Jyoti gosavi

Horror

3  

Jyoti gosavi

Horror

रंजा मुंजा - भाग 3

रंजा मुंजा - भाग 3

5 mins
168


दोन-तीन दिवस सुरळीत गेले आणि एक दिवशी सकाळी सकाळीच वेणी घालता घालता ती घुमू लागली. सकाळी अजून अंघोळ देखील केली नव्हती, अशा वेळी पारोशाने तिच्या अंगात देवी कशी आली ?असं जरा आईला आश्चर्य वाटलं. हा!हा!हा! असा आवाज करीत ती घुमू लागली. शेवटी आईने न राहवुन विचारले देवी माते! मुलीची आंघोळ झालेली नाही अशा पारोच्या देहात तुम्ही कसा काय संचार केलात? त्यावर देवीला राग आला. 

"ते पारोसे बिरोसे तुम्हा माणसांसाठी असते" देवीला कसला आलय सोवळं ओवळ. तू माझ्या वरती शंका खातेस का? देवीने लालबुंद डोळे करून विचारलं आणि जोरात जोरात भिंतीवरती रंजू आपले हात आपटू लागली. हातातल्या बांगड्या फुटल्या त्याची काच मनगटात घुसली. रक्त वाहू लागलं. त्याबरोबर आईने चुकले! चुकले !देवी माते माफ कर चुकले! माझ्या लेकराला त्रास देऊ नको असे म्हणत कान धरून माफी मागितली. मग देवी शांत झाली आणि माझा मान करा असे डोळे वटारुन सांगू लागली. देवाऱ्हा्यातून हळदी कुंकवाचा करंडा आणला आणि देवीचा मान केला. तेव्हा कुठे देवी शांत झाली. दहा मिनिटे तशीच पडून राहिली आणि मग एकदम "मी जाते" अशी जोरात आरोळी ठोकून धाडकन जमिनीवर ती अंग टाकले. 

एकदा फक्त झाडाला त्रास देऊ नका असे वडिलांनी म्हटल्याबरोबर दोन्ही पाय स्वतःच्या मानेवर ती ठेवून एखाद्या आधुली सारखी बुडा वरती गरागरा फिरू लागली. आणि तुला दाखवते झाडाला कसा त्रास देतात! असे म्हणली शेवटी वडिलांनी माफी मागितली तेव्हाच मानेवरचे पाय खाली घेतले. 

हा सिलसिला चालूच राहिला ,कधी दिवसभरातून तीन- तीन वेळा देवी माता अंगात येत असे, तर कधीकधी अजिबात येत नसे. हळूहळू सगळ्या गावांमध्ये बामनाच्या पोरीच्या अंगात देवी येते, अशी वदंता पसरली. मग काय विचारता? एक तर खेडेगावच ते !त्यातून खेडेगाव असो नाहीतर, शहर असो! प्रत्येक ठिकाणी माणसाला विवंचना या असतातच . आणि मग एखादी ओटीभरण्याने किंवा पाच-दहा रुपयांनी समस्ये वरती जर उपाय मिळत असेल, तर लोकांची लाईनच लागते. देवी आता दर मंगळवार शुक्रवार शुक्रवारी येऊ लागली. पहिले सुरुवात घरापासूनच केली. मुलगा होण्यासाठी आईची ओटी भरली आणि तो नारळ लाल कपड्यात बांधून आढ्याला टांगायला सांगितला .आई वडील दोघांना देखील ही गोष्ट विचित्र वाटली कारण असा ओटीचा नारळ कधी आढ्याला कोणी टाकत का? पण देवी म्हणाली म्हणल्यावर ते सर्वमान्य करून घ्यावं लागलं.

*********************************


हळूहळू मुंजाने त्या घरात आपले बस्तान पक्के केले. घरा नंतर तो गावातल्या पोरीबाळींना पण देवीच्या नावाने कुंकू बांधून देणे, भाग बांधून देणे, अंगारा देणे ,तोडगा देणे, इत्यादी गोष्टी करु लागला. 

रात्री रंजन झोपलेली असताना तो आपल्या जुन्या ठिकाण्यावरती जाऊ लागला . पिंपळावरती सारी भुतावळ त्याच्याभोवती जमत असे. काय रे मुंजा! तुझी मजा चालली आणि आम्ही मात्र येथे असेच झाडाला लटकतोय! 

कसा आहे तुझं नवं घर? आम्हाला पण घेऊन चल ना! अरे मनुष्य देहाचा ताबा मिळवल्याशिवाय आम्हाला आमच्या राहिलेल्या इच्छा, वासना कशा काय पूर्ण करता येतील? एखाद्या पदार्थाचा सुगंध आम्हाला मिळतो परंतु त्याची चव घेण्यासाठी आणि तृप्ती मिळण्यासाठी मानवी शरीरच पाहिजे. आम्हाला चवीचा आनंद पाहिजे, स्पर्शाचा चा आनंद पाहिजे, आणि सर्वच भुतावळीला मानवी देह मिळत नाही. तुला मिळाला आहे तर तू आम्हाला अजून मधून तेथे येऊ देत जा. बाकीची भुतावळ त्याच्यापुढे गयावया करु लागली. आणि मुंजा ने त्यांना पण परवानगी दिली. त्यानंतर रंजू च्या शरीराचे जास्तच हाल होऊ लागले. दिवस-रात्र ती आपल्याच धुंदीत राहत असे. तिचे शरीर म्हणजे अत्रुप्त आत्मा यांचे घरच झाले होते. त्यामुळे ती वेगवेगळ्या देवांची /देवीची नावे घेऊन घुमत असे. कधी मी साक्षात दुर्गामाता आले! कधी मी रेणुका माता, कधी चंडिका, कधी गावातील गाव देवी जानुबाई, गावातला देव चवणेश्वर, या सर्वांची नावे घेऊन घुमत असे. आणि वेगवेगळे पदार्थ खायला मागत असे.  

तिची नुसती खा-खा वाढली होती. आणि देवी अंगात येते म्हटल्यावर कोणी ना कोणी, काहीना काही, चांगलेचुंगले पदार्थ खायला आणून देत होते. आई तर तिला म्हणू लागली तुझ्या अंगात एखादा ब्रह्मराक्षस शिरला आहे का? का तुला, भस्म्या झालेला आहे? "खातेस बोकडा सारखी आणि वाळते मात्र लाकडा सारखी" कारण तिच्या अंगी खाल्लेले अन्न लागत नव्हते. ते अन्न भुतावळ खात होती. असे बघता-बघता दोन महिने गेले. जसं काही एखादी गोष्ट अंतर्ज्ञानाने बघावी तशा मात्र सगळ्या गोष्टी बरोबर सांगत होती. घरातल्या देव्हाऱ्यामध्ये रेणुकेचा टाक थोडासा वाकला होता, त्याला पाठीमागुन तांब्याचा सपोर्ट लावला होता. एकदा अंगात आल्यावर म्हणाली मी रेणुका बोलते तुझी कुलस्वामिनी, ती देव्हार्‍यात ठेवली आहेस ना? पाठ मोडकी ती बोलते. 

गौरी गणपतीचे दिवस आले यांच्या घरामध्ये दहा दिवसाचा गणपती आणि गौरी बसत. त्यामुळे घरात ती धामधूम सुरू झाली तिच्याकडे सर्वांचे थोडेसे दुर्लक्ष झाले. त्यामुळे तिच्या अंगात तीन-तीन चार-चार वेळा दिवसभरात येऊ लागले. ही जास्त चिडचिड करू लागली . आईशी भांडण काढू  लागली. संध्याकाळी आरतीच्या वेळी तिच्या अंगात येत असेअसे, ती सर्व आरत्या इतरांबरोबर घुमत घुमत म्हणत असे फक्त शंकराची, आणि दत्तात्रयाची आरती सुरू झाली की, तो मुंजा मान खाली घालून शांत बसत असे. त्याला त्या आरत्या म्हणताना काहीतरी त्रास होत असावा .

गौरी गणपती गेले त्याचा सुखनैव वावर चालू होता. साधारण एक महिना गेला आणि एक दिवस! 

रंजा मुंजा 


तो शनिवारचा दिवस होता. आई वडील दोघांचा देखील शनिवारचा उपवास होता. शनिवार, सोमवार ,एकादशी, चतुर्थी, प्रदोष असे सगळे उपवास ते दाम्पत्य मोठ्या भक्तिभावाने करीत असे. त्यातून परिस्थितीमुळे फराळ म्हणजे एक छटाक शेंगदाणे भाजायचे आणि दोघांमध्ये गुळा बरोबर खायचे. किती पोट भरत असेल? देवच जाणे! 

तो संत तुकारामाचा संसार होता किंवा सुदाम देवाचा संसार होता. आहे त्यात समाधान होते. वृत्ती समाधानी ,आनंदी होती, आणि भगवंत भजन करणारी होती. त्या परिस्थितीत देखील त्यांची अखंड साधना चालू होती. त्यांचा अजपा जप चालू असे .

आधी मुलांना जेऊ घातले आणि आता ती दोघे उपवास सोडायला बसणार! पहिला घास तोंडात घालणार! त्याआधीच रंजन म्हणाली "काका उपवास सोडू नका "मला कसंतरी होतंय. मला काहीतरी होतंय .आणि एकाएकी तिच्या आवाजात, तिच्या चेहऱ्यात बदल झाला. 

मी देवी बीवी काही नाही, मी भूत आहे भूत! मी मुंजा आहे. मी तुमच्या घरात शिरलोय आणि या झाडाला मी कधीच सोडणार नाही. याला मी माझ्या बरोबरच घेऊन जाणार. तिचा तो अवतार, ते डोळे, छद्मी हसणे, आवाज बदलून पुरुषाच्या आवाजात बोलणे सारेच अंगावर आल्यासारखे होते. क्षणभर घरातील सगळी मंडळी गांगरून गेली. काय घडतंय ते कळत नव्हतं परंतु, क्षणभरात सारे सावध झाले. प्रथम सावध झाले ते तिचे लाडके काका ,त्यांनी हातातला घास ताटातच टाकला, पानाला नमस्कार केला आणि भरलेला हंडा डोक्यावर ओतून घेतला. अंगाला भस्म फासले आणि ओलेत्याने गुरुचरित्राचे वाचन सुरू केले. 

ती अतिशय अनावर झाली होती. घरातील कोणालाही ऐकत नव्हती. घरात आई आणि दोन लहान बहिणी, त्यामुळे गुरुचरित्राचा वाचनाला बसण्याआधी तिला खाटेच्या पायांना बांधून बसते केले आणि तिच्यासमोरच त्यांनी गुरुचरित्र वाचायला घेतले. तिचा आरडाओरडा ,दंगा चालूच होता. 

मी एकेकाला सोडणार नाही. अख्या घराला टाळे लागल्याशिवाय मी येथून जाणार नाही. मी बघतोच तु कसा काय मला घालवतो?असे चालले होते. आजूबाजूच्या लोकांच्या घरात यांच्या घरात रात्री-अपरात्री काय चाललंय त्याबद्दल काहीच खबरबात नव्हती. स्वतःच्या पूर्व पुण्याईने म्हणा किंवा वाडवडिलांच्या कृपेने म्हणा, मध्ये मध्ये ती भानावर येत होती,आणि आपण स्वतःच पुढे काय उपाय करायचा ते देखील सांगत होती. असे करता करता बारा वाजले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror