सविता
सविता
आज वर्षा खुपच आनंदात होती. त्याला कारणही तसच होत. त्यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस होता. सकाळीच उठून प्रतापने वर्षाला "हैप्पी एनिव्हर्सरी डार्लिंग..!" म्हणुन विश केल. तिनेही त्याला मिठी मारत 'सेम टु यु' म्हटल. त्याला लवकर आज निघायच होत. ऑफीसच काम आणि महत्वाची मिटींग होती. वर्षाने त्याला लवकर यायला सांगितल. तिला बाय करून तो निघाला. वाटेतच त्याची गाडी बंद पडली. अशी कशी बंद पडली अचानक ही गाडी. त्याला खुप चिड येत होती. उशीर होत होता. त्याने मदनला काॅल केला. दोघांचा एकच मार्ग होता. त्याने प्रतापला लिफ्ट दिल्यामुळे तो ऑफीसला वेळेत पोहोचला. आज सकाळच्या प्रोब्लेममुळे तो वैतागलेला होता. तरीही तो आज त्याला वर्षाला बाहेर घेऊन जायच होत. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हे निमित्त होत. आणि आई ही घरी नव्हत्या. वर्षाला आज खुप छान वाटत होत. तिचा आनंद ओसंडून वाहत होता. प्रतापसारखा तीच्यावर जीव ओवाळून टाकणारा, तिच्यावर खुप प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणुन खुप खुश होती. त्यांच्या लग्नाला बघता बघता दोन वर्षे कशी गेली तिला कळल देखील नाही. ती याचाच विचार करत होती. ती त्यांचे फोटो पाहत बेडवर बसली होती. ती एकटक मग्न होती फोटो पाहण्यात. प्रतापचा फोटो तिने छातीशी धरला नि मनातच म्हणाली, " तु फक्त माझा आहेस. म्हणुन तुला मी मिळवल . आणि आज तुझ्यासोबत आहे." तेवढ्यात तिच्याजवळून कुणीतरी गेल्याच तिला जाणवल. दुपार होती जोराचा वारा सुटला, खिडक्या आणि दरवाजे देखील जोरात आदळले. इतका आवाज झाला की तिने कानाला हात लावला. कोण असेल ? मला अस का वाटल कुणीतरी इथुन गेल.? तिने इकडे तिकडे उठून सगळीकडे बघितल, कुणीच नव्हत. ती खुप घाबरली होती, तिच्या चेहर्यावरचा आनंद क्षणातच गायब झाला. सगळ घर बघितल, पण कुणीच नव्हत. ती एकटीच होती. तिने खाली खिडकीतुन बघितल तर वाचमॅन काका बसले होते. रामु बागेत झाडांना पाणी घालत होता. चला, मलाच काहीतरी भास झाला असेल...म्हणुन तिने तो विषय सोडुन दिला. आणि परत ती फोटो पाहू लागली. आजच्या तयारीसाठी साडी आणि दागिने काढुन ठेवले, सर्वच तयारी तिने केली
आणि ती आता प्रताप येण्याची वाट बघत होती.
प्रताप ऑफीसच काम आणि मिटींग्स संपवून लवकर घरी जायला निघतो. आज त्याच कामात लक्ष लागत नव्हत. पण आज लग्नाचा वाढदिवस असल्याने त्याला वर्षाची आठवण आली नि तो मोबाईलमधले फोटो पाहू लागला. वर्षा होतीच तशी त्याला वेड लावणारी, तिच्या प्रेमात तो वेडा झाला होता. त्याच खुप प्रेम होत तिच्यावर. तिच सौंदर्याने तर त्याच्या मनाला भुरळ घातली होती. तो तिचाच विचार करत होता. तेवढ्यात त्याला फोन आला. वर्षा बोलत होती. तिने झालेला प्रकार त्याला सांगितला, मनातुन ती खुप घाबरली होती. "प्रताप लवकर घरी या ना आज, माहित नाही पण आज भिती वाटत आहे. "
प्रताप : कसली भिती ? " अरे डार्लिंग झालय माझ काम मी लगेच निघतो. बाय....!!"
प्रताप घरी जाताना वर्षासाठी साडी, तिच्यासाठी
एक छानस गिफ्ट आणि गुलाबाचे फुले आणि तिच्यासाठी गजरा घेतला. त्याने हे सगळ गाडीत पाठीमागे ठेवल नि तो निघाला. हे तिच्यासाठी सरप्राइज असणार होत. तो आज खुप मस्त आणि रोमँटीक मुडमध्ये होता. त्याने रोमँटिक गाणी लावून तो गाडी चालवू लागला. संध्याकाळचे सहा वाजले होते. तो गाडी चालवत होता. तेवढ्यात त्याच्या डोळ्याला क्षणभर अंधारुन आल नि कुणीतरी त्याच्या गाडीच्या समोर आल अस त्याला झाल, त्याने लगेच जोरात ब्रेक जागेवर ब्रेक दाबला. तर एक काळी आकृती अस्पष्ट परंतु पळताना दिसली. नक्की हे काय होत ? तो खुप घाबरला. त्याने पाच मिनिट गाडी थांबवली नि आजुबाजुला बघितल, कुणीही नव्हत आणि तो घटाघट पाणी पिऊन थोडी फास्ट गाडी चालवत घरी निघाला. तो घरी आला. दमला होता. तो येऊन हाॅलमध्ये टेकला नि वर्षाला आवाज दिला. त्याच्या चेहर्यावरून तिने विचारल ... " काय झाल अस धापा का टाकताय आणि घाबरल्यासारखे दिसताये." प्रताप काहीच बोलत नाही. काही नाही ग, तु चहा दे मला आणि तयारी कर आपल्याला बाहेर जायचय. वर्षा कीचनमध्ये जाते. प्रतापने आणलेली साडी, फुले, गजरा आणि गीफ्ट तो त्यांच्या बेडरुममध्ये ठेवून येतो. तिला सरप्राईज द्याव म्हणून तो जागेवर येऊन बसतो. तो विचार करत होता, मी तर गाडी नीट चालवत होतो. मग पुढे कोणीतरी आल्यासारख का झाल? जाऊ दे सोड., मला भास झाला असेल. आधी आजचा दिवस छान सेलीब्रेट करू दे. वर्षा आली तिने त्याला चहा दिला. ती त्याच्या जवळ येते, तेवढ्यात इतका जोरात वारा सुटतो, की त्यांची फोटो फ्रेम तुटुन खाली धाडकन् कोसळते. अक्षरक्षः फोटो फ्रेमचा चुराडा होतो. दोघेही खुप घाबरतात. प्रतापला कळत नव्हत. अस का होत आहे आज. वर्षा तर खुप घाबरली. प्रताप घाबरलेला होता,पण वर्षापुढे काहीच नाही अस दाखवतो.
वर्षा : " आज ना खरच मला खुप भिती वाटतेय . आणि आता ही फ्रेम अशी...???? "
प्रताप : " ये वेडाबाई, अस काही नाही. चल, आपला आज खुप महत्वाचा दिवस आहे की नाही? मग बाहेर जायचय आपल्याला डीनरसाठी आणि हो तयारी कर लवकर. आणि
तुझ्यासाठी बेडरुममध्ये एक सरप्राइज आहे. तिला खुप आनंद झाला तीची पावले लगेच बेडरुमच्या दिशेने गेली. प्रताप हाॅलमध्ये चहा घेत होता. तिला प्रतापने नक्की आपल्यासाठी काय आणलय? हे पाहण्यासाठी ती खुप उत्सुक असते. ती दार उघडते तशी परत काळी आकृती तिला सरकन् जाताना दिसते. ती दारातच असते. प्रचंड घाबरते. तिला कसतरी होत, चक्कर येते. ती प्रतापला आवाज देते. प्रताप तिचा आवाज ऐकून लगेच बेडरुमकडे धावत जातो. तो तिथे जातो. बघतो तर काय?? दारातच वर्षा पडलेली असते. आतमध्ये त्याच लक्ष जात. त्याला
ते दृश्य पाहून आश्चर्याचा धक्काच बसतो.
मी वर्षासाठी आणलेल सरप्राइज अस कस झाल. त्याला कळत नाही, दहा मिनीटांनी लगेच वर्षा ते बघायला आली. मग तिच्याआधीच हे अस कुणी केल असेल... कोण आल असेल ? त्याने आणलेली साडी... बाॅक्समधुन काढुनअस्ताव्यस्त अवस्थेत , कापलेली बेडच्या खाली पडलेली दिसते, गुलाबाच्या फुल तर पाकळ्याच करुन फेकून दिल होत, गजराही चुरगळलेला होता, काचेच गिफ्ट तर फुटलेल तसच बाॅक्समध्ये होत. हे सगळ बघुन प्रतापला डोक फुटतय अस वाटत होत. डाॅक्टर आले त्यांनी वर्षाला तपासल आणि सांगितल की " या ठीक आहेत सद्या पण घाबरल्यामुळे अस झालय, थोड बीपी लो झाल होत, त्यांंना पाणी भरपूर द्या. ही मेडीसीन लिहून दिलीत ती व्यवस्थित घ्या. आणि त्यांची काळजी घ्या. बाकी काळजी करण्यासारख काही नाही. होतील त्या उद्यापर्यंत ठीक. अस सगळ सांगुन डाॅक्टर निघून गेले. प्रताप तिच्याजवळ बसुन होता. त्याने तिला लिंबु सरबत दिल. तिने ते घेतल नि झोपली. ती झोपलेली होती पण झोपेतच काहीतरी बरळत होती. "ती परत आली आहे. प्रताप, ती सोडणार नाही आपल्याला." तो त्रास निघून गेल्यासारखा तिथेच बसुन होता. विचारांत गुंतला. इकडे हे सगळ कुणी केल. मांजर तर नाही आल ना.!! आणि बाहेरची नोकर माणस तर कुणीच विचारल्याशिवाय आत येत नाही. सकाळपासून झालेल्या दोन घटना, वर्षाच घाबरुन प्रतापला काॅल करण, आता हे सरप्राइज आणि वर्षाला अचानकपणे अस होण. नेमक हे का होत आहे. घर तस नवीन आहे मग हे अस का होत आहे. पण नक्कीच इथे अमानवी काही तरी आहे एवढ तरी नक्की आहे. लग्नाचा वाढदिवस त्याला वर्षाला अजुन एक सरप्राईज तिला बाहेर नेऊन तिच्यासोबत वेळ घालवून द्यायच होत परंतु हे अस झाल. या सगळ्यापेक्षा तीची प्रकृती ठीक असण गरजेच आहे. त्याला तीची काळजी वाटत होती. पण त्याचबरोबर तिच्या एका वाक्याने त्याला भिती वाटु लागली. 'ती परत आली आहे 'हे वाक्य ऐकून घाबरला तर होता, त्याने कसतरी किचनमध्ये जाऊन वर्षासाठी खीचडी केली नि तिला खाऊ घातल... औषध दिले. तिला झोप लागली. हे सगळ झालेला प्रकार विसरण्यासाठी तो खाली जाऊन बसतो. त्याने एक दोन विस्कीचे पेग घेतले. तिथेच लोळत पडला नि टिव्ही चालू केला. अचानक लाईट गेले.सर्वत्र अंधार पसरला. तो मोबाईल शोधू लागला टाॅर्च लावण्यासाठी तर तोही मिळेना, तो तश्याच अवस्थेत बसुन होता... बाहेर मिट्ट काळोख होता. रातकीड्यांचा किर्र कीर्र आवाज येत होता, मधुन सोसाट्याचा वारा सुटला... एकदम पाऊस कोसळतो अस वातावरण तयार झाल, दार आपटल गेल जोर्याने....त्याच लक्ष खिडकीच्या बाहेर गेल, झाडावर एक काळीकुट्ट आकृती त्याला दिसली. तो खुपच घाबरला...तिचे डोळे लाल बुंद जणु आग ओकत होते, ती नजर रोखुन त्याच्याकडे पाहत होती, खुप विचित्र दिसत होती....तो
जागेवरून उठणार तेवढ्यात लाईट आले. तो आता हिंमत करून खिडकीजवळ गेला. त्या झाडावर कुणीच नव्हत. आपल्याला भास तर नाही होत ना....??हे काय होतय?? सगळ अनाकलनीय होत. प्रताप बेडरुमकडे निघाला. तर वर्षा एकटक शुन्यात नजर हरवून बसल्यासारखी त्या झाडाकडे खिडकीतुन बघत होती. तो तिच्या जवळ गेला, तस ती त्याच्यावर भडकली, रागाने बघु लागली डोळे मोठे करून आणि काही कळायच्या आत तिने त्याला ढकलून दिल. तीचा आवाजच बदलला होता...अवतार पण.... ती वर्षा नाहीच हे प्रतापला समजल होत. तो भिंतीवर आदळला. ती क्रुरपणे हसत होती...मोठमोठ्याने...तिचे दात खुप विचित्र दिसत होते. तिच हे विचित्र रूप पाहुन प्रताप अजूनच घाबरला. त्याच्या डोक्याला लागल. रक्त येऊ लागल....तशी ती अजुन क्रुरपणे हसत होती त्याच्यावर...प्रताप उठून परत वर्षाकडे गेला. " ये वर्षा काय झालय तुला ? अस का करत आहेस... तु शांत हो बर आधी." त्याने तिला हात लावताच ती अजुन चवताळली. तिने त्याची मानच धरली, पकड इतकी जोरात होती की त्याचा आवाजच निघत नव्हता. घशाला कोरड पडली, तो स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी धडपडत होता, पण त्याची मानच रक्ताळलेल्या नखांनी आवळली गेली होती. ती रागाने त्याच्याकडे बघत. त्याचा श्वासही कोंडत होता... परत तेच क्रुरपणे हसत... तुला सोडणार नाही मी.... फक्त तु माझ्या तावडीत सापडू दे....तुला सोडणार नाही मी...तीची ताकद खुप वाढली होती, तरी प्रतापने सारी शक्ती एकवटुन तिला जोरात मारल... " वर्षा काय
चाललय तुझ ? तशी ती काळी आकृती क्षणार्धात बाहेर आवज करत गेली. काहीतरी बरळत असलेली, प्रतापला गळा आवळून ठेवलेली वर्षा शांत झाली. त्याची सुटका झाली तसा तो मोठ्याने श्वास घेऊ लागला, खुपच घाबरलेला, हे काय चाललय काहीच कळत नव्हत. वर्षा भानावर आली... तशी तिने प्रतापकडे बघितल.... " हे काय प्रताप, एवढ काय झालय घाबरायला.... आणि एवढ धापा टाकायला कुठे गेला होतात का ? त्याला काय बोलाव तिला समजत नव्हत. जे काही होतय ते वर्षाला
काहीच समजत नव्हत. ती लगेच नाॅर्मल होऊन जायची... पण तिच्यात नक्की कुणीतरी आहे. वर्षाने प्रतापला पाणी दिले, त्याने काही मिनिटांत ते सगळ पाणी संपवल. तो तिथेच बसुन होता. तिच लक्ष त्याला लागलेल्या डोक्याच्या जखमेवर गेल... " हे काय प्रताप कधी झाल ? आला तेव्हा तर नव्हत ना..... मग कधी झाल ? " "मला असच भिंत लागली, लक्ष नव्हत माझ " प्रताप म्हणाला.
वर्षा : "तुम्ही पण ना...! स्वतःकडे लक्ष देतच नाही. "ती त्याला जखमेवर पट्टी करुन देते. त्याच वर्षावर खुप प्रेम होत आणि तिचही. दोघेही एकमेकांना सोडून राहू शकत नव्हते. पण आज अश्या घटनांमुळे प्रताप खुप घाबरला होता. तश्याच अवस्थेत तो झोपुन होता. रात्री कधी झोप लागली कळल नाही. पक्ष्यांच्या आवाजाने त्याला एकदम जाग आली. वर्षाला उठल्यावर कालच्या तब्येतीमुळे आज फ्रेश वाटत होत. ती लवकर कीचनमध्ये जाऊन टीफीन प्रतापसाठी चहा, नाश्ता करत होती. तो खाली आल्यावर तिने त्याला टीफीन दिला. तिच्याबाबतीत काल जे झाल ते सगळ ती विसरली होती. फक्त तिला चक्कर आली. ती झोपून होती... एवढच त्याला तिच्या बोलण्यातुन
समजल. तिने त्याला दिलेला नाश्ता संपवला. तो ऑफीसला निघाला... तेव्हा त्याला नर्व्हस बघुन ती... " प्रताप साॅरी, माझ्यामुळे आपण बाहेर जाऊ शकलो नाही "
प्रताप :" इट्स ओके वर्षा... परत कधीतरी जाऊ."
प्रतापला आज ऑफीसला जाव वाटत नव्हत. काल पूर्ण दिवसच बेकार गेला, अश्या विचित्र घटनांनी तो हादरून गेला होता. त्याने आणलेल सरप्राईज तो वर्षाला देऊ शकला नाही. त्याने बाहेर जायचा...प्लनिंग केलेल तेही कॅन्सल झाल. आणि वर्षाच्या कालच्या विचीत्र वागण्यामुळे प्रताप खूप परेशान झाला. तसाच तो ऑफीसला निघून गेला. त्यानंतर आज परत त्याला वर्षाचा दुपारीच फोन आला.... तो खुपच घाबरला....त्याने गाडी काढली नि घरी जायला निघाला. घरी नक्की काय झाल असेल....??वर्षा ठीक तर असेल ना.... त्याच्या मनात नाही ते विचार येत होते. वर्षाचा फोन आल्यावर तिचा भेदरलेला आवाज ऐकून तो लगेच फास्ट गाडी चालवत घरी पोहचतो. तो धावतच घरात जातो, ती कुठेच त्याला दिसत नाही.... तो आवाज देतो... पण काहीच प्रतिसाद नाही तो वरच्या खोलीत जातो तर क्षणभर तिला पाहून तो जागेवरच थांबतो. ती एकटक् खिडकीच्या बाहेर पाहत होती. केस मोकळे सोडलेले, तिचा चेहरा खुप विचित्र दिसत होता, चेहरा पांढरट पडलेला, डोळ्या खाली काळे व्रण, डोळे विस्फारलेले, पेटत्या
निखार्यासारखे लालभडक.... आणि नजर रोखुनू ती प्रतापकडे बघत होती... त्याला बघुन ती खुपु चवताळली, मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली, गुरगुर करायला लागली....अश्या अवस्थेत वर्षाला पाहून तो खुप घाबरला.
तो तिच्या जवळ जाऊन....वर्षा...वर्षा... काय झालय तुला ? अशी का करत आहेस ?ती मोठमोठ्याने त्याच्याकडे बघुन हसत होती. " तुला सोडणार नाही मी, तुला आणि हीला मी बघुनच घेईन...!" परत ती हसत होती...मोठ मोठ्याने हसत होती....ओरडत होती....त्या खोलीमध्ये एक उग्र दर्प जाणवू लागला, जळल्यासारखा वास येत होता, खोलीभर तो वास पसरला. त्याला त्या वासाने गरगरायला लागल, जस तो तिच्याजवळ जातो, ती पेटुन उठते, चवताळते.... तिच्या धारदार नखांनी त्याला ती ओरखाडते मानेला, दोघांची झटापट होते, तिने मान धरताच प्रतापली आपली शक्ती एकवटतो... तो मोठ्याने ओरडत होता...., "सोड मला... सोड मला... मी काय केलय तुझ ?कोण आहेस तु ? आमच्या जीवावार का उठलीस ? माझ्या वर्षाला का त्रास देत आहेस? "इतक्यात "मला विसरलास तु ? " जवळ जवळ वीस मिनीटे हा थरार चालू होता. वरती मोठमोठ्याने साहेबांचा आवाज ऐकुन
वाॅचमन धावत आला नि माळी रामुही आला. ते दोघे वरती दारात येतात नि आवाज देतात...,तशी वर्षा प्रतापला पटकन् सोडून टाकते...लगेच काळी आकृती क्षणार्धात खिडकीतुन बाहेर जाते..... वर्षा भानावर येते.... स्वतःला सावरते.... प्रतापलाच विचारते. आपण इथे काय करतोय ? आणि मला हे काय झालय ? प्रतापकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरे नव्हती. प्रतापला काय कराव कळेना... पण वाचमन आणि रामुने हा सगळा प्रकार पाहीला नि त्यांच्याही लक्ष्यात आल की हे सगळ अमानवी आहे. नक्कीच कुणीतरी वर्षा मॅडमला धरलय. प्रतापने वर्षाला खाली आणल नि तिला झोपवल. प्रताप बाहेर विचार करत बसला की यावर नक्कीच काहीतरी उपाय केला पाहीजे. पण कोण असेल आणि अस वर्षाला त्रास देतय... त्याच डोक सुन्न झाल होत. तेवढ्यात वाचमन प्रतापकडे येतो.... " साहेब काय झालय ? मगाशी जे काही झालय ना मॅडमच्या बाबतीत त्यावर काहीतरी उपाय केला पाहीजे सर.
प्रताप : " हो केल पाहीजे पण काय करायच? मलाच मार्ग सापडत नाही आहे. वर्षाला अलीकडे अस काहीतरी विचीत्र होतय. ती नसतेस ती, आणि तिला जे काही होतेय त्याची कल्पना सुध्दा नाही. पण या सगळ्यामुळे वर्षाला खुप त्रास
होतो आहे. तिची तब्येत दिवसेंदिवस तिची प्रकृती खराब होत आहे. डाॅक्टरांना दाखवल तर ते ठीक आहे म्हणतात. पण ती अच अचानक का वागायला लागली काहीच कळत नाही. आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यादिवशी पासुन हे सगळ सुरू झालय." हे सगळ वाचमन ला सांगताना प्रतापला भरून आल. प्रतापला अस पाहुन वाचमनने त्याला एक सांगितल. " साहेब एक गावात मांत्रिक आहे जरा दुर आहे आपल्यापासुन तो हे सगळ दुर करू शकतो. "
प्रताप - " माझ्या वर्षाला यातुन सोडवण्यासाठी मी काही करू शकतो, तु पैशाची काळजी करू नको...." आपण त्यांना हवे असतील तेवढे पैसे देऊ. त्यांना येण्याचीही व्यवस्था करू."
वाचमन - "ठीक आहे साहेब घरी गेलो की मी आजच त्यांचा नंबर घरच्या डायरीत आहे बघतो. त्यांना त्वरीत काॅल करुन तुम्हांला उद्या कळवतो. पण तोपर्यंत वर्षा मॅडमची तुम्ही खुप काळजी घ्या.... साहेब...!!" एवढ बोलून तो निघून गेला. वाचमनच्या शब्दाने त्याची आशा पल्लवीत झाली. त्याला मार्ग सापडला होता. त्याला त्याची वर्षा परत हवी होती. दहा दिवस होऊन जातात, वर्षा खुप विचित्र वागत असते. स्वतःलाही त्रास करुन घेत असते. तिची तब्येत खुप खराब झाली होती. प्रतापला तिच्याकडे बघवतही नव्हत.
प्रताप ऑफीसला जात होता. त्याच कामात लक्ष लागत नव्हत. तो यावीषयी कुणाशी बोलू शकत नव्हता. वाचमनने मांत्रिकाला फोन केला. त्याने प्रत्यक्ष भेटायला यायला लावल. तेव्हा वाचमन आणि प्रताप त्या मांत्रिकाकडे जाऊन आले. प्रतापने वर्षाला कूाय होतय, कसा त्रास होतो, तिच विचित्र वागण आणि बोलण सगळ त्यांना सांगितल. हा सगळा प्रकार त्यांच्या लक्ष्यात आल. त्याने सांगितील की अमानवी शक्तीचा वावर आहे तिथे, तिच शक्ती वर्षाला त्रास देत आहे. अतृप्त आत्मा तिला त्रास देत आहे. जोपर्यंत त्या आत्म्याची अपूर्ण ईच्छा पुर्ण होत नाही तोपर्यंत तो तिला सोडणार नाही. त्रास देत राहणार... प्रताप आणि वाचमन हे ऐकून थक्क झाला. त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता. असा प्रसंग कधीच त्याच्या जीवनात आला नव्हता. पण त्याची वर्षा या सगळ्यात सापडली होती. तिला होणार त्रास आणि तिचे हाल त्याला बघवत नव्हते. म्हणून त्याने मांत्रिकाला उपाय करण्यास सांगितल आणि त्यांच्या घरी यायला लावल...त्यानेही होकार दिला.
प्रतापच्या मनाला दिलासा मिळाला. वर्षा बरी होईल. पण हे सगळ काय आहे आणि तिलाच का ती वाईट शक्ती त्रास देत आहे हेच त्याला कळत नव्हत.
प्रताप आणि वाचमन घरी आले. प्रतापच टेन्शन थोड कमी झाल्यासारख वाटु लागल. त्याला एक आशेचा किरण दिसत होता. वर्षा लवकर बरी होईल. असा विचार करत तो घरात आला.. मांत्रिक दहा दिवसांनी येणार होता. तोपर्यंत तिची काळजी घ्यायला लागणार होती. प्रताप आत बेडरुममध्ये आला... तशी झोपलेली वर्षा त्याला पाहुन जागी झाली... नि त्याच्याकडे रागाने बघु लागली.... ती खुपच चवताळली होती. तिला प्रताप बाहेर गेला होता आपल्याला इथुन घालवण्यासाठी याची चाहूल लागली होती. ती रागाने मोठे डोळे करून नजर रोखून त्याच्याकडे बघत होती... ' तुला सोडणार मी, बघुन घेईन. तु मला इथुन घालवायला बघतोय ना पण नाही सोडणार मी तुला.... प्रतापला मांत्रिकाने दिलेला अंगारा त्याने तिच्यावरती थोडा भिरभिरला तशी ती एकदम शांत झाली. तीचा आवाज बंद झाला. वर्षा तशी भानावर आली. दहा दिवस वर्षाला खुप त्रास होत होता. ती रोज असच विचित्र वागागची. मोठमोठ्याने हसायची. तिच हे रूप आणि भयानक वागण पाहुन प्रताप घाबरला होता. आठ दिवस गेले. तो आत्मा
वर्षाला खुप त्रास देत होता. तिचे खुप हाल होत होते. ती झोपेतली बाहेर उठून जायची. झोपेत काहीतरी बडबड करायची. प्रतापवर धावुन जायची. राहीले फक्त मात्रिक यायला दोन दिवस. प्रताप ऑफीसला जाऊ शकत नव्हता. तो चिंतेत होता. मांत्रिक येईपर्यंत त्याला खुप भयानक गौष्टींचा सामना करावा लागतोय याची भिती वाटत होती. काय होईल याचा विचार करुन भितीने त्याचा थरकाप उडाला होता. वर्षाला मांत्रिकाने दिलेला अंगारा शिंपडल्या मुळे ती शांत झाली होती. प्रतापही विचार करत तिथेच पडून होता. त्याला अस समोर पाहुन वर्षा त्याच्याजवळ आली. तोही तिच्या जवळ आला. त्याला अंगार्यामुळे वर्षामध्ये फरक पडला अस जाणवत होत. तिच्यात थोडी सुधारणा झाली अस त्याला वाटत होत. त्यानेही तिला आपल्या मिठीत घेतले, इतक्या दिवसांतुन त्याला त्याची वर्षा परत मिळाली होती. तेवढ्यात सोसाट्याचा बाहेर वारा सुटला, थंड वार्याचा झोत खिडकीतुन आत आला नि खिडकी जोरात वाजली...दारही खुप जोरात आदळल....दोघेही खुप दचकले. प्रताप तर खुप घाबरला. त्याला त्या शक्तीचा वावर आपल्या आसपास आहे अस जाणवत होत. वर्षाने त्याला परत आपल्या जवळ घेतल नि सांगितल की मि जेवण बनवते... आपण दोघे मिळून मस्त जेवण करू. तो आपल ऑफीसच काम करू लागला. तिचा स्वयंपाक झाला. दोघांनी छान जेवण केल. जेवण झाल्यावर ती तब्येत बरी नसल्यामुळे हल्ली लवकर झोपून जात होती. त्याला मात्र झोपच लागत नव्हती, तो त्याच
काम करत बसला होता. त्याला बेडरुममध्ये कुणीतरी असल्यासारख जाणवत होत. त्याने वर्षाकडे पाहील तर ती शांतपणे झोपली होती. त्याला अस्वस्थ वाटत होत... त्याने थोडी खिडकी उघडली.... मस्त गार वारा सुटला होता, थंडगार वार्याचा झुळुक अंगाला स्पर्शुन जात होती .. मध्येच झाडांची पाने सळसळत होती.... त्या अंधारात ते समोरच झाड खुपच भयानक दिसत होत, झाडाभोवती घुबड गिरट्या घालत होती. रातकिड्यांचा कीर्रर्रर्र कीर्रर्रर्र असा आवाजाने रात्रीची शांतता भंग पावत होती. तो जागेवर येऊन त्याच काम करू लागला. परत जोराचा वारा आला नि एक काळी आकृती पटकन् आत आली.... नि तिने वर्षाच्या शरीरामध्ये प्रवेश मिळवला. लगेच काही मिनिटांसाठी लाईट गेले. प्रताप खुप घाबराला. झोपलेली वर्षा जागी झाली दचकुन.... काहीतरी बोलायला लागली. ती खुप बदलली क्षणातच, तिचे हावभाव लगेच बदलले... प्रतापने तिला, " काय झाल वर्षा?" अस विचारल. ती अजुनच रागाने त्याच्याकडे बघू लागली. तिने त्याला जोरात
लोटुन दिल तसा प्रताप बेडजवळ खाली जाऊन पडला. त्याला उठता येत नव्हत. मुका मार लागला होता. कसाबसा तो बेडचा आधार घेउन उठला नि मांत्रिकाने दिलेला अंगारा शोधत होता. ईकडे ती भिंतीवर डोके आपटुन घेत होती, हातही भिंतीवर आपटत होती. वर्षाला अस काही तरी करताना पाहुन प्रतापला रडायला येत होत. तो तिला थांबवत होता पण ती त्रासच करुन घेत होती. तिला पकडताना त्याची शक्ती कमी पडत होती. तो तिच्याजवळ जायचा, तशी ती अजुन मोठमोठ्याने हसत होती....' तुला तर खुप त्रास द्यायचा आहे, मी तुम्हांला सोडणार नाही 'तेवढ्यात प्रताप देवाजवळ जाऊन पटकन् अंगारा तिच्यावर शिंपडतो दुरुनच... तशी ती तडफडू लागते... वर्षा शांत होते... तिला दम लागलेला असतो. त्या आत्म्याने तिच्या शरीराला खुप त्रास आणि इजा पोहचवलेली असते.
बिचारी वर्षा खुप वैतागलेली होती. तिला काय होतय कळत नव्हत. तिच डोक जड पडल्यासारख तिला वाटत होत. त्याने तिला पाणी दिल नि तिला झोपवल तशी ती शांतपणे झोपली.
उद्या मांत्रिक सकाळी येणार होते. सगळी तयारी झालेली होती. आज अमावस्येची रात्री असल्याने त्यांना काम पूर्ण करता येणार होत. वाचमन त्यांना घेउन येणार होता. वर्षाला अजुन त्रास होत होता. मांत्रिक आपल्या शिष्यांसह प्रतापच्या घरी आले. घरात शिरल्या शिरल्या त्यांना नकारात्मक शक्तीचा वावर असल्याची जाणीव झाली. वर्षाला याची चाहूल लागली. तिने स्वतःला आत खोलीत कोंडून घेतले होते. खुप विचित्रपणे आतून हसण्याचे आवाज येत होते. प्रताप दार वाजवत होता. ती उघडत नव्हती. बडबड करत होती. मांत्रिकाला रामुने पाणी वगैरे दिल. ते तिथेच बसले होते. कसेबसे वाचमनच्या मदतीने त्याने दार उघडल. मांत्रिकाने वर्षाला खाली आणायला लावल. त्यांनी आधीच प्रताप आणि वॉचमन ला हाताला बांधायला सुरक्षारक्षक म्हणून एक हातात बांधायला दोरा दिला. रामुलाही दिला. सगळ्यांना चंदनाचा टीळा लावला. त्यांनी पूजेच सामान वगैरे सगळी तयारी करून आले होते. मांत्रिकाने धुपाची वडी पेटवली. त्या वासाने वातावरण प्रसन्न झाल्यासारख वाटत होत. प्रताप आणि वाचमनने वर्षाला खाली आणल. मांत्रिकाने तिच्याकडे एक नजर टाकली. तशी ती चवताळली. 'सोडा मला, सोडा म्हणते ना.... सोडा मला..."अस तिच चालू होत. जोरजोरात ओरडत होती. धुपाच्या वासाने तिला कस तरी होऊ लागल ति अजुन चवताळली. रागाने प्रतापकडेच नजर रोखुन बघत होती.
मांत्रिकाने आधीच त्या जागेत कुंकवाच रिंगण तयार केल होत. तिथे सर्वांना बसायला सांगीतल. सगळे बघत होते. वर्षाच बडबड करण, रागाने मांत्रिकाकडे बघु लागली. मांत्रिकाने तिला अंगारा लावताच ती शांत होऊ लागली... तीच गुरगुरण चालुच होत. सगळ्यांना आता जाणीव झाली होती की ही भयानक शक्ती आहे. तिच मोठ्याने ओरडण चालूच होत. चवताळली ती. प्रतापवर धावून जाणार तिला मांत्रिकाने रोखल, त्यांनी तिच्या अंगावर परत अंगारा भिरकावला तशी ती म्हणत होती' सोडणार नाही मी तुला ' परत तेच क्रुरपणे हसणे, जोरजोरात हसत होती. मांत्रिकाने तिच्या कपाळाला अंगारा लावला. त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मंत्र पठण करत पूजा सुरू केली. तशी ती अजुन जोर करू लागली. मत्रोच्चराने तिला त्रास होऊ लागला. त्यांनी पूजा सूरू केली. घरातल वातावरण त्या मंत्रोच्चराने भारावून गेल. प्रसन्न वाटत होती.
तिला मांत्रिकाने विचारल ... बोल कोण आहेस तु ?" तशी ती हसायला लागली.... त्यांनी पुन्हा विचारल, "कोण आहेस तु ? का त्या निष्पाप स्रीला त्रास देत आहेस ? आताच्या आता इथुन निघून जा... मुक्त हो. तिच्या शरिरातुन "ती - पुन्हा रागाने प्रतापकडे बघत होती... हसत होती.... " नाही जाणार मी... तुला सोडणार नाही अस त्याच्याकडे बघून बोलत होती." बोल तु कोण आहेस ? का या दोघांना त्रास
देत आहेस ? पूजामुळे आणि मंत्रोच्चरामुळे त्या आत्म्याची शक्ती क्षीण होत चालली... ती आता शांत झाली. घरातील वातावरण अचानक बदलू लागल..." ती आता बोलू लागली..."
सगळ्यांच लक्ष तिच्याकडेच होत.... मांत्रिकाने पुन्हा विचारल.... तु बोल नाहीतर मी तोपर्यंत तुला त्रास देत राहणार... तिचा आवाज आला... " मी सविता आहे. " हा आवाज ऐकुन प्रताप बेहोश व्हायचाच बाकी होता. त्याच्या अंगाचा थरकापच झाला. प्रताप बोलू लागला.... " हे कस शक्य आहे "मांत्रिकीाने प्रतापला थांबायला सांगितल. तिला पुढेही बोलायला लावल...." का आलीस यांच्या आयुष्यात यांना त्रास द्यायला...." तिचा आवाज रडवेला झाला...
" मी यांना त्रास देत नाही. यांनीच माझ आयुष्य बरबाद केल आहे. मी आणि प्रताप आमचा आनंदी आणि सुखी संसार होता. आम्हांला दोन मुली आहेत. सगळ चांगल चालू होत. प्रतापच माझ्यावर खुप प्रेम होत. कश्याहीची कमी नव्हती. म्हणतात ना " सुखी संसाराला कुणाची तरी नजर लागतेच " तसच झाल. प्रतापच वागणच बदलल. त्याने माझा शारीरीक आणि मानसिक छळ करायला सुरूवात केली. खुप त्रास द्यायचा तरी मी हे सगळ माझ्या मुलींसाठी सहन करायचे. पण प्रताप असा का वागतोय हेच कळत नव्हत. त्याच बाहेर राहण वाढल होत. तो घरी येतच नव्हता. त्याला काही विचारायला गेल तर तो खुप मारहाण करायचा. मुलींनाही जीव लावत नव्हता. त्यानेच एक दिवस सांगितल की माझ एका बाईवर प्रेम आहे. ती खुप आवडते मला. मला आता तुझ्यासोबत राहायच नाही. हे ऐकुन माझ्या पायाखालची जमिनच सरकली पण तरीही दोन मुलींसाठी जगायच ठरवल. मी त्या दिवसापासुन त्याला काही म्हणत नव्हते. तो घरी येतही नव्हता. त्या बाईसोबतच राहायचा. त्याने आम्हांला सोडून दिल होत. त्याच वागण खुपच बदलल होत. त्याला तिच्याशी लग्न करायच होत. ती त्याच्या मागे लागली होती. एकतर लग्न कर कीॅवा मला सोडून दे म्हटल्यावर हा खुपच चवताळला. त्याला माझा राग येऊ लागला. तो घरीही तिच्याशी दिवसभर फोनवर बोलायचा. हा तिच्या प्रेमाच्या जाळ्यात गुरफटुन गेला होता. तिच्या सौंदर्यावरती भाळला होता. म्हणुन तो हे अस त्रास द्यायचा मला. मी त्याला अडसर वाटु लागले होते. त्याने प्लनिंग करुन मुलींना आणि सासुबाईंना गावी पाठवुन देऊन मला त्या रात्री तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे म्हणुन तो खुप छान बोलत होता. मला वाटल हा प्रताप बदलला असेल, त्याला त्याची चुक कळली असेल. मी ही त्याला विरोध केला नाही. त्याने मध्यरात्री मला राॅकेल ओतुन पेटवुन दिल नि तो तेथुन पळून गेला... मला खुप वेदना झाल्या. खुप ओरडले पण लोक येईपीर्यंत सगळ
संपल होत. तिच हे बोलण ऐकुन मांत्रिकालाखुप वाईट वाटल.
प्रतापालाही हे सगळ ऐकून धक्का बसला. ही तर मेली होती मग परत इथे कशी काय ? मांत्रिक तिला विचारतो...." प्रताप आणि वर्षाने गुन्हा केला आहे. तुझ्या
बाबतीत जे काही झाल ते खुपच वाईट झाल. हे दोघे तुझे गुन्हेगार आहेत.... त्याची शिक्षा तर दोघांनाही मिळणार...."
" पोरी तु मुक्त हो आता किती दिवस इथेच थांबणार आहेस... तुझी काही इच्छा आहे? "तु यांना का त्रास देत आहेस...??"
प्रतापला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळाली पाहीजे आणि त्याच्यासोबतच्या त्या बाईलाही..फक्त त्याने माझ्या दोन्ही मुलींना सांभाळल पाहीजे. त्याच्या जवळ ठेवल पाहीजे. त्यांना
कधीच अंतर नाही दिल पाहीजे. त्याने त्याच्या आईलाही सांभाळल पाहीजे.
मांत्रिक: " एवढ सगळ तुझी ईच्छा पूर्ण केल्यावर तु वर्षाच्या शरिरातुन मुक्त हो... ही तुझी जागा नाही आहे. तिच्या शरिराला त्रास देऊ नको. "
" हो फक्त माझ्या गुन्हेगारांना शिक्षा द्या आणि माझ्या मुलींना प्रतापने सांभाळल पाहीजे...तरच मी इथुन जाईल... नाहीतर माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही..."
मांत्रिक तिला शब्द देतो. त्यांना सविताची इच्छा समजली होती आणि तिला मुक्ती द्यायच होत.... हे काम मांत्रिकाला आज रात्रीच करायच होत.
मांत्रिक त्यादिवशी प्रतापच्या घरीच थांबले होते. त्यांना त्या आत्म्याला मुक्त करायच होत. त्यासाठी रात्रीची वेळ ठरविली होती. वर्षाला त्यानंतर थोडा त्रास कमी झाला. ती थोड्या वेळ झोपली होती. प्रतापने सगळ काही ऐकल होत. मांत्रिक प्रतापशी बोलत होता.... प्रतापने त्याचा गुन्हा कबुल केला होता. आजसंध्याकाळपर्यंत त्याने त्याच्या आईला गावाकडून बोलवून घेतल. झालेला सगळा प्रकार त्याने आईला सांगितला. प्रतापच्या दोन्ही मुलींना रात्रीपर्यंत आणायला सांगितल. जसजशी वेळ जवळ येत होती तसा वर्षाला त्रास जाणवत होता. मांत्रिकाने पुजेला लागणारे सर्व साहीत्य मागवून घेतल. संध्याकाळ ची वेळ आणि नियोजन चालू होत.
वर्षा तिच्या एका खोलीत बसली होती. ती स्वतःला जास्त त्रास करून घेत होती. कुणालाही जवळ फिरकु देत नव्हती. प्रतापला बघीतल्यावर तिच्या डोळ्यांत सुडाची भावना स्पष्ट दिसत होती. रात्र झाली, प्रतापच्या दोन्ही मुली आणि आई आल्या होत्या. वाचमन आणि रामुदेखील तिथे उपस्थित होते.
मांत्रिकाने एक मोठा यज्ञ पेटवला. त्याच्या भोवती एक वर्तुळ काढण्यात आल. पुजेची तयारी करण्यात आली होती. सगळ्यांना आधीच कपाळाला अंगारा लावला आणि आजुबाजुलाही शिंपडण्यात आल. सर्वांना सुरक्षा साठी ताईत आधीच देण्यात आल होत. मांत्रिकाने वर्षाला घेऊन यायला लावला. ती आता खुपच पेटुन उठली होती, जस त्या खोलीकडे तिला आणत होते, तशी ती कींचाळत होती, मोठ्याने ओरडत होती, " सोडा मला, सोडा मला!" मध्येच हसत होती.... तिचा आवतार पाहुन सगळेच भितीने थरथर कापायला लागले. ती मांत्रिकाला पाहताच अजुन मोठमोठ्याने ओरडती होती. रात्रीची ती भयाण शांतता तिच्या त्या आवाजाने भंग पावली. आज अमावस्या असल्याने तिचा जोर वाढला होता. बाहेर पूर्ण काळोख होता... त्यादिवशी काहीतरी होणार असच सर्वांना वाटत होत. मांत्रिकाने सांगितलेल्या जागेवर सगळे जीव मुठीत धरून बसले होते. नेहमीपेक्षा आजुबाजुच वातावरणच बदलल होत. मांत्रीकाने वर्षाला जवळ बोलवल तशी ती त्यांच्याकडे रागाने डोळे मोठे करुन बघत होती. पाय आपटत होती... मध्येच हसत होती, ती खुप चवताळली होती. तेव्हा मांत्रिकाने यज्ञ पेटवुन त्यांनी बाजुला काढलेल्या वर्तुळात वर्षाला बसवण्यात आल.... त्यांनी तिच्या अंगावर अंगारा टाकला तशी ती थोडी शांती झाली, पण प्रतापकडे अजुनही रागाने बघत होती. तिचा गूरगुरण्याचा मोठ्याने आवाज येत होता. पुजा सुरू केली होती. मांत्रिकाने वर्षाच्या शरीरात प्रवेश केलल्या आत्म्याला बोलवल.वर्षाच्या शरिरात सविताने प्रवेश मिळवला होता. मांत्रिकाने तिला यायच आव्हान केल. तस आजूबाजुच वातावरण बदलून गेल... वर्षाच पूर्ण शरीर बदलु लागल.... तिचा आवाज बदलला....घोगरा येऊ लागला...भेसुर आवाजात ती प्रतापला म्हणत होती..." तुला मी सोडणार नाही, तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला देणारच...." तिचे ते शरिर पाहून तोही घाबरला....ती आलेली होती.... तेव्हा खोलीत एक उग्र दर्प जळलेला वास येऊ लागला...शरिर पूर्ण जळलेल, कातडी लोंबत असलेली, चेहरा विद्रुप आणि पूर्ण काळपट , त्वचा चिटकलेली, तिचे डोळे लालभडक अग्नीच्या ज्वालेसारखे आग ओकत होते, नजर रोखुन ती प्रतापकडे बघत होती. खुप विचित्र हसत होती...तिच ते भयाण रूप पाहुन सगळ्यांना चक्कर यायचीच बाकी होती.... ती प्रतापला बोलत होती,
"अजुनही हा नालायक माणुस गप्पच आहे?याच्या तोंडून मला ऐकायच आहे....!!" तिला मांत्रिकाने तुझ्या सर्व ईच्छा पूर्ण करू सांगीतल.... मांत्रीक जोरजोरात मंत्रोच्चार करू लागले.... प्रतापला बोलायला लावल... त्याने त्याचा गुन्हा कबुल केला नि मुलींना आजपासून मीच सांभाळेल शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी मी घेईल.... " सविता मला माफ कर, मी चुकलो. माझ्या गुन्ह्याची मला शिक्षा मीळायला हवी तो पश्चाताप करून रडत होता... तसेच आईही ईथेच राहील यापुढे आमच्यासोबत...हेही सांगीतल. तिने मुलींना पाहील.... प्रतापचे शब्द ऐकताच मांत्रिकाने सांगितल.... " जा सविता... मुक्त हो... ईथे राहू नको... तुझी जागा इथे नाही आता.... तरच तुझ्या आत्म्याला शांती भेटेल. तेवढ्यात एक काळी आकृती किंचाळत, आवाज करत खिडकीच्या बाहेर गेली..... खिडकीच्या काचा फुटल्या.... वातावरण आता शांत झाल होत.... तिच्या इच्छा पूर्ण होताच ती आसमंतात विलीन झाली.... तशी वर्षाला चक्कर आली ती तिथेच कोसळली.... मांत्रिकाने तिच्यावर अंगारा शिंपडला... थोड्या वेळाने ती शुध्दीवर आली... तिला खुप मोकळ मोकळ आणि छान वाटत होत. प्रतापने स्वतः पोलिसात जाऊन आपला गुन्हा कबुल केला नि त्याला त्याची शिक्षा मिळाली. वर्षा आता दोन्ही मुलींचा
आणि आईचा सांभाळ करू लागली.

