Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Komal Mankar

Tragedy

3  

Komal Mankar

Tragedy

सुरांची साथ तू

सुरांची साथ तू

3 mins
730तो नेहमी म्हणायचा , " डोळ्याच्या संगीतीपेक्षा मला स्वरांची संगत प्रिय वाटते....काय बिघडलं डोळे नसेल तर ? डोळे फक्त जग दाखवण्यासाठी असतात तर संगीत हे आपल्याला जगण्याला आधार देतं"


  तेजस नाईक मूळचा जळगावचा , माझी आणि तेजसची ओळख झाली ती दीपस्तंभ फौंडेशनमुळे . तेजसची बरीच गाणी ऐकली " मन मंदिरा " हे त्यातलंच सुरेख आवाजात गायलेलं गाणं.... त्याचा तो आवाज म्हणजे मंत्रमुग्ध करून घेणारा , वाऱ्याच्या एका लहरींच्या झोतात अनेक स्पदनांनी कर्णाला मोहून घ्यावे असाच तो सूर .


" देवा खेळ मांडला "ह्या त्यांनी गायलेल्या गाण्यासारखंच तेजस आयुष्य जगला . नियतीने ह्या प्रवासात त्याला हरवले की त्याने नियतीला ?? असं म्हटलं तर वावंग ठरेल . तेजस नऊ वर्षाचा असताना चिकणगुण्याच्या साथेत त्याचे डोळे गेले .


चालण्यासाठी जमिनीवर पडलेले ते पाऊल अडखळत धावायला शिकतात , आपण पडतो ....ठेच लागते पुन्हा उभे राहतो आणि कशाचा आधार न घेता पळायला सुटतो. अक्षरांची ओळख होते , तोंडातून एक एक शब्द उचारत आपण पूर्ण वाक्य वाचण्याची धडपड करतो. पण त्याच्यासाठी पुन्हा हे नव्याने शिकण्याची कसब त्याला एका विशिष्ट दिशेने नेणारी ठरली .... ब्रेल लिपीच्या सहाय्याने तेजस लिहायला , वाचायला शिकला. त्याने जिद्द आणि महत्वकांक्षा सोडली नाही . शरीराच्या एखाद्या अवयवाने साथ सोडली म्हणून जगणं सोडून द्यायचं असतं , किंवा निराशेने ग्रस्त होऊन काहीच करायचं नसतं हे मानून जगणाऱ्यातला तेजस नव्हताच . 


काळोखातही उजेडाचा किरण शोधणारा तो जीव संगीतातुन स्वतःला व्यक्त करायचा .


आज सकाळी तेजसच्या आई सोबत माझं बोलणं झालं , आणि त्याच्या कितीतरी आठवणींना उजाळा मिळाला . जवळ जवळ अर्धा एक तास आमचं बोलणं झालं . तेजसच बालपण , नियतीने केलेला क्रूर आघात .... त्याच्या जन्मापासून तर शेवटच्या घटकेपर्यंत हृदयात घोळत असलेल्या आठवणी आणि बरंच काही त्या तेजस बद्दल भावूक होऊन सांगत होत्या.....


" एकदा मुंबईला तेजसचा गायनाचा प्रोग्राम होता , तेव्हा त्याचा आवाज ऐकण्यासाठी स्वयंपाकात व्यस्त असलेले आचारी बाहेर आले , कोण गातं आहे हे बघायला ... त्याच्या आवाजाने अंगावर शहारे यायचे , तो गानं म्हणायचा ना तेव्हा अक्षरशः तिथे उपस्थिताच्या डोळ्यात पाणी यायचं." एवढचं बोलून त्या थांबल्या .


एका आईला हे दुःख पचवणं किती अवघड असेल आपण कल्पना करू शकत नाही .


" तेजस दहावीत असताना मला तेजसकडून खूप मेहनत करून घ्यावी लागत होती , माझं दहावी झाल्यानंतरच लग्न झालं त्यामुळे शिक्षण राहून गेलं पण तेजसला शिकवताना मी नव्याने पुन्हा शिकत गेली , तेजस बीएच्या पहिल्या वर्षाला असताना मी बारावीची परीक्षा दिली . आणि तो तृतीय वर्षाला असतांना मी द्वितीय वर्षाला होते . "


तेजसच्या आई पुढे म्हणाल्या ,

" श्रावणबाळ आपल्या अंध आईवडिलांसाठी झटपट करीत होता , त्यांना शिकवत होता ... पण माझ्या अंध मुलाने आपल्या डोळस आईला शिकवले . त्याच्यामुळे मला जग कळले . "


तेजसच्या आईने त्याच्यावर सुवर्ण तेज हे पुस्तक लिहिले , सुवर्ण तेज हेच नाव का ? ह्यावर त्यांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिली , सूर्य तेजासारखं त्याच तेजस्वी व्यक्तिमत्त्व होतं .


जळगावच्या भुमीवर काहीच वर्षात तेजसची ओळख गायक म्हणून प्रचलित होणार होती ,


परंतु तसे झाले नाही . तेजस जळगावला MJ कॉलेजमध्ये ( music special ) बीए तृतीय वर्षाला शिकत होता . IAS होण्याचं त्याचं स्वप्न होत . ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो UPSC चा दीपस्तंभमध्ये अभ्यास करत होता . नियतीच्या मनात काय असते हे कोणीच ओळखू शकत नाही . नियतीने परत तेजसवर क्रूर आघात केला . आता मात्र तो जीवन मरणासाठी लढत होता . तेजसला डेंगू हा रोग झाला आणि 27 ऑक्टोबर 2017ला त्याला ह्या जगाचा निरोप घ्यावा लागला .

27 ऑक्टोबर हा दिवस प्रत्येक वर्षी येत राहील . परंतु हा दिवस तेजसच्या आईवडिलांसाठी काल परवा घडून गेलेल्या घटने सारखाच ताजा असेल .


तेजसच अधिकारी होण्याच स्वप्न. एका बंधीस्त आशाळभूत पामराला जाग यावी तसच विरळ झालं, परमेश्वरालाही त्याचा आवाज गोड वाटला असावा . तो आताही गात असेल का हा प्रश्न उपस्थित होतो म्हणण्यापेक्षा छळतो अधिक .....


ना मुश्किलें उसे हरा पायी 

ना हस्तियाँ उसे रूला पायी 

वो तो खुद एक फरिश्ता था..... 

जिंदगी उसे जित ना पायी !


Rate this content
Log in

More marathi story from Komal Mankar

Similar marathi story from Tragedy