End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Nitin Chinchwade

Others


3  

Nitin Chinchwade

Others


अदृश्य शक्तीतील परमेश्वर

अदृश्य शक्तीतील परमेश्वर

1 min 222 1 min 222

         प्रत्येक मनुष्याच्या मागे एक शक्ती काम करत असते, त्यामुळेच त्याच्या कर्तुत्वाला आणि जीवनाला झळाळी येत असते. दूषित कर्म किंवा पाप संचय यामुळे ती शक्ती आपला हात त्या मनुष्याच्या डोक्यावरून काढून घेते. त्यामुळे लोक म्हणतात एका रात्रीतून राजाचा रंक होऊ शकतो. ज्या अदृश्य शक्तीमुळे हे घडते ती शक्ती म्हणजे परमेश्वर. 

           ज्याची आस्था आहे जो आस्तिक आहे त्याला चराचरामध्ये परमेश्वर दिसतो. नदीतून वाहणाऱ्या पाण्यामध्ये, झाडातून वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये, पक्ष्यांच्या किलबिलाटा मध्ये, वासरासाठी हंबरनाऱ्या गायीमध्ये, औदुंबराच्या वृक्षांमध्ये सगळीकडे अदृश्य शक्ती मधील परमेश्वर आहे. 

          सुगंध डोळ्याला दिसत नाही पण नाकाला त्याची अनुभूती होते. अदृश्य शक्तीतील परमेश्वर सुद्धा तसाच आहे. परमेश्वराची अनुभूती घेण्यासाठी मनुष्याला साक्षात्काराची गरज असते. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष आणि साक्षात्कार म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, अनुभव. आणि या अनुभवातून प्राप्त होणारी आत्म्याची स्पूर्ती म्हणजे अदृश्य शक्तीतील परमेश्वर. 

        दुःखी कष्टी आत्म्याची मदत करणे, मुक्या प्राण्यांवर दया करणे. प्राण्याचा आत्मा आणि माझा आत्मा एकच आहे ही भावना निर्माण होणे म्हणजेच अदृश्य शक्‍तीतील परमेश्वराची अनुभूती घेण्यासारखे आहे. 

            नास्तिक मनुष्य परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा मागतात. आपण घेत असलेला श्वास ज्यामुळे आपण जिवंत आहे पण तो श्वास आपणाला दिसत नाही त्याप्रमाणे परमेश्‍वराचे अस्तित्व आहे. 

        मनुष्याला संकट आले की त्याला परमेश्वराची आठवण होते. मधुमेह झाला म्हणून साखर खाणे सोडने म्हणजे संकट आल्यावर देवाची आठवन होण्यासारखे आहे. मनुष्याच्या जीवनावरील अदृश्य शक्तीचा प्रभाव कालानुरूप कमी होत असतो. 

          दुःखीकष्टी आत्म्यांना मदत करणे, मुक्या प्राण्यांवर दया करणे, निसर्गावर प्रेम करणे म्हणजेच अदृश्य शक्तीतील परमेश्वराच्या अनुभूतीसाठी पुण्यसंचय करणे. 


Rate this content
Log in