शापित ययाति
शापित ययाति


हस्तिनापूरचा राजा नहुष ज्याने इंद्राचा पराभव केला... कित्येक अश्वमेघ यज्ञ केले.. असा हा पराक्रमी राजा ज्याला इंद्रावर विजय मिळविल्यामुळे गर्व होतो.. व तो जगातील सर्व गोष्टीचा उपभोग घेण्याचा विचार करतो.. त्याची इच्छा इंद्राची पत्नी इंद्रायणीला वश करण्याची होते... पण इंद्राणी त्याला अट घालते की माझ्यापर्यंत पोहचण्यासाठी काही तरी वेगळे करावे लागेल.. तेव्हा तो ऋषींची पालखी करून इंद्राणीपर्यंत जाण्याचा विचार करतो.. पण गर्वाने फुललेल्या राजाला थोडाही धीर नसतो.. तो जलद इंद्राणीपर्यंत पोहचण्यासाठी अगस्ती ऋषीला लाथ घालतो तेव्हा ते त्याला शाप देतात नहुष राजा, "तु आणि तुझी मुले कधीही सुखी होणार नाहीत.. नहुष राजाला खुप होतो पण तो काहीच करू शकत नाही..
नहुष राजाला दोन मुले असतात..थोरला यती व धाकटा ययाती... यतिला ह्या शापाबद्दल तो दहा अकरा वर्षाचा असतानाच कळते तेव्हा तो घर सोडून जातो व संन्यास घेतो....ययातीला लहानपणी फुल झाडें खुप आवडतात..तेव्हा नहुष राजा त्याला सांगतात की राजाला पराक्रम आवडायला पाहिजे..फुल, झाडें नाही.. ती भावना खोलवर ययातीच्या मनामध्ये बिंबवतात.. वयाच्या सतरा अठराव्या वर्षी शत्रूचा पराभव करून ययाति अश्वमेध यज्ञ करून करून विजय मिळवतो.. लहानपणीच ययातीला त्याची आई यति बद्दल सांगते आणि यति प्रमाणे संन्यास न घेण्याची शपथ ययाति कडून घेते.. अश्वमेध यज्ञ करून परत येतांना ययाति ची भेट एका ऋषीं शी होते.. तो ऋषीं यति म्हणजे त्याचा थोरला भाऊ असतो.. जेव्हा ययाति त्याला परत येण्याची विनंती करतो तेव्हा त्याला घरी परत येण्याची यतीला संसाराची घृणा असते आणि तो त्याला नकार देतो.. नहुष राजा अंथरूनला खिळाले तेव्हा त्यांचे दुःख ययाति ला बघवत नव्हते तेव्हा राजवाडा पासून लांब अशोक वनात राहण्याचा सल्ला त्याची आई ययाति ला देते.. व तिथे त्याच्या सेवेसाठी अनेक दास दासी देते.. कालांतराने नहुष महाराजांचा मृत्यू होतो व ययाति चा राज्याभिषेक होऊन तो सम्राट होतो...
शुक्राचार्य हा दैत्याचा गुरु असतो.. त्याला एक कन्या असते.. तिचे नाव देवयानी असते... ती खुप सुंदर असते पण ती गर्विष्ठ आणि कोपिष्ट असते.. देवयानीला शुक्राचार्याचा शिष्य कच आवडतो पण कच देवयानीला गुरु बहीण मानतो आणि तिला श्राप देतो की तुझे लग्न ऋषिपुत्रांशी होणार नाही.. दैत्याच्या राजाची कन्या शर्मिष्ठा ही देवयानी ची मैत्रीण असते.. त्या दोघी एकत्र खेळून मोठे होतात...शर्मिष्ठा आणि देवयानी एकत्र खेळतात तेव्हा देवयानीला वाटते की शर्मिष्ठा ही राजकन्या असल्यामुळे आपला उपहास करते... जेव्हा देवयानी आणि शर्मिष्ठा मैत्रिणीसोबत जलक्रिडेला जाते तेव्हा शर्मिष्ठा ला चुकून तिच्या दासी देवयानीचे वस्त्र देतात. जे देवयानी ला कचाने दिलेले असतात तेच वस्त्र शर्मिष्ठाला देतात तेव्हा देवयानी चिडून शर्मिष्ठाच्या अंगावरचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न करते.. तेव्हा शर्मिष्ठा देवयानीला ऋषिकन्या म्हणून हिणवते.. व ते देवयानीला सहन न झाल्यामुळे देवयानी शर्मिष्ठा ला मारून पळत सुटते.. देवयानीने जीवाचे काही बरे वाईट करू नये म्हणून शर्मिष्ठा देवयानीच्या मागे जाते.. व पुढे एक विहीर असते.. दोघींच्या भांडणात देवयानीचा तोल जातो व ती विहिरीत पडते.. शर्मिष्ठा घाबरून तिथून पळ काढते.. तेव्ह्ड्यातच ययाति तिथून जात असतो.. त्याला विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज येतो.. आवाज ऐकून तो विहिरीत डोकावतो तेव्हा देवयानी त्याला वाचविण्याचे विनंती करते.. ययाति तिला विहिरीतून बाहेर काढतो.. विहिरीतून बाहेर काढल्यावर देवयानी त्याला म्हणते तु माझा हात धरला त्यामुळे तुला माझ्याशी लग्न करावे लागेल.. दोघे विवाह करतात ती आपल्या पित्याला म्हणजेच शुक्राचार्याला घडलेला प्रकार सांगते...शर्मिष्ठा ने तिला ऋषीं कन्या म्हणून कसे हिनवले आणि कसे विहिरीत ढकलले आणि ययाति ने वाचविले हे सांगते.. शर्मिष्ठाचा बदला घेण्यासाठी तिला सोबत दासी बनवून नेण्याचा हट्ट करते..शुक्राचार्याचे मुलीवर जीवापाड प्रेम असते म्हणून तो क्रोधाने राजाकडे जातो आणि शर्मिष्ठाला दासी बनवून पाठविण्याचा राजाला आदेश देतो... राजाला ही गोष्ट बिलकुल आवडत नाही पण शुक्राचार्य शीघ्र कोपी असतो आणि नाही म्हटले तर पूर्ण प्रजेसह शुक्राचार्य राज्य भस्म करू शकेल ह्या भीतीपोटी तो शर्मिष्ठाला म्हणजे आपल्या लाडक्या कन्येला देवयानी सोबत दासी बनवून पाठवतो.. राजकन्या देवयानीची दासी बनते पण हे ययातीला हे बिल्कुल आवडत नाही.. शर्मिष्ठा देवयानीची निमूटपणे सेवा करते.. राजकन्या असून देवयानीची निमूटपणे सेवा करतांना पाहून शर्मिष्ठा ययातीला आवडायला लागते व शर्मिष्ठालाही ययाति आवडायला लागतो. ही गोष्ट जेव्हा देवयानीच्या लक्षात येते तेव्हा देवयानी शर्मिष्ठाला अशोक वनात कैद करते.. पण एक दिवस ययाति तिथे जातो व शर्मिष्ठा चे मन ओळखून तिच्याशी गांधर्व विवाह करतो.. कालांतराने देवयानीला पुत्र प्राप्ती होते व ती त्याचे नाव यदु असे ठेवते.. शर्मिष्ठा ही गरोदर राहते. देवयानी तिला त्याचा जाब विचारते तेव्हा ऋषींच्या आशीर्वाद आहे असे उत्तर देते.. शर्मिष्ठा ला ही पुत्र होतो त्याचे नाव ती पुरुरवा अशी ठेवते.. देवयानी काही पूजा करते तेव्हा ऋषीं भविष्य वाणी करतात की यदु सम्राट होणार नाही.. तेव्हा देवयानी ला आश्चर्य वाटते..हे ऐकून ती पुरुरवा व शर्मिष्ठा लाही बोलावते.. तेव्हा ते ऋषीं भविष्यवाणी करतात की पुरुरवा सम्राट होईल.. तेव्हा देवयानीला संशय येतो की हा ययातीचाच पुत्र आहे तेव्हा देवयानी शर्मिष्ठा आणि पुरुरवाला तळघरात डांबून ठेवते.. ययतीच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर तो दोघांची सुटका करून देतो तेव्हा शर्मिष्ठा पुरुरवाला घेऊन मार्ग सापडेल तिथे चालू लागतात.. वाटेत तिला यति भेटतो.. तेव्हा शर्मिष्ठा त्याला हकीकत सांगते. तो शर्मिष्ठा व पुरुरवाला अगस्ती ऋषींच्या आश्रमात सोडतो.. तिथे पुरुरवा सर्व प्रकारच्या विद्या ग्रहण करतो..
शर्मिष्ठाला सोडवायला ययातीने मदत हे कळल्यावर देवयानी ययातीला अशोक वनात कैद करते व सर्व स्वतः राज्य कारभार बघते... कालांतराने यदु व पुरुरवा दोघेही मोठे होतात..हस्तिनापुरवर मोठे संकट येते.. शत्रू हल्ला करतो.. तेव्हा यदूला पराभूत करून शत्रू डांबून ठेवतात.. पुरुरवाला जेव्हा कळते की आपले राज्य धोक्यात आहे तेव्हा पुरुरवा शत्रूचा सामना करतो व शत्रूला पराभूत करून यजुला सोडवून आणतो.. यजु आणि पुरुरवा हस्तिनापुरात येतात तेव्हा सर्व पुरुरवाचे खुप कोडकौतुक करतात पण देवयानीला माहिती नसते की पुरुरवा कोण आहे ते.... शर्मिष्ठा खुप प्रतीक्षा केल्यांनतर पुरुरवाला शोधायला हस्तिनापुरात येते. तेव्हा देवयानीला कळते की पुरुरवा ययातीचाच मुलगा आहे..
देवयानीचे लग्न होते तेव्हा शुक्राचार्य घोर तपसचर्या करण्यासाठी व दैत्यांना जीवन संजीवनी मिळवून देण्यासाठी अरण्यात निघून जातात.. आणि शर्मिष्ठा जेव्हा शोधायला आलेली असते त्यावेळीच शुक्राचार्य परत येतात. आपल्या कन्येची दुर्दशा पाहून ययातीला श्राप देतात की तु ह्या क्षणीच जर्जर वृद्ध होशील.... तेव्हा ययाति व देवयानी दोघेही उशाप मागतात.. दिलेला श्राप परत घेता येत नाही म्हणून ते म्हणतात की तुझ्या वनशातला कुणी तरुण हा वृद्धत्व घेईल तर तुझा श्राप मागे घेता येईल .. तेव्हा पुरुरवा ययातीचे वृद्धत्व घ्यायला तयार होतो.. परत ययाति तरुण होतो पण पुरुरवा वृद्ध होतो.. स्वतःच्या मुलाची ही दशा ययातीला बघवत नाही.. म्हणून शुक्राचार्याला पूर्ववत करून मी स्वतः वृद्धत्व स्वीकारायला तयार आहे अशी मागणी करतो.. पण श्राप परत घेणे शक्य नसल्यामुळे पुरुरवा पूर्ववत होताच तुला मरण येईल असे शुक्राचार्य ययातीला सांगतो.. ययाति ला ते मान्य असतो... ययातीला मरणाची खन्त वाटत नाही.... इतक्यात कच तिथे असतो त्यालाही तपस्चर्येने संजीवनी विद्या प्राप्त झाली असते तो ययातिचा श्राप मागे घेतो.. व यदु पेक्षा पुरुरवा बलवान असल्यामुळे तो सम्राट होतो...