Jyoti gosavi

Thriller

4.5  

Jyoti gosavi

Thriller

सिक्कीमची सहल

सिक्कीमची सहल

2 mins
268


सिक्कीमच्या टूरला गेलो होतो. सिक्किम हा तसा हिमालयाचा भाग, त्यातील राहणारे लोक नेपाळी .आपल्याला हे माहीत पण नाही नेपाळी लोक आपल्या भारताचा भाग देखील आहेत. आपण नेपाळी म्हणजे नेपाळचे एवढेच समजतो. तिथला निसर्ग रम्य आहे. गँगटोक तिथली राजधानी. डोळ्याचे पारणे फिटावे इतके सुंदर धबधबे तेथे आहेत. सिक्कीम फिरता-फिरता असे वीस ते पंचवीस धबधबे आम्हाला आढळले मे महिन्याचे दिवस असल्यामुळे हिमालयातील बर्फ वितळलेले असते त्यामुळे धबधबे एकदम जोरदार असतात अशाच एका रम्य धबधब्यापाशी गाडी थांबवली धबधब्याच्या बाजूने बऱ्यापैकी झाडी होती आणि टेकाडावर जावे त्याप्रमाणे पायवाट पण होती आम्ही तिथे गेलो, छान फोटो वगैरे काढले, निसर्गाचा डोळे भरून चमत्कार पाहिला आणि खाली उतरत होतो खाली उतरताना एक साप अगदी आमच्या जवळून गेला म्हणजे आम्ही त्याला चांगला जवळून पाहिला. त्यानंतर खाली उतरलो गाडीत बसलो. मिस्टरांचा त्या दिवशी वाढदिवस होता .साधारण तासाभराने मी त्यांच्या पाया कडे पाहिले तर त्यांची चप्पल रक्ताने भरलेली तुम्हाला असं काय झालं, आणि एवढं रक्त येईपर्यंत तुम्हाला कळत कसं नाही? त्यावर ते म्हणाले की त्यांना काहीच वेदना वगैरे होत नाहीत किंवा काही चावल असेल तरी कळलं नाही.


कपड्याने पाय पुसला चप्पलचे रक्त पुसले पण अगदी मोहरीच्या दाण्याएवढी एकदम दात लागल्यासारखी जखम होती व त्यातून सतत रक्त येत होते त्यामुळे नंतर काळजी वाटू लागली काय झालं असेल काय चावल असेल आम्ही तर अशा आडरानात आहोत, तिथे लवकर वैद्यकीय मदत पण मिळू शकत नाही आज त्यांचा वाढदिवस आणि त्यादिवशी हे असा अचानक काय झालं शिवाय तो साप जवळून गेल्याची आठवण झाली, मग त्यांना सारखं खोदून खोदून विचारलं की तुम्हाला तेव्हा काही टोचलं का? चावलं का? जवळ-जवळ दोन-तीन तास जखम सतत पाझरत होती. शेवटी त्यांना मीठ खायला लावलं तिखट खायला लावलं जेणेकरून जिभेची चव बरोबर आहे का ते बघितलं कारण जर विषारी साप वगैरे चावला असेल तर माणसाच्या फाईव्ह सेन्सेसवर परिणाम होतो डोळ्यांना ब्लर दिसते आणि जिभेला तिखट-मीठ काही कळत नाही

त्यांना तिखट मिठाची चव बरोबर कळत होती सोबत मिरची होती ती चावायला लावल्याने त्यांचे तोंड भाजले व ते आमच्यावर भडकले तरी, आम्हाला आनंद झाला. नाही! जे काही आहे ते विषारी नाही! मग आम्ही ड्रायव्हरला जवळ येथे कोठे दवाखाना आहे का विचारले काय झाले ते सांगितले त्यावर त्याने गाडी साईडला घेऊन कोणतातरी झाडपाला घेऊन आला व त्या रक्त येणाऱ्या जागी लावला हा इलाज मात्र गुणकारी ठरला रक्त पाझरणे बंद झाले मग त्याने सांगितले येथील गवतात जळवेसारखे किडे आहेत ते चावताना कळत नाही. त्यांच्या विषारी लाळेमुळे चावलेले कळत नाही पण नंतर दोन-तीन तास रक्त वाहते ते जळवेसारखे स्वतःचं पोट भरेपर्यंत शरीराला चिटकुन राहतात. आम्ही त्याचा खूप शोध घेतला पण तो सापडला नाही आणि जवळजवळ एक तासाने पॅंटीच्या आत पायाच्या शिवणी पाशी तो आत जाऊन बसलेला मिळाला झटकन त्याला बाहेर ओढून रस्त्यावर टाकले आणि तेव्हाच आमचा जीव भांड्यात पडला अशा या या अनपेक्षीत प्रसंगाने आमचे धाबे दणाणले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller