Vilas Yadavrao kaklij

Action Others

3.4  

Vilas Yadavrao kaklij

Action Others

'स्वातंत्र्य '

'स्वातंत्र्य '

8 mins
312


प्रशांत नेहमीप्रमाणे घरी आला . पत्नीला आवाज दिला शुभदा! दोन ते तीन वेळा आवाज देऊनही प्रति उत्तर आले नाही. तेव्हा त्याने बेडरूममध्ये जाऊण विचारले. तेंव्हा फुगलेली होती. त्याचे कारण काय होतं ते कळत नव्हतं .मग मी विचारलं ऑफिस मध्ये काही झाले का? का .कोणाचा फोन आला. काही घडले का? काही उत्तर देत नव्हती . तेव्हा मात्र माझा सतांप अणावर झाला. व मोठ्याने ओरडून सांगितले . सांगितल्या शिवाय समजणार आहे का ? सांगायचे नसेल तर ? तेंव्हा मात्र एक टेप रेकॉर्ड चालू झाल्याप्रमाणे कॅसेट सुरू झाली. आई घरामध्ये कामा निमित्त रागवली होती. वेळेवर लागणाऱ्या गोष्टी मिळाल्या नसल्या कारणाने . त्यांनी केलेली बडबड व काही टोमणे मारले असल्याने मॅडम रागावलेल्या होत्या. हे नेहमीचच असतं! काहीतरी मोठ कारण हवं ना ?. आम्ही दिवसभर जॉब करावा . विरंगुळा मिळावा ; निवांत बसावं पेपर वाचावा ,टीव्ही बघावा?. मात्र हे यांना चालत नव्हते. ऑफिस मध्ये मान पाठ एकवटूवून 12/ 12 घंटे काम करावं लागत . त्यामुळे माणसिक थकवा व शारीरीक थकवा येत होता. व घरी आल्यानंतर या प्रकारचे बोलणे ऐकावी लागत होती.

प्रशातला सांगून काही उपयोग होत नव्हता. अग !त्यांना उत्तरे द्यायच नाही . त्यांनी माझ्यासाठी खूप केल आहे . रात्रं न दिवस रक्ताचं पाणी करुण मला शिकवल आहे. गावाकडे असणारी जमीन, घर सारे विकुन आपल्याला फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले होते. व त्यांच्या फंडांमध्ये असणारी जमा रक्कम तेही माझ्या शिक्षणासाठी , बहिणीच्या लग्नासाठी खर्च केली होती. एक एक पैसा कमावलेला . रक्ताच पाणी केलेलं व स्वाभिमानाने जगणारा माणुस ? खरंच कुणाची बोलणे ऐकेल का? आपण या वयामध्ये त्यांना दिलेला आधार व मानसिक समाधान हेच आमच्यासाठी खूप होतं. वयोमाना नुसार अगं !त्यांची बडबड चालू असते . आपण समजून घ्यायचं आपण शिकलेले आहोत .म्हाताऱ्या माणसांना समजून घ्यायला काय हरकत आहे. शुभदा चा मात्र पारा चढला. "ऐकून घेतल्यामुळे ते दिवस आले आहेत."! आता मी काही ऐकूण घेणार नाही. एक तर मी या घरामध्ये राहील. किंवा त्यांनी राहो तुला पाहिजे तो तू निर्णय घे! किंवा घेऊ नको. मला आता कोणतीही बंधन नको आहेत. अरे जीवनामध्ये. मी काय काय स्वप्न बघितली होती. वडिलांनी शिक्षण केले. नोकरी मिळवली महिना लाख रुपये कमवत होती. मात्र घरी सर्व जुने विचाराची असल्यामुळे त्यांनी सांगितले होते तुझे लग्न झाले कि तू हवी तशी मजा कर ! तुझ्या मनाप्रमाणे फिर ; मनाला येईल त्या ठिकाणी ट्रीपला जा . आणि जीवनाचा आनंद घे! त्यासाठी त्यांनी एक चांगलं तुझ स्थळ शोधलं ! तोला मोलाचा जास्त पॅकेज असणारा असा आयटी इंजिनिअर नवरा मिळवला? आणि काय पदरी पडलं! आज मिळेल स्वातंत्र्य ! अद्या मिळेल स्वातंत्र्य! आज यांना सांभाळून घे . घे काही दिवस थांब ! नंतर बघू ! नंतर पाहू .

अरे प्रशांत लग्नाला दोन वर्षे झाली. सांग कधी कुठे बाहेर फिरायला घेऊन गेलात ? हॉटेलमध्ये कधी जेवायला तरी नेलं. कारण काय तर आपण बाहेरून जेवून गेल्यानंतर त्यांचं काय? त्यांना बाहेरचे चालत नाही. व म्हाताऱ्या माणसांना घेऊन स्वातंत्र्यावर गदा आणून स्वतःचं स्वतंत्र असं जीवन नाही का रे! आपल्याला .कधी मिळणार स्वातंत्र्य? वीस वर्ष शिक्षणामध्ये गेली . नोकरी शोधण्यात दोन वर्षे गेली .आणि आज लग्न होऊन दोन वर्षे झाली. तरी पण ? मला कोणत्याही प्रकारचा विचार व्यक्त करता येत नाही. वा स्वतंत्ररित्या कुठे जाता येत नाही. आज एक तास उशीर झाला तर घर डोक्यावर घेतलं ! म्हणजे मी कोण ? कोणत्या प्रकारचे मत असतील तर नाही का? अग हो ! तुला सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळेल शब्दाला प्रत्युत्तर करू नको . मी आहे ना !मी अनेक प्रकारे विविध प्रकारचे उदाहरण देऊन समजून सांगितले . मात्र उपयोग झाला नाही. शुभदा ! 'एवढी रागावली होती. आज दोन वर्षे लग्नाला झाली . या दोन वर्षांमध्ये इतकी संतापलेली मी कधी बघितली नव्हती. आणि आज तर इतका पारा चढला होता. कुणाचे ऐकून घेण्यास तयार नव्हती . आणि निर्णय घेऊन मोकळी झाली होती. व रागात स्वतःच्या बॅग भरण्याची क्रिया चालू केली .मी अतिशय विनवण्या केल्या . अनेक प्रकारचा प्रयत्न केला मात्र काही उपयोग झाला नाही . मी आता घरामध्ये राहणार नाही. तुला माझ्या बरोबर यायचं असेल तर ये किंवा येऊ नको . तुझा निर्णय तू घे! माझा निर्णय मी घेतलेला आहे . त्यात बदल होणार नाही. आमचे हे बोलणे जोरात असल्यामुळे घरातील सर्व मंडळी ऐकत होती. त्यात आईने परत रामायण सुरू केले . अरे प्रशांत ! मी चुकी केली आहे . मी चुकले आहे . गावाकडच्या घर आणि जमीन विकून तिथे आले नसते तर आम्ही गावाकडे आनंदाने राहिलो असतो . येथे तुमच्या मध्ये अडचण ;आमचा कोणाला त्रास झाला नसता. आमचं चुकलं . आम्ही आमच्या गावी जातो . तिकडे वडिलांनी सुद्धा बडबड सुरू केली. अगं त्या लोकांना स्वातंत्र्य पाहिजे ! आहे. स्वातंत्र्य ! म्हणजे काय? तर स्वैराचार ;कोणीही चौकशी करू नये . कोणीही बोलू नये . कोणत्याही प्रकारची बंधने आमच्यावर घालू नये. अग ! आपण कोण ? यांना बोलणार! आपला काय सबंध त्यांच्याशी आपण विनाकारण यांना बोलतो आहोत .आयुष्यात येऊन आपण काही केलं नाही सार काही गमावून बसलो. आता आपल्याला एखादा वृद्धाश्रम बघावा लागेल. तिकडे भावाने सुद्धा बडबड सुरू केली . माझं शिक्षण सुद्धा पूर्ण होऊ शकेल असं मला वाटत नाही .कारण आमचा खर्च इतरांना परवडत नाही असे वाटते . आणि आम्हाला खाऊ घालण्यासाठी कोणाची तयारी नाही .त्यामुळे आई आणि बाबा आपण गावाकडे जाऊ कडे एखाद्या फ्लॅट भाड्याने घेवून तेथे आनंदाने राहू. इथे आपल्याला स्वतंत्रपणे राहता येत नाही. मी कॉलेजला ही कोणाच्या परवानगी शिवाय आहे जाऊ शकत नाही . फिरण्याचा गोष्ट वेगळीच ट्रीपला ही किंवा कॉलेजच्या मुला मुली बरोबर एन्जॉय सुद्धा करू शकत नाही . तेंव्हा मी त्या घरात राहून माझा काय उपयोग ? म्हणून बडबड करू लागला .आता मात्र तिकडे आई सुद्धा जाण्याच्या तयारीत उगाच देखावा म्हणून की खरेच ! तयारी करत आहेत . हे सुद्धा खरे वाटत नव्हते . प्रत्येकाला आपापले स्वातंत्र्य पाहिजे होते. कुणालाही कुणाची बंधन नको होती .कुणी कुणाला बोलू नये . विचारू नये .कारण विचारलं म्हणजे बंधन .पाळत ठेवल्यासारखे वाटत होते . त्यामुळे कोण ? केंव्हा ? किती वाजता ?

मला हे न विचारणे बरे कारण . प्रत्येकाच्या स्वातंत्र्यावर गदा येत होती. आणि सर्वजण आपापला मार्ग शोधत होते. मग मीही निर्णय घेतला आणि आवाज वाढवून सगळ्यांना ऐकायला येईल या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य हव आहे ना? आपल्या मनाला पटेल. त्या पद्धतीने 

स्वतंत्र जीवन जगावं .कुणावर ही कुणाची बंधने असणार नाहीत. कारण प्रत्येकाचे "स्वातंत्र्य " ची व्याख्या ही वेगळी आहे. नाते संबंध . रक्ताचे नाते किंवा प्रेमाची नाती याचा कोणीही विचार केलेला दिसत नाही. त्यामुळे मी सर्वाना स्वतंत्र पणे सांगितले .तुला खरेच स्वतंत्र पाहिजे असेल. तर तू ते उपभोगू शकते . जर या घरातून स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्य मिळावं या साठी तर या घरातून बाहेर पडत असशील! तर मात्र एक लक्षात ठेव परत या घरांमध्ये प्रवेश मिळणार नाही. या घरांमध्ये जे नातं निर्माण करून तू प्रवेश केला होता . त्या नात्या मध्ये अंतर पडेल . ते नातं तुटेल याचा विचार कर .एकदा तुटलेल्या नातं परत जोडता येत नाही . आणि जोडण्याचा प्रयत्न केला . तरि पूर्वीप्रमाणे असत नाही एवढं लक्षात ठेव .आणि हा पूर्ण विचार तू तुझा निर्णय घे !आणि या घराच्या बाहेर तुला वाटलं पडावसं वाटल तर बाहेर जा . मात्र एकदा बाहेर पाऊल ठेवल्यानंतर परत या घरात परत येण्याची अपेक्षा बाळगू नये हा विचार करून तू तुझ स्वातंत्र्य मिळू शकते. आईला पण त्याच प्रमाणे सांगितले तुम्ही जमीन घर सार सारं काही विकून आम्हाला जो पैसा दिला . त्या पैशात मी माझं शिक्षण केलं .फ्लॅट घेण्यासाठी तुम्ही जी रक्कम दिली . ती रक्कम मी आजही तुमचे नावे बँकेमध्ये जमा करून ठेवली आहे. आणि जमिन विकून जेवढा पैसा आला होता तेवढया रकमेची पुन्हा परत जमीन घेऊन ठेवलेली आहे. मात्र आजपर्यंत तुम्हाला मी ते सांगितलं नाही . कारण तुमच्या मनामध्ये शंका आली असती! की मुलगा मोठा झाला .    स्वतंत्र झाला. तो आपले कर्तव्यातून मुक्त होण्याचा मार्ग शोधला आहे . व गावाकडे जमीन घेतली याचा अर्थ आम्हाला तू इथून घालवण्याचा प्रयत्न करतो आहे .असं वाटेल .;मन दुखावले जातील, म्हणून मी आज पर्यंत. सांगितले नाही . मात्र आज तुम्हाला ही स्वातंत्र्य हव आहे .ते तुमच्यावर बंधने येतात .पण तुम्ही तुमच्या पिढीमध्ये त्यामध्ये बंधन तयार केलेली आहे . काळानुरूप बदल झालेला आहे . पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यामध्ये जेवढे बदल झाले आहेत ; ते बदल विचारांमध्ये. वागण्यामध्ये . तसेच त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे बदल घडून आलेले आहेत. याचा विचार तुम्ही केलेला नाही . व आमची आजची पिढी स्वतः स्वच्छंदी जीवन जगण्याची .स्वप्न पाहत असताना. उंच आकाशात भरारी घेताना कोणताही अडथळा नको . वाट्टेल त्या दिशेला . वाटेल तेंव्हा स्वतंत्र विहार करावा. सामाजिक बंधन न पाळता आनंदी जीवन जगावं .अशा प्रकारचे 'स्वप्न' बघितलेले असतात. त्यामुळे तुटलेले मना मध्ये विशिष्ट गोष्टी करण्यासाठी सांगितलं की ती बंधन वाटतात ! स्वातंत्र्यावर गदा येते येऊ नये . म्हणून मुक्तपणे तू आणि मी आणि स्वतःचे घरटे व त्यामध्ये सार्‍या प्रकारच्या सुखसोई असाव्यात इतका फक्त . कोणता विचार केलेला असतो ? पुढच्या पिढीचा . त्यावर संस्काराचा . किंवा आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास ' मानसिक व बौद्धिक ताण झाल्यास त्याची सहनशक्ती ही तयार झालेली नसते. दोन पिढीतील अंतर हि जणू दरी निर्माण झालेली असते . या दरी मुळे तिकडची माणसे इकडे येऊ शकत नाही .व इकडची तिकडे जाऊ शकत नाही . कोणी जाण्याचा प्रयत्न केलात तर ते दरीत पडतात व स्वतःचे हात पाय मोडून घेतात .किंवा संसाराचा खेळ खंडोबा तरी करून घेतात. त्या पद्धतीने आपल्यामध्ये होऊ नये .अशी माझी अपेक्षा आहे .आणि प्रत्येकाने आपापला विचार करून स्वतः निर्णय घ्यावा !

इतरांना कोणालाही दोष देऊ नये किंवा नंतर ही निर्णय बदलण्याची वेळ येऊ नये . म्हणून मी सर्वांना निर्णय घेण्यास सांगितला . भावाला पण त्या क्षणी सांगितले. तुझ्यावर हे कोणत्या प्रकारचे बंधन नाही . तुझ्या शिक्षणासाठी बँकेत काही रक्कम ठेवलेले आहे .तिचा उपयोग कर आणि तू तुझ्या जीवनात स्वत्र्यत विचार करून निर्णय घे! आणि त्या क्षणी मी ड्रायवर ला बोलावले . ड्रायव्हरला सांगितले शुभदा ची गाडी घे आणि ती सांगेल तेथे जा ! आणि तुही तिला हवा असेल तर त्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जा ! तुला ही माझ्याकडून कोणत्याही प्रकारचे बंधन असणार नाही . इतरांना सूचना दिल्या . त्याच पद्धतीने आईवडिलांना पण दिल्या भावाला पण सांगितले .एक फ्लॅट बुक केलेला आहे .त्याच्या चाव्या आणि कागदपत्र तुला माझ्या मित्राकडून मिळतील .त्या कलेट कर आणि जीवन जगण्यास स्वतंत्र आहे . या पद्धतीने सगळ्यांना सूचना देऊन मी माझ्या ड्रायव्हरला बोलावलं . व सांगितलं आपल्याला आज बाहेर जायचं आहे . माझी बॅग पॅक केली मी निघालो . जाताना सांगितला सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालेल आहे . या क्षणापासून प्रत्येक जण आपापल जीवन जगण्यासाठी येण्यासाठी 'स्वतंत्र ' आहे . कोणी कोणाला काहीही विचारू नये . म्हणून मी ड्रायव्हर ला बॅग घेऊन निघालो . व आज मी एका निवांत स्थळी एका हॉटेलमध्ये एकटा जीवन जगत आहे . व शोधत आहे "स्वातंत्र्य" म्हणजे काय? आणि ते प्रत्येकाला का हवं असतं . आणि त्याचा अर्थ जेंव्हा मला सापडेल तेंव्हाच मी माझ्या स्वगृही परत जाईल ! आणि गेल्यानंतर मला कळेल कि कोण ? कोणत्या ? प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगत आहे . व कशाप्रकारे आनंदी जीवन जगत आहे . हे पुढील भागात क्रमशा ........


Rate this content
Log in

Similar marathi story from Action