Author Sangieta Devkar

Drama Children

4.0  

Author Sangieta Devkar

Drama Children

सरोगसी आई आणि लॉकडाऊन

सरोगसी आई आणि लॉकडाऊन

5 mins
275


अहो आज रात्री मुग्धा आणि मंदार येणार आहेत. वनिता पराग ला नाष्टा देत सांगत होती. मग काय स्वारी एकदम खुश असणार आज अमेरिके हुन बहीण भाऊजी येणार म्हंटल्यावर! हो आहेच खुश आणि आपली लाडकी मावू येणार म्हणून संकेत सावी ही खुश आहेत. काय ग पण सहज येत आहेत की काही काम आहे भारतात पराग ने विचारले. आपला ही नाष्टा टेबलवर ठेवत वनिता बोलली तुम्हाला माहीत आहे ना मुग्धा आणि मंदार च्या लग्नाला पाच वर्षे झाली पण अजून त्यांना मूल नाही झालं . तिथे मुग्धा ची ट्रीटमेंट केली तर तिला गर्भाशयाचा एँडीनोमायोसिस या तीव्र आजाराचे निदान झाले आणि हा आजार उपचाराने ही बरा होत नाही. त्यामुळे मुग्धा आई नाहीच होऊ शकणार म्हणून त्यांनी सरोगसी चा निर्णय घेतला आहे त्या साठीच ते इकडे येत आहेत. इथे सरोगसी साठी कोण मिळते का बघणार आहेत आणि मग इथेच सगळी प्रक्रिया करून मूल घेऊनच अमेरिकेला परत जाणार आहेत. ओके मग काय आणायचे असेल तर तसे मला व्हाट्स अँप कर मी निघतो ऑफिस ला पराग म्हणाला. सावी आणि संकेत ला बाय करत तो बाहेर पडला.


वनिता ने घर छान आवरले सावी आणि संकेत शाळेला गेले होते. मुग्धा वनिताची लहान बहीण आणि एक मोठा भाऊ होता त्यांना. मुग्धा च्या आवडीचा स्वयंपाक करायचा तिने ठरवले तशी तयारी सुरु केली. पाच वर्षा पूर्वी मुग्धा आणि मंदार लग्न करून अमेरिकेला गेले होते तिकडेच स्थाईक झाले. अधूनमधून भारतात यायचे. वनिताने सगळी कामे आटोपली. कधी मुग्धा येते असे तिला झाले होते. रात्री 10 वाजता मंदार आणि मुग्धा आले. मग एकत्र जेवण झाली. मुग्धाने सावी वर्ष 10 आणि संकेत 8 वर्ष त्यांना खेळणी आणली होती चॉकलेटस आणले होते कपडे ही घेऊन आली होती. तिला मूल न्हवते म्हणून ती भाच्या वर जीवापाड प्रेम करत होती. भाच्याची पण ती लाडकी माऊ होती. जेवण झाल्यावर पराग म्हणाला,मंदार वनिताने सांगितले मला तुमच्या बद्दल मग त्या संदर्भात काही माहिती किंवा कोणी महिला पाहीली आहे का की जी सरोगसी साठी तयार असेल. आमच्या डॉक्टरांनी इथल्या एका डॉक्टराना भेटायला सांगितले आहे ते सगळं मॅनेज करतील असे बोलले मंदार म्हणाला. मग थोड्या गप्पा मारून सगळे झोपायला गेले.


सकाळी लवकर आवरून मुग्धा आणि मंदार त्या डॉक्टरांना भेटायला गेले. सगळी केस त्यांनी स्टडी केली. आणि एक महिला सरोगसी साठी तयार असल्याचे सांगितले. त्या महिलेला कधी भेटता येईल आम्हाला मुग्धा ने विचारले. थोड्या वेळात ती महिला येईल माझे बोलणे झाले आहे तुम्हाला सगळं पटले तर पुढे आपण ट्रीटमेंट सुरू करू डॉक्टर बोलले. मग थोड्या वेळात एक सावळी पण दिसायला सुंदर सुदृढ अशी महिला तिथे आली डॉक्टरांनी तिला बसायला सांगितले आणि म्हणाले,या वैशाली याच त्या सरोगसी मदर यांची मी पूर्ण तपासणी केली आहे काही ही दोष नाही यांच्यात. तुम्हाला काही विचारायचे तर विचारा . मग मुग्धा बोलली तुम्ही काय करता वैशाली. मी स्वयंपाकाची काम करते माझे पती मजूर आहेत आणि दोन लहान मूल आहेत मला. पण आमच्या दोघांच्या पगारात काही भागत नाही . मुलांचं शिक्षण,कपडा खानपान सगळं नीट होत नाही. त्यात माझा लहान मुलगा पाच वर्षांचा आहे तो आजारी असतो त्याचे औषध पण बघावे लागते म्हणून मी तुमच्या मुलाला जन्म द्यायला तयार झाले मला पैशाची गरज आहे. वैशाली बोलली. मग सगळं ओके ठरवून मंदार आणि मुग्धा घरी आले.


थोड्याच दिवसात मंदार चे शुक्रजंतू आणि मुग्धाचे स्त्री बीज यांचा हॉस्पिटल मधील प्रयोगशाळेत यशस्वीरित्या संयोग घडवून आणला आणि गर्भ तयार केला तो गर्भ वैशाली च्या गर्भाशयात रोपण केला गेला. आता वैशाली मुग्धा आणि मंदार यांनी तात्पुरता रेंट ने फ्लॅट घेतला होता तिथे राहत होती. वैशाली ला उत्तमोत्तम ट्रीटमेंट आणि आहार दिला जात होता. चांगलं खाणं,दूध फळे हे खाताना वैशाली चा जीव कासावीस व्हायचा आपली पोर घरी काय खात असतील आणि मी इथं चांगलचुंगल खात बसले असा विचार करून तिचे डोळे भरून यायचे पण हे सगळं आपल्या लेकरांच्या सुखा साठी भविष्यासाठीच आहे हे मानत येताच ती शान्त व्हायची. महिन्यातून एकदा तिला पती आणि मुलांना भेटायला मिळायचे तेव्हा मुग्धा तिच्या मुलांना खाऊ ,खेळणी द्यायची. काही पैसे ही तिच्या पती ला द्यायची. मुग्धा आणि मंदार स्वभावाने किती छान आहेत असे वैशाली ला वाटायचे असल्या देव माणसानच्या उपयोगी मी पडले तर ते माझे भाग्यच असे म्हणायची. आता वैशालीला तीन महिने झाले होते. अचानक काही काम आल्या मुळे मंदार आणि मुग्धा ला अमेरिकेला जाण भाग होत. काम झाले की लगेचच परत यायचे असे मुग्धाने ठरवले होते. वैशाली ची सर्व व्यवस्था करून आणि वनिता ला लक्ष द्यायला सांगून मुग्धा अमेरिके ला गेली. तेव्हा मार्च महिना नुकताच सुरू झाला होता आणि कोरोना चा संसर्ग सुरू झाला सरकार ने लॉकडाऊन जाहीर केले.


मुग्धा अमेरिकेत अडकली तिला भारतात येणे अवघड झाले. वैशाली ची तिला काळजी वाटू लागली. फोनवर व्हिडिओ कॉल वर मुग्धा तिची चौकशी करू लागली. असेच वैशाली ला सात महिने पूर्ण झाले. आणि अचानक तिला बी पी चा त्रास होऊ लागला म्हणून मग डॉक्टरांनी तिची प्रसूती ड्यु डेट च्या आधी करण्याचे ठरवले. तशी कल्पना मुग्धा आणि मंदार ला दिली. आणि वैशाली ने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मुग्धा मंदार वनिता पराग आणि वैशाली सुध्दा खूप खुश झाली. मुग्धा चे तिकडे लक्ष लागत न्हवते कधी भारतात जाते आणि बाळा ला मिठीत घेते असे झाले होते. पण लॉकडाऊन मुळे विमान सेवा बंद होती. मुग्धा चा जीव आपल्या बाळा साठी कासावीस होत होता आणि वैशाली जो पर्यंत मुग्धा ला तिचे बाळ देत नाही तोपर्यंत आपल्या घरी जाऊ शकत नवहती. दोघी आया आप आपल्या पिल्ला साठी व्याकुळ झाल्या होत्या पण नाईलाज होता. मुग्धा बाळाच्या आठवणीने रडायची आणि कोरोना ला कोसत राहायची मग मंदार तिची समजूत घालायचा. आपलं बाळ सुरक्षित आहे वनिता पराग पण आहेत नको काळजी करु म्हणायचा. मुग्धा ने वैशाली ची डिलिव्हरी केली त्या डॉकटराना विनंती केली की तिला भारतात यायचे आहे. मग त्यांच्या ओळखीच्या एका वकील मित्राने अमेरिकेतील वकीलाशी मेल द्वारे संपर्क केला आणि सरोगसी मदर च्या हक्का बद्दल ची माहिती पटवून दिली .त्या नन्तर अमेरिके हुन भारतात येणाऱ्या "वंदे भारत " योजनेतील एका विमानात एकाच व्यक्तीला भारतात जाण्याची परवानगी दिली गेली.


इकडे वैशाली ही चिंतेत होती की जर मुग्धा ला यायला नाही मिळाले तर या बाळा ला कोण सांभाळनार? मग मुग्धा भारतात आली पण इथे येऊन ही तील लगेचच बाळाला भेटता नाही आले. तिला चौदा दिवस कोरोंटाइन व्हावे लागले . मुग्धा नाराज झाली पण बाळा साठी सातासमुद्र पार आली होती तिथे अजून काही दिवस तिला बाळाचा वियोग सहन करावा लागणार होता. हे चौदा दिवस संपले आणि मुग्धा बाळा कडे आली वैशाली ला आणि बाळा ला घट्ट मिठी मारली. डोळे भरून बाळा ला पाहिले तेव्हा तिचे समाधान झाले.एक महिन्यांनी ती बाळा ला भेटत होती.अनेक वर्षांनी मिळालेल्या मातृत्वाने तिचा चेहरा फुलला होता. आणि वैशाली ही आपल्या जबाबदारी तुन मोकळी झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama