रक्त भक्षक (भाग ४)
रक्त भक्षक (भाग ४)
भाग ४
गणू ने मला स्मशानात बोट दर्शवल्या नंत्तर काहीच कळायला मार्ग राहीला नाही.....कारण स्मशानात ऐक पांढरी शुभ्र साडी घातलेली , लांब काळेशार केस सोडलेले , कपाळावर खुप मोठ्ठं गोलाकार कुंकू लावलेलं अशि ऐक स्त्रि तिथल्या निंबाच्या झाडाला टागंलेली दिसली......
काय कराव कळत नव्हत. कुठे जाव सुचत नव्हत माझे तिथेचं बारा वाजले होतो , गणू ने हवल खाल्लेली होती तो सुध्दा बेशुध्द पडला. मी तिथुन गावकरी मंडळी ना मोठ्याने आरोळ्या मारत होतो , हे पाहा गावकऱ्यानों या लवकर इकडे मला वाचवा.....वाचवा करत होतो.....
गावातीलं जवळ जवळ ५० लोक जमा झाली.....
ते तिथे येताच काय रे काय झालं ओरडायला.....
मि हे बघा सर्वनाश झालाय....गणुच्या घराकडे त्याचा मुलगा दाखवण्यास गेलो....तर..मी त्यानां आत पाठवले
मी बाहेरच ऊभा थांबलेलो होतो .
गोळा झालेल्या लोकांपैकी दहा बारा लोक घरात शिरली.....मला वाटलं त्यानां सुध्दा धक्का बसला असावा हा सर्व प्रकार बघुन .......मी डोक्यावर हात देऊन बाहेरच बसलो होतो आणि...........माझी नजर सतत त्या निंबाच्या झाडावर जात होती. घरातुन वश्या (वासुदेव)निघाला तो मला बघून माझ्या कडे मोठो मोठो डोळे करुन बघत होता....., काही वेळाने आत गेगेली सर्व मंडळी बाहेर आली आणि माझ्या कडे धक्का बसल्या सरखं बघत होती , त्यातिलच ऐक माणूल मला बोलला काय रे......कुठे काय आहे आत मध्ये....
अस कस काय.....होऊ शकते म्हनुन मी आत शिरलो तर........आत कोणिचं नाही मी त्यानां ओर
डून सांगत होतो गणूचा मुलगा मी येथे मृत अवस्थेत पाहीलाय.....ते जाऊद्या तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही का ,चला दूसरी कडे ....
मला दिसलेली ति बाई तिचे दाहा इंच बाहेर आलेली जिभ , डोळ्याचे बूबळ बाहेर आलेली ति निंबाच्या लटकलेली मी पाहीली होती पण सुध्दा तिथे नव्हती , आणि आचर्या ची गोष्ट अशी की गणू पण कुठे दिसत नव्हता मी गावकऱ्याना समजुन सांगण्याचा प्रयत्न करत होतो तरी ते ऐकायला तयार नव्हते , त्याचं लोकांमधील ऐक माणूस मला बोलला कोण गणू , आणि कोणत्या गणूचा मुलगा पाहीलाय तु......असं बोलल्या नंत्तर मला कसलच भान राहील नाही मी जाग़्यावर चक्कर येऊन पडलो .लोकांनी मला ऊचलुन घरी घेऊन गेले काही वेळानंत्तर मला जाग आला तर तेव्हा सकाळचे १० वाजले होतो माझ्या बाजूला बरीच मंडळी ऊभी होती त्यात आमच्या गावचे सरपंच सुध्दा होतो . सरपंचाने मला पाणि दिले आणि मला विचारले सविस्तर सांग काय झाले ?
तु का ओरडला ,आणि तुला का चक्कर आले, आणि तु सर्वाना का ऐकत्र आवज मारत होता...? मला काहीच कळात नव्हत कस सांगु काय सांगु...
नंत्तर मी सर्व प्रकार सरपंचाला सांगीतला, तर सरपंच ला हा सर्व सांगीतलेला प्रकार खोटा वाटत होता. तेच माणसाच्या मनात अनेक प्रश्न तयार झाले होतो...
त्याचं गर्दितुन ऐक ८० वर्षाचा म्हातारा पुढे आला तु कोणाला बघीतले....?
अरे ज्या लोकांना जाऊन आज ४० वर्ष झालेत............त्यानां तु परत कसं बघनार....?
*पुढे वाचा...............loding*