ती सावत्र ३
ती सावत्र ३


ती उगाचच त्याच्या आसपास घुटमळत राही. एके दिवशी तो कॉलेजला आलाच नाही. ही खूप कासावीस झाली. आधीच २ दिवस कॉलेजला सुट्टी असल्याने तिने त्याला पाहीलेले नव्हते. पुण दिवस तिचे लक्ष अभ्यासात नव्हते. तिला वाटले की त्याला बरे नसेल तर मग तिने देवाकडे प्रार्थना केली की त्याला बरे वाटू दे. ती देवाला महणाली की असेही माझ्या आयुष्यात आईचे प्रेम नाही तर निदान हे तरी राहू दे. तिच्या मैत्रीणी विचार करू लागल्या की ही अशी विचीत्र का वागतेय.
कॉलेज संपले तशी ती उदास मनाने घरी निघाली. घराजवळ येताच तिला एक आेळखीचा आवाज ऐकू येत होता. तिला वाटले की तिला भास होतोय. ती विचार करायला लागली की मी प्रेमात ठार वेडी झालीय. तिच्या आेठावर हसू उमटले. तिने घरात प्रवेश केला तसे ती आश्चर्यचकित झाली. दिवसभर ती ज्याचा विचार करत होती, ज्याचा साठी देवाला साकडे घालत होती तो तिच्यासमोर होता. तिच्या घरी. तिला वाटले की तिला भास होतोय परत. हे कसे शक्य आहे. त्याचे पण तिच्याकडे लक्ष गेले. तो काही बोलणार इतक्यात तिची आई आली आणि तिला पाहून त्याच्या आईला म्हणाली की ही निता. निताने पाहीले की त्याची आई त्याच्या शेजारी बसलेली होती. पण तिचे लक्ष त्याच्याकडे होत महणून तिला कळलेच नाही.
त्याची आई त्याची ओळख करून देत म्हणाली की हा माझा मुलगा निशाद. तेवढ्यात निशाद बोलला की आई ही माझ्याच कॉलेजला आहे. निताला गालातल्या गालात हसु फुटले की हा पण मला ओळखतो. निताची आई तिला म्हणाली की दारातच थांबणार आहेस का? तशी निता भानावर आली. तिला वाटले की आपण आल्यापासून दारातच आहोत मूर्खासारखे. निशाद काय विचार करेल की किती बावळट आहे ही मुलगी. ती
आत आली तसे निशादची आई तिला म्हणाली की ते तिच्या शेजारी राहायला आलेत. आधीच्या धक्क्यातून सावरते न सावरते तोच परत सुखद धक्का. तिला आठवले की त्यांचे शेजारचे घर वर्ष झाले बंद होते. ती वेळ न दवडता निशाद च्या आईला म्हणाली की काकु काही मदत लागली तर जरूर सांगा. तशी निताची आई म्हणाली की हो खरच सांगा, मला नाही तर निदान तुम्हाला तरी तिची मदत होईल आणि हसायला लागली. निताचा चेहराच पडला.
ते त्यांच्या घरी गेल्यावर तिची आई म्हणाली की जरा मलाही घरात हातभार लावा. तिची आई किचन मधे निघून गेली तसे ती विचार करु लागली की आता हा कायम नजरेसमोर असेल. ती मनोमन खुश झाली. देवघरात जाऊन देवाच्या पाया पडून आली. तिच्या आईला म्हणाली की तु राहू दे मी बनवते जेवण. तिची आई म्हणाली बघ चारचौघात तुला बोलले की कशी वठणीवर येतेस तु. पण निताचे तिच्या आईकडे लक्षच नव्हते. ती तिच्याच विश्वात गुंग होती. थोड्या वेळाने तिची आई परत आली आणि तिच्या पाठीत एक धपाटा घालून महणाली की भवाने लक्ष कुठे आहे. किती वेळचे सांगतेय गैस बंद कर ४-५ शिट्या झाल्या. तिने पटकन गैस बंद केला अन बाहेर आली. त्याच्या घराकडे हळूच वळून पाहू लागली तसा तो तिला दारातच उभा दिसला. तिने झटकन मान वळवली. तिला वाटले की कशी मी मूर्ख. तो काय विचार करेल.
ती घरात जायला वळू लागली तसा त्याने तिला आवाज दिला. तिच्या जवळ आला आणि काही बोलणार इतक्यात तिचे बाबा बाहेरुन आले आणि त्यांना पाहू लागले. तिला मागचे आठवले. तिला बांबाकडे पाहायला पण भिती वाटू लागली.
***********
लवकरच पुढील भाग प्रकाशित करेल.
please leave your comments