Priyanka Kumawat

Tragedy Others

3  

Priyanka Kumawat

Tragedy Others

चांडाळ चौकडी

चांडाळ चौकडी

7 mins
264


नमिता, विद्या आणि शालिनी बस स्टॉप वर बसची वाट पाहत थांबलेल्या. सुहासिनी आजही नेहमीप्रमाणे लेट होती. विद्या हळुवार पणे आजूबाजूस बघत होती. आजूबाजूच्या गर्दीत तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला शोधत होती. तिची नजर एका मुलावर खिळली. तिने नमिता ला हळूच कोपर मारून त्याच्याकडे बघ असा डोळ्यांनी इशारा केला. नमिता ने त्याच्याकडे पाहिले आणि मग विद्या कडे खालून वर पाहत म्हणाली की कोणीही काय आवडत ग तुला येडी. यावर शालिनी जोरजोरात हसू लागली. दुरून सुहासिनी साडी सांभाळत पळत येत होती. शालिनी म्हणाली सुहासिनी आली म्हणजे बस येतच आहे. तेवढ्यात बस आली आणि तिघी वर चढून जागा सांभाळून बसल्या. सुहासिनी ने धावतच बसमध्ये इंट्री केली. 


विद्या म्हणाली की सुहासिनी कधीतरी टाईमवर येत जा ग. किती ती धावपळ? सुहासिनी म्हणाली अग आज वेळेवरच निघाले. सोसायटी गेटवर आल्यावर आठवले आईंच्या पायाच नाही पडले आज. मग परत घरी गेले त्यामुळे उशीर झाला. शालिनी म्हणाली अग एक दिवस नाही पडले असते तर काय फरक पडला असता? सुहासिनी म्हणाली अग उगाच परत या गोष्टीवरून वादाला आमंत्रण. नमिता म्हणाली की अग तू ऐकतेस ना म्हणून ऐकवतात ते, तु कितीही कर काहीतरी कमी दाखवतातच ते. सुहासिनी म्हणाली जाऊदे ग, सोड तो विषय. 


या चौघी एकाच एरियामध्ये राहतात आणि ऑफीस पण एकाच ठिकाणी. रोजची यायची जायची एकच वेळ त्यामुळे त्यांच्यात गट्टी जमलेली. चौघी त्यांचे सुखदुःख एकमेकांशी शेअर करत. सुहासिनी चे लग्न झालेले. सासू , ती आणि नवरा असे तिघेच घरी. सासू एकदम जुन्या आणि बुरसट विचारांची. कायम काहीतरी कुरापती काढून सुहासिनी ला त्रास द्यायची. सुहासिनी ला रोज साडीतच ऑफिस ला जा म्हणायची. तिच्या ऑफीस च्या कामात नेहमी अडसर आणायची. बिचारी ने पण जुळवून घेतलेले. साडीशी ही आणि सासू शी ही. नवरा कायम आईचीच बाजू घेणारा. हेच नशीब म्हणून सुहासिनी हसत सगळे सहन करायची. एक दिवस माझ्या प्रेमाने मी यांना बदलवेल या विचारांची. 


नमिता ही हुशार आणि चुणचुणीत मुलगी. दिसायला अगदी सुंदर. त्यामुळे स्थळ असे स्वतः हून चालत येतात तिला. पण नमिता प्रत्येकात दोष काढून परतवून लावते. आई वडील हिच्यासाठी आता कोण आणावा हाच सारखा विचार करत असतात. आता यांना कोण सांगणार? नमिता ला अमोल आवडतो पण घरच्यांना आज सांगेल, उद्या सांगेल म्हणून ती सारखे पुढे ढकलत असते. घरचे नाही म्हणतील या भितीने. कारण प्रेम विवाह करण्यास उत्सुक अशी त्यांच्या घरातील ती पहिली मुलगी आहे. शालिनी राहायला अगदी बोल्ड. पण तिला मुलांपेक्षा मुलींचे आकर्षण. ही गोष्ट तिला कळत होती पण वळत नव्हती. तिला याची भिती वाटत होती म्हणून तिने ही गोष्ट ना घरी ना तिच्या चांडाळ चौकडी ला सांगितली. 


विद्या ही दिसायला सर्वसाधारण मुलगी होती. तशी दिसायला बर्यापैकी सावळी. तिच्या घरचे आणि ती उत्स्फुर्तपणे वर शोधत होते आणि आलेले नकार ही पचवत होते. तर अशी ही चांडाळ चौकडी. त्यांचे ऑफीस आले तश्या त्या आपापल्या ऑफीस ला निघून गेल्या. साधारण दुपारच्या सुमारास विद्या ने त्यांच्या चांडाळ चौकडी या वॉटसप ग्रूपमधे मॅसेज सेंड केला की ती आज ऑफीसमधून लवकर घरी जाणार आहे. तिला आज मुलगा पाहायला येणार आहे. त्यावर तिघींनी तिला बेस्ट ऑफ लक चा मेसेज पाठवला. सुहासिनी दिवसभर बिझी होती. तिच्या ऑफीस मध्ये उद्या तिचा क्लाएंट येणार असतो आणि प्रेझेंटेशन तीच देणार असते. संध्याकाळी तिघीच सोबत घरी जात असतात. विद्या आधीच घरी गेलेली असते. 


नमिता म्हणते की मागे बघून गेलेल्या मुलाचा होकार आला आहे. आता मी नकार द्यायला काय कारण शोधू? जाम टेन्शन आलय मला. शालिनी म्हणते की तू घरच्यांना डायरेक्ट सांगून टाक. तू आधीच घाबरते. सांगून तर बघ. नमिता म्हणते की अग पण ते नाही म्हणाले तर? सुहासिनी म्हणते सांगून तर बघ. आपण ना मनातच ठरवत राहतो. सांगितल्या शिवाय त्यांना कसे कळेल? नमिता म्हणते बघू काय होतय ते. त्यांचा स्टॉप येतो तशा त्या आपापल्या घरी जायला निघतात. घरी गेल्या बरोबर सुहासिनी कामाला लागते. इकडे नमिता घरी तिचा नकार कळवते. या वेळेस तिची आई खूप संताप करते की मुलात नाव ठेवायला कुठे जागा नाही आता काय कारण आहे तुझ्याकडे? पण नमिता कडे याचे उत्तर च नसते. ती तिच्या रूममध्ये निघून जाते. 


इकडे विद्या ला पाहुणे बघून जातात. ती खूप खुश असते. ती त्या मुलासोबत स्वप्ने ही रंगवायला लागते. शालिनी तिच्या रूममध्ये बसून हे तिलाच का होतय याचा विचार करत असते. इकडे सुहासिनी सगळे काम आवरून हॉलमध्ये येऊन बसते. तेव्हा तिच्या सासूबाई तिला उद्या माझ्या बहिणी येणार आहे तेव्हा तु सुट्टी घे म्हणतात. सुहासिनी म्हणते की आई उद्या ऑफीस मध्ये माझे क्लाएंट येणार आहे. उद्या सुट्टी नाही मिळणार सांगते. त्यावर तिच्या सासूबाई चिडून म्हणतात की मग पाहुण्यांना कोण बघणार? मुलाकडे बघून म्हणतात की आता तूच सांग बाबा ईला. पाहुण्यांचे कोण करणार मग? हिची आई येणार असती तरी अशीच म्हटली असती का ही? सुहासिनी म्हणाली की तसे नाही आई, उद्या प्रेझेंटेशन मलाच द्यायचे आहे. त्यामुळे जायलाच लागेल मी ऐनवेळी नाही म्हणाली तर माझे इम्प्रेशन खराब होईल. पण ते तिचे काही एक न ऐकता त्यांचा निर्णय तिच्यावर लादतात. बिचारीला जास्त बोलायची संधी सुद्धा देत नाही. 


रात्रभर सुहासिनी आसवे गाळत होती. दुसऱ्या दिवशी ऑफीस ला आणि तिच्या चांडाळ चौकडी ला तिने मेसेज करून दिला की ती आज काही पर्सनल कामामुळे येऊ शकत नाही. फोन तसाच ठेवून ती पाहुण्यांची सरबराई करायला हसत तयार झाली. नमिता, शालिनी स्वतः च्या विचारात गुंगलेल्या. विद्या नेहमीप्रमाणे कालच्या पाहून गेलेल्या मुलाचा विचार करत होती. संध्याकाळी सुहासिनी च्या घरातील पाहुणे परत गेले. सहज फोन हातात घेतला तर तिच्या मॅनेजर चा मेल तिला आलेला. मेल वाचून ती खूप सुन्न झाली. शेवटी मीच ऐनवेळी दगा दिला मॅनेजर बरोबरच बोलत आहे असे स्वतःशी म्हटली. सकाळी पुन्हा शालिनी, नमिता, विद्या आधीच बसस्टॉप वर हजर. नेहमी प्रमाणे सुहासिनी ने धावत, साडी सांभाळत बस पकडली. 

विद्या खुश तर होती पण आतल्या आत अजून त्या मुलावाल्यांचा निरोप का नाही आला हा विचार करत होती.


नमिता, सुहासिनी, शालिनी स्वतः मध्येच गुंग होत्या. त्यांचा स्टॉप आल्यावर हलकेच एकमेकींना बाय करत ऑफीस ला निघून गेल्या. सुहासिनी ला तर आत जायची भिती वाटत होती. एक श्वास घेऊन ती आत गेली. जे व्हायचे होते तेच झाले. तिचा मॅनेजर तिला सगळ्यांसमोर खूप ओरडला. सुहासिनी परत ऑफीस बाहेर पडली. तिला खूप रडायला येत होते. तिने त्यांच्या चांडाळ चौकडी वर मेसेज केला की भेटायच का? थोड्या वेळात सगळ्यांचे हो म्हणून मेसेज आले. 


एका कॅफेमध्ये कॉर्नर सीट पकडून चौघी बसल्या. चौघी उदास होत्या. सुहासिनी ने शांतता तोडत २ दिवस घडलेले सगळे सांगितले. माझे करियर माझ्या घरच्यांच्या नजरेत शून्य आहे, सगळे करून काहीतरी नेहमी अपुर्ण आहे असे ते नेहमी दाखवतात. काय करू कळत नाही. काल खूप महत्वाचा दिवस होता माझा. पण त्याचे महत्त्व त्यांना कळलेच नाही. त्यांच्या नजरेत मी फक्त एक कामवाली बाई आहे. नमिता म्हणाली की माझ्या ही घरी कुरकुर चालू आहे. आईने अबोला धरला आहे. अमोल बद्दल सांगितल्यावर ते कसे रिअॅक्ट होतील? मला अमोलला गमवायचे नाही. विद्या म्हणाली की परवा पाहायला आलेल्या मुलाने नकार कळवला. आई खूप रडत होती फोनवर. मी काय करू मी अशी दिसते त्यात माझा काय दोष? आईवडील आता माझ्यावरच चिडायला लागलेत. कोणी मला पसंत करत नाही हा माझा दोष आहे का? 


सगळ्या आपले प्रॉब्लेम सांगत होत्या. आज कुणीही कोणाला सजेशन देत नव्हत्या कारण आज त्या त्यांच्या समस्येवर तोडगा काढायला जमलेल्या. इतक्या वेळची शांत असलेली शालिनी म्हणाली की मी खूप दिवसांपासून तुमच्या पासून एक गोष्ट लपवत होते कारण मलाच तिची पुष्टी करता येत नव्हती. ती असे म्हणताच सगळ्या तिच्या कडे भुवया उंचावून पाहू लागल्या. तिने घट्ट डोळे मिटले. तोंडात शब्दांची जुळवाजुळव केली आणि म्हणाली की लहानपणी मी खूप नॉर्मल होते. पण जसेजसे मोठी होत गेली तसतसे माझ्यात पण इतरांप्रमाणे बदल होत गेले. पण माझ्यात होणारे बदल हे खूप वेगळे होते. ती २ मिनिटे शांत झाली. 


मला इतर मुलींसारखे मुलांमध्ये इंटरेस्ट नाही. मला मुलींकडे पाहून आकर्षण होते. ती असे म्हणताच सगळ्या आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागल्या. ती म्हणाली की प्लीज मला सोडू नका. तुम्हाला काय कुणालाही पटणार नाही म्हणून मी हे कोणालाही सांगितले नाही. घरच्यांना ही नाही. पण मला माझेच हे पटत नव्हते. पण शेवटी मी हे मान्य केले आहे. पण घरच्यांना हे कसे समजावून सांगू? ती हे म्हणताच सगळ्या सुन्न झाल्या. नमिता तिच्या हातावर हात ठेवून म्हणाली की यात तुझी चूकी नाही. देवाने दिलेले वाईट होऊच शकत नाही. विद्या म्हणाली की बस झाले आपण आता हे प्रॉब्लेम घेऊन जगू शकत नाही. आपण मनातच कुढत बसण्यापेक्षा घरच्यांशी बोलू या. जे होईल ते होईल. पण निदान रडत बसण्यापेक्षा प्रयत्न तरी करू. असे म्हणून तिने हात पुढे केला. शालिनी ने तिच्या हातावर हात ठेवला. नमिताने पण थोडा विचार करून हात ठेवला.


पण सुहासिनी हात ठेवायला तयार नव्हती. ती म्हणाली की माझ्या नवऱ्याला आणि आईंना सांगून काही फायदा नाही. शालिनी म्हणाली की सांगून तर बघ ना? तु आज हे सांगितले नाही तर आयुष्यभर अशी कुढत राहशील. सुहासिनीने पण जरा विचार करून हात हातावर ठेवला. त्या चौघींच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली. एक नवी उमेद आणि आत्मविश्वास घेऊन त्या कॅफेबाहेर पडल्या.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy