शौर्य ,साहस
शौर्य ,साहस


गेल्या चार वर्षापूर्वी माझ्याकडे इ. पहिलीचा वर्ग होता.वर्ग जरा लहान,बसायला खाली सतरंजी ,खिडक्या लहान असा वर्ग ...
पहिलीची मुले लहान .बाई म्हणजे त्यांचे विश्व.बाई या मुलांना फारच आवडतात.प्रायमरी पर्यंत बाई त्यांच्या लाडक्या असतात.
तर झाले असे उन्हाळ्याचे दिवस होते.वर्गात खूप गरम व्हायचे.मी मुलांना घेवून बाहेर मैदानावर बरेचदा अभ्यास घेत बसायची.
एके दिवशी आम्ही परिपाठानंतर वर्गात गेलो.मागच्या स्वप्नील नावाच्या मुलाने मला हाक मारली.आणि ओरडला "बाई,पाल ,पाल "
मला पालीची खूप भीती वाटते.मीच ओरडले घाबरुन पटकन.मुले माझ्याकडेपाहायला लागली.बाईंना भीती वाटते? हे प्रश्नचिन्ह मुलांच्या चेहर्यावर दिसत होते.मी तर वर्गाच्या बाहेर जावून उभी राहीले.मुलांना जवळ घेतले.मावशींना बोलावले.
तो पर्यंत स्वप्नील माझी नजर चुकवून चप्पल घालून वर्गात गेला.राज आणि प्रवीण या दोघांनाही उत्सुकता होती.तिघे मिळून पालीला शोधले.तिला मारली.मावशिंना सांगितले.
मला हायसे वाटले.परत वर्गात जायची इच्छाच होईना.स्वप्नील मला म्हणाला,"बाई,चला वर्गात मारलं मी पालीला." आणि हाताला ओढत वर्गात नेले.
स्वप्नीलचा हा साहसी स्वभाव..
मला खूप भावला.आणि आपलेपणा त्याहून आवडला.
लहानपणीच मला त्याचे "शौर्य,साहस" समजून आले. मोठा झाल्यावर त्याला सैनिक व्हायचे आहे.
मुलाचे पाय पाळण्यात दिसतात....तसे मला स्वप्नील मोठा झाल्यावर निश्चितच एक सुजाण ,जबाबदार नागरिक घडेल यात शंकाच नाही.