Priyanka Kumawat

Tragedy Crime

4  

Priyanka Kumawat

Tragedy Crime

भीती बदनामीची

भीती बदनामीची

2 mins
290


कित्येकदा बदनामीच्या भीतीने आपण करणारे कृत्य चुकीचे आहे हे माहीत असून लोक ते करत असतात. अलीकडेच एक घटना वाचण्यात आलेली. एक खूप इमानदार इन्स्पेक्टर होते. आपल्या कामाशी ते खूप इमानदार होते. कुठल्याही प्रकारच्या आमिषाला ते बळी पडत नसे. ते ना कधी लाच घेत ना घेऊ देत. त्यांच्या कंट्रोलमध्ये असलेल्या भागात तर गैरकामे करणाऱ्यांना आळाच बसलेला. पण असले धंदा सोडतील तर नवलच. त्यांनी इन्स्पेक्टरला लाचपण देऊन पाहिली. पण ते खूप इमानदार होते त्यांनी उलट त्या लोकांना कायद्याची भाषा दाखविली.


त्यांचे हे वागणे त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये काहींना आवडत नव्हते. त्यांची वरकमाई बंद झालेली. त्यांना काय करावे कळत नव्हते. एकदा गैरकामातील एकाला त्यांनी अटक केली. इकडे त्यांच्या धंद्यातील लोकांना घाम फुटायला लागला. त्याने तोंड उघडले म्हणजे सगळेच जेरबंद होणार. इकडे काही डिपार्टमेंटच्या लोकांनापण घाम फुटायला लागला कारण ते पण अप्रत्यक्षरीत्या त्यात सहभागी होते. काय करावे ह्या विचारात सगळे होते. त्या धंद्यातील लोकांकडून त्यांना धमक्या येऊ लागल्या.


इकडे अटक झालेला इसम काही बोलायला तयार नव्हता. ते इन्स्पेक्टर त्याला थोडीथोडी थर्ड डिग्री देत होते. तो बोलला म्हणजे एक मोठी केस सुटणार होती. या केसमुळे गैरकामांना आळा बसेल म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते. एकेदिवशी ते सकाळी ड्युटीवर आले असता त्यांना कळले की तो ईसम काल रात्री जेलमध्ये मेला. डिपार्टमेंटमधील ते लोक त्यांना दोष देऊ लागले की तुमच्या मारहाणीमुळे तो मेला. आता वरून प्रेशर येईल. तुमच्या पदाला डाग लागेल. इन्स्पेक्टर तर हताश होऊन बसले. आता आपले काही खरे नाही. आपल्याला पदावरून कमी करतील. देशसेवा करण्याचे आपले स्वप्न केवळ स्वप्नच राहील.


पण त्यांना माहीत नव्हते की हा सगळा त्यांच्या विरोधात गेम आहे. ते लोक म्हणाले की आपण हे जरा वेगळ्या पद्धतीने दाखवू. तुमची चूक नाही तर त्याने तुमच्यावर हल्ला केला म्हणून बचावासाठी तुम्ही त्याच्यावर वार केला आणि त्यात तो गेला असे दाखवू. तुम्हीपण ही केस हा मेला म्हणून बंद करा. इन्स्पेक्टर प्रचंड दडपणाखाली होते. बदनामीच्या भितीने त्यांनी जे घडतय ते घडू दिले. पण तिथेच ते चुकले. त्यांना स्वतःच्या पदावर आजवर एकही डाग लागू दिला नव्हता त्यामुळे ते खूप अस्वस्थ झाले.


या भितीमुळे ते त्यांची ड्युटी नीट करू शकत नव्हते. त्या केसमध्ये ते लक्ष घालू लागले की त्यांना बदनाम करण्याची भिती दाखवली जाऊ लागली. त्यांनी कोणाला पकडले तरी त्या केसमुळे बदनाम करण्याची भिती घालून गुन्हेगार आरामात स्वतःला सोडवून घेऊ लागले. ते पण भितीने नाईलाजाने दुर्लक्ष करू लागले. इन्स्पेक्टरचे यामुळे कामावरून लक्ष हटू लागले. कामात चुका होऊ लागल्या. वरून बोलणी भेटू लागली. त्यांचे देशसेवा करण्याचे स्वप्न धुळीस मिळू लागले. बदनामीच्या भितीने त्यांना पूर्ण ग्रासले.


हे सगळे सहन करण्याच्या पलीकडे गेल्यावर त्यांनी गळफास लावून घेतला. बदनामीची भिती त्यांना मृत्यूपर्यंत घेऊन गेली. एका इमानदार इन्स्पेक्टरचा बदनामीच्या भीतीने जीव घेतला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy