पौराणिक कथा (अंतिम भाग )
पौराणिक कथा (अंतिम भाग )
या भागात आपण पौराणिक राक्षसांची माहिती घेणार आहोत.
आपण बहुतेक वेळा अत्यंत रक्तपात असणारे भयपट चित्रपट पाहतो त्याच प्रमाणे भयकथा पण वाचतो. पण यामुळे बऱ्याच वेळा भयावह स्वप्न पडल्याचे किंवा मानसिक आघात झाल्याचे आपल्याला अनुभवायास मिळते.
आपण परीकथा, दंतकथा आणि पौराणिक राक्षस अशा कथा सुद्धा ऐकत आलो आहोत. जगातील सर्व धर्मात अशा अध्यात्मिक संस्कृतीची आणि धर्माची विशेष ओळख म्हणुन स्वतःच्या धर्मातील घटनांचे रहस्यमय दृष्टांत सांगितलेले आहेत.
काही घटना या अचानक कोणी अदभुत विभूतीने प्रकट होऊन मदत केली, त्यांचा दयाळूपणा आणि प्रेमाबद्दलच वर्णन केलेले असते. तर काही घटना मात्र भयानक आणि भीतीदायक असून, त्यांचे काही भयानक प्राण्यांमध्ये रुपांतर होते अशा पण घटना आहेत.
ह्या सगळ्या कथांमध्ये किती सत्यता आहे हे सांगणे कठीण आहे. परंतु, एक जनरल नॉलेज म्हणून तुम्ही त्याकडे नक्की पाहू शकता. मला सुद्धा ह्याच माहिती मुळे पौराणिक राक्षसांबद्दल कळले. जी माहिती मी तुम्हा सर्व वाचकांसोबत शेअर करू इच्छिते.
अशीच एक कथा ज्यु लोकसाहित्यातील आहे. ज्यू लोकसाहित्यांमधे एक विशिष्ट डिब्बुकी (अद्भूत प्राणी) राहतो, जो एका मृत पापी व्यक्तीचा आत्मा आहे.
असे मानले जाते की, तो जे दुष्ट लोक माणसांना त्रास देतात, त्यांच्यासाठी तो एक पाठीराखा असतो आणि गरिबांच्या यातना कमी करून दुष्टांना शिक्षा करतो. तो या कामासाठी एखाद्या परकाया शरीरात प्रवेश करतो. त्यावेळेस लोक त्याला डिब्बुकी संचारला असे म्हणतात.
अशीच जिन्न बद्दल इस्लाम धर्मात रूढी आहे. इस्लामिक संस्कृतीमध्ये , एक पौराणिक प्राणी म्हणून, जिन्नची ओळख आहे. हा आपल्या अदभूत शक्तीने धूर आणि अग्नीपासून पंख तयार करुन एक क्षणात ज्यांनी आठवण केली तेथे पोहचतो. सर्व भूतखेत याच्या आज्ञेत राहुन त्याची सेवा करतात व तो सांगेल ते कोणतेही अशक्य काम आपल्या चमत्काराने शक्य करतात. इस्लाम धर्माच्या परंपरेनुसार भूताला इब्लिस नावाचा जिन्न म्हणून ओळखले जाते.
पाश्चात्य देशांच्या धर्मात सुद्धा राक्षसांचे अस्तित्व असे मानले गेले आहे. भयंकर राक्षस हे जिवंत माणसांच्या शरीरात प्रवेश करुन त्यांच्या हातून वाईट किंवा पीडिताला अडचणीत मदत पण करतात. असे पौराणिक राक्षस लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करुन लोक धास्ती मुळे आजारी पडतात. काही लोक मुद्द्याम मला राक्षसाला भेटायचे आहे, त्याच्याशी लढायचे आहे अशी धेर्य आणि धाडस दाखविणारी भूमिका घेतात. त्यातून मानसिक धक्के बसुन बरेच लोक मनोरुग्ण झाले आहेत.
आजकाल लोक जगातील इतर प्राण्यांवर / अदभूत चमत्कारावर विश्वास ठेवतात. उदाहरणार्थ, मलय देश (इंडोनेशियन) लोकसाहित्यांमधे एक निश्चित पोंटियानॅक (अद्भुत आत्मा) हडळ आहे.
तिचे लांब केस असुन ती (व्हँपायर) हडळ आहे. ही हडळ भितीदायक असून ती गर्भवती महिलांवर हल्ला करते. त्यांनी खालेले अन्न ती मंत्राने आपल्या पोटात घेते. त्यामुळे गरोदर महिलांना अशक्त पणा येतो. एखाद्या गरोदर महिलेस असा त्रास झाला तर त्यावर मंत्र तंत्राने उपचार करतात.
रशिया मध्ये राक्षस ही एक विकृत आणि त्रास दायक शक्ती आहे, याच्यावर लोकांचा विश्वास आहे. त्याला रक्तरंजित खाद्य आवडत असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
तो माणसाचे जगणे अनिश्चित आणि त्रासदायक करतो. त्याच्या अंगात पापी तत्व, पाण्याचे विष करणे , माणसावर भीतीदायक नकारात्मक प्रभाव, दुष्ट आत्म्याचे प्रतिनिधित्व असे त्याचे लक्षण आहेत. एखादा चांगला व्यक्ती त्याच्या मनात भरल्यास लपून तो त्याचा बळी घेतो. तसे त्याचे काही चांगले चमत्कार पण आहे. त्याच्या शक्तीने बुडणाऱ्या जहाजांमधील लोकांचे प्राण त्याने वाचविले असल्याचे लोक कथातून उल्लेख आहे.
समुद्रात पण असे भयानक आणि मनुष्याचे मांस खाणारी विशिष्ट राक्षस असल्याचे दक्षिण अमेरिकेतील एका देशाचे नागरिक भरवसा ठेवतात. दक्षिण अमेरिकेत एक देश अशा घटनांचा अनुभव असल्याचा उल्लेख करतो.
ब्राझिलियन लोकसाहित्यांमध्ये इंन्टाटाडो, साप किंवा नदीतील डॉल्फिन मासा मनुष्य रूप धारण करतो, अशी एक दंत कथा कदाचित बर्याच जणांनी ऐकले असेल.
असे म्हणता की त्याला लैंगिक सुखाची आवड आणि संगीताचा छंद आहे. त्यामुळे तो विशेषतः स्त्रियाना आपल्या श्वासाने भुल पाडून त्याच्या बद्दल आकर्षण निर्माण करतो. स्त्री त्या भुलीस बळी पडल्यास शेवटी तिचा मृत्यू होतो. अशा कथा आहेत.
"मॉन्स्टर ऑफ द वर्ल्ड" श्रेणीतील आणखी एक पौराणिक प्राणी म्हणजे गॉब्लिन.
त्याच्याकडे मानवी देखावा आहे. खूप उंच, केसाळ केस आणि चमकणारे डोळे. जंगलात राहतात, सहसा दाट आणि प्रवेश करण्यास अवघड किंवा अशा घनदाट अरण्यात त्यांचे वास्तव्य असते. ते गर्द झाडांमध्ये लपून बसतात. सतत एखादी व्यक्ती येते की काय यावर लक्ष ठेऊन असतात. त्यांच्या हाव भावाने आणि टाळ्या वाजवून महिलांना स्वतःकडे आकर्षित करून उपभोग घेतात.
लोचनेस मॉन्स्टर, स्कॉटलंड या नावाचा एक तलाव असून त्याची 230 मी. खोली आहे. हा यूकेमधील पाण्याचा सर्वात मोठा साठा आहे असे मानले जाते . याला सर्वात मोठा जलाशय, असून त्याला स्कॉटलंडमधील दुसर्या क्रमांकाचा पाणी साठा किंवा जलाशय असे म्हणतात. याची उत्पत्ती बऱ्याच काळापूर्वी म्हणजे युरोपमधील शेवटच्या बर्फ युगात पर्यंत जात असल्याचे संदर्भ आढळतात.
या तलावा बद्दल एक आख्यायिका असून या तलावामध्ये एक अदभुत रहस्यमय प्राणी राहतो. ज्याचा उल्लेख इ.स. 565 मध्ये प्रथम लेखी केला गेला होता. तथापि स्कॉट्स नावाच्या एका संशोधकाने प्राचीन काळापासून त्यांच्या लोककलांमध्ये जल राक्षसांचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख सत्य परिस्थिती वर आधारीत असून जल राक्षसांना सामुहिक "केल्पी" या नावाने ओळखतात.
आजकालचे आधुनिक लोक यांना नेस वंशाची ही एक उत्पत्ती असून या राक्षसांना नेसी असे म्हणतात. याचे संशोधक जवळपास 100 वर्षांपूर्वी सुरू झाले होते. १८३३ मध्ये, एका विवाहित जोडपे समुद्र किनाऱ्याच्या जवळ विश्रांती घेत होते. विश्रांती घेत असताना, त्यांच्या डोळ्यादेखत काहीतरी अदभुत, आक्राळ विक्राळ आणि भयभीत करणारा प्राणी जात असतांना दिसला. यानंतर १००० पेक्षा पण जास्त साक्षीदारांनी त्यांनी अक्राळविक्राळ आकृती पाहिल्याचा दावा केला आहे.
वैज्ञानिकांनी याची गंभीर दखल घेतली आणि ते या घटनेवर सत्य परिस्थिती शोधून काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अद्याप हे गुढ रहस्य काय आहे, याची उकल त्यांना करता आली नाही.
आजपर्यंत अनेक स्थानिक लोकांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, एक प्राणी दोन मीटर रुंद सरोवरात राहतो आणि ताशी 10 मैलांच्या वेगाने फिरतो. आधुनिक प्रत्यक्षदर्शींचा असा दावा आहे की नेसी खूप लांब मान असलेल्या राक्षसा सारखा आणि गोंधळलेला आहे, असे दिसते.
हेडलेसच्या तथाकथित व्हॅलीचे रहस्य म्हणजे जो कोणी या क्षेत्रात जातो आणि तो कितीही सशस्त्र असला तरीही तिथून आतापर्यंत कोणी परतलेले नाही.
लोकांच्या अदृश्य होण्याच्या घटनेचे निराकरण अद्याप झाले नाही. जगातील सर्व राक्षस तेथे जमतात की इतर काही परिस्थितीमुळे लोक अदृश्य होतात की नक्की काय हे आज पण एक गुढ रहस्य आहे.
कधीकधी घटनास्थळी केवळ मानवी डोके सापडले आणि तेथील रहिवासी भारतीयांचा असा दावा आहे की हे सर्व घाटीत राहणाऱ्या बिगफूटने केले आहे. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींचा असा दावा आहे की त्यांना खोल दरीत एक प्राणी दिसला जो राक्षस केसाळ माणसासारखा दिसत होता.
द व्हॅली ऑफ हेडलेसच्या गूढतेची सर्वात विलक्षण बाब म्हणजे येथून माणुस दुसऱ्या एखाद्या विश्वात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार आहे की काय इतकी गुढता निर्माण झाली आहे.
तुम्हाला जर याबाबत अधिक माहिती असेल तर मला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर अशा काही दंतकथा ऐकल्या, वाचल्या असतील तर मला नक्की सांगा.
सध्यातरी ही कथामालिका मी इथे संपवत आहे. पुन्हा भेटू नवीन रहस्यमय कथेसोबत.
~समाप्त~