माझ्याकडे घेऊन येईल ..."
" तेव्हा पर्यंत प्रतिक्षा कर ती येण्याची ..... नाही आली म्हणजे आपलं अख्ख आयुष्य वाट बघण्यात घालवं .... "
" मी बघेल वाट ..... "
" कमाल आहेस यार तू ..... आणि तीही .... जसं मी तुला समजवून समजत नाहीये तसं आदितीलाही काय समजवू ... ती मनातून खुश नाही वाटत ह्या लग्नासाठी , ती हे लग्न तिच्या घरच्यांची मर्जी राखण्यासाठी करत आहे ..... "
" हो .... "
" भ्याड आहेस तू अण्या ...... ऐकलं भ्याड ......"
" हो ..... निघायचं ..... "
" इथे थांबून पण काय करायच आता .... चल .... "
वाळूतून चालतांना अनुज भरल्या चांदण्याकडे आकाशात बघत होता .... रात्र गडद होत चालली होती .... तो दिवस अनुज आजही विसरू शकला नव्हता ..... म्हणून की काय जुन्या आठवणींना तो उजाळा देत होता ....
==================================================================================
तिला अनुजच्या चेहऱ्यावर पाच वर्षांचा भूतकाळ रेंगाळताना दिसला ...
" अरे अनुज कुठे हरवलास तू ? "
" हा ... कुठे नाही अगं .... तुझ्या लग्नाचा काळ आठवतोय ...."
सगळे प्रसंग अनुजसमोर काल परवा घडून गेलेल्या आठवणीसारखे ताजे होते .
खोल खोल भूगर्भाच्या मध्याशी शिरावे तसे ....
" अण्या आता लग्नाचा काळ आठवून काय फायदा .... जाऊदे हा विषय .... मला सांग , निख्या , प्रितम कसा आहे ? भेटतात का तुला ? रेवा , मालती लग्न होऊन गेल्या तेव्हापासून माझ्या संपर्कात नाही .... कॉल नाही की भेट नाही .... लग्न झाल्यावर खरचं यार माणूस एवढा बदलून कसा जातो . "
" मुलींची लाईफच तशी असते ग लग्नानंतर , घर ... संसार , मुलंबाळ नवरा त्यात त्या आपल्याला कश्या वेळ देईल आता .... हो निख्या आता बैंग्लोरला एका रिसर्च सेंटरमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे . गेल्या महिन्यात इथे कामानिमित्त आला होता तेव्हा गेला भेट घेऊन . "
" आणि ..... प्रितम ? "
" तो .... लाखोच पॅकेज सोडून आदिवासी जीवनावर रिसर्च करतोय .... कधी संपणार ना ह्याचा रिसर्च देव जाणे ! "
" काय सांगतोस काय .... दुनिया एवढी डेव्हलप झाली आणि तो जंगलात जाऊन बसला . "
" हो .... आता आलाय म्हणजे इकडे , वरळीला गेस्ट हाऊसवर थांबलेला आहे . भेटून जा त्याला खूप बरं वाटेल ... "
" हो नक्की भेट घेते त्याची .... एक विचारू ? " न राहून किती दिवस मनाला छळणारा प्रश्नाला विचारण्याच धाडसं तिने आज केलं ....
" तुझं लग्न झालं ? "
" माझं लग्न ...." तो हसला .
" हो अरे ..."
" तू जाताना एकदा घरी ये .... खुप मोठं कुटुंब आहे माझं ....आई सारखी तुझी आठवणं काढत असते "
" आईला नमस्कार सांग माझा .... "
" हो .... येणार आहेस ना ! "
" तुला सांगून नाही येणार .... येईल पण नक्की , आहे इथेच आठवडाभर तरी अजून ... "
" ये ..... मी वाट बघेल ..... "
" खूप उशीर झाला , तुझ्यासोबत बोलण्यात कसा वेळ निघून गेला ना कळलंच नाही . मला वाटतं पाऊस येईल ढग दाटून आलेत ... चल निघते आता . नाईस टू मिट यू take care ..."
" you take care ..... bye ...... "
ती कारमध्ये बसली .... गाडी निघाली ..... अनुज गाडीच्या वेगवान जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे स्तब्ध बघत उभा राहिला .
ढग धावत होते ..... सकाळची दहाची वेळ सायंकाळचे सात वाजून गेले असावे अशी भासत होती . काळोख अधिकच तीव्र होत होता . अनुज तिथून चालतच घरी जायला निघाला .... एवढ्यात त्याचा फोन वाजला . रस्त्याच्या कडेला उभं राहून त्याने कॉल रिसिव्ह केला .
" Hello ..... बोल प्रितम ..... "
" अरे कुठे आहेस तू ? "
" रस्त्याने ..... का , काय झालं ? "
" just आदितीचा कॉल येऊन गेला .... ती येत आहे भेटायला .... "
" हो , आताच निघाली ती इथून तिला म्हटलं मी तुला भेटून जा .... "
" हो , हो ..... अण्या ... अरे आवाज कटतोय तुझा .... "
" मला येतो आहे तुझा आवाज ...... "
" अरे आज तरी सांगितलं का तिला ? "
" काय ..... काय सांगितलं का ? "
" काही नाही , जाऊदेत .... "
" आणि हे बघ प्रितम ती तुला भेटायला आल्यावर माझ्या बद्दल विचारेल तर काही सांगू नकोस .... "
" बरं भावा नाही सांगणार okay ... "
" हा तेच म्हणतोय ..... "
" चल मी थोडं आवराआवर करतो ....खूप पसारा झालाय रे ती येईलच एवढ्यात .... "
" हो .... bye see you ...."
घरी पोहोचल्यावर अनुज बाल्कनीतच उभा राहिला काळोखाला न्याहाळत .
दाटणाऱ्या मेघांबरोबर ..... तुझी सय अधिकच गडद होत जाते , बरसणाऱ्या सरी बरोबर नकळत तुझी आठवण डोळे भिजवून जाते .... मला माहिती होत तू येशील .... आणि आज बघ तू आली देखील ... ह्या भेटी का होतात अश्या ? अजनुही आपल्यात काही उरलंय का ?
काय माहिती अजून नियतीच्या पोटात काय काय दडलंय .... तो स्वतःशीच बोलत होता .
=========================================================================
रूमची आवराआवर करता करता प्रितमच्या एकट्याची तारांबळ उडाली होती . सर्व पसारा त्याने सोफ्याच्या खाली भिरकावला . खिडक्यांचे पडदे ओढले . त्यावर परफ्युम मारला . साऱ्या रूमभर परफ्युमचा घमघामाट ....
दोन , तीन दिवसांचा मुकामी असा पंधरवाड्याचा पसारा मांडून ठेवेल ह्याची कोणी कल्पना न केलेली बरी .
बाहेर दाराची बेल वाजत होती . आली असावी ही म्हणून प्रितम दार खोलायच्या आधीच काचेतून बघू लागला .
" बापरे सहा वर्षाने भेटतोय आपण .... अजूनही तशीच आहे तू .... बारीक झाली एवढंच ..... का ग नवरा खायला देत नाही की मारझोड करतो .... " तो दार उघडतच बोलायला लागला .
आदिती मात्र कितीतरी वेळ प्रितमकडे बघत होती , किती बदलला होता तो ... आधीचा प्रितम आता राहिलाचं नव्हता . दाढी वाढलेली ... डोळे थोडे खोल गेलेले ... हाताच्या बाह्या ढोपरापर्यंत दुमडलेल्या ... चष्म्याची सक्त नफरत असलेला प्रितम त्या चौकोणी भिंगाच्या ग्लासने एखाद्या तत्वज्ञानी सारखा भासत होता तिला .
" आत ये म्हणशील का मला .... "
" हो .... हो ये आत .... "
" अरे वा .... कोणत्या इंजिनिअरची रूम एवढी नीट & clean असते रे , पसारा वैगरे सारा सोफ्या खाली लोटला वाटतं .... "
" यार आदे तुझी नजर अजूनही आहे तशीच तीक्ष्ण आहे .... तुला आल्या आल्या साऱ्या गोष्टीची खबर तरी कशी लागते ."
" लॉजिक अँड माय ओब्सेर्वेशन इस स्ट्रॉंग ... "
" लॉजिक ते कसं .... "
" आधी पासून पसारा मांडायची सवय होती रे तुला ती सवय गेली असावी का आताशा .."
" कसली भारी आहेस ना यार तू .... मला वाटलं खूप काही बद्दल झाला असावा . "
" माणसं बदलतात का रे ? "
" माझ्या माहितीप्रमाणे तरी ..... बदलतात ... "
" रेवा आणि मालती बदल्यात ना ! "
" परिस्थितीने बद्दलवल त्यांना .... "
" अशी कोणती परिस्थिती आली त्यांच्यावर ? लग्नच तर झालं त्यातच खूप काही बद्दल ... लोक अमाप पैसा आल्यावर बदलतात ... पैश्या सोबत अहंकारही येतो ना रे ! पण रेवा आणि मालती विसरूनच गेल्यात ..."
" तू सुद्धा लग्न झाल्यावर त्याना एकवर्षं कुठे विचारलं होतं ....."
ह्याला काय माहिती त्या एक वर्षात माझ्या आयुष्यात काय घडलं ... कितीतरी वेळ काहीच न बोलता आदिती शांत बसलेली होती .
" काय घेणार चाय कॉफी ? "
" कॉफी .... चल मी बनवते ...."
" नको तू बस्स .... मी आणतो बनवून .... " प्रितम किचन मध्ये गेला कॉफी बनवायला ,
" ये प्रितम तुला माहिती आहे , मी आणि अण्या आज आपल्या कॉलेजच्या टपरीवर चाय पिलो ..."
प्रितम किचन मधूनच ओरडला , " गुड गुड .... मला पण न्यायचं होतं .... ",
" मला कुठे माहिती होतं तू इथे आहेस ते .... नाहीतर तुला घेऊनच गेले असते तिकडे ...."
आदितीची नजर भिंतीवर लावलेल्या चित्राकडे गेली . सोफ्यावरून उठतं आदिती त्या चित्रासमोर उभी राहून चित्र बारक्याव्याने टिपत होती .
" प्रितम अरे साखर थोडी जास्त घालशील .... "
" हो , हो ...... हे घे झाल्यावर सांगते , आता लागली तर वरून घे . " कॉफीचा मग प्रितमने आदिती समोर ठेवला .
" झाली पण लवकरच ..... "
" हो , असा किती वेळ लागतो कॉफी बनवायला .... "
" by the way .... प्रितम , nice पैंटिंग्ज ..... कुणाची आहे रे ही पैंटिंग ? "
" यू नो दॅट .... द ग्रेट ग्रीक पेंटर निकोलस गायजींस ... त्याची पेंटिग आहे ... आणि त्यांच्या ह्या पेंटिग खुप महागड्या देखील आहेत . इथे आल्यावर मी ही पैंटींग बघून नवल वाटून घेत होतो . म्हटलं ही पैंटींग इथे आलीच कशी . काहीतरी चुकीचं कनेक्शन असावं कुणाचं ह्या पैंटींग सोबत .. "
" काय कला असते ना एखाद्यात ..... खरचं खुप कोरीव आणि शिलेदार वळणं घेतली आहेत त्यांनी .... "
" कोरीव आणि शिलेदार काय म्हणतेस .... त्याची ही पेंटिग म्हणजे ग्रीक राष्ट्राची ओळख आहे . जी आता ह्या वॉलची शोभा बनून आहे . "
" बरं बरं मला काही कळतं नाही त्यातलं .... "
" बाकी कसा आहेस ... आणि हा काय अवतार करून घेतलास स्वतःचा . अगदी जंगली विभागात रिसर्च करतो म्हणून जंगली व्हायचं का ? " फटकळ आदिती कशाचा विचार न करता मनात आलं ते बोलली .
तो हसतच ,
" अगं वेळ नाही मिळाला दाढी बनवायला , आय नो ..... तुला अशी दाढी वाढलेली माणसं म्हणजे एखाद्या गुंढ्यासारखी वाटतात .... एकदा म्हटली होती तू मला असं .... "
" हो रे ..... पण तू चेहऱ्यावरून दाढी वाढलेली असली तरी तत्त्वज्ञानीच वाटतो दिसायला .शोभतो तुला हा लूक .... असाच राहूदे ..."
" हो आता असाच राहू दे म्हणून सल्ला नको देऊ .... नाहीतर मला त्या जंगलातच संन्यास घेऊन बसायची वेळ येईल .... " दोघेही हसले .
" रिसर्च काय म्हणतो तुझा ..... आणि कशाला रे आदिवासी जीवनावर पीएचडी करण्याच्या भानगडीत पडलास , आयआयटी चा स्टुडंट ना तू ! .... "
" आयुष्यात माणसाला हवं ते ज्ञान मिळवायला कोणत्याच क्षेत्राच लेबल नाही लागत ग ... कला शाखा काय वाणिज्य काय आणि विज्ञान काय देतात माणसाला ज्ञानच .... आपण अश्या मतभेदाने जखडून बसलो ... मला हे जग अनुभवायचं आहे .... कार्पोरेट सेक्टरमध्ये मन नाही लागत माझं ... नको ते पॅकेज नको ती नोकरी .... "
" सॉरी ..... तुला दुखवण्याचा उद्देश नव्हता माझा .... "
" तुझ्या बोलण्याने दुःखी कधीच नाही होत ग मी .... एक सांगू .... "
" हा सांग की , सांगायला काय परवानगी घेतो आहे ... "
" आयुष्य म्हणजे खडतर प्रवास का ग ? निवळ आपल्या वाट्याला येईल तसा जगावा , आठवड्या पूर्वीचा प्रसंग आहे .... इथे यायला निघालो तेव्हा ना एक आदिवासी बाई ST मध्येच बाळंत झाली . तिच्या त्या कांठाळ्या बसवणाऱ्या कळानी मलाच गहिवरून आले ... तुला सांगू त्यावेळी मनात असंख्य प्रश्नाने गर्दी केली होती मनात , असा कोलाहोल झाला होता प्रश्नांचा . अश्या आदिवासी स्त्रिया डोंगरकपारीत, झाडाझुडुपांमध्ये बाळंत होतात . घनदाट जंगल असो की मुसळधार पावसाळा . त्यांची कुठे सरकारी हॉस्पिटलमध्ये सोय होते ग . अश्याच जमिनीवर लोळत नवा जीव जन्माला घालतात त्या . त्यात एखादीनेच सरकारी रुग्णालयाचा बेड पाहिला असेल ह्याची शाश्वती देखील देता येणार नाही . ती बाई त्या दिवशी विव्हळत होती अक्षरशः बसमध्ये .... मला कळत नव्हतं तीच हे विव्हळण बाळंतपणाच्या यातना होत्या की मरणयातना . म्हणतात , डिलिव्हरी म्हणजे बाईचा दुसरा जन्म ..... यार तिच्या नशिबात नसेलच ग तो दुसरा जन्म .... "
हे सारं ऐकून घेताना आदितीचा अंगावर शहारे आले .... काय झालं असावं त्या बाईचं ,
" म्हणजे , मग ती बाई ...... "
" हो .... मुलाचा रडण्याचा आवाज यायला लागला आणि तिच्या कळा बंद झाल्या ... तिने डोळे मिटले ते कायमचे .... "
" यार , विशींन्न आहे हे .... एक बाईच असते ती निसर्गाच्या फलश्रुतीना झुंज देणारी ... किती भयान वास्तविकता आहे ही .... "
आदितीे पहिल्यादाच प्रितमला असं भावुक झालेलं बघत होती . ह्या वास्तविकतेने आपल्या मित्राला पार बदलवून टाकलंय असं तिला प्रतिमकडे बघून वाटत होत .
" माणुसकीला धरून ठेवण्याची नाळही त्याच्यातच बघायला मिळाली मला , एकदा शिकारी करणाऱ्या एका इसमाला मी बघितलं आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणालो , '
ऐसे प्राणियों की हिंसा करना गलत बात है .... ' तर तो मला काय म्हणाला माहिती आहे ...."
" काय ? "
" क्या आपने कभी मुर्गी का मांस या उसके अंडे खाये है ? मी आधीतर निशब्द झालो नंतर म्हणालो , ' हा खाये है .... " त्यावर तो बोलला .... " ऐसेही जिंदा रहने के लिए हम ये खाते है .... "
" खूप कठीण जीवन जगतात ते .... "
" हो , आपण कोणत्या बदलांची अपेक्षा करायची त्यांच्याकडून ? भाषा सुद्धा धड हिंदी ना धड मराठी .... मला खूप उशिरा लक्षात आलं त्या बाईच्या मृत्यच कारण . ते लोक हॉस्पिटलमध्ये जात का नाहीत .... "
" पैसे नसतात म्हणून ना ! "
" तेही एक कारण आहे ग पण त्यांची भाषाही डॉक्टरला समजणार नाही . अगं तरुण तरुण मुली लग्न व्हायच्या आधीच गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्युमुखी पडतात . अशिक्षितपणा . आरोग्याची काळजी नाही . आणि त्यांना कोणी समजून घ्यायला तयार नाही . "
" हो यार , त्यांना मुबलक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत ... "
" दोन महिने मी त्यांच्यात राहून त्यांची रहणं , सहन एकूणच बोली भाषा शिकायला लागलो ... थोड कठीण गेलं आधीतर , खायचं ताटातील अन्न समोरचा भुकेला आहे म्हणून ते आपल्या ताटात टाकतील ... त्यांना आपली भूक बाजूला ठेऊन आपल्याला देताना काही वाटणार नाही पण आपल्याला ते खातांना मनात शंका निर्माण होईल , हे पशुच मांस आपण कसं खायचं ? म्हणून ... एका धर्तीवर राहणाऱ्या माणसात एवढा फरक बघायला मिळतो .... "
" अरे , ऐकूनच तर ही परिस्थिती बदलावता येईल आपल्याला.... आणि हा बद्दल आपणच घडून आणवू शकतो... ते कसं बघ...."
" मला माहित्ये... आणि मी तेच करतोय... माझ्या थेसिस तयार आहेत रिसर्च पूर्ण झाला तरी देखील मी तिथे जात रहाणार आहे... भावनिक ओढीने म्हणून नाही तर त्यांच्या सारखी माणुसकी कुठे तरी मलाही जपता यावी म्हणून ."
" गुड यार... सोबत मलाही घेऊन चल कधी... "
" हो तू येणार असेल तर.... पुढच्या महिन्यात निख्या आणि अण्या येत आहे सोबत . "
" मी पण जमेतो तुला तसं कळवते , निख्याला पण भेटून किती वर्षे झालीत... "
" हो , पण तुझा नवरा वाट बघत असेल तुझी तिकडे.... "
त्याच्या ह्या वाक्यावर आदिती काहीच बोलली नाही ,
" अगं अशी गप्प का आहेस , भांडून आलीस का त्याच्यासोबत... "
" भांडायला तो माझ्या सोबत कुठे असतो.... " आता खरं काय ते तिला सांगावचं लागलं ,
" सोबत नसतो म्हणजे.... तुम्ही वेगळी रहाता का ? "
" डिओर्स झालाय आमचा... " प्रितमला ऐकून धक्काच बसला .
" कधी आणि का ? तू हे आता सांगते आहे मला.... "
" हो , तुला काय सांगू रे.... "
" का मित्र नाही का मी तुझा.... काय झालं होतं डिओर्स घ्यायला ?"
" त्याचं आधीच अफेर्स चालू होतं... "
" बापरे.... हे तुला कधी कळलं ? "
" लग्न झाल्यावर सहा महिन्यांने... तो घरी खूप उशिरा यायचा नीट वागायचा नाही माझ्याशी . विंकेडला तिच्या सोबत फिरायला जायचा , ती आठवडाभर घरी येऊन रहायची .... खुप वैतागले होते मी त्याच्या अश्या वागण्याला... एका छत खाली राहण्याला तरी काय अर्थ होता ? म्हटलं डिओर्स देऊन मोकळा हो.... मला ही ह्या बंधनातून मुक्त कर.... "
" म्हणजे ...... लग्न झाल्यावर सहा महिन्यातच डिओर्स घेतला का ? "
" हो .... "
" मग एवढी दिवस होती कुठे तू ? "
" कॉलिफोर्नियालाच...... तिथेच जॉब बघितला आणि स्थायी झाले ."
" इंडियात का नाही आली परत....."
" काय केलं असतं इथे येऊन तरी , बाबाला मनासारखा जावई मिळाला होता.... आणि निघालाही तो तसाच..... नाही जायचं म्हटलं होतं मला बाहेर देशात इथेच राहायचं होतं ... पण , नाही... शेवटी त्यांच्या मताने लग्न करून मी एकटेच पडले.... आजही एकटीच रहाते तिथे.... फावल्या वेळात एका NGOसाठी काम करते.... म्हणून एकटे पण कसं तरी जाणवत नाही.... आता ह्या एकटे पणाची भीती वाट्याला लागली आहे ."
" मग लग्न करून घे ना....."
" लग्न.... अजून विचार नाही केला ."
" एकटं जगणं खूप कठीण असतं गं....."
" रीतिरिवाज आणि परंपरांच्या बंधनाने बांधून केलेल लग्न टिकेलच , ह्याची शाश्वती कोण देईल ?? "
" कोणीच देऊ शकत नाही..... परस्परांशी जुळवून घेण्याचा खेळ म्हणजे लग्नगाठ आहे ..."
" हो प्रितम..... "
काहीवेळ शांततेत निघून गेल्यावर ,
" अण्याच तर खूप मोठं कुटुंब आहे म्हणाला तो . "
" हो सुखी आहे तो त्याच्याच कुटूंबात...... "
" तू देखील..... पण ती सोबत नसते रहात का तुझ्या ? " आदिती उत्सुकतेने प्रितमच्या फॅमिली बद्दल विचारू लागली .
" मी कुठे सोबत नको राहू म्हणतो तिला...."
" तुझं पटतं ना तिच्याशी ?"
" हो अगं..... पण तिचे काही स्वप्न आहेत त्या स्वप्नाच्या आडे येणारा मी कोण ? आणि एक सांगू का आदि तुला..... लग्न झाल्यावर मी तिला कधीच बंधनात नाही ठेवलं , तुला जे वाटते ते कर . सोबतच रहायला पाहिजे असंही काही नाही.... ती माझ्या आईबाबांना घेऊन इटारसिला रहाते . तिचा जॉब तिकडे आहे . ती मी जिथे जाईल तिथे येऊ शकत नव्हती म्हणून म्हणाली , तू तुला जिथे जायचं तिथे जा आई बाबांना माझ्याजवळ असू दे ! ठीक आहे म्हटलं मग मी......"
" किती understanding आहे रे तुमच्यात ...."
" असायलाच पाहिजे .... प्रत्येक नात्यात , तेव्हाच नातं टिकतं . "
" फार तर नाती तुटतात ती अट्टहासानेच आणि इगो .... एखाद्याचा इगो हर्ट झाला तर झालं दावनीला अडकलेल्या गोऱ्या सारखा तो पेटून उठतो .... कशी टिकेल मग नाती ?"
" सोपं नसतं रे नातं टिकवणं आणि ते पूर्णत्वास नेणं....."
" हो.... तुला माहिती आहे कधी कधी खूप फस्ट्रेट होतो ग मी.... सर्व सोडून द्यावं वाटतं....कशाची कमी नाही जीवनात कुठेही नोकरी करून राहू शकलो असतो . पण मी माघार घेतली तर त्या उन्ह , पावसात ज्यांनी अजून पर्यंत घराचं छत बघितलं नाही त्यांचं कसं होईल हा विषय छळतो म्हणाला "
" तेही खरयं प्रितम , तुला तशी साथ देणारी जीवनसाथी मिळाली तिच्या सहयोगाने तू खूप सामोरे जा..... परत मागे वळून बघू नको.... तुझा प्रवास कोसो मैलाचा आहे , तेव्हा थांबून जाऊ नकोस.... आणि ह्यात तुला कधी माझ्याकडून मदत हवी असल्यास बिनधास्त सांग ..."
" तू आज एवढ्या वर्षांनी मला भेटली तेच काही कमी आहे का माझ्यासाठी.... पण भेटत रहा ग .... आणि हो इकडे शिफ्ट हो आता , काय तो एकटेपणा .... NGO मध्ये इथे ही काम करता येईल तुला.... नाहीच कोणतं NGO मिळालं तर मला जॉईन होऊन जा ! न संपणारी काम असतात माझ्यासभोवती गराडा घालून.... मला वाटतं कधी कधी मी पीएचडी करतोय की नुसता पीएचडी जगतोय ...."
" आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्याकडून आज खुप मोठं इन्स्पिरेशन घेऊन जातेयं.... हा जन्म आणि दिवसाची चोवीस तास माणसाला धडपाड्याला खूप झालीत... जॉईन व्हायचंय तुला , पण यार तू ज्या विभागात रिसर्च करतो तिकडे तुझ्या खाण्याची गैरसोय होत असणार राहतो कुठे तू मग तिकडे ? खातो काय ? नाही म्हणजे मी तुझ्यासोबत आले तिकडे तर माझी सोय नाही लागणार ना ! "
" ते जे खातात तेच खातो त्याच्या ताटात जे असेल ते.... तिथे आपली मिजास चालत नाही . केळीच कालवण जरी पात्रात वाढलं असलं तरी मुकाट्याने खायचं असतं . कधी रानटी हरीण असो की मग सस्याच मास..... खावच लागतं... तिथे तुला खिचडी त्यावर साजूक तूप , बेसनाचे लाडू कधीच खायला मिळणार नाही..... पण तुला यायचं असेल तर एवढ्या तयारी निशी यावं लागेल..... आणि हो तिकडे बाया नदीवर अंघोळ करतात ."
"कोणी बघितलं तर ?" आदितीला खूप मोठा प्रश्न पडला .प्रितम आधीतर तिच्या ह्या विचारलेल्या प्रश्नांनाला खळखळून हसला ,
" ये मी जोक नाही हा मारला.... असा वेड्या सारखा का हसतोय ?"
" बावळट..... तुला अजून त्यांची संस्कृती नाही माहिती , जंगलात रहाणारी लोक असलीत तरी खूप सभ्य आहेत ती . कधी कोणत्या बाईकडे वाईट नजरेने बघणार नाहीत , कधी कुणाचं देणं अंगावर ठेवत नाहीत ."
" किती सालस जीवन आहे रे त्याचं..... "
" हो , सुविधा नसल्या त्यांच्याकडे तरी सालस जीवन नक्कीच आहे..... "
" मी दोन महिन्यात इंडियाला सेटल व्हायचा प्रयत्न करते..... नंतर परत ह्याविषयीची सखोल माहिती दे मला .... इथल्या आदिवासी संस्कृतीवर तू जे काही मला सांगितलं ते लिहायचंय टाईम्स एक्स्प्रेसाठी तुझी परवानगी असेल तरच हा.... परदेशीयाना देखील आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटायला हवा..... "
" अगं तू लिहिते आहे हेच खुप भारी फिलिंग आहे माझ्यासाठी , मला असं कोणत्याच प्रसंगाचं वर्णन करून लिहिता येत नाही ते काम तुझं आणि अण्याचं .... आहात तुम्ही दोघे writers लिहा त्याच्याबद्दल आणि मला मेल नक्की कर लिहून पूर्ण झालं की .... आणि काही घटना अगदी जश्याचा तश्या नमूद कर..... "
" हो , तू जे सांगितलं तेच लिहणार .... चल आता निघू का ? खूप वेळ झाला रे घरी जाऊन मला सायंकाळी कॉन्फरन्ससाठी जायचं आहे ....."
" OK व्यवस्थित जा...... आणि पोहचली की टेक्स्ट कर ...."
आदितीला निरोप द्यायला प्रितम तिच्या कार पर्यंत आला . आदिती गाडीत बसली .
प्रितमला एकदा सांगव वाटलं.... अण्या अजूनही तुझ्या प्रतीक्षेत आहे . पण तो तिला असं काही सांगू शकला नाही .
" काही रहालय का..... "
" Okay मी बघून येऊ का एकदा.... "
" नाही थांब .... साधं कळतं नाही तुला ....कुठेतरी हरवलाय तू म्हणून म्हटलं ."
" ओहहह ..... कुठे नाही ..... "
" चलो..... "
" नेक्स्ट टाईम ड्रायव्हर आण सोबत..... "
" का मला येत ड्राइव्ह करता..... उगाच फुकटचे सल्ले नको देत जाऊ ... "
" अगं ड्रायव्हर म्हणजे 'तो' समजली नाहीस का......"
" प्रितम तू पण ना ! okay बाय...... भेटला तर घेऊन येईल जरूर...."
=========================================================
काळोखातलं प्रखर चांदणं आणि मंदमस्त वारा ह्या निसर्गी निर्मित वातावरणाचा मिलाफ म्हणजे स्वर्ग सुखं उपभोगल्या सारखं वाटू लागतं.....
निर्विकार थंड वारा अनुजच्या देहाला भेदत होता... दुपार पर्यंत काय पावसाची सततची रिपरिप चालू होती , आणि आता बघा अवकाशात चांदण्याचा सडा... लुकलुकणाऱ्या चांदण्याकडे बघत अनुज एकांतात स्वतःशीच गप्पा मारत टेरिसवर उभा होता . त्याने खिशातून फोन काढला आदितीला कॉल करू का ? नाही नको , ... असं म्हणत त्याने खिश्यात फोन ठेऊन दिला परत. खरचं येईल का ती ?
की जाईल ह्या खेपेलाही तशीच न सांगता निघून....
दोन , तीन दिवस तशीच निघून गेली... आदितीला अनुजचा कॉल नाही की मॅसेज नाही , आता तर ती घरी येईल ही आशा अनुजने सोडून दिली .
त्या दिवशी सकाळी सकाळी आठ वाजता दाराची बेल वाजली .
अनुज आपल्या खोलीत खिडकीपाशी उभं राहून बाहेरचा पाऊस न्याहाळत होता . एका हातात कॉफीमग आणि दुसऱ्या हातात टॅब घेऊन तो कविता टाईप करत होता . बाहेर कोण येतंय कोण जातंय ह्याची त्याला काही कल्पना नाही .
" अगं तू , एवढ्या पावसात..... ये आत ये... भिजली नाहीस ना बाळा ? किती वर्षांनी डोळे भरून बघते आहे तुला... फार दुबळी झालीस ग...." अनुजच्या आईने दरवाजा उघडला . आदितीला पाहून ती आनंदून गेली .
" नाही काकू.... एवढ्या पावसात येणार नव्हते पण संध्याकाळची फ्लाईट आहे ना ! आणि अण्या सांगत होता तुम्ही माझी खूप आठवण करता म्हणे , आता आलीच तर भेट घेऊन जावं म्हटलं.... परत तिकडे गेल्यावर लवकर काही येणं होतं नाही . "
" हो तुला कशी आमची आठवण येणार बस्स हा.... मी पाणी आणते तुला . "
आदितीने मानेनेच होकार देत हलकीशी स्माईल दिली . तिचं लक्ष समोर खेळणी खेळत असलेल्या मुलांकडे गेलं . त्यांना बघून आदितीच मन अगदी भरून आलं होतं . ती इकडे तिकडे कुठे अण्याची बायको दिसते का म्हणून शोध घेत होती . एवढ्यात पाणी घेऊन अनुजची आई आली ,
" हे घे पाणी .... कुणाला शोधते आहे का ? हा अण्या आताच तर होता इथे बाळासोबत खेळत..... कदाचित खोलीत गेला असावा...."
" किती गोड आहेत ही मुलं..... अगदी अण्या सारखी दिसतात . "
अनुजची आई हसायला लागली ,
" हो हो , गोड आहेत पण खरचं अण्या सारखी दिसतात का ही ?"
" हो ना काकू..... का अण्यासारखी नाही दिसत का ?"
" अगं अण्याच अजून लग्नच नाही झालं..... " आदितीला हे ऐकून धक्काच बसला तिला वाटलं अनुजची आई आपली मज्जाक तर घेत नाही आहेत .
" काय सांगताय काय काकू तुम्ही ? अनुजने अजून लग्न नाही केलं तर ही मुलं कुणाची ? "
" अगं छोट्या मुलांच वसतिगृह उभारलय ना त्याने... तुला सांगितलं नाही का ? आता चार वर्षे होतील.... ही दोन मुलं माझी जबाबदारी म्हणून आपुलकीने सांभाळते मी . अण्या ऑफिसला गेल्यावर एकटीला घर खायला धावत होत बघ . ही मुलं देखील वयाने किती छोटी आहेत ग ह्यांच कोणी नाही ह्या जगात . "
" हे तर त्याने मला कधीच नाही सांगितलं.... आणि लग्न का नाही केलं त्याने अजून...."
" कोणी तरी मुलगी आवडत असावी त्याला , खूप समजवलं मी पण नाही ऐकलं त्याने... तू आलीच तर समजवं त्याला लग्न करून घे म्हणावं , माझं काय आज आहे उद्या नाही . "
" असं का बोलता तुम्ही.... मी समजवते त्याला ."
" पण तुझ्यासोबत खुप वाईट झालं ग.... " नेमकं त्या कशा बदद्दल बोलत आहे आदितीला काही कळलं नाही .
" काय वाईट झालं माझं .... मला समजलं नाही काकू . "
" अगं तुझा डिओर्स झाला ना ! खूप वाईट झालं आजकाल लग्न ही संकल्पनाच चुकीची वाटायला लागली . पूर्वीची लग्न कशी टिकत होती . पण बरं केलंस तू .... आता एकटीच रहाते का मग ? "
आदिती त्यांचं हे बोलणं ऐकून थक्कच झाली.... ह्यांना कोणी सांगितलं असावं माझ्या डिओर्स बद्दल ती विचार करू लागली , आपण अनुजला तर काहीच सांगितलं नाही .
" कसल्या विचारात बुडालीस ? "
भानावर येत , " हा ..... काही नाही .... हो मी एकटीच असते . पण तुम्हाला डिओर्स बद्दल कोणी सांगितलं ? "
" कोणी काय अण्याने सांगितलं..... काय ग काय झालं , मला नव्हतं सांगायला पाहिजे का ? "
" नाही काकू असं काही नाही.... "
" बरं जा अण्याला भेटून घे..... "
आदितीला तर आता त्याला न भेटताच जावं वाटत होतं . खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली म्हणेल मी त्याच्यापासून . पण काय सांगणार होती भेटल्यावर हेच की ,' माझा डिओर्स झाला .' घरी येऊन भेटून नाही गेली तर त्याचं ही वाईट वाटेल त्याला . शेवटचं अनुजच्या आईला तिला विचारायचं होतं ,
" काकू एक सांगू शकता काय ? "
" हो बोल ना ... काय ? "
" अण्याच कुणावर प्रेम होतं माहिती आहे तुम्हाला ? "
" हो.... माझ्या समोर बसलेल्या मुलीवर ... "म्हणजे अनुज आपल्या आईला सांगितले होते आपल्या प्रेमाबद्दल हे तिच्या लक्षात आलं.... आदिती दूरवर बघत म्हणाली ,
" पण त्याने मला हे कधीच सांगितलं का नाही ? "
" कसं सांगेल ? कॉलेज संपल्यानंतरच तू लग्न करून परदेशी निघून गेली . " आदिती काहीच बोलली नाही ,
" बाळा , एकदा विचारून बघ त्याला .... तू जरी त्याच्यावर प्रेम नसली करत तरी तो आजही तुझ्यावरच प्रेम करतो . "
" काकू ..... तो आताही स्वीकार करेल माझा असं वाटतं तुम्हाला ? "
" हा प्रश्न मला काय विचारतेस.... तू गेली तेव्हापासून तो तू येण्याचीच वाट बघतो आहे ."
आता मात्र आदितीला त्याला भेटल्या वाचून राहवलं नाही . ती उठली आणि अनुजच्या खोलीत गेली .
" आदिती तू ? " दाराचा आवाज येताच अनुज मागे वळला .
" हो..... येऊ ना आत ? "
" ये ना ... मला वाटलं न सांगताच निघून गेलीस की काय ? "
" ह्या वेळेला तुझी भेट घेतल्याशिवाय जाणार नव्हते.... अरे काय टॅबवर कविता टाईप केली दिसते . " आदितीच त्याच्या हातात असलेल्या टॅबकडे लक्ष गेलं .
" हो ..... बाहेर पाऊस पडत होता , त्या पावसाकडे बघून कविता सुचत होती तर बसलो टाईप करत.... "
" पूर्ण झाली असेल तर म्हणून दाखव ना ! "
" तू हसू नको मात्र...."
" नाही हसणार रे म्हण ....."
अनुज टॅबवर टाईप केलेली कविता वाचायला लागला ,"
आज आला होता तो अचानक असाच दाटून .....
कुंद वारा होता त्यांच्या सोबतीला ,
काळोख होता विस्तीर्ण ....
मृदगंधाचा ओलावा पसरला होता जिकडेतिकडे .....
ढग धावत होती ,
रिपरिप थेंब गिरवत तोही त्या ढगात शिरत होता
वळवाचा ना तो .....
पुन्हा पुन्हा एकवार नव्याने बरसत होता ....
गडगडाटाने काळजात धस्स करून जायचा
वीज अशी कडाडली , ढग मध्येच गडगडले की
वाटायचं , स्तब्ध हो .... नुसता बरस
आक्रंदन नको करुस ...... मला तुझ्या अश्या
रूपानेही शहारल्या गत होतं .....
मधेच येणं अन निघून जाण तुझं
किती किती वाट पाहायला लावतं .....
अरे सततचा राहणं असाच संथ , तुझ्यात
मिसळून जावं वाटतात सारेच दुःख ....
मग नकोस होतं तुझं अवेळी येणं
भावनाही अश्याच येतात तुझ्यासारख्या
अवेळी न सांगता , आणि निघूनही जातात तश्याच
कशाचाही थांग पत्ता लागत नाही !
सारं कसं माझं त्रिकोणी जगणं
तुझ्याचभोवती रेगाळलेलं .....
तू असावा , शब्दांची मैफिल पुन्हा सजावी आणि
मी त्या शब्दात गुंतून जावे
पाऊस पाऊस होऊन ती ओळ बहरावी
किती रे साज तुझा असा अलगद कोसळण्याचा ..... "
" व्वा ...... अप्रतिम कविता लिहिली पावसावर , पाऊस पडायचं थांबेल पण पावसाचं वर्णन करताना तू मात्र थकणार नाहीयेस ..... आजही आवडतो तुला पाऊस ? "
काहीवेळ निःशब्द उभा राहत अनुज म्हणाला ,
" हो आवडतो , तोच एक असतो माझ्यासोबतीला..... " आदिती काहीच बोलली नाही त्याच्या ह्या वाक्यावर..... काही वेळाने ,
" एक विचारू तुला ? "
" विचार ना ! "
" वसतिगृह उभारलं मुलांचं तू हे भेटल्यावर मला सांगितलं का नाहीस ? "
" तू पण कुठे सांगितलं मला तुझा डिओर्स झाल्याचं..... "
दोघेही आता काहीच बोलत नव्हते खूप वेळ दोघात शांततेची दरी कोसळली होती ,
" त्या दिवशी पण तू इथे येऊन मला भेटणार नव्हती , अचानक मी तिथे यायला आणि तुझी भेट व्हायला..... "
" मला नव्हतं भेटायचं..... परत त्याच आठवणी तेच दिवस आठवतात आणि मन खिन्न होऊन जातं . "
" मग या अश्या अचानक होणाऱ्या आपल्या भेटी किंवा अकस्मात येणाऱ्या भेटीच्या वेळी यांना नशिबाचा भाग मानलाच पाहिजे ना ! "
" तुला माहित्ये मी Destiny वर विश्वास नाही ठेवत...."
" स्वतःवर तरी ठेवते ना !"
" हो.... आता तरी सांगणार आहेस का तू ? "
" कधीचा सांगणार होतो . "
" हो , मग सांगितलं का नाहीस ? "
" तू हातात पत्रिका ठेऊन गेली होती माझ्या ...."
" तू थांबवायचं होतं मला.... "
" तुझ्या बसलेल्या आयुष्याची घडी विस्कटायची नव्हती मला . "
" घडी बसलीच कधी होती रे अण्या..... घराच्यांचा मर्जीत स्वतःच्या मनाविरोधात गेली . इथून तुमच्या सर्वांपासून दुर.... शेवटी तिथे जाऊन एकटीच पडले . "
" आता तरी मला सोडून जाऊ नकोस , मला माहिती आहे तुझंही माझ्यावर प्रेम होतं अजूनही करतेस तू नाही सांगितलं तरी डोळ्यात दिसतं तुझ्या... पण तुझ्या आयुष्यात असं एकटेपणाच वादळ यावं हा विचार कधीच आला नव्हता मनात.... तू जगात जिथे कुठे असेल तिथे नेहमी आनंदात रहावी हिच प्रार्थना करायचो . काल मला प्रितमने कॉल करून सांगितलं तेव्हा विश्वासच बसत नव्हता खूप अस्वस्थ वाटत होतं ऐकून , मी म्हणायचो तू खूप सुखी असेल तुझ्या संसारात . "
"आयुष्यात काही वादळं .... चांगल होण्यासाठीच येत असावी..... नियतीचा डाव आधीच रचलेला असतो रे . मी येताना ठरवून आली की काहीही झालं तरी तुला भेटायचं नाही , पण त्या दिवशी गार्डनमध्ये तू दिसला आणि पाऊले आपसुकच तुझ्या ओढीने जवळ आली . आता तुझ्या दुर जाणारं नाही ती ..... "
आदितीला बकुळीच्या फुलांचा खोलीत सुहास येत होता ,
" अण्या ..... इथे कुठे बकुळी आहे का ? "
" हो विपिनने लावलेल्या त्याचं वृक्षाची , तुझ्या बाजूच्या टेबलवर पातेल्यात आहे बघ....."
"........माझ्या ओंजळीत टाक ना ! "
मोठ्या अट्टाहासाने तिने ओंजळीत घेतलेली बकुळी वाळली होती केव्हाची ,
आठवांचा गंध मात्र अजूनही दरवळत होता आस्मंतात....
-------- समाप्त
====================================================