सांग ना गं आई...
सांग ना गं आई...


बाबा आले आड आता
जन्म कसा घेऊ ...
चुकलं ग काय
माझ तूच सांग आई ...
फेडीन मी ॠण तुझं
होईन मी उतराई...
नाव तुझं मोठं
करीन गं आई ...
नको गं जन्मा माझ्या
छेद तू देऊ ...
बाबांनाही समजवं तू
होण्या तू माझी आई...
सडा सारवण रांगोळी
दारी मी काढीन ...
हिकमतीन नाव आपलं
घ्र्रण्याचं वाढवीन...
नाही गं छळ्णार तुला
कसं सांगु आई...
वारसा तुझा घेऊनी
मोठी मी होईन...
आजोबांच्या गोष्टी
दादासोबत ऐकेन ...
आजीनं दिलेला खाऊ
वाटून मी खाईन...
तुझ्यापरी सारं काही
रांधनं मी करीन...
शाळामधल्या चिमुकल्यांची
बाई मी होईन ...
रुसलेल्या बाबांचंही
मन मी जिंकेन ...
त्यांची लाड्ली अनं
तुझी गं प्रतिमा होईन...
सोनुले गं तू माझी
जीव की प्राण...
स्वार्थापाई जग सारं
माणुसपण गहाणं...
कसं सांगु तुला गं
जमान्याची रीत ...
आत्म्यावाचुन धड सारी
जणू भावनाशून्य प्रेतं ...
खूप वाटते गं सोनुले
जन्मा तु यावं ...
पापे तुझे घेऊनी
ह्र्दयी तुला लावावं ...
विनवते बाबा तुम्हास
मला नका नाकारु ...
जन्माआधी मला असा
नका टाटा करू ...
नाही होणार बाबा मी
तुम्हावर ओझं ...
समजून घ्या तुम्ही
मला फक्त आजं ...
तू तरी सांग ना रे दादा
त्यांना मनातलं सारं काही...
सोबतीनं खेळु दोघे
विनवते तुझी ताई ...
हो गं चिमुकले
चुकलंच माझं खरं ...
देऊ आम्ही जन्म तुला
माफ मला करं ...
माय बाप बंधुनों
सोडा तुमचा हेका ...
सांगतो तुम्हा एक
माझंही थोडं ऐका ...