Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Nitin Chinchwade

Others


3  

Nitin Chinchwade

Others


बालपणीचा काळ

बालपणीचा काळ

1 min 222 1 min 222

   माझ्या लहानपणी शाळेत शाईपेन वापरण्याबद्दल सक्ती केली जायची. त्यामुळे सर्व विद्यार्थी शाळेत शाईपेनच वापरायचे. मंग रविवारी पेनाची जीप आणि नीप काढून ती गरम पाण्यात स्वच्छ धुवायची. दुकानात जाऊन शाई भरून आणायची. शाईची बाटली आणायची म्हणजे पैशाची फार उधळपट्टी केल्यासारखे समजायचे. दहावीला गेल्यावर आनंद व्हायचा कारण दहावीला शाळेत फुल पॅण्ट घालायला मिळायचि. पाचव्या इयत्तेत घेतलेली कंपास पेटी दहावीपर्यंत जायची. फार तर आतील साहित्य सुटे मिळायचे ते नवीन घ्यायचे. घरापासून शाळा साधारण दोन किलोमीटरवर असायची. रोज शाळेत पायी जाण्याशिवाय दुसरा पर्याय नसायचा. 

         शाळेचा अभ्यास, घरचा अभ्यास, गृहपाठ करणे, अभ्यासाचे टाईम टेबल करणे सर्व काही नियोजनबद्ध करावे लागत. काटकसर करुन उत्तम शिक्षण घेण्याची कला आई-वडिलांनी आम्हाला शिकवली. थोडक्यात सादा जीवन उच्च विचार हा गुरुमंत्र त्यांनी दिला. 

          पण हेच आत्ताच्या आणि पहिल्या शिक्षण पद्धतीत खूप तफावत आहे. आत्ता शाळेच्या शिक्षणात कसलीही काटकसर दिसत नाही. शाळेत जाण्यासाठी रिक्षा, मोबाईल, भरमसाठ फी असलेले क्लास अवाढव्य खर्च करणे एक फॅशन झाली आहे. आम्ही सदन आपल्याचे भासविण्याची पद्धत होऊन बसली आहे. त्यात मुलांना वेळ द्यायला आपल्याला वेळ नसल्याची गैरसमजूत आपल्या मनामध्ये दृढ झाली आहे. 

          खरंच आपल्या आईवडिलांनी आपल्याला जे संस्कार केले ते संस्कार आपण आपल्या मुलांना देण्यात खूप कमी पडलो आहोत. 

         आपल्याला दिलेले संस्कार मुलांवर घडवून एक उत्तम पिढी खऱ्या अर्थाने देशाचे उत्तम संस्कारी नागरिक तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची खरंच गरज आहे. 


Rate this content
Log in