Priyanka Kumawat

Tragedy Inspirational

4.4  

Priyanka Kumawat

Tragedy Inspirational

प्रवासात भेटलेला तो

प्रवासात भेटलेला तो

3 mins
555


एकदा नको असताना प्रवास करत होते. माझा छंद होता प्रवासात लोकांचे निरीक्षण करायचा. कोणी कसे आ वासून झोपले ते बघून हसायचे. लहान मुले पाहून त्यांच्या सोबत खेळायचे. लोकांचे जागेवरून होणारे भांडणे पाहायचे. असले उद्योग करत मी प्रवास करत. ट्रेन मध्ये एकदा समोसे विकायला एक मुलगा आलेला. भली मोठी टोपली सावरत समोसे विकत होता. लहान असा १०-१२ वर्षाचा. मळकेसे कपडे घातलेला. इथे आपली साधी बॅग आपल्याला ट्रेन मध्ये इकडे तिकडे करत नाकी नऊ येतात तिथे चालू ट्रेन मध्ये पण जड टोपली सावरत सराईतपणे फिरत होता. समोसे विकण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडून गरमागरम समोसे म्हणत होता.

आपके बच्चों को भूक लगी होगी ले लो, भाभी के लिए ले लो असे मधेच हसण्यावारी घेत विकत होता. चालताना ज्यांना त्याचा धक्का लागत होता, ते त्याच्याकडे रागाने पाहत होते. कोणी कोणी तर शी हा आता मला शिवला, घरी जाऊन अंघोळ करायला लागेल असा आविर्भाव चेहर्यावर आणत होते. एका महाशयांनी तर तो धक्का लागलेला भाग रूमाल खिश्यातून काढून पुसला. नंतर शिंक आल्यावर तोच रूमाल नाकाला लावला. शिंक आल्यावर कदाचित ते विसरले असतील की हा तोच रूमाल होता. कोणी हडतूड करत होते. कोणी टोपलीत वाकून समोसे बघत आणि नाकतोंड मुरडून नको म्हणत. तरीही त्याच्या चेहर्यावरील भाव न बदलता तो त्याच काम करत होता. कदाचित त्याला हे अंगवळणी पडलेले. 

थोडेफार विकले गेले. तो दमला आणि माझ्या पुढयात येऊन बसला. मी त्यालाच बघत होते. एकदोनदा नजरानजर झाल्यावर त्याने स्मितहास्य केले, मी पण प्रतिसाद दिला. दमून थोडे बसल्या वर त्याला घशाला कोरड पडल्या सारखे मला उगाच वाटले. मी त्याला पाणी पियेगा क्या विचारले. तो संकोचून नको म्हणाला. मी तरी बाटली त्याच्या पुढयात धरली. त्यानें एकदा माझ्या कडे पाहिले, माझ्या नजरेतील होकारार्थी भाव पाहून बाटली घेऊन पाणी पिऊ लागला. अख्खी बाटली संपवली एवढी तहान त्याला लागलेली. 

मी विचारले तुझ्या घरी कोण कोण असते? तू लहान असून का हे काम करतोय? तो म्हणाला की मी नाही करणार तर कोण करेल ताई. बाप मजूर होता. बांधकाम करता करता वरतून पडला हातपाय गेले. कंत्राटदाराने एक रूपया ही मदत केली नाही.. की नुकसान भरपाई दिली नाही. आई भांडीधुणी ची कामे करते. पण बापाला पैसा लागतोय औषध पाण्याला आता. आईचे पैसे पुरेसे नव्हते मग मी पण लागलो कामाला. असे सांगून तो थांबला. त्याच्या चेहर्यावरचे भाव अजूनही तसेच निर्विकार होते. 

मी म्हटले त्रास होत असेल ना असे ट्रेन मध्ये जड टोपली डोक्यावर घेऊन समोसे विकायला? तो म्हणाला बापाने एवढा त्रास सहन केला त्याचे हातपाय शाबूत होते तेव्हा. आता बापाला माझी गरज आहे तर मी करतोय त्यात त्रास कसला? त्याचे बोलणे ऐकून मला खूप गहिवरून आले. एवढासा हा जीव जीवनाचा रहाटगाडा ओढण्यासाठी किती कमी वयात सज्ज झाला. किती कमी वयात त्याचे इवलेसे हे मन प्रौढ झाले. न कळत्या वयात किती तो शहाणपणा न सांगता आलेला. खेळण्या बागडण्याचे हे दिवस बाजूला सारून कुटुंबाला हातभार लावतोय. नकळत माझा हात खिशात गेला. ५०० रूपये काढून मी त्याच्या समोर धरले. तो म्हणाला की पैसे आम्हाला नीट पुरतील एवढे समोसे विकल्या जातात रोज. नको मला पैसे.

स्वाभिमानी अशा मुलाला बघून मला त्याला एक सॅल्यूट ठोकायच मन झाले. तो स्टेशन आले म्हणून डोक्यावर टोपली ठेवून उठून गेला. कोण कोणाचे पांग फेडतय कळतच नव्हते मला. तो आईवडिलांचे की आईवडील त्याचे. टोपली नव्हे तर त्याच्या कुटुंबाचा भारच उचलत होता तो. नंतर पुन्हा तिथून प्रवास बर्याच वेळेला झाला पण तो दिसलाच नाही. एक न पुसणारी आठवण माझ्या मनात राहून गेली.



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy