हसा पण हळू
हसा पण हळू
चित्राताईंनी नवीन स्वयंपाकीण बाई ठेवल्या होत्या.
एक दिवस त्या त्यांना म्हणाल्या, 'काकू, आज आपल्या
कडे तीन पाहुणे येणार आहेत, तेव्हा स्वयंपाक कसा कराल?'
'कसा करु?', स्वयंपाकीणबाईंनी विचारले.
'म्हणजे ....ते तुम्हीच ठरवा', चित्राताई म्हणाल्या.
'हो ते झालंच. पण कसा करु करु?'
'म्हणजे?’
'म्हणजे तुम्हाला ते परत यावेसे वाटतात की नाही? यावर सगळा स्वयंपाक अवलंबून आहे.'