STORYMIRROR

Preeti Sawant

Children Stories Comedy Tragedy

2.6  

Preeti Sawant

Children Stories Comedy Tragedy

फसलेले रसगुल्ले

फसलेले रसगुल्ले

2 mins
85


रुही ऑफिसवरून घरी आली. तर तिची आई घरी नव्हती. तिने फोन करून विचारले तर कळले, ती आज सानिया मावशीच्या घरी गेली आहे आणि उद्या सकाळी येणार.

मग काय ती फ्रेश झाली आणि किचनमध्ये गेली. कारण तिचे बाबा यायच्या आधी तिला जेवण बनवून ठेवायचे होते.


पण किचन मध्ये जाताच तिला कळलं की, आई तर सगळं जेवण बनवून गेली होती.

मग रुही निवांत झाली. तिने स्वतःसाठी चहा ठेवला आणि दूध ओतण्यासाठी पातेलं बघायला गेली तर दूध संपलं होतं. जे थेंबभर होतं ते काही तिला चहासाठी पुरणार नव्हतं.

तिने असलेलं थेंबभर दूध ओतून घेतलं आणि कंटाळत टोप घासून नवीन दूध तापवायला ठेवलं आणि ती दूध उकळायची वाट पाहू लागली.

काही वेळाने तिने पाहिले तर सगळे दूध फाटले होते.


अरेच्चा!!आता काय करावे म्हणून तिने गॅस बंद केली आणि विचार करू लागली.

तेव्हा तिच्या लक्षात आले की, फाटलेल्या दुधाचे रसगुल्ले करतात. मग काय शेफ रुही तयार झाल्या रसगुल्ले बनवायला.

तिने आधी सगळे दूध गाळून घेतले आणि ते एका मलमल कपड्यात बांधून ठेवले.

थोड्यावेळाने ती मैदा शोधू लागली पण तो काही केल्या तिला मिळत नव्हता.


मग तिने आईला फोन केला आणि मैदा कुठे ठेवलाय हे विचारले. आईने सांगताच तिला मैद्याची ठेवलेली पिशवी दिसली. ती मनात म्हणाली, "आई पण ना. इथे मैदा आहे आणि मला दुसरीच जागा सांगितली."

तिने मलमलच्या कापडातला दुधाचा गोळा परातीत ठेवला आणि तिने माप घेऊन मैदा

त्या दुधाच्या गोळ्यात मिसळून तो मळायला घेतला. पण किती ही मैदा टाकला तरी कमीच. रुही वैतागली.


मग तिने कसे बसे त्याचे गोळे बनवून बाजूच्या गॅस वर तयार केलेल्या पाकात सोडले.

काहीवेळांनंतर तिचे बाबा ऑफिसवरून घरी आले. तिने लगेच सगळे किचन स्वच्छ केले आणि जेवण गरम करून तिच्या बाबांना वाढले.

इकडच्या तिकडच्या गप्पा करत दोघेही जेवले आणि मग तिने स्वीट डिश म्हणून रसगुल्ले असलेली वाटी बाबांच्या हातात दिली.

बाबा रसगुल्ले बघून खूप खुश झाले. रुहीने बनवलेले कळल्यावर त्यांना तिचे फारच कौतुक वाटले.


त्यांनी चमच्याने एक रसगुल्ला उचलून तोंडात टाकला तर तो इतका टणक झालेला की, त्यांनी तो अख्ख्या तोंडातून बाहेर काढला.

रुही बघतच राहिली. मग रुहीने रसगुल्ला तोंडात टाकला तर तो दगडासारखा टणक होता.


आता रुही रडकुंडीला आली. तिने तर नीट रेसिपी बघून रसगुल्ले बनवले होते. मग चूक कुठे झाली.

तिच्या बाबांनी जरी तिचे रसगुल्ले फसले असले तरी तिच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले.


मग तिने लागलीच तिच्या आईला फोन केला. तेव्हा तिला कळले की, तिने मैदा समजून पिठीसाखर वापरली होती आणि ती जास्त पडल्यामुळे रसगुल्ले टणक झाले होते.

रुहीची आईने सांगितलेले न ऐकून स्वतःच्या मनाचे केल्यामुळे फजिती झाली होती.


तर अशी होती रुहीच्या फसलेल्या रसगुल्याची कथा. 

~समाप्त~


Rate this content
Log in