Priyanka Kumawat

Horror Thriller

4.0  

Priyanka Kumawat

Horror Thriller

शाळेतील भूत कथा

शाळेतील भूत कथा

5 mins
595


ही कथा आहे एका शाळेची आणि तिथे घडणाऱ्या अमानवीय घटनांची. एक नावाजलेली संस्थेच्या शाळा सर्वदूर होत्या. त्यांना सांगलीत पण एक शाळा काढायची होती. त्यासाठी त्यांना ३२ एकर जमीन तरी लागणार होती. जागा त्यांना मिळाली पण शहराबाहेर १०-१२ किमीवर. तिथून आसपास चे गाव पण ५-६ किमीवर असतील. बांधकाम सुरू झाले. खोदकाम करताना मजुरांना बरेच सांगाडे मिळू लागले. संस्थेच्या लोकांना कळले की ही जागा आधी दफन करण्यासाठी वापरत. मजुर काम सोडून जाऊ लागले. संस्थेने त्यांना जास्त वेतन देऊन काम करून घेतले. 


बघता बघता काम पूर्ण झाले. मेन गेट च्या एका बाजूला शाळेच्या शिक्षकांना राहायला घरे, बाजूलाच मुलामुलींना हॉस्टेल. दुसऱ्या बाजूला शाळेतल्या इतर कर्मचार्यांना घरे, पुढे दवाखाना. मधोमध मैदान आणि समोर शाळा. मेन गेट च्या पलीकडे समोर एक समशान. आजूबाजूला ओसाड जागा. ६वी ते १२ वी अशी ती शाळा. संस्थेच्या नावामुळे अॅडमिशन लवकर फुल झाले. शाळा चालू झाली. सगळे सुरळीत चालू होते. पण एक ६वी मधला मुलगा जरा तणावाखाली होता. त्याला रात्री अपरात्री त्याच्या पलंगाखालून आवाज यायचे. जसे की कोणी त्याला बोलवत आहे. त्याने एकदोनदा याकडे दुर्लक्ष केले पण त्याला रोज आवाज येऊ लागला. त्याने घाबरून हॉस्टेल हेड ला सांगितले. हॉस्टेल हेडला वाटले की कोणीतरी त्याची फिरकी घेत आहे. तो घाबरला असल्याने त्यांनी त्याला दुसरा पलंग दिला. 


एक ८वी ला जाणाऱ्या मुलाला त्यांनी त्याच्या जागेवर शिफ्ट केले. थोडयाच दिवसांनी तो मुलगा पण तक्रार करू लागला की त्याला पलंगाखालून आवाज येतात. त्याला झोपल्यावर असे वाटे की तो अलगद उचलला जाऊन हवेत तरंगतो. हे ऐकून हॉस्टेल हेड हादरले कारण दोघांना पण अनुभव आले होते. त्यांनी तातडीने मुख्याध्यापकांना सांगून पंडित ला बोलवले. सगळी मुले शाळेत गेल्यावर पंडित हॉस्टेल ला आला कारण मुलांना यातील काही कळू द्यायचे नव्हते नाही तर त्यांना अभ्यासात मन लागले नसते. पंडित ने तिथेच २ तास ध्यान लावले. २ तासानंतर सांगितले की या पलंगाखालच्या जमिनीत एक सांगाडा आहे. बांधकाम करताना तो राहिलेला दिसतोय. तोच त्रास देतोय. पंडित म्हणाला की ही जागा खोदून सांगाडा काढायला लागेल. पण जागा खोदली तर इमारती ला तडा जाईल महणून हेड म्हणाले की दुसरा काही उपाय सांगा. विचार करून पंडित म्हणाला की ही जागा अभिमंत्रित करतो पण हा पलंग परत कोणालाही देऊ नका. दुसऱ्या दिवशी पंडित ने तो पलंग अभिमंत्रित केला. 


काही दिवस सुरळीत गेले. तिथेच कर्मचारींसाठी राहायला असलेल्या एका घरात एक ड्रायवर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याची मुले पण सवलत दिल्याने त्या शाळेत शिकत होती. तो शाळेतल्या मुलांना सहलीला घेऊन जाणे, गावातून भाजीपाला आणणे, शाळेची बाहेरील कामे करणे असे काम करायचा. त्याला काही झाले नसताना पण उगाचच कसलातरी आजार जडला. सारखा छातीत दुखवू लागला. काही दिवसांनी त्याच्या घराच्या बाहेर तो विचित्र अवस्थेत मरून पडलेला. त्याचे डोळे सताड उघडे होते जसे त्याने मरण्याआधी काहीतरी भितीदायक पाहिलेले. हे सगळं घडले तेव्हा इंग्रजी चे सर १५दिवसांसाठी त्यांच्या गावी गेलेले. त्यांना यातील काहीच माहित नव्हते. 

८ दिवसांनी ते यायला निघाले. नेमकी ट्रेन लेट झाली आणि ते ९ वाजता सांगलीत आले. १० मिनिटांसाठी त्यांची शाळेवरून पलिकडील गावाला जाणारी शेवटची गाडी सुटली. शाळेपर्यंत जायला आता एकही बस नव्हती. इकडे तिकडे पाहिल्यावर त्यांना एक टेम्पोवाला भेटला पण तो फक्त त्यांना ५-६किमी पर्यंत सोडणार होता. त्याला तिथून दुसरीकडे जायचे होते. सरांनी विचार केला की तिथून मग लिफ्ट घेऊ कोणी भेटले तर. काही वेळानंतर टेम्पोवालयाने सरांना सांगितलेल्या ठिकाणी सोडले आणि तो त्याच्या दिशेने निघून गेला. सर तिथेच थांबले. अर्धा तास उलटून पण एकही गाडी त्यांना दिसत नव्हती. मग कंटाळून ते पायीच शाळेच्या दिशेने निघाले. सुनसान रस्ता , आजूबाजूला ओसाड माळरान आणि त्यात अमावस्या होती. त्यामुळे फक्त चांदण्यांचा टीम टीम प्रकाश. सर खरतर भूत वगैरे काही मानत नव्हते पण वातावरणच एवढे भितीदायक होते की त्यांना कधी एकदाचे घरी पोहचतोय असे झालेले. 

तेवढ्यात त्यांना मागे कोणीतरी चालतय असे जाणवले. त्यांनी वळून पाहिले तर त्यांच्या दिशेने कोणीतरी झपाझप पावले टाकत येत होते. सरांना जरा हायसे वाटले. जवळ आल्यानंतर त्यांना कळले की तो शाळेत काम करणारा राजेश होता. त्यांना खूप आनंद झाला. राजेश ला पण बरे वाटले. सरांनी त्याला विचारले की तू आता कस काय? तो म्हणाला की शहरात गेलो होतो कामासाठी. सर म्हणाले की अरे मग शाळेची गाडी घेऊन जायची ना. राजेश म्हणाला की तीच घेऊन जाणार होतो पण ती पंक्चर होती. सर म्हणाले बरेच झाले जाऊदे नाही तर मग तू मला आता भेटला नसता आणि मला एकटयाने जायला लागले असते. राजेश म्हणाला की सर रात्री चे इथून जायला भिती वाटते का? सर म्हणाले अरे एकटयाने जायचा कंटाळा येत होता. 


बोलत बोलत शाळा आली. आत आल्यावर सरांनी त्याला बाय केले. मग तो त्याच्या घरी जायला वळला. सर त्यांच्या घरी जायला वळले तर सिक्युरिटी गार्ड त्यांच्या कडे विचित्र नजरेने पाहत होता. ते तडक घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ ला मधल्या सुट्टीत खानावळ मध्ये बाकी सरांजवळ जाऊन बसले. बाकीचे सर्व सर त्यांची सुट्टी कशी गेली वगैरे विचारू लागले. नंतर गणिताचे सर त्यांना सांगू लागले की अहो तो आपला तो ड्रायवर होता ना तो मेला. इंग्रजी चे सर म्हणाले की उगाच गंमत करू नका माझी. तर बाकीचे सर म्हणाले की अहो खरच. ८ दिवस झाले त्याला जाऊन. पण इंग्रजी चे सर म्हणाले की कसे शक्य आहे हे? काल तर आम्ही रात्री सोबत आलो. हे ऐकून बाकीच्या सरांच्या चेहर्यावर भिती पसरली. तो तोच होता राजेश जो काल सरांसोबत शाळेत आलेला. त्यांचे चेहरे पाहून इंग्रजी चे सर काय समजायचे ते समजले. चक्कर येऊन तिथेच धाडकन कोसळले. ८ दिवस ते अॅडमिट होते. सिक्युरिटी गार्ड पण त्यांना पाहायला गेलेला. तो म्हणाला सर तुम्ही गावावरून आले तेव्हा एकटेच बडबडत होते. मला तेव्हाच काहीतरी विचित्र वाटलेले. 


दरम्यान बऱ्याच जणांना चित्रविचित्र अनुभव येऊ लागले होते. कुणाला गावी गेलेले आपले सवंगडी दिसत तर कोणाला आवाजे येत.सर्व सरांनी सुद्धा मुख्याध्यापकांना तक्रार केली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी तातडीने तिथे पंडितांकडून महापूजा करून घेतली. त्यानंतर हे सगळं थांबले. बहुदा तिथे भटकत असलेल्या आत्म्यांना शांती मिळाली असेल. पण तो पलंग मात्र अजूनही तिथे तसाच अभिमंत्रित आहे. अजूनही तो कोणालाच देत नाही.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror