Priyanka Kumawat

Horror Thriller

3  

Priyanka Kumawat

Horror Thriller

सत्य की स्वप्न

सत्य की स्वप्न

3 mins
207


मध्यरात्री तिला जाग आली , आपल्या भोवती काहीतरी अमानवी आहे असे तिला सारखे जाणवत होते. तिला या घरात येउन काहीच दिवस झाले होते, पण आल्यापासून वाटत होते की काहीतरी आहे जे सतत आजूबाजूला फिरतय. आपल्याला पाहतय. रात्री तर ते तिला अजूनच जाणवत. घरात ती , नवरा आणि तिचा लहानगा असे तिघेच होते. तिने वळून पाहिले तर दोघे गाढ झोपलेले.

तिला वाटले की तिला भास होत आहे. परत झोपायला वळली तर तिला हॉल मध्ये काहीतरी हालचाल जाणवली. ती नखशिखांत हादरली. पण ते काय आहे हे पाहणे आवश्यक होते. तिला वाटले निशाद ला उठवावे.. पण काही नसेल तर तो चिडेल म्हणून तिने एकटीनेच जायचं असे ठरवले. ती रूममधून बाहेर आली. बाजूच्या रूममध्ये देवाजवळ दिवा तेवत होता ते पाहून तिला हायसे वाटले. तिने तिथूनच आधी हॉलचा कानोसा घेतला तर समोर फक्त अंधार होता. ति तिथेच काहीवेळ घुटमळली, तिला वाटले पुढे जाऊन पाहूया.

हळूहळू ति हॉलमध्ये आली. बाजूलाच एक काचेचा दरवाजा होता आणि पलीकडे बालकनी. ति काचेत पडलेल्या आपल्या रूपाला पाहत होती. अचानक तिच्या शेजारी पुसटशी आकृती उमटली. तिने झटकन मागे वळून पाहिले तर कोणीच नव्हते. परत काचेत पाहिले तर कोणी तरी होते . मागे वळून पाहिले तर नाही. ति खूप घाबरली, परत काचेत पाहायचे तिचे धाडस होत नव्हते. पण खातरी करावी म्हणून पाहिले तर कोणीच नव्हते. ति विचारात पडली की तिला काय दिसले आधी पण क्षणभरच. कारण पुढच्याच क्षणी तिला तिच्या समोर खूपजण ऊभे दिसले. ति भीतीने तिथेच गारठली. ते सगळे तिलाच बघत होते. लाल डोळे, कटलेली मान, त्यातून पडणारे रक्त आणि रक्ताचे माखलेले अंग.

ति धावत सुटली रुम कडे, तर तिथे निशाद आणि रुद्र च्या आसपास तेच उभे होते. तिने त्यांच्या कडे पाहिले तर ते गाढ झोपेत होते. ते अमानवी लोक त्यांना काही करतील या भीतीने तिने पटकन रुद्र ला घेतले, आणि निशाद ला गदागदा हलवले. तो काय आहे ओरडतच उठला पण बाजूला पाहून जागीच थकबला. त्याचे डोळे भितीने विसफारले, निशाने त्याचा हात पकडून जोरात बेडवरून खेचले. ति त्याना घेऊन बाजूच्या रुममध्ये आली.

निशाद तर अजूनही जे पाहिले ते खरे की खोटे असा विचार करत होता. त्याने निशाकडे पाहिले तर ती थरथर कापत होती. एव्हाना रुद्र झोपमोड झाल्याने रडत होता. निशाद ने दोघांना जवळ घेतले. इतक्यात त्यांचे लक्ष खिडकी बाहेर गेले तर घराबाहेर खाली खूप भूते नाचत होती. ते भयंकर असे पाहून ते खूप घाबरले. रुद्र तर तिला जोरात चिकटला.

ते देवासमोर बसून देवाचा धावा करु लागले. इतक्यात तिचे लक्ष दिव्याकडे गेले तर ते थोडे च राहिले होते. त्यांना कळून चुकले होते की दिवा आहे तिथपर्यंतच ते जीवंत राहतील, दिवा विझला की आपले काही खरे नाही. पण तेल किचनमध्ये होते. ती हिमतीने बाहेर जायला निघाली पण निशाद ने तिला थांबवले, दोघे एकमेकांना जाउ देत नव्हते पण शेवटी निशाद तिला महणाला की रुद्र कडे तुझे थांबणे गरजेचे आहे. तिने त्याचा कडून वचन घेतले की तो नक्की परत येणार.

तिने त्याला जपमाळ घातली आणि रक्षा लावली. मोठा श्वास घेत बाहेर पडला. काही वेळाने त्याचा ओरडायचा आवाज आला, इकडे तो आवाज ऐकून ती जोरात रडायला लागली. ती गदागदा हलत होती कारण निशाद तिला झोपेतून उठवत होता.

समाप्त.....

please leave your comments.Rate this content
Log in

Similar marathi story from Horror