रक्त भक्षक (भाग ५)
रक्त भक्षक (भाग ५)


असे म्हणताच डोळ्यात अचानक चररररररर पाणी आले
आणि सुन्न पडून गेलो. माझ्या डोळ्यासमोर तेच चित्र भिरभिरत होते, काय करावं कळत नव्हतं.
कुठे जावं हेही सूचत नव्हतं. शेवटी माझ्या घराच्या एका खोलीत
जाऊन कोपरा बघितला
आणि तिथेच दोन दिवस डोळ्याच्या पापण्या ऊघड्या ठेऊन बसून राहिलो.
माझ्या बायकोला माझी काळजी वाटत असावी.
म्हणून तिने एका तांत्रिकाला बोलावले. तो (तांत्रिक) काहीतरी पुटपुटत माझ्या खोलीच्या दरवाजापर्यंत आला.
मला बाहेरचं सर्व आतमध्ये ऐकू येत होतं.......
पण बाहेर निघायला धाडस होत नव्हतं. त्या तांत्रिकाने एका हातात कशाचा तरी धूर घेतला होता आणि एका हातात मोराच्या पंखाचा झाडू होता.
त्याने त्याच्या पायाने दरवाजाला एक जोरात लाथ मारली आणि दरवाजाची कडी तुटून उघडला गेला.
मला फार भीती वाटत होती. तो समोर येताच त्याचं ते भयानक रुप पाहून मला चक्कर येत होती.
(तांत्रिक वर्णन - गळ्यामध्ये कवळ्याची माळ आणि माणसाच्या सापड्याचे डोके लटकलेले होती,
चेहऱ्यावर पांढरी विभूती म्हणजे भस्म लावलेली होती... काळा पैजामा आणि काळेच शर्ट घातलेला होता, डोक्यावर लाल भडक कुंकवाचे बोटे उमटलेले होते)
तो जसा माझ्या जवळ आला तसाच... त्या तंत्राने त्याचे मंत्र सुरु केले. माझ्या समोर तो असल्यामुळे मला ते ऐकायला येत होते......
(”ओम् हां हीं हूं हौं ह: सकल भूतप्रेत दमनाय स्वाहा....”
”ओम ह्वीं क्लीं कंकाल कपालिनी कुंडबरी आडंबरी भंकार घ: घ:...”
“ह्वैं हूं प्रेत प्रेतेश्वर आगच्छ आगच्छ प्रत्यक्ष दर्शय दर्शय फट...”)
बहुतेक हे भुत बोलावण्याचे असावे आणि खरंच जोराने हवा सुटायला लागली तसेच घराचे दरवाजे आणि खिडक्या खट... खट... खट... खट
वाजत होते. हवेची गतीसुद्धा वाढली होती. बघता बघता घरात अंधार पडून गेला आणि माझ्या डोळ्यासमोरुन सररररररकन एक काळी सावली पळाली. त्याचे ते तंत्राचे मंत्र चालूच होते...
”ओम् हां हीं हूं हौं ह: सकल भूतप्रेत दमनाय स्वाहा...”
”ओम ह्वीं क्लीं कंकाल कपालिनी कुंडबरी आडंबरी भंकार घ: घ:...”
“ह्वैं हूं प्रेत प्रेतेश्वर आगच्छ आगच्छ प्रत्यक्ष दर्शय दर्शय फट...”
आणि... तिथे प्रकट झाला तो महाभयानक रक्त भक्षक...
वाचन पुढे चालू ठेवा...