End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Nitin Chinchwade

Comedy Children


2  

Nitin Chinchwade

Comedy Children


शाळा

शाळा

1 min 144 1 min 144

मी साधारण पाचव्या इयत्तेत होतो. शाळेची वेळ साडेबाराची असायची. आमच्या घराजवळच साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर म्हशींचा गोठा होता. साठ वर्षे वय असणारी एकदम फटकळ म्हातारी तिला सगळे नानी म्हणायचे. तिच्या मालकीचा तो म्हशीचा गोठा होता. गोठ्याच्या शेजारी मोठे डबके होते. त्यात बारा महिने पावसाचे आणि गोठ्याचे पाणी साठलेले असायचे. त्याची खूप दुर्गंधी यायची.


पण त्या डबक्या शेजारी एक चिंचेचे झाड होते. त्या झाडाच्या चिंचा खूपच गोड लागायच्या. चिंचा काढण्यासाठी पाण्यात ठेवलेल्या दगडांवर पाय ठेवून जावे लागायचे. साधारण सकाळी शाळेच्या वेळेच्या आधी अकरा वाजता आम्ही शाळेचा ड्रेस घालून शाळेची सगळी तयारी केलेली असायची. चिंचा काढायच्या आणि नंतर शाळेत जायचे, असा रोजचा दिनक्रम असायचा.


चिंचा काढायच्या अर्थात त्या दगड मारून पाडायच्या. चिंचा पाडत असताना आमच्यापैकी एखादा मित्र नानी आली म्हणून भीती दाखवायचा आणि मग सगळे घाबरून पाण्यातल्या दगडांवरून उड्या मारत पळून जायचे.


एक दिवस चिंचा काढत असताना मी नानी आली म्हणून सर्वांना भीती दाखवली आणि दगडांवरून उड्या मारत पळत सुटलो. तसा दगडावरून पाय घसरून मी पाण्यात पडलो आणि शाळेचा ड्रेस सगळा चिखलाने भरला. माझे मित्र सगळे हसायला लागले, कारण माझी फट... फट फजिती झाली होती.


Rate this content
Log in

More marathi story from Nitin Chinchwade

Similar marathi story from Comedy