STORYMIRROR

Preeti Sawant

Drama Romance Tragedy

4.0  

Preeti Sawant

Drama Romance Tragedy

खरं प्रेम एकदाच होते

खरं प्रेम एकदाच होते

7 mins
399


ही कथा आहे रितू आणि संजू या दोघांची..

असे कोणीतरी म्हटलेलंच आहे की,'हम एक बार जितें है । एक बार मरते है और प्यार...प्यार भी एक ही बार होता है।'

रितू अशी मुलगी होती जी नेहमी स्वप्नाच्या जगात रमलेली असायची. तिला प्रेमावर इतका विश्वास होता,की तिला वाटायचे तिच्या स्वप्नातला राजकुमार एक ना एक दिवस तिला नक्कीच भेटणार. 

तिला खूप मुलांवर क्रश व्हायचे, पण त्या पैकी कोणालाही विचारायची तिची कधी हिम्मतच व्हायची नाही पण तरीही अजून ती खऱ्या प्रेमापासून वंचित होती. अशातच एके दिवशी ती वृंदावन सोसायटीत राहायला आली. नवीन जागा, नवीन शेजारी, सगळ वातावरण तिच्यासाठी नवीनच होते.


त्या सोसायतीत संजू नावाचा एक मुलगा राहायचा. अतिशय देखणा, हुशार व वृंदावन सोसायटीची जान, कोणतीही मुलगी पाहताक्षणी प्रेमात पडेल असा होता संजू. पण असे असूनही त्याला कोणत्याच मुलींमध्ये इंटरेस्ट नव्हता.

एक सोडली तर बरं का..! तिचे नाव होते मिनू(मिनाक्षी). ती इतकी सिंम्पल, सुंदर, श्रीमंत, एखाद्या अभिनेत्री सारखी दिसायची. अगदी तिचा रुमाल खाली पडला तरी तो उचलायला मारामारी होईल, इतकी मुले तिच्या पाठी होती.

पण तिला त्याचा काहीच फरक पडायचा नाही. कारण ती संजूच्या प्रेमात अखंड बुडालेली असायची. सगळ्या सोसायटीत सगळ्या मुलामुलींना त्यांच्या जोडीचा हेवा वाटायचा. संजू तासन्तास बाल्कनीत मिनूला बघत उभा असायचा आणि ती पण सुद्धा बरं का.! 

असे म्हणतात की, कोणाचा आनंद जास्त काळ टिकत नसतो आणि जे नशिबात लिहून ठेवलय अगदी तसच घडते, त्याला तुम्ही आम्ही काहीही करून बदलू शकत नाही. ह्या दोघांच्या बाबतीत सुद्धा असच झाल. 

एके दिवशी मिनूची आई अचानक वारली आणि मिनूच्या वडिलांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. ते कायमचे बेंगलोरला शिफ्ट झाले. बिचारी मिनू काहीच करू शकत नव्हती. त्या वेळेला मोबाईल ही नव्हते. तरीही शक्य तितक्या वेळेला ती न चुकता संजूला फोन करायची. दोघेही फोनवर बोलताना खूप रडायचे. 

तेव्हा दोघेही शिकत असल्यामुळे भेटीगाठीचा प्रश्नच नव्हता. असं म्हणतात, पुढे तिचे फोन ही येणे बंद झाले. तसेच संजू सेटल नसल्यामुळे तिला लग्नाचे आश्वासन ही देऊ शकत नव्हता. असेच दिवस जात राहिले आणि एके दिवशी मिनूच्या मैत्रिणी कडून संजूला हे समजले की मिनूच्या वडिलांनी तीचे लग्न जमवलय म्हणून.

हे ऐकून संजूच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तो रडण्याशिवाय काही ही करू शकत नव्हता. त्या प्रसंगानंतर ह्या लव्हस्टोरीचा दुःखद एन्ड झाला

अशीच काही वर्ष उलटली. मोबाईल ही आले. पण संजूला ह्याचा काहीही फरक पडत नव्हता. कारण मिनूजी नव्हती त्याच्या आयुष्यात.

ऑफिस, घर आणि त्याची आवडती बाल्कनी व त्या बाल्कनीत मिनूच्या असंख्य आठवणी, हेच त्यांचे रूटीन झाले होते.

संजू अजूनही मिनूच्याच आठवणीत गुंग असायचा आणि दररोज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एकटक बाल्कनीत उभे राहून मिनूच्या बंद घराकडे बघत राहायचा.

पण आज इतक्या वर्षानी त्याला त्या घरात कुजबुज जाणवायला लागलेली. अशातच शेजारच्या पिंट्या (सोसायटी चा छोटा खबरी) कडून त्याला कळले तिथे कोणीतरी नवीन फॅमिली राहायला आलीये. कोण आहेत? किती जण आहेत? सगळे पिंट्या सांगत होता. पण संजूला त्याच्या बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता.कारण आता तो बाल्कनीत जास्त वेळ घालवू शकत नव्हता.


रितू आणि फॅमिलीला येऊन एक आठवडा झाला होता. त्यात त्यांच्या बऱ्याचश्या सोसायटीत ओळखी ही झाल्या होत्या आणि पिंट्या. तो तर रितूचा बेस्ट फ्रेंड झाला होता. तो रितू ताई..रितू ताई करत तिच्या अवतीभोवतीच असायचा आणि रोज तिला सोसायटीची इत्यंभूत माहिती द्यायचा. पण अजूनही तिची आणि संजूची भेट झालीच नव्हती. संजूने ही बाल्कनीत येणे बंद केले होते. 

पण एके दिवशी रितू आणि संजूची गाठ पडलीच. ती पण बाल्कनीतच..!

संजू फोनवर बोलायला बाल्कनीत आलेला आणि रितू सुद्धा. तेव्हा त्यांची नजरानजर झाली. पण संजूने रितूकडे न बघितल्या सारखे केले.

पण संजूला पाहताच रितू तो वही दिल हार बैठी. वो एक झलक अपना काम कर गयी||

रितूला कधी पिंट्याला भेटतेय आणि विचारतेय की हा देखणा कोण आहे असे झाले होते. पण शाळेला ख्रिसमस सुट्टी असल्यामुळे पिंट्या चार दिवस त्याच्या मावशीकडे गेलेला होता. रितूला त्याची वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. ती रोज वेळ मिळेल तेव्हा तासन्तास बाल्कनीत बसून संजूची वाट बघत असायची. पण काही केल्या संजू तिला दिसायचाच नाही. तिला तर त्याचे नाव पण माहीत नव्हते. तिने त्याचे नाव प्रिन्स चारमिंग ठेवले होते.


फायनली काही दिवसांनी पिंट्या घरी आला आणि तिने त्याच्यावर प्रश्नाची सरबत्ती करायला सुरुवात केली. तेव्हा तिला संजू आणि त्याच्या दु:खद लव्हस्टोरी बद्द्ल कळले. ते ऐकून ती इतकी भावूक झाली व तिला नकळत संजू आवडायला लागला.

ती रोज संजूची वाट बघत असे. संजू एका ठराविक वेळेलाच बाल्कनीत येत असे आणि रितू त्याला लपुनछपुन बघत असे. असे खूप महिने गेले. पण रितूची त्याच्याशी बोलण्याची हिम्मतच होत नव्हती. 

एके दिवशी पिंट्याने त्या दोघांची एकमेकांशी तोंड ओळख करून दिली आणि त्यानंतर रितू काही ना काही कारण काढुन संजूशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली. पण हाय हॅलो शिवाय संजू तिच्याशी काहीही बोलत नसे. त्याच्या हृदयात फक्त आणि फक्त मिनूच होती. तो सगळयाच सोसायटीतल्या मुलींशी हटकून वागत असे. 

रितूने संजूला या वेदनेतून बाहेर काढण्याचा पक्का निश्चय केला.


तिने हयात पिंट्याची मदत घ्यायचे ठरवले. रितू बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती आणि तिला अकाऊंट हा विषय खूप कठीण जात असे आणि संजू तर अभ्यासात खूप हुशार होता. म्हणून तिने त्याची मदत घ्यायचे ठरवले. 

जेणेकरून त्याचा सहवास पण मिळेल आणि त्याच्या जवळ जाण्याचा चान्स सुद्धा मिळेल. पिंट्याच्या मदतीने तिने अशी काही गुगली टाकली की, तिला नाही म्हणणे संजूला शक्यच झाले नाही. तो मुळातच हुशार असल्यामुळे अडल्या नडलेल्याना तो नेहमीच मदत करत असे. पण त्याला कुठे माहीत होते की, त्याच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवलय ते.


हळूहळू दोघेही खूप चांगले फ्रेंड बनले. अगदी बेस्ट फ्रेंड म्हणा ना..

रितूला काहीही प्रॉब्लेम झाला तरी ती संजूची मदत घेत असे. ते दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारत, पण फक्त फ़ोनवर. कारण उगाच सोसायटीत चर्चा नको म्हणून एकमेकांच्या समोर अगदी तोंडओळख असल्यासारखे दोघेपण वागत असत. संजू रितूला एका ठराविक वेळेलाच फोन करत असे आणि मग ते दोघे तासन्तास गप्पा मारत असत. त्यावेळी रितू कितीही बिझी असली तरी तो वेळ फक्त आणि फक्त संजूसाठीच असे. त्यावेळी ते दोघे एकमेकांशी दिवस भराचे सगळे शेअर करत असत. पण अजून ही संजूच्या मनात फक्त आणि फक्त मिनूच होती. तो जास्त वेळ रितुपाशी फक्त मिनूबद्द्लच बोलत असे. रितू पण त्याला समजून घेत असे. तिला खूपदा वाटे की ह्याला प्रोपोज करावे. पण नंतर तिला ही पण भीती असे की, संजूला जर हे आवडले नाही तर..म्हणून ती गप्पच बसत असे..


मिनू हळूहळू संजूच्या आयुष्यात विरळ होत चाललेली आणि तिची जागा त्याच्या आयुष्यात हळूहळू रितू घेत होती. पण तरीही तो रितूला एक चांगली मैत्रिणच मानत होता. आता तर संजूला लग्नासाठी स्थळे ही यायला लागली होती. पण तो नेहमी टाळाटाळ करत असे. एक दिवशी संजूची आई अचानक सिरीयस झाली. तिला कॅन्सरच निदान झाले आणि ती पण लास्ट स्टेज होती. संजूला काय करावे ते सुचत नव्हते. अशातच तिच्याकडे आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे असे डॉक्टरांनी संजूच्या घरातल्यांना सांगितले. संजू पूर्णपणे हताश झाला. त्याच्या आईने तिच्या आजाराची गोष्ट सगळ्या नातेवाईक आणि शेजाऱ्यांपासून लपवायला सांगितली आणि संजूकडे वचन मागितले की, ती मरायच्या आधी तिला सूनमुख पहायचे आहे. संजू या वेळेला काही कारण देऊ शकत नव्हता. त्याने ही आईच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला.

इथे ह्या सगळ्या व्यापात भरपूर दिवस त्याचे रीतूशी बोलणं झाले नव्हते. त्याला मेसेज वाचण्यास सुद्धा फुरसत नव्हती. रितूला इतकच माहीत होते की, संजूची आई आजारी आहे. या पलीकडे तिला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. इथे संजूचा मुलगी बघण्याचा कार्यक्रम जोरदार पार पडला आणि काही दिवसांत त्याचे लग्नही ठरले. लग्नाची तारीख पण 2 महिन्यांनी ठरली. आता तर संजूला उसंतच नव्हता. कारण लग्नाची सगळी जवाबदारी त्याच्या एकट्या वर होती. आईच्या आजारपणामुळे बाबा जास्त मदत करू शकत नव्हते. आई जवळ कोणतरी असणे भाग होते. अशा परिस्थितीत तो रितूला फोन करने ही विसरून गेला होता. बरेच दिवस त्याने तिच्या मेसेजला ही उत्तर दिले नव्हते.


इथे रितू तासन्तास बाल्कनीत उभी राहून संजूची वाट बघत असायची. पण कित्येक दिवस तिला त्याचे दर्शनही झाले नव्हते.

एक दिवस अचानक रितूला संजूचा फोन आला आणि त्याने इतक्या दिवसात घडलेली सर्व हकीकत रितूला सांगितली. रितूने त्याला खूप धीर दिला.

पण संजूच्या एका वाक्याने रितूच्या पायाखालची जमीनच सरकली. संजूने त्याचे लग्न जमलंय आणि ते पण 2 महिन्यात आहे,असे सांगितले. 

तो तिला म्हणाला, ती त्याची जवळची एकच मैत्रीण असल्यामुळे तिने त्याला जमेल तितकी मदत करावी अशी आशा संजुने व्यक्त केली. रितूने ही आपले दुःख लपवून लागेल ती मदत करायचे त्याला वचन दिले.

काही दिवसांनी लग्नाची तयारी जोरदार सुरू झाली. रितू शक्य तितक्या वेळा चेहरा आनंदी ठेवून जमेल ती मदत संजूला करत होती. 

पण म्हणतात ना 'प्यार पे किसिका जोर नही रहता', तिच्या बाबतीत अगदी तसच झाले. सगळे दुःख आत लपवल्यामुळे तिला त्रास होऊ लागला. ती ठीक जेवत ही नव्हती. एकटक काहीतरी विचार करीत असे. घरातले सगळे तिची काळजी करायला लागलेले. पण कोणालाही काहीच कळत नव्हते की, नक्की हिला काय होतंय ते. तिलाच माहिती ती कोणत्या वेदनेतून जात होती ते.

ही तिच्या सहनशीलतेची खरी परीक्षा होती. ती फक्त दिवस मोजत होती. आता लग्नाला 2 च दिवस शिल्लक होते आणि तिच्या तेव्हा अचानक तिच्या सहनशिलतेचा अंत झाला. तिने स्वतः संजूला फोन केला.

कारण नेहमी संजूच तिला फोन करत असे. त्याने फोन लागलीच उचलला. त्याचा आवाज ऐकून रितू खूप रडायला लागली ती स्वत:वर नियंत्रण ठेवू शकली नाही आणि मग तिने रडत रडत आपल्या मनातले प्रेम संजूसमोर व्यक्त केले.

त्यावेळी संजूला नक्की काय करावे सुचतच नव्हते. कारण त्याने कधीच रितुबद्दल असा विचारच केला नव्हता. त्याला रीतूला काय बोलावे, तिला कसे समजवावे हेच कळत नव्हते, त्यात लग्न 2 दिवसांनी होते. संजूने रितूला आपल्यापरीने समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती फक्त रडत होती. तिला एकदाच संजूला भेटायचे होते. पण संजूला ते शक्य नव्हते आणि तेवढ्यातच कोणतीतरी त्याला हाक मारली. घरात इतका गोंधळ होता की, संजूने रितूचा फोनच ठेवून दिला. रितूने पुन्हा संजूला फोन केला तर तो स्विच ऑफ येवू लागला. रितू त्यदिवशी खूप खूप रडली.

अखेरीस, लग्नाचा दिवस उजाडला. सगळी सोसायटी संजूच्या लग्नाला गेली होती. रितूचे आई बाबा सुद्धा. पण रितू मुद्दामच उशिरा गेली. लग्न समारंभ व्यवस्थित पार पडला. रिसेप्शन सुरू झाले. तेवढ्यातच रितूची लग्नात एन्ट्री झाली. सगळी लोके नवदाम्पत्याला शुभेच्या देत होते. फोटो काढत होते. रीतूने ही स्टेज वर जाऊन संजू आणि श्वेताला शुभेच्या दिल्या. संजू रितूला पाहातच राहिला. पण नेहमीप्रमाणे तो काहीच करू शकला नाही. 

अचानक त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि ही प्रेम कहाणी सुरू होण्या आधीच संपली..

रितू काही महिन्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी परगावी निघून गेली आणि तिथेच ती सेटल झाली. कारण आता वृंदावन सोसायटीत तिच्यासाठी काहीच उरले नव्हते.


समाप्त

(ही कथा आवडल्यास तिला नक्की शेअर करा. धन्यवाद.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama