ती सावत्र - भाग ४
ती सावत्र - भाग ४


तिचे वडिल त्याला पाहून हसले आणि घरात निघून गेले. ती विचारात पडली की बाबा काहीच का नाही बोलले. निशाद तिला विचारु लागला की कॉलेजला काय झाले तर ती बोलली की काही खास नाही. ती घरात आली आणि बाबांजवळ बसली. त्यांचा मूड चांगला आहे पाहून सांगू लागली की तो त्यांच्या शेजारी राहायला आलाय आणि कॉलेजला पण सोबत आहे तर कॉलेजला आज काय झाले ते विचारात होता. तर बाबा तिला म्हणाले की मला माहीत आहे. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे. बाबांनीच त्यांना ते घर मिळवण्यासाठी मदत केलेली. ते ऐकून ती जरा निवांत झाली.
तिची आई बाबांसमाेर उगाच तिच्याशी गोडगोड बोलु लागली. तिला पण ते काही नवीन नव्हते. जेवण आटपल्यावर तिचे बाबा आईला सांगत होते की त्यांच्या मित्राला आपण घरी जेवायला बोलावूया. ते ऐकून निताला खूपच आंनद झाला. तिची विचार करत होती की देव आज तिच्यावर जास्तच खुश आहे. घरातील आवराआवर तर नेहमीच असायची पण आज ती तयार व्हायला जरा जास्तच वेळ घेत होती. दोनदा हा नाही तो करत ड्रेस बदलला. मग जरा वेळ देऊन वेणी घालत होती. अतुल तिला म्हणाला की आज काय कॉलेजला काही आहे का? तिची आई म्हणाली की काही नाही रे जरा पंख फुटायला लागलेत आणि जोरजोरात हसायला लागले.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती कॉलेजला जायला निघाली. तिने त्याच्या घराकडे पाहीले. ५-१० मिनट उगाच तिथे घुटमळत होती. तिच्या आईने पाहिले अन् बोलली की नसेल जायचे तर नको जाऊस. ती तडक निघाली जायला. कॉलेजला सगळे तिला आज काय खास आहे विचारत होते. तिच्या मैत्रीणी तर तिला आल्यापासून चिडवत होतया. तिला ही खुप छान वाटत होतं. तिने त्याच्याकडे वळून पाहिले तर तो मित्रांमध्ये रमलेला. तिला वाटत होते की त्याने एकदा तरी तिला पाहावे. कॉलेज संपले तसे ती उगाच मैत्रिणींसोबत थांबलेली कारण तो थांबलेला. पण तो निघतच नाही ते पाहून ती जायला निघाली. ती जास्त वेळ थांबू शकत नव्हती. नाही तर न जाणो घरी आजून काय घडले असते.
ती घराच्या आवारात आली तसे ताे पण त्याच्या गाडीने येताना दिसला. तिचे आणि त्याचे बाबा बाहेरच गप्पा मारत होते. तिचे बाबा म्हणाले की ही माझी मुलगी. निशाद चे बाबा म्हणाले की हो तू आहे का? हुशार आहे तुमची मुलगी. निशाद सांगत होता की स्पर्धा परीक्षा मध्ये नेहमी पुढे असते ही. तिचे बाबा तिच कौतुक ऐकून खुश झाले. तेवढ्यात निशाद पण तिथे आला. निशादचे बाबा तिला म्हणाले की एकाच तर कॉलेजला जातात तर निशाद सोबत का नाही जात तू. तर ती म्हणाली नको काका मी जाईल माझी माझी, उगाच याला त्रास. तर निशादचे बाबा म्हणाले की अग तयात काय त्रास, जात जा. तिचे बाबा म्हणाले की जात जा ते म्हणतात तर. ती निशादकडे पाहू लागली तर तो म्हणाला की येत जा.
तिला खरंतर आनंद झालेला पण असे त्याच्या मागे बसायला तिला अवघड वाटत होते. ती फक्त हसली आणि घरात निघून गेली. घरात आल्यावर बसतेच तो तिची आई म्हणाली की मला मदत कर जेवण बनवायला. ती खरतर खूप दमलेली पण तिला आठवले की आज निशाद, त्याचे आई बाबा येणारे जेवायला. मग ती लागलीच कामाला लागली. तो येणार तया आधी जरा तयार झाली. ते आले, मग जेवण गप्पा सुरू झाल्या. जेवणानंतर मग मोठी मंडळी घरात, अतुल आणि निशाद बाहेर गप्पा मारत होते. निता किचनमध्ये आवराआवर करत होती. ते पाहून निशाद ची आई म्हणाली की बरीच मदत करते की निता, नाही तर आजकालच्या मुली जरा हलत नाही. ते ऐकून निताचया आईला वाटले की हे उगाच विचार करतील की मी हिच्याकडून खूप काम करवून घेते. तिच्या आईने तिला आवाज दिला की भांडे असू देत मी सकाळी धुवेल. ती बाहेर आली आणि त्याच्या आई शेजारी बसली.
तिला कळले की तो बाहेर आहे. ती बाहेर आली तर तो हळुवार हसला आणि त्याच्या आईला म्हणाला की मी घरी जातो. ती विचार करू लागली की हा काहीच बोलला नाही. सकाळी लवकरच तिच्या आईने तिला उठवले आणि भांडी घासा कालची म्हणाली. तिला खरतर खूप झोप येत होती पण करावे तर लागणारच म्हणून ती उठली.
(क्रमशः)