ती सावत्र भाग १
ती सावत्र भाग १


ही गोष्ट आहे तिची जी लहान असल्यापासूनच लढत होती, चांगले जगण्यासाठी, मनमोकळे राहण्यासाठी, प्रेम मिळवण्यासाठी. ती होती निता.
ती ९ महिन्याची असताना तिची आई वारली . तेव्हा तिचा भाऊ असेल २ वर्षाच्या. पोरांची आबाळ होउ नये म्हणून तिच्या वडिलांनी तिच्या मावशीशीच लग्न केले. जेणेकरून मावशी आहे तर जीव लावेलच महणून. मावशी तसी चांगली हाेती. त्यांचे सगळे व्यवस्थाीत करी. पुढे मावशीला मुलगा झाला. तशी मावशी जास्त वेळ त्याच्यातच घालवू लागली. म्हणायला तशी ती निताचया मोठ्या भावाला कुणालला जीव लावे कारण तो घरातील मोठा मुलगा. पण निताची ती जरा टाळाटाळ करु लागली. निताला ती अतुलशी फार खेळू देईना.
निता मोठी होत गेली तसे तिच्या मावशीचे वागणे लक्षात येईल लागले. तिला कळेच ना की ती मुलगी आहे म्हणून तिची आई असे वागते की ती सावत्र आहे म्हणून. पण जरी ती सावत्र असेल तर ती तिच्या कुणाल दादा बरोबर ठीक वागत होती. ती वडिलांना पण सांगू शकत नव्हती कारण त्यांना ती सांगणार तरी काय. तिची नवीन आई तिच्या वडिलांसमोर तिच्याशी चांगले वागे. तिला डायरी लिहिण्याची सवय होती. ती डायरीत सारे काही लिहे की आज तिच्या आईने तिला ऊशीरा जेवायला दिले, ती कशी तिच्यावर चिडली, तिने तिला किती काम करायला लावले, वगैरे वगैरे.
तिची डायरी ती लपवूनच लिहे. तिची मैञीणच जशी ती.
तिला म्हणायला तशा चांगल्या मैत्रीणी होत्या पण सगळ्याच गोष्टी ती सांगू शकत नव्हती. एके दिवशी तिच्या कडून अतुल ला धक्का लागला तर तिच्या आईने तिच्या कानाखाली आवाज काढला. ती आईला म्हणाली की चूकून लागला तिने जाणूनबुजून नाही केले तर तिची आई म्हटली की शेवटी तो तुझा सावत्र भाऊ तु म्हणूनच केलेस. ती गच्चीत जाऊन खूप रडली. तिला तिचे वडील खूप जीव लावत, कुणाल पण खूप प्रेम करे पण आईच्या प्रेमासाठी ती आसुसलेली होती. तिला तिच्या जन्मदात्या आईची खूप आठवण येई. तिने तिला पाहीले पण नव्हते तरी आई असती तर असे लाड केले असते तसे लाड केले असते असे तिला वाटायचे.
अतुल अन तिची तशी चांगली गटटी होती पण तो आईलाच साथ देई काही झाले की. एके दिवशी ती आणि तिचा वर्ग मित्र सोबतच घरी येत होते त्याला तिच्या घराजवळ असणाऱ्या त्याच्या मित्राकडे जायचे होते. ते अतुल ने दुरूनच पाहीले अन आईला जाऊन सांगितले. मग तिच्या आईने ते असे काही तिच्या वडिलांना रंगवून सांगितले की तिच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी तिला झोडपून काढले आणि दटावून सांगितले की पुन्हा कधी कोणत्याही मुलाशी मैत्री नको. बिचारीला काही एक बोलायची संधी पण दिली नाही. तिला कळतच नव्हते की मुलांशी मैत्रीबाबत हे असे का??
लवकरच पुढील भाग प्रकाशित होतील.
please leave your comments