Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF
Click here to enter the darkness of a criminal mind. Use Coupon Code "GMSM100" & get Rs.100 OFF

Preeti Sawant

Horror Thriller Others


3  

Preeti Sawant

Horror Thriller Others


रक्तपिपासू - भाग ६

रक्तपिपासू - भाग ६

4 mins 761 4 mins 761

बाबा पुढे बोलू लागले, “त्या कापालिकाने मंत्र सिद्धीने एका आत्म्याला वश केले होते. त्या आत्म्याची एक अट होती की, ह्या घरच्या कर्त्या पुरुषाबरोबर ती आत्मा जेव्हा संभोग करेल त्यानंतर त्या व्यक्तीने कोणत्याही परस्त्रीशी तसेच त्याच्या स्वत:च्या पत्नीशी सुद्धा संभोग करायचा नाही. जी कोणतीही स्त्री तिला त्या घरच्या कर्त्या पुरुषाबरोबर संभोग करताना बघेल ती काही दिवसातच मरण पावेल. तसेच जर ह्या घराची भरभराट टिकवायची असेल तर ह्या घराच्या कर्त्या पुरुषाला त्या आत्म्याबरोबर संबंध ठेवावेच लागतील आणि ह्याचा अंत तोपर्यंत नाही जोपर्यंत त्या घरात एखाद्या मुलीचा जन्म होत नाही. मला माहीत आहे हे सर्व ऐकल्यावर आता तुम्ही कोणीही ह्या वाड्यात राहणार नाही. पण आता माझी तरी ह्या सगळ्यातून सुटका नाही. मला मरेपर्यंत इथेच राहावे लागेल.” असे म्हणून ते रडू लागले.


त्यांना रडताना बघून माझे आणि रखमाचे हृदय हेलावले. पण त्यांनी जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. याचा अर्थ असा होता की, “बाबा असेपर्यंत तरी मला चिंता नव्हती. पण बाबांना जर काहीही झाले तर त्यांच्या जागी मी होतो आणि मला काहीही झाले तर.. तुमच्या दोघांपैकी एकाला.” असे बोलता बोलता काका अचानक बोलायचे शांत झाले.


मग काकी बोलू लागली, “बाबा आता खूप थकले होते. पण आपल्या सगळ्यांसाठी ते जगत होते. पण अगदी काही दिवसच.. त्यांनंतर त्यांनी डोळे मिटले. पण जायच्या आधी त्यांनी ती खोली मंत्रसिद्धीने बंद करून घेतली. त्यांनी जाता जाता यांना उद्देशून एक पत्र लिहिले होते व ते पत्र वाचून झाल्यावर ते जाळण्यात यावे असे ही त्यामध्ये नमूद केले होते. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, आज माझा कार्यकाल इथे संपत आहे. माझी घटिका जवळ आली आहे. मी केलेल्या चुकीचे परिणाम मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत भोगले आणि माझ्या पुढच्या पिढीला हे भोगावे लागू नये म्हणून मी हे प्रायश्चित करत आहे. यापुढे रखमाला ह्या घराची रखवाली करायची आहे. इथे कोणत्याही पुरुषाला म्हणजे अगदी तुला सुद्धा रात्री वस्ती करण्यात मनाई आहे. ती आत्मा रात्रीची शक्तिशाली असते. पण ती काहीही करून त्या खोली बाहेर येऊ शकत नाही. जो पर्यंत स्वत: कोणी ती खोली उघडत नाही. पण जर असा कधी प्रसंग आलाच तर मात्र ह्या घराण्यात जन्मलेली मुलगी तिचा सर्वनाश करू शकेल.


पण यासाठी विक्रम आणि अभयला ह्या घरापासून लांब ठेवण्यात समंजसपणा आहे. हे समजल्यापासून विक्रम आणि तुला आम्ही जास्तीतजास्त ह्या घरापासून लांब ठेवू लागलो. काही दिवसांपूर्वी जेव्हा हे आजारी पडले तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला. यांना काही झाले तर मी ही या घरात जास्त दिवस काढू शकणार नाही हे मला माहीत होते म्हणून मी तातडीने तुम्हा दोघांना इथे बोलावून घेतले. पण अभय तू सुमनला अश्या अवस्थेत इथे घेऊन यायला नको होतेस.”


हे सगळे ऐकून अभयला गावातल्या लोकांच्या त्या वाड्यासंबंधी विचारताना आलेल्या प्रतिक्रिया आठवल्या आणि त्याच्या अंगावरून सरसरून काटा गेला. तेवढ्यात त्याला सुमनची आठवण आली. तो तिला बघण्यासाठी खोलीत आला आणि पाहतो तर सुमन जागेवर नव्हती. तो घरभर सुमनला हाका मारत शोधू लागला. त्याला पाहून काका-काकी आणि विक्रांत ही सुमनला शोधू लागले पण सुमनचा कुठेही पत्ता नव्हता. आता सगळेच घाबरले होते पण कोणाचेही लक्ष आजोबांच्या खोलीकडे गेले नाही. इतक्यात विक्रांतची नजर त्या खोलीकडे गेली आणि त्याला त्या खोलीचे दार उघडे दिसले. त्याने “अभय दादा” अशी जोरात हाक मारली आणि अभयचे लक्ष जाताच त्याने त्या खोलीकडे बोट दाखविले. मग अभय आणि विक्रांत दोघेही धावत त्या खोलीकडे गेले पण ते आत जाणार इतक्यात खोलीचा दरवाजा बंद झाला आणि वाड्यातले सगळे दिवे ही गेले. पण ते गेले तसे ते परत आले ही. पण तेव्हा समोर सुमन बेशुद्ध अवस्थेत त्या खोलीच्या दरवाजासमोर पडली होती.


अभय आणि विक्रांतने तिला उचलून खोलीत झोपविले आणि विक्रांत डॉक्टरांना आणण्यासाठी निघून गेला. अभय खूपच हतबल झाला होता. तो सुमनचा हात हातात घेऊन एकसारखा रडत होता. काका आणि काकी त्याला धीर देत होते. तेवढ्यात विक्रम मुश्किलीने गावातल्या डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी सुमनला तपासले आणि इंजेक्शन दिले. काही वेळातच सुमन शुद्धीवर आली. तिने अभयला मिठी मारली व ती रडू लागली. ती काही बोलणार इतक्यात ती इंजेक्शनच्या गुंगीमुळे पुनः झोपी गेली. मग डॉक्टरांनी त्याच्याजवळची काही औषधे देऊन काही महत्वाच्या टेस्ट लिहून दिल्या त्या तालुक्याच्या दवाखान्यातच होऊ शकत होत्या. सुमन प्रेगनंट असल्याची पूर्वकल्पना विक्रमने आधीच डॉक्टरांना दिली होती. त्याप्रमाणे डॉक्टरांनी तिची तपासणी केली होती. औषधे आणि टेस्ट लिहून दिल्यानंतर डॉक्टरांनी लवकरच त्या वाड्यातून काढता पाय घेतला.  

“दादा मी आहे ना. मी असेपर्यंत तरी तुला आणि वहिनीला मी काहीही होऊ देणार नाही.” असे बोलून विक्रमने अभयचा हात हातात घेतला. तसे अभयने प्रेमाने त्याला कुरवाळले. दोघांचे प्रेम बघून काका-काकी दोघांनाही बरे वाटले. 

(क्रमश:)


Rate this content
Log in

More marathi story from Preeti Sawant

Similar marathi story from Horror