कू.शुभम संतोष केसरकर

Drama Horror Crime

5.0  

कू.शुभम संतोष केसरकर

Drama Horror Crime

सौंदर्याचे ग्रहण !!

सौंदर्याचे ग्रहण !!

8 mins
2.0K


आमच्या कॉलोनीत ना आज एक भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे व त्यासाठी आज ह्या कॉलोनीतील प्रत्येक जण एकदम थाटामाटात तयार होत आहेत , एकमेकांसाठी कुठल्याही गोष्टीत मदत करणाऱ्या ह्या माणसांमध्ये आम्ही राहतो ह्यातच आमचे भाग्य आहे , व ह्या सर्व गोष्टी ह्या कलयुगात पाहिला तर सोडा अनुभवता सुद्धा येत नाही . अरेरे …..!! ह्या सर्व गडबडीत मी माझा परिचय तुम्हा सर्व श्रोत्यांना करूनच नाही दिला ,माफ करा हा !! तर मित्रांनो माझे नाव कल्पेश आहे व मी गेली दहा वर्ष ह्या कॉलोनीत वास्तव्यास आहे , तुम्ही सगळे असं समजू नका की चक्क ह्या लहान वयात ह्याने घर कसं घेतलं , तर तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की हे घर माझे नाही तर माझ्या परमपूजनिय माझ्या आई-बाबांचे आहे व त्यात मी गेली दहा वर्षे त्यांच्या सोबत राहतो , ही एक मस्करी होती .


तर चला मग तुम्हाला ह्या कॉलोनीमधील प्रत्येक कुटुंबाची ओळख करून देतो. तर ह्या कॉलोनीत एकूण पाच कुटुंब राहतात , त्यात पहिल्या कुटुंबाची ओळख करून द्यायची म्हटलं तर हे एक शांत , कामास तत्पर व त्याच प्रमाणे थोडे रागीट सुद्धा आहेत व त्यांचे आडनाव सुद्धा त्यांच्या प्रमाणेच म्हणजे विष्णू रागीटकर , दुसरे कुटुंब हे त्यांच्यापेक्षा थोडे रागीट असुदेत पण त्याचंप्रमाणे जीवास जीव लावणारे आहेत व त्यांचे नाव किशोर दयाळकर , तिसऱ्या कुटुंबाबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमी आहे कारण त्यांचा सहवास हा आम्हाला मिळणं खरोखर खूप उर्जादायक व त्याचप्रमाणे प्रेरणादायी आहे , मला वाटणाऱ्या अडचणी जर मी आई-बाबांन व्यतिरिक्त कोणाला सांगत असेन तर ते आहेत रामचंद्र सुटेकर , व जी शेवटची दोन घरे राहिले आहेत ते कुटुंब म्हणजे " तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना " ह्या म्हणी प्रमाणे एकमेकांशी वागतात , कारण त्यांच्यात नेहमी कुठल्याना कुठल्या गोष्टी मधून भांडण सुरू असतात व ते सगळं झाल्यानंतर पुन्हा एकमेकांची माफी मागतात व पुन्हा एकत्र येतात तर त्यांची नाव आहे गोपाळ नार्वेकर व दुसऱ्यांचे नाव आहे सतीश जुळेकर. तर घ्या मित्रांनो ही आहेत आमच्या कॉलोनीत वास्तव्यास असणारी सर्व एका पेक्षा एक एक कुटुंब. पण ह्या कॉलोनीत एक सहावं घर सुध्दा आहे पण ते काही कारणास्तव बंद आहे व त्यात कोणी राहत सुद्धा नाही व आम्हा सर्व मुलांना सुद्धा त्याठिकाणी जाण्यास मज्जाव केला आहे .


आज भव्यदिव्य कार्यक्रमात सर्वांनी उपस्थिती लावली व त्यांच्या अंगी असणारे सर्व कलागुण त्यांनी दाखविले व हा कार्यक्रम सर्वांनी एका उच्च स्तरावरती घेऊन गेले , व रात्रीच्या ह्या सुंदर प्रकाशात सर्वांनी मिळून मिसळून एकत्र हा कार्यक्रम संपन्न केला. आमच्यातील असणारे कौटुंबिक संबंध अजूनही दृढ व अतूट झाले. नंतरचे काही महिने अगदी सुखात व आनंदात व्यतीत होत होते व सर्वांच्या घरात एक आनंदाचे वातावरण जणू एका फुलांच्या बागे प्रमाणे इतरेत्तर बहरत होते . परंतु एका पौर्णिमेच्या दिवशी अचानक लागलेल्या ग्रहनाप्रमाणे कॉलोनीमधील जी शांतता , समता व बंधुता ह्या तिन्ही गोष्टींचा मिलाप ज्याप्रकारे स्थिर होता ती स्थिरता ह्यापुढे टिकणार नाही असे चित्र जणू सगळीकडे पसरत होते. आमच्या कॉलोनीत एक नवीन व्यक्ती राहण्यासाठी म्हणून येणार होती , नाही कोणाची ओळख , नाही कोणाचा परिचय , फक्त ती व्यक्ती आणि आम्ही कॉलोनीमधील रहिवासी. आमच्या कॉलोनीमधील जी रूम कित्येकवर्षं बंद होती त्या रूममध्ये एका स्त्री ला राहण्यास परवानगी दिली . तुम्ही ह्या कॉलोनीत राहू शकता पण त्यासाठी आम्हाला पूर्वसूचना देणं ही तितकच महत्वाचं होत , कोणत्याही अनोळखी व्यक्तीस त्वरित राहण्यास मिळणे सुद्धा आम्हा सर्वांना थोडे वेगळे वाटले.


तिच्या सौंदर्याकडे पाहून जणू राजाच्या दरबारातील एक अप्सराच होती , तिचे ते देखणे रूप , करीत असलेला तो शृंगार , बघताच क्षणी वाटणारा तो आनंद ह्या सर्व बाजूनी आम्ही सर्व मोहित झालो होतो. तिच्या सौंदर्यावर तिचा मान होता की अभिमान होता ह्याबद्दल आम्हाला समजले नाही पण ती आता कॉलॉनीतील एक सदस्य आहे.कधी आम्हा सर्वांना वाटे की जाऊन तिच्याशी बोलावे व आमच्या कॉलोनीतील संघात तिला सुद्धा घ्यावे कारण ती आता आमच्या कॉलोनीमधील एक सदस्य म्हणून राहत आहे . आम्ही सर्व राहिवासींनी एक निर्णय घेऊन तिच्या घरी गेलो व तिला ह्यासर्व गोष्टीबद्दल एक पूर्वकल्पना दिली व आमच्या कॉलॉनीतील सर्व नियम व तो मोडल्यास दयावा लागेल तो दंड , कॉलोनीत होणारे सांस्कृतिक कार्यक्रम , दिले जाणारे सर्व सन्मान व आमच्या कॉलॉनीमधील एकनिष्ठची भावना कधीही ह्याचे उल्लंघन करू नये ह्याबद्दल तिला सांगितले , पण ह्या सर्व गोष्टींचा तिच्यावर काही फायदा झाला असावा असे आम्हा सर्वांना जाणवलेच नाही , ती जणू आम्हा सर्वांना डावलत होती म्हणजेच दुर्लक्ष करत होती.


आम्हीही तिच्याबरोबर जास्त वेळ न बोलता तातडीने तिथून बाहेर पडलो. दुसऱ्या दिवसापासून तिने कॉलोनीतील प्रत्येक माणसाबरोबर वाद घालण्यास सुरवात केली, क्षुल्लक करणावरूनही तिने आपले रंग दाखवण्यास सुरवात केली व नव्हे नव्हे ते आरोप करत गेली , तिच्या अश्या वागण्याने सर्वांच्या घरात वाद निर्माण होऊ लागले . प्रत्येक दिवसाचे चित्र हे सर्वांच्या घरात अश्याच प्रकारे निर्माण होत होते. तिचा स्वतःच्या सौंदर्य खूप अभिमान होता. आमच्या सर्वांकडे पाहून आपले तोंड तिरस्काराने वळवायची. ह्यासर्व गोष्टी एक दिवस नाहीतर कित्येक महिने विचित्रपणे चालू होत्या , आम्ही सर्व कॉलोनीमधील राहिवासींनी मिळून असा निर्णय घेतला की तिला ह्या कॉलोनीमधून काढून टाकावे त्यानंतरच ह्या सर्व विचित्र गोष्टी थांबतील व पुन्हा येथे सगळ्या गोष्टी नवीन प्रमाणे चालू राहतील. कारण वर्षानुवर्षे आमच्यामधील असणारे प्रेम , कुतूहल व विश्वास ह्या सर्व गोष्टींना तडा जाऊन देणं हे कितपत बरोबर आहे ह्यासर्व गोष्टींची जाणीव आम्हा सर्वांनाच आहे ह्याची खात्री आमच्यातील प्रत्येक माणसाच्या मनात होती त्यामुळे तसे काही घडू नये ह्यासाठी सक्तीचे पाऊल उचलने सुद्धा महत्वाचे आहे. आम्ही सर्वांनी क्षणांचाही विलंब न करता तिच्या घरी गेलो व तिला ह्यासर्व गोष्टींची जाणीव करून दिली की तू जशी वागत आहेस ते अत्यंत चुकीचं आहे ह्यामुळे आमच्या सर्वांमध्ये तू दुरावा निर्माण करत आहेस , आमच्या कानावर असे काही गोष्टी आल्या आहेत की तू दुसऱ्याने सांगितलेल्या गोष्टी हे कोणी तिसऱ्याला त्याच्याविषयी गोल फिरून अगदी वेगळ सांगत आहेस व त्यामध्ये तू वाद निर्माण करत आहेस , ह्या सर्व गोष्टी एकतर बंद कर नाही तर आमची कॉलनी सोडून जा . ह्या सर्व गोष्टी तिच्या कानावर पडताच ती अगदी वेड्यावानी घरातून बाहेर जाऊन बारकाईने आपल्या साडीला काही बाजुंनी कापून जोर जोरात ओरडायला लागली की ह्या सर्व लोकांनी माझ्यावरती अत्याचार केले आहे आणि मला बळजबरीने इथून काढून टाकण्याचा विचार करत आहेत , मला वाचवा तुम्ही सगळ्यांनी !! असं बोलताच ती अचानक बेशुद्ध झाली व सतंप्त जमावाने तातडीने तिकडच्या स्थानिक पोलिसांना बोलवून आमच्या कॉलॉनिविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.


आमच्या कॉलॉनीतील सर्व वरिष्ठांनी एकमताने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तिने केलेल्या प्रत्येक कृत्याचे वर्णन पोलिसांना दिले व आमच्या सर्व रहिवाश्यांना होणारा त्रास त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी फक्त एकच प्रश्न विचारला व ते म्हणाले तुमच्याकडे कोणता पुरावा आहे का ?? असे प्रश्न विचारतास आमच्या जवळ तिच्याविरुद्ध एकही पुरावा नव्हता , फक्त बोलण्याने ती दोषी असे सिद्ध होणार नाही , तर तिच्याविषयी ठोस पुरावे आणणे पण तितकेच महत्वाचे आहे असे वरिष्ठ पोलिसांनी आम्हाला सांगितले. पोलिसांनी आम्हाला एका आठवड्याची मुदत दिली , जर तुम्ही ह्या एका आठवड्यात तुम्ही निर्दोष आहात असे सिद्ध नाही केले तर महिलेवर केलेल्या अत्याचारा अंतर्गत तुम्हा सर्व ज्येष्ठ रहिवाश्यांना तुरुंगात टाकले जाईल ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी !! , व त्या महिलेला सुद्धा ती रूम एका आठवड्यासाठी सोडण्यास सांगितले व एक आठवडा दुसरीकडे थांबावे असे स्पष्टपणे सांगितले व तुमच्या दोघांपैकी कोणीही हे शहर सोडून जाऊ नये असे नियम बजावले .आमच्या सर्वांच्या मनात एकच विचार होता की, इतक्या घाईत नक्की कसे व कुठून पुरावे मिळवायचे . तिला दोषी सिद्ध करण पण महत्वाचे होते, नाहीतर तिचे नाटके अजून वाढतील व त्रास सुद्धा आम्हालाच सहन करावे लागतील .


काही महिन्यात एवढे काही बदलून जाईल असे आमच्या सर्वांच्या मनात कधीच नव्हते . आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करायचे एवढे काही आमच्या सर्वांच्या समोरील लक्ष होते. ज्या व्यक्तीच्या मदतीने त्या बाईने जे हे घर घेतले त्या माणसास आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला , जिथे तिथे घर विकले जाते व ज्या व्यक्तीच्या मदतीने संपूर्ण घराचे व्यवहार होतात अश्या सर्वांशी आम्ही चर्चा केली तरीही आम्हाला यश आले नाही पण नशिबाने दोन , तीन दिवसांनी तो स्वतःहून त्या घरात त्या बाईला भेटण्यासाठी म्हणून आला पण घराभोवती केलेल्या कुंपणाला बघून तो तेथून निघताच क्षणी आम्ही त्याला पकडून पोलीस स्टेशन मध्ये हजर केले , पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली पहिल्यांदा तो म्हणाला " की मी त्या घरी भाडे वसूल करण्यास गेलो होतो पण ती तिथे नव्हती त्यामुळे मी तिथून निघेन इतक्यातच तिकडच्या लोकांनी मला तुमच्यासमोर हजर केले , मला नाही माहिती ती बाई कोण आहे , मला फक्त ती रूम तिला देण्यास सांगितले होते , ह्या व्यतिरिक्त मला काहीच माहिती नाही ,माझा ह्याच्याशी काही संबंध नाही , मला सोडून द्या ." पोलिसांनी केलेल्या प्रत्येक चौकशीत त्याचे म्हणणे हेच होते. वेगळ काही तो बोलेल अथवा वेगळं काही करेल असे कुठेही वाटत नव्हते व असे सरळ स्पष्टीकरण त्यांनी आम्हा सर्वांना सांगितले , पण हा त्याने आम्हाला सांगितलं की हा रूम त्याने कोणाच्या सांगण्यावरून दिला पण तो कोण ह्याचे स्पष्टीकरण दिले नाही. मला तरी वाटत ह्या सर्व गोष्टीत जणू कोण्या दुसऱ्याचाही हाथ आहे. नवीन कोडी व त्यात ही नवी समीकरणे आम्हा सर्वांना चिंतेत टाकणारे होते. संशयित व्यक्तीच्या स्पष्टीकरणातून आम्हाला जी काय माहिती मिळाली ती सुद्धा महत्वाची होती.


ह्या सर्व धावपळीत आमच्याकडे फक्त आता शेवटची दोन दिवसच उरले होते व त्यातही आमच्याकडे कोणतेही पुरावे साठविलेले नव्हते. जेवढे काही शक्य होईल तेवढे प्रयत्न आम्ही सर्वजण एकत्र मिळून करत होतो . माझ्या मनात असा विचार आला की आपण आपल्या कॉलॉनीपासून नेहमी बाहेर जाऊन पाहत आहोत आपण जर सर्वांनी मिळून एकदा ह्या घराची तपासणी केली तर त्यातून आपल्याला नक्की कोणतेना कोणते तरी पुरावे नक्कीच मिळतील. आम्ही क्षणांचाही विलंब न करता थेट पोलिसांकडे गेलो व त्यांना ह्यासर्व गोष्टी सांगितल्या व आधी ते नाहीच बोलत होते व नंतर त्यांनी त्यांचा एक गट आमच्या बरोबर पाठवून संपूर्ण घराची त्यांनी तपासणी केली व त्यात त्यांना जे काही मिळालं ते अत्यंत वाईट व शरीरासाठी अत्यंत धोकादायक होते.आम्हा सर्वांना तिच्या घरातून वेगवेगळ्या किलोचे असे वेगवेगळे माल सापडले व त्यात चरस , गांजा , तंबाखू असे शरीरास अपायकारक पदार्थ मिळाले व त्यातून आमच्या सर्वांच्या असे लक्षात आले की ह्याघरातून रात्री व अपरात्री मालाची तस्करी होत असे व त्यासर्व गोष्टी आम्हाला कळू नये म्हणून ति हा खेळ आमच्यासोबत खेळली.पोलिस हा माल त्यांच्यासोबत घेऊन गेले व घराला कुलूप लावून आम्ही सर्व तातडीने पोलीस स्टेशनमध्ये गेलो व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यास ह्या सर्व गोष्टी सांगितल्या व तातडीने त्या बाईला अटक केले व तिला तुरुंगात टाकले. तिची विचारपूस केल्यानंतर तिला ज्याने घर दिले तोच ह्या सर्व बाबतीत गुन्हेगार आहे असे तिने स्पष्ट केले व मी पैश्यासाठी त्याच्यासोबत काम करत होते असेही तिने स्पष्ट नमूद केले. म्हणजेच ह्या सुंदर चेहऱ्या मागे एका ग्रहणाचे दोष आहे असेच जणू काही दिसून येते . लोकांना काही संशय होऊ नये व आपली कामे ठरल्याप्रमाणे पूर्ण होऊ दे अशीच काही ह्यांची मानसिकता असावी. पण जे झालं अतिशय अपरिचित होत व आमच्या कॉलॉनीत अश्या काही गोष्टी घडतील ह्याचा अंदाजही आमच्यातील कोणालाही नव्हता पण त्यादिवसानंतर आम्ही सर्व पुन्हा एकनिष्ठ व एकत्र आलो . सुंदरता असावी व त्याचा अभिमान नसावा नाहीतर आपलीच फजिती होते व त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात हे सिद्ध झालं.


Rate this content
Log in